काळीज भेदणारा,शर रेशमी निघाला!

Submitted by सत्यजित... on 13 February, 2017 - 10:40

अंदाज फार होता..थोडा कमी निघाला...
मज गीत भासलेला,तो बातमी निघाला!

वाटून काल गेले..बहरायचेच अाता...
हंगाम पावसाचा पण मोसमी निघाला!

हसणे उधार घेवुन मी स्वागतास गेलो...
मी तर डमीच होतो,तोही डमी निघाला!

टाळून चार नजरा,तो जायचा तिथे पण...
परतून यायचा हां!तो संयमी निघाला!

फौलाद काळजाचा होतो गडी तसा मी...
काळीज भेदणारा,शर रेशमी निघाला!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users