Submitted by द्वैत on 9 February, 2017 - 05:51
वाटते प्रेम व्हावे तुला पाहुनी,
गीत मी गुणगुणावे तुला पाहुनी
ध्यास लागो दिला ह्या तुला पाहण्याचा
तुझ्या लोचनी मी सदा राहण्याचा
अन् एकदा तु हसावे मला पाहुनी
वाटते प्रेम व्हावे तुला पाहुनी
भेट व्हावी अचानक कधी पावसाळी
तु बघुन ना बघावे मला सान्जवेळी
अन् एकदा तु पहावे पुन्हा वळुनी
वाटते प्रेम व्हावे तुला पाहुनी
भावना शब्द व्हाव्या गुलाबी रुमाली
ओठ ना उत्तरावे हसु उमटावे गाली
अन् एकदा तु फुलावे जरा लाजुनी
वाटते प्रेम व्हावे तुला पाहुनी
रचना - द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त ....
मस्त ....
छान लिहिता तुम्ही...
धन्यवाद
धन्यवाद