गार वारा

Submitted by vijaya kelkar on 13 February, 2017 - 05:32

गार वारा

थंड गार वारा, कोणीच देत नव्हते थारा
आंबट तोंड करत निघाला तरातरा
करी आंबट-गोड फळांचा मारा
पानांना म्हणाला हात धरा, फेर धरा
तेवढ्यानं त्यांचा लाल झाला चेहरा
देठातनं एक पान वाकलं, पण फिकुटलं
वाऱ्याने पुन्हा खुणावलं
तसं अलगद खाली आलं
झाड रागावलं वाऱ्यावर
साऱ्यापानांना सोडून दिलं वाऱ्यावर
आणि नवी पर्णे घेऊन आलं
नाचू लागलं,धक्का दिला वाऱ्याला
आता..वारा वरमला
गोड-गोड बोलू लागला
कळलेच नाही केव्हां झोंबू लागला ~~~
विजया केळकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त!