रीत

Submitted by vijaya kelkar on 12 February, 2017 - 02:13

रीत

मन मनास घुसळे
भावांनी (भावनांनी )भाव जागवावे ...

दु:ख दु:खात मिसळे
सुखांनी सुखात मिरवावे ...

राग रागावर उसळे
लोभांनी त्यास लोभात बुडवावे ...

घाव दाण्यावर देती मुसळे
फुंकरींनी कोंड्यास उडवावे ...

वीज विजयात सळसळे
पाण्याने सरसर-झरझर धावावे ...

धुसफुसत सासूने सुनेस म्हणावे -'धसमुसळे '
हसत सुनेने घरास उजळावे......

विजया केळकर ____

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults