वार्धक्याचे जिणे

Submitted by गवंडी ललिता on 13 February, 2017 - 00:41

वार्धक्याचे जिणे

थकले शरीर पण, मन अजून तरुण आहे
वार्धक्याने झाली कमान, नजर क्षितीजाच्या पल्याड आहे

थरथरणारे हात, आधारासाठी अधीर आहेत
आपल्याच प्रियजनांना, मी मात्र नकोसा आहे

मी न कुणाचा, कुणी न माझे, हेच सत्य आज आहे
माझ्याच घरात माझीच आता, अडगळ आहे

कानांनी आणि डोळ्यांनी, साथ तर केंव्हाच सोडली आहे
कोण आले, काय बोलले, मनाच्या अंदाजाने ओळखतो आहे

ओठ ओठातच पुतपुटतात, डोळ्यात धुक्यांचे थवे आहे
वार्धक्याच्या जीवनाला आता, वृद्धाश्रमाचा आधार आहे

नव्हतेच घर माझे, अन् मी न घराचा कोणी
एकटया जीवनात आता, चाललो पहा अनवाणी

-ललिता गवंडी, अकोले

Group content visibility: 
Use group defaults

प्रतिसाद साठी सगळ्याचे धन्यवाद ........
कधी तरी , वृद्धां साठी वेळ दिला की मग मन प्रसन्न होतं .........
त्यांच्या मनाची घालमेल थोडेफार कमी होते......