म्हणतात बुवा

Submitted by द्वैत on 13 February, 2017 - 13:51

valentine day special

म्हणतात बुवा, प्रत्येकासाठी कोणी ना कोणी असते
अन कधी ना कधी कुठे ना कुठे बघून कोणी हसते
रुक्ष बाकी दिवस सारे येतात आणि जातात
पण मोरपंखी ते चार दिवस डायरीत जपून राहतात

म्हणतात बुवा, प्रेमामध्ये दुनिया गुलाबी दिसते
गुलाबी सूर्य गुलाबी चंद्र अहो रात्र गुलाबी असते
त्याच गुलाबी चांदण्यात आपण सारी रात्र जागतो
अन मिटून घेतल्या पापण्या तरी तो चांदच दिसत राहतो

म्हणतात बुवा, प्रेमाला ह्या कसलीच उपमा नसते
अहो कळ्या फुल ठीक ह्यांना काट्यात प्रेम दिसते
अहो काट्याचा त्या दंश देखील मऊ शीतल होतो
लाजत लाजत हात तिचा जेव्हा हातामध्ये येतो

म्हणतात बुवा, हे प्रेमवीर थोडे वेडेच असतात
शून्यात नजर लावून कुठे एकटेच हसत बसतात
अहो मोजून श्वास घेणार्यांना हि धुंदी कशी कळणार
अन ओठ खोलून हसन ह्यांना कधी बर जमणार

कवी - dwait

Group content visibility: 
Public - accessible to all site users