Submitted by राजेंद्र देवी on 9 February, 2017 - 05:31
काळ...
नाही पाहू शकलो स्वप्ने उद्याची
वर्तमानात झोपलोच नाही
थकले तन माझे
मन अविरत चालत राही
नाही पाहू शकलो दिवास्वप्ने
भूतकाळाने पिच्छा सोडला नाही
ना रमलो मी भूतकाळांत सुद्धा
भविष्याची चिंता त्राही त्राही
आयुष्याचे व्याकरण
कधीच जमले नाही
तिन्ही काळ , ना पूर्णं, ना अपूर्णं
सारे चालू काळातच राही
राजेंद्र देवी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आयुष्याचे व्याकरण
आयुष्याचे व्याकरण
कधीच जमले नाही
तिन्ही काळ , ना पूर्णं, ना अपूर्णं
सारे चालू काळातच राही >> छान अप्रतिम ..!
धन्यवाद....
धन्यवाद....
मराठी व्याकरण छानच आहे ...
मराठी व्याकरण छानच आहे ...
कविता आवडली..
धन्यवाद ललिताजी...
धन्यवाद ललिताजी...