अंतर्मनाची शक्ती (intuition) की बोला फुलाला गाठ - देव जाणे

Submitted by वृंदा on 8 February, 2017 - 16:15

अंतर्मनाची शक्ती (intuition) की बोला फुलाला गाठ - देव जाणे

असं म्हणतात की सगळ्यांना अंतर्मनाची शक्ती असते फक्त अनेकांना माहित असते किंवा माहित असले तरी वापरता येत नाही.
अनेकांना पुढे काय घडेल ह्याचा अंदाज येतो (logical thinking )किंवा उत्स्फूर्त (intuition )पणे सुद्धा कळते.

मला सुद्धा अंतर्मनाची शक्ती आपल्यात आहे हा शोध आत्ता म्हणजे २-३ वर्षांपासून लागला आहे किंवा तो माझा भ्रम पण असेन . पण काहीतरी आहे हे नक्की .. माझे लॉजिकल थिंकिंग माध्यम आहे म्हणजे त्या पलीकडे असे नक्कीच आहे . मी माझे अनुभव सहज म्हणून शेअर करतेय .

१. २०१४ ची गोष्ट नुकताच व्हाट्स अँप वापरायला सुरू केलेले . तेव्हाचा हा अनुभव . त्या वर्षी अनेकदा लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्या बद्दल लेख ग्रुप वर पाठवायचे ते पाहून मला खूप अस्वस्थ आणि वाईट वाटायचं जे सगळ्यांनाच वाटते . एकदा मात्र न राहवून एका अशाच ग्रुप ला म्हणाले "आपण काहीतरी करू या " असे वाटत होते की फंडस् गोळा करून (like help age India ) त्यांना पैसे पाठवू या पण कोणी म्हणजे कोणीच प्रतिसाद दिला नाही मग मी पण व विषय सोडून दिला पण आईला म्हणाले " आई , कोणीतरी मोठे माणूस किंवा प्रसिद्ध लोकांनी पुढाकार घेऊन त्या लोकांना मदत केली तर बरं होईन त्यांचे लोक पण ऐकतील ( कारण माझे कोणी ऐकले नाही) " खूप तळमळीने म्हणाले आणि काय आश्चर्य पुढच्याच वर्षी सप्टेंबर २०१५ ला नाना पाटेकर आणि मकरंद अनारसपुरे ह्यांनी "नाम " म्हणून संस्था स्थापन केली आणि हो माझा खूप आवडता नट म्हणजे अक्षयकुमार ने सुद्धा आत्महत्याग्रस्त लोकांना मदत केली !!
मला तर खूप खूप आनंद झाला माझं खरे ठरले त्यापेक्षा काहीतरी चांगली सुरुवात झाली त्याचा !!

२. २००२ ची गोस्ट तेव्हा नुकतंच टीव्ही केबल घेतलेलं तेव्हा "सुरताल" म्हणून गाण्यांचा प्रोग्रॅम लागायचा झी मराठी वर .. तेव्हा एक ६-७ वर्षांची चिमुरडी एका छोट्या स्टुलावर बसून गाणे गायची ..आवाज तर खूप चॅन होता पण त्यापेक्षा ती खूप गोड आणि सुंदर दिसायची मी तेव्हा एकदा म्हणाले " हि मुलगी पुढे हिरोईन होणार बघ " आणि तसंच खरं ठरलं ती म्हणजे "टाइमपास " पिक्चर ची हेरॉईन केतकी माटेगांवकर !!!
अगदी तसंच २००९ ला "लिटल चॅम्प सारेगमपा " ला जेव्हा मी आर्या आंबेगावक ला पहिला तेव्हा ती नववीत आणि सगळ्यात मोठी कॉन्टेस्टंट होती . मी म्हणाले हि छान आहे दिसायला फक्त दात ठीक केले कि छान दिसेन आणि तसं आणि तसाच घडले . आर्या ने हेरॉईन म्हणून सुरुवात "ती सध्या काय करते " मधून केली !!!

३. मला थोडीफार पत्रिका कळते माझ्या एका मैत्रिणी ची सहजचं पत्रिका पहिली ( मी ज्योतिषी नाही आणि चुकून पण होणार नाही ... कारण नंतर सांगेन ) तर तिच्या पत्रिकेत "प्रेम विवाहाचे " योग होते आणि तिचे पण एका मुलावर प्रेम होते पण घरचे जात वेगळी म्हणून विरोध करत होते म्हणून त्याच्याशी लग्न होईल का म्हणून विचारात होती .. मी म्हणाले "काळजी करू नकोस .. घरचे कितीही विरोधात असले आणि अरेंज मॅरेज साठी कितीही प्रयत्न केले ..मुले पाहिलीस तरी तुझे लव्ह मॅरेज च होणार " तसंच खरं झालं त्या मुलाशी लग्न झालं पण माझ्यामनात ते लग्न यशस्वी होणं नाही असं मन सांगत होतं आणि झालंही तसंच खूप वर्षांनी कळले तीच त्या मुलाशी डिवोर्स झाला आणि लगेच तिचे दुसरे लग्न ठरले आणि मजा म्हणजे त्या मुलाने मागणी घातली आणि तिला हि आवडत होताच म्हणजे दुसरेही लव्ह मॅरेज !!

साल २००७ ची गोस्ट असेन अजून एक मैत्रिणीची पत्रिका पाहिली पण सगळीकडे डिव्होर्स चे योग होते पण मी तसं तिला सांगितलं नाही नंतर कळलं कि तिचे वैवाहिक लाइफ चांगले नव्हते आणि लवकरच डिव्होर्स घेणार आहेत आणि तो झालाही .. मला त्याचे खूप मनापासून वाईट वाटले !!!

४. साल २०१४ असेच एका मैत्रिणीची पत्रिका बघून सांगीतल की तु आणि तुझा नवरा नक्कीच abroad ला जातील आणि लगेच २-३ महिन्यात गेली पण !!( आजकाल १० पैकी ८ जातात ..त्यामुळे हा फक्त योगायोग होता ) मला खरंतर बघून नाही कळत पण सगळे उत्स्फूर्त पणे बोलून गेले !!

५.साधारण एप्रिल २०१४ ची गोस्ट असेन मी जवळच्या ' खंडोबा ' मंदिर ला आई बरोबर गेले . तेव्हा मी आई ला खंडोबा चा इतिहास विचारत होते
पण ती म्हणाली फारशी माहिती नाही तेव्हा मी म्हणाले ' खंडोबाची ' माहिती कुठून मिळाली तर बरे होईन किंवा ह्यावर कुठली सिरीयल यायला हवी आणि काय आश्चर्य लगेच म्हणजे मे २०१४ पासून "जय मल्हार " नावाची सिरीयल सुरु झाली !!

अनेकदा मी जे बोलते तसंच नंतर घडते किंवा तशी बातमी कानावर येते.

मजा म्हणजे मी जे काही खात असेन म्हणजे भेळ , एकादी भाजी किंवा काही खाण्याचं विचा येत असेन तसंच थोड्यावेळाने t.v सिरीयल मध्ये दिसते . मला ह्याची मात्र खूप गम्मत वाटते.

असे अनेक आणि बरेच अनुभव आहेत फक्त खंत म्हणजे स्वतःबद्दल काही फारशी intuition नाही . एवढा आठवतंय २००४ ला खुप अस्वस्थ होते खूप म्हणजे खूपच !!! पुढचा आपला काळ कठीण आहे हे मला आतून वाटत होते ( कदाचित कुणाला नकारात्मक विचार वाटेन ) आणि तसच झालें कठीण काळ अजूनही संपला नाही त्यात अनेक ज्योतिष वाऱ्या झाल्या पण समाधान नाही उलट काही ज्योतिष लोकांमुळे उरले सुरले hopes पण संपलेत ( काही चांगले पण ज्योतीषी असतील )आणि मिळाला तो म्हणजे नुसता मनस्ताप !!!( अजूनही अस्वस्थ आहे आणि मी ह्यावर काहीतरी लिहावे असे वाटते .. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढली तरी चालेन पण ज्योतीषीच्या नादी लागू नये .. तुम्हाला फक्त संताप आणि मनस्ताप मिळेल .. म्हणजे कसं आ बैल मुझे मार )

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@वृंदा,
तुम्ही तूच आहेस तुमच्या जिवनाचा शिल्पकार हे पुस्तक वाचले आहे का?
The POWER of Your Subconscious Mind मधील बरेच उतारे व त्याचे स्पष्टीकरण या पुस्तकात केले आहे. शिवाय त्या अनुषंगाने बरीच संतवचनेही दिली आहेत. कर्म व त्याचे फळ याबद्दलही त्यात दिलेले आहे. असो.

तरीपण कर्म व कर्मफळ हे सिध्दांत अभ्यासताना खालील गोष्टींचापण विचार केला गेल्यास फायदा होऊ शकेल असे वाटते.
१. पाप पुण्याच्या अनेक व्याख्या आहेत. पण त्रिकालाबाधीत अशी एकच व्याख्या आहे असे म्हणतात. ती म्हणजे
कृतज्ञता म्हणजे पुण्य व कृतघ्नता म्हणजे पाप.

२. माणसाचा अहंकार (अभिमान) खूप मोठ्याप्रमाणात पुण्य खातो.

३. या जगात सज्जन माणसांना सर्वात जास्त दु:ख भोगायला लागते कारण मी सज्जन आहे याचाच तो अभिमान धरतो.

४. आपल्या होणार्‍या स्तुतीमुळे आपले चांगले कर्मफळ खूप मोठ्याप्रमाणात खर्ची पडते.

तुम्ही खूप गंभीरपणे विचार करत आहात असे लिहिले आहे म्हणून काही मुद्दे सुचवले आहेत.

धन्यवाद ! खूप छान पद्धतीने सांगितलंत तुम्ही आणि पटलेही ! Happy ग्रेट !!

पहिला पॉईंट तर खूप पटला . बरोबर आहे 'कृतज्ञता म्हणजे पुण्य' आणि मी पण मानते पण माणसाला जे आहे त्या पेक्षा काय नाही त्याचीच जास्त तक्रार असते Happy

अहंकार किंवा अभिमान तर सगळयांना देह आहे तो पर्यंत असणारच ना !! तो नसणे फक्त साधुसंतांचा शक्य.

राहता राहिला प्रश्न 'स्तुतीचा ' तर एक मुलगी आणि माणूस पण असल्यामुळे खूप प्रिय आहेच !! Happy Happy

वॄंदाजी, नेहमीचा प्रश्न आहे हा. यावर उत्तर खालील प्रमाणे.

महाभारत युद्धानंतर धृतराष्ट्राने कॄष्णाला विचारले, मी का असा आंधळा जन्माला आलो आणि माझे सर्व शंभर पुत्र का मारले गेले? अलम दुनियेत मीच एकला इतका भयंकर अभागी कसा? कॄष्ण उत्तरला. या जन्माच्या आधीच्या पन्नासाव्या जन्मात तू एक पारधी होतास, तू एकदा शिकारीला गेला होतास. तेव्हा एका पक्ष्यावर तू बाण चालवलास, पण तो पक्षी बाण चुकवून उडाला... तू रागात येऊन त्याची शंभर अंडी आपल्या पायाने चिरडून टाकलीस, आपली शंभर पिल्ले तुझ्यापायाखाली चिरडली जात असतांना तो असहाय बाप दुसर्‍या झाडावर बसून तुझ्या कृत्याकडे हताशपणे, तीव्र यातनेने तडफडत बघत होता... जे दु:ख तू त्या पाखराला दिलेस, तेच दु:ख, आपली शंभर पोरं आपल्या डोळ्यासमोर मरतांना बघून तुला हताशपणे भोगावे लागले...

धृतराष्ट्र म्हणाला, "हो, मान्य आहे.. पण ह्या पन्नासाव्या जन्मातच का, आधी किंवा नंतर का नाही?"

कृष्ण म्हणाला, "शंभर पुत्र व्हावे ह्यासाठी खूप पुण्य लागतं... एवढे पन्नास जन्म तू ते पुण्यच कमावत होतास... ते पुण्य कमावलंस... तुला १०० मुलं झाली आणि तुझ्या पन्नास जन्माआधीच्या कर्माचा हिशोब पूर्ण व्हायची वेळ आली. तो पूर्ण झाला."

-------
प्रत्येक बीजाला फळायला वेगवेगळा कालावधी लागतो... काही दोन आठवड्यात फळतात.. काहींना सहा महिने लागतात तर काहींना वीस वर्षे, शंभर वर्षे लागतात फळे धरायला... तसेच कर्माचे आहे. आज घडलेले कर्म कदाचित पूर्वकर्माचा हिशोबही असेल.. आज भोगलेला आनंद पूर्वकर्माचं संचित असेल...
------------
आता यापुढे आणखी प्रश्न उभे राहतीलच... ही चर्चा अनंत आहे.. त्यापेक्षा कर्मबंधनातून मुक्त होण्याचे प्रयत्न केलेले केव्हाही उत्तम.

नानकळा जी धन्यवाद ! उदाहरणे योग्य आणि समर्पक दिली आहेत .

प्रत्येक बीजाला फळायला वेगवेगळा कालावधी लागतो... काही दोन आठवड्यात फळतात.. काहींना सहा महिने लागतात तर काहींना वीस वर्षे, शंभर वर्षे लागतात फळे धरायला... तसेच कर्माचे आहे.>> हा मुद्दा जास्त पटला .

माझा प्रश्न आहे आपल्याला मागचे कर्म कसे कळणार ??

पुनर्जन्म असणारच ! रिप्रोड्युस करण्यापेक्षा रिप्लेस जास्त सोप्पे !!

धाग्याचा विषय कर्म हा आहे ला वृंदातै?

मला intuition वगैरे काही माहीत नाही, पण ज्याचा तुम्ही 'मनापासून' विचार करता , ते तुमचं मन आणि आसपासचा परिसर ऐकतं आणी त्यानुसार वागतं. त्यामुळे माणसाने नेहमी पॉजिटिव्ह रहावं...
या धन- ऋण शक्तीला काही लोकं पॉजिटिव्हिटी/ निगेटिव्हेटी म्हणतात.. काही लोकं देवाची कृपा/ देवाचा कोप म्हणतात...
ज्याला जे वाटतं त्याने ते म्हणावं

"माझा स्वतःवर पुर्ण विश्वास आहे , माझं हे काम होणारच" म्हणा किंवा "माझा माझ्या देवावर खुप विश्वास आहे , माझं हे काम होणारच" म्हणा दोन्हीचा इम्पॅक्ट सारखाच आहे...

उदाहरण म्हणून एक प्रसंग सांगते -

युएसचा एच १ व्हिसा हे पुर्णपणे लक आहे... लॉटरीत लागला तर लागला...
माझ्या टिम मधे आम्हा ४ लोकांसाठी व्हिसा रेज केलेला.. पैकी माझं म्हणणं होतं मिळाला तर मिळाला , नाही मिळाला तर नाही मिळाला .. माझी केस सोडून देऊत..
माझी एक मैत्रिण ज्या दिवशी व्हिसा रेज केला तेंव्हा पासून म्हणत होती, ' यार ये सब लक की बात है, मुझे नही लगता अपना व्हिसा होगा, आय डाऊट लॉटरी मे भी आयेगा"
दुसरा मित्र म्हणत होता " मला मिळणार व्हिसा.. आयेम शुअर" अर्थात अनेकांनी त्याची खिल्ली उडवली कारण खरचंच कोणीच इतक्या ठामपणे मला मिळणारच म्हणू शकत नाही
तिसरा मित्र म्हणाला, "व्हिसाका पता नही बट आयेम शुअर मै मार्चसे इस ओडीसी मे नही रहुंगा", त्याला म्हणायचं होतं लॉटरीमधे सिलेक्ट नाही झाला तर मी प्रोजेक्ट बदलेन किंवा कंपनी बदलेन... हे सगळं न म्हणता त्याने ' इस ओडिसी मे नही रहुंगा' म्हणणं प्रेफर केलं
मला लग्गेच ट्रॅव्हल करणं शक्य नव्हतं पण माझ्याकडे ट्रॅव्हल थांबवायला दुसरे पर्याय होते

आम्हा ४ ही जणांचा व्हिसा लॉटरी मधे सिलेक्ट झाला.. पहिल्या मुलीला सगळे म्हणायला लागले, बघ तू तर म्हणत होतीस होणार नाही, आणि तिने तात्काळ उत्तर दिलं ' अजुन अप्रूव्ह कुठे झालाय'

पुढच्याच महिन्यात आम्हाला आरएफई आली, आर एफ ई म्हणजे त्यांना आणखी डॉक्युमेंट्स हवे होते... तिचं सुरू झालं "बघा म्हणलेलं की नाही" Uhoh
दुसरा मित्र मात्र म्हणत होता की "इट्स ओके.. होईल अप्रूव्ह.. डॉक्युमेंट्स तर सबमिट करायचेत.."
तिसरा तो मार्च पासून ओडीसी मधे नसण्याबद्दल ठाम होता तर मी म्हणत होते,' व्हिसा अप्रूव्ह झाला तर चांगलं आहे पण मला किमान मार्च पर्यंत कुठेही जायचं नाहीये'
ही सगळी ऑक्टोबर २०१५ ची कहाणी...

नोव्हेंबर २०१५ ला एकाच दिवशी आम्हा ४ ही जणांना आरएफई बद्दल ईमेल्स आले..
एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही चारही जणांनी सेम डॉक्युमेंट्स सबमिट केलेले (पर्सनल मार्कशीट वगैरे सुद्धा एकाच ठिकाणीवरून स्कॅन केलेली ) तरीही चौघंपैकी फक्त पहिल्य अमैत्रिणीचा व्हिसा रिजेक्ट झाला..
आम्ही उरलेल्या तीन जणांचा अप्रूव्ह झाला आणि दुसर्‍या मित्राने १ डिसेंबरला अमेरिकेला ट्रॅव्हल केलं..

आता उरलो आम्ही २.. मी मला किमान मार्चपर्यंत जायचं नाहीये यावर ठाम होते आणि तिसरा मित्र मला मार्चच्या आत या ओडीसी मधुन बाहेर पडायचंय यावर ठाम होता..

जानेवारी मधे आमच्याकडे रिक्वायरमेंट नव्हती पण फेब मधे येणार होती, सो या मित्राला मॅनेजरने सांगितलं की तू पॅकिंग सुरू कर, १ फेब ला तू ट्रॅव्हल करतोयेस. हा मित्रही खुष, मी पण खुष कारण फेब मधे हा गेला की मार्च मधे पुन्हा लग्गेच अमेरिकेत कोणाची गरज नव्हती..

जानेवरीच्या शेवटच्या आठवड्यात एक घटना घडली -
मी डेटावेअर हाऊस मधे काम करते, क्लाईंट अमेरिकेतले बरीच नावाजलेली बँक आहे.... बरीच बॅकग्राऊंट व्हेरिफेकेन्स वगैरे होतात आम्हाला या प्रोजेक्ट मधे घेण्या आधी... माझ्या व्हेरिफिकेशन साठी तर लोकल पोलीस पण आलेले घरी पहिल्या वेळेला... सांगायचा मुद्दा हा की इतकं सेन्सेटिव्ह आहे आमचं प्रोजेक्ट..
अर्थातच मोबाईल फोन/सुरी/चाकू/बंदूक वगैरे ओडीसी मधे अलाऊड नसणं, क्लाईंट मेलबॉक्स वरून पर्सनल मेल बॉक्स वर ईमेल न पाठवणं वगैरे जी बंधन असायला हवीत ती आहेत...

जानेवारी तिसर्‍या आअठवड्यामधे या मित्राने आम्हाला पार्टी दिली, बिल क्रेडिट कार्ड वरून पे केलं... नंतर क्रेडिट कार्डचं बिल भरायचं म्हणून क्लाईंट मशिन वरून लॉगिन केलं आणि बिल भरलं आणि बिलाची रिसिप्ट पर्सनल ईमेल वर पाठवून दिली..... इथेच तो चुकला... क्लाईंट मशिन वर जे जे ऑटोमेटेड चेक्स आहेत त्यांनी प्रोजेक्टच्या व्हिपीला ईमेल पाठवला आणि दुसर्‍या दिवशी त्या व्हिपीने आमच्या मॅनेजरला एकच ईमेल पाठवला दोनच शब्दांचा - "रिलिज हिम"... चुकीला माफी नाही Proud

त्याचं म्हणणं होतं 'तो मार्चच्या आत ओडीसीच्या बाहेर पडणार.. आणि तो मार्चच्या आत ओडीसीच्या बाहेर होता"

आता हा जात नाही म्हणल्यावर सगळे माझ्याकडे वळाले Uhoh
रिक्वायरेमेंट आहे, जावंच लागेल, दुसरा कॅण्डिडेट नाहीये वगैरे वगैरे वगैरे.... मी खुप समजावायचा प्रयत्न केला की आत्ता जाणं शक्य नाहीये किमान मला १-२ आठवडे द्या... ते हो म्हणाले आणि मी फेबच्या दुसर्‍या आठवड्यात ट्रॅव्हल करायचं म्हणून शॉपिंगचा विचार करू लागले..
२९ जानेवारी २०१६ ची ही गोष्ट....

सोमवारी १ फेब ला मी ऑफिसात गेले आणि मॅनेजरने सांगितलं - रिक्वायरमेंट होल्ड वर गेलीये.. होल्ड कधी उठेल माहीत नाही, तुला आत्ता ट्रॅव्हल करता येणार नाही आणि इतक्यात किमान ऑक्टोबर २०१६ पर्यंत तरी रिक्वायरमेंट पुन्हा येईल असं वाटत नाही, तुला हवं असेल तर तुला रिलिज करतो प्रोजेक्ट मधुन, दुसरीकडून जा तू युएसला...
मी म्हणाले मला फरक नाही पडत, मिळालं जायला तर ठिकेय नाही तर मी एप्रिल नंतर विचार करेन काय करायचंय त्याचा...

३ मार्च २०१६ ची गोष्ट - मॅनेजर माझ्याकडे आला आणि म्हणाला - २ एप्रिल ला ट्रॅव्हल करायचं तुला.. आता नाही म्हणू नकोस, तू म्हणालीस एप्रिल मधे हरकत नाही.. रिक्वायरमेंट परत आपल्याकडे आलीये आणि आपल्याला कोणाला ना कोणाला पाठवावंच लागणार आहे... मी चटकन हो म्हणाले कारण मार्च मधे आमच्या घरात एक संकट आलेलं त्यातुन तरून जायला मला पैश्याची खुप गरज होती..

या सगळ्या घटने कडे -
माझी पहिली मैत्रिण intuition म्हणून बघते , मुझे पेहलेसे पता था, मेरे साथ यही होता है हमेशा..
दुसरा मित्र पॉजिटिव्हेटी म्हणून बघतो - नेहमी तुम्हे एजो विचार करता ते तसं घडतं
तिसरा मित्र वाईट शक्ती म्हणून बघतो - नजर लग गयी रे मुझे.. बाकी कुछ नही
मी संपुर्ण पणे देवाची कृपा म्हणून बघते - बरोबर ज्या वेळेला मला पैश्यांची गरज होती त्याच वेळेला कॅन्सल झालेली रिक्वायरमेंट परत येते काय आणि मी इथे येते काय... माझ्याकडे याला दुसरं नाव नाहीये.

आम्ही चौघंही आमच्या जागी बरोबरच आहोत.. त्रयस्थ म्हणून पाहिलं तर आमची केस वेगळी दिसते
पहिलीनं निगेटिव्ह विचार केला म्हणून असं झालं
दुसर्‍यावर देवाची कृपा म्हणुन इतकं सगळं पटकन/ विनासायास झालं
तिसर्‍याने मागुन घेतलं म्हणून त्याच्या बाबत असं घडलं
माझं नशीब चांगलं म्हणून हवं ते मिळालं

या भल्या मोठ्या पोस्टचं एकच सार -
तुम्ही जो विचार करता ते देव तुम्हाला देतो.... नियती तथास्तू म्हणतेच!!!!

वृंदा, तुम्ही साध्या भोळ्या आणि प्रामाणिक आहात. तुम्ही कठीण परिस्थीतीतून जाताय असं तुम्ही म्हणालात. त्यातून सावरुन तुम्ही कणखर व्हाल ही सदिच्छा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

@ वृंदा,
"माझा प्रश्न आहे आपल्याला मागचे कर्म कसे कळणार ??" असा प्रश्न तुम्ही विचारला आहे.

म्हणजे ते मागचे कर्म कळले तर त्याप्रमाणे काही उपाययोजना करता येतील असे काही मनात येत आहे का?

पण मला वाटते ते मागचे कर्म कळण्याची फारशी जरूरी नसते. कोणत्याही कर्माची फळण्याची जरी वेळ आली तरी त्याला फळण्यासाठी अनुकूलता लागते. हा मुद्दा बर्‍याच जणांना माहित नसतो. जर मनात सतत सकारात्मक विचार भरलेले असतील तर प्रतिकूल कर्मफळांना फळण्याची संधी मिळू शकत नाही. आपण ती वेळ पुढे ढकलू शकतो. यापध्दतीने अगदी मरेपर्यंत आपण ते प्रतिकूल कर्मफळ पुढे ढकलू शकतो.

हेच ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातून सांगतात.
रामकृष्णीं वाचा अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥ हरिपाठ १४.२ ॥

इथे "रामकृष्णीं वाचा अनंतराशी तप ।" म्हणजेच अत्यंत सकारात्मक विचाराने भरलेले मन असा अर्थ घेता आला पाहिजे.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मिकी ऋषी. त्यांचे मन नेहमीच सकारात्मक विचारांनी भरलेले राहिल्याने त्यांना कधीही उर्वरीत आयुष्यात त्यांच्या पापांची फळे भोगायला लागली नाहीत.

शिवाय वाल्मिकी ऋषी जीवनमुक्त असल्यामुळे त्यांना ती कर्मफळे कधी भोगायलाही लागणार नाहीत. ही सर्व कर्मफळे अनुकुलतेच्या अपेक्षेत नुसती पडून राहणार आहेत. वाल्मिकी ऋषींच्या दृष्टीने विचार करता ती जणूकाही नष्ट झाली आहेत किंवा जळून खाक झाली आहेत.

हेच हरिपाठात ज्ञानेश्वर महाराज सांगतात
हरिउच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥ हरिपाठ ११.१ ॥
तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपता हरी ॥ हरिपाठ ११.२ ॥

याशिवाय सकारात्मक विचाराने भरलेले मन प्रतिकूल कर्मफळ भोगत असतानाही त्यातून नवीन प्रतीकूल कर्मफळ जन्माला घालत नाही व ही प्रतिकूल कर्मफळ तयार होण्याची साखळी तुटते हा अत्यंत महत्वाचा मुद्दा तर बरेच जण विचारात घेत नाहीत.

आणखी एक मुद्दा म्हणजे, या पध्दतीने आपण भोगत असलेले प्रतिकूल कर्मफळ आणखी प्रतिकूल होणार नाही हे निश्चित करू शकतो. येवढे जरी साधता आले तरी खूप काही आपण मिळवले असे म्हणता येते.

बर्‍याच वेळेस हे सर्व संतांनाच शक्य आहे, आपल्यासाठी नाहीये ते; अशा प्रकारची पळवाट काढून, आपण आपली जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न करतो. पण संतावर व संतवचनांवर दृढ श्रध्दा ठेवता आली व त्यानुसार आचरण ठेवता आले तरी सुध्दा त्या श्रध्देच्या जोरावर संतांसारखी कर्मे आपल्या हातून होऊ शकतात. त्यासाठी आपण संत बनण्याची वाट पाहाण्याची आवश्यकता नसावी. मला वाटते सर्व संत याच मार्गाने संत बनले आहेत.

विषय फारच क्लिष्ट आहे.
आणि कदाचित माझ्यामुळे तो आणखीनच क्लिष्ट होत चालला असावा. Happy
तेव्हा थांबतो.
तुम्हाला नमस्कार व शुभेच्छा.

टीप :
१) तुमचे भाग्य तुमच्या विचारात ही वामनराव पै यांनी लिहिलेली छोटी पुस्तिका जरूर वाचा. मी १० वर्षापूर्वी ५ रूपयाला विकत घेतली होती. हा विषय त्यात खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितला आहे.

२) आपले मन सतत सकारात्मक विचाराने भरलेले राहण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला "उपासना" असे म्हणतात.

शाम भागवत, काय सुंदर लिहिलंय तुम्ही!
मला स्वतःला हरिपाठ फार आवडतो पण मला त्याचा संपूर्ण अर्थ माहीत नाही. तुम्ही फार छान समजावून सांगितल्यात ह्या ओळी.. मनापासून धन्यवाद!

शेवटी कितीही उड्या मारल्या तरी नशीब हा जो भाग आहे, वैयक्तिक आयुष्यातला हा नाकारु शकत नाही. विलासराव देशमुखांसारख्या गडगंज श्रीमंत, राजकारणी व्यक्तीला, ज्याचे लाखो फॉलोअर्स आहेत, जगातले सर्वोत्तम डॉक्टर्स, इस्पितळं, तंत्रज्ञ दिमतीला आहेत, प्रत्यारोपणासाठी एक अवयव मिळत नाही, आणि कैक गरिबांच्या महागड्या शस्त्रक्रिया मोफत होऊन जातात तेव्हा नशिब मानावेच लागते. >>>>>>> प्रचंड अनुमोदन.....

शाम भागवत, काय सुंदर लिहिलंय तुम्ही! +१
विशेषतः हे वाक्य -
याशिवाय सकारात्मक विचाराने भरलेले मन प्रतिकूल कर्मफळ भोगत असतानाही त्यातून नवीन प्रतीकूल कर्मफळ जन्माला घालत नाही व ही प्रतिकूल कर्मफळ तयार होण्याची साखळी तुटते हा अत्यंत महत्वाचा मुद्दा तर बरेच जण विचारात घेत नाहीत.

वृंदा, कर्माचा सिद्धांत नावाचे एक पुस्तक लेखक हीराभाई ठक्कर जरूर वाचा. सगळंच पटेल असे नाही, अनेक शंकांचे निरसन होऊ शकेल. अनेक नवीन प्रश्नही पडतील. Proud पण हे छोटेखानी पुस्तक तुम्ही आवर्जून वाचावे अशी शिफारस करतो.

ह्या पुस्तकातले एक उदाहरण आठवते (ह्या शब्दात नाही पण भावार्थ असाच काहीसा) (स्वगत- परत एकदा वाचायला हवे हे पुस्तक)
मागील जन्मी अन्नाचा अपमान केल्यामुळे समजा ह्या जन्मी उपाशी रहाण्याची वेळ येणार आहे तर कोणी एक माणूस उपासनेचा भाग म्हणून अन्नग्रहण टाळतो, कोणी एक माणूस दुसर्‍या व्यवधानात खाण्याचे टाळतो तर कोणी समोर अन्न आलेले असताना देखिल त्यात काहीतरी खोट काढून लाथाडतो.
म्हणजेच या जन्मी सात्विक राजसी तामसी प्रकारे वागण्याच्या चॉईस नुसार कर्मे नलीफाय होतील /नवीन कर्मे तयार होतील.
पाप पुण्याचा वेगेवेगळा हिशोब असतो. ५ पा पं, ५ पुण्य हिशोब बरोबर असं होत नाही. ५ पुण्याची वेगळी फळे आणि ५ पापांची वेगळी फळे.

मागच्या कर्माची फळे या जन्मात भोगताना आपण नवीन कुकर्मांना आवाहन करत नाहीत ना हे बघणे, प्रतिकूल परिस्थिती / वातावरण / माणसे यांना सकारात्मक दृष्टीकोन राखून / सुविचाराने कसे सामोरे जातो ह्याला महत्व द्यायला हवे.

कृष्ण म्हणाला, "शंभर पुत्र व्हावे ह्यासाठी खूप पुण्य लागतं... 
>>>>>
सहीये!
आणि आपण लालूप्रसाद यादव यांची ईतकी ईतकी मुले आहेत म्हणून त्यांना चिडवत असतो. पण प्रत्यक्षात श्रीकृष्ण यादव यांच्या म्हणण्यानुसार हे तर त्यांच्या गतजन्मीचे पुण्यच आहे Happy

सगळ्यांना धन्यवाद ! खूप अवघड विषय (कर्म ) सोपा करुन सांगितलात . Happy

सगळ्यांची उदाहरणे खासच आहेत आणि पटलीही !

मी पण वैश्विक शक्ती ( universal power ) आणि निसर्ग ह्यांना प्रचंड मानते . कारण त्याचे अस्तित्व जाणवते घडोघडी तसे देवाचे अस्तित्व जाणवत नाही . निसर्ग तर प्रचंड पॉसिटीव्ह आहे . रॉ आहे . कधीतरीच निसर्गाचे प्रकोप दिसतात .भूकंप , प्रलय , त्सुनामी वगैरे नाहीतर निसर्ग सारखा निरुपद्रवी आणि आनंदी कोणी नाही . असो .

म्हणजे मागील जन्मी चे कर्म कळणारच नाही ही व्यवस्था निसर्गाने केलीये म्हंटल्यावर .. त्याच्यापुढे आपले काय चालणार ! Sad

शेवटी आपले चांगले विचार , जबरदस्त इच्छाशक्ती , अंतर्मन शक्ती (subconscious mind )आणि निसर्गाच्या कृपेने आपल्याला जसे आयुष्य पाहिजे ते मिळवता येते . अर्थात त्यासाठी भरपूर आराधना / उपासना लागणार ! ( मी देवाची उपासना म्हणत नाहीये). इच्छा तेथे मार्ग !

कारण हेच ... देवाचा अनुभव नाही त्यामुळे माझ्यासाठी निसर्ग हाच देव Happy

कर्म हि कन्सेप्ट मान्य असली तरी मागच्या जन्मीचे कर्म / भोग हे काही माझ्या पचनी पडत नाहीच्च !!!>>>>>> माझ्यामते दैव (नियती,नशीब) हेच खरे आहे.कित्येक अशी सज्जन माणसे पाहिली आहेत ज्यांनी वाचिक तर सोडाच पण मनानेहीकधी वाईट चिंतलेले नाही.पण तरीही त्यांच्या नशिबी दु:ख आले.याउलट ज्यांनी दुसर्‍याला बराच त्रास दिलेल पाहिला आहे,त्यांची सर्वार्थाने भरभराट झालेली पाहिली आहे.नियतीच्यापुढे कोणी जाऊ शकत नाहीहे खरे.त्यात्यावेळी तसतशी बुद्धी होत जाते.
चालू जन्मात माणसानेचांगली कृत्ये करावी या हेतूने, तू जर वाईट वागलास तर पुढील जन्मात तुला किंवा तुझ्या पिढ्यांना परिणाम भोगावे लागतील असा अप्रत्यक्ष धाक घातला जातो.त्यामुळे एकाअर्थी ही संकल्पना सुरेख आहे.
पहिल्या पानावर तुम्ही म्हटले आहे की स्वामी समर्थांना म्हटलेत की या माणसाला शिक्षा करा नाहीतर मी रहाणार नाही.मनाच्या एका विकलक्षणी तसा विचाआला असेलही.तरीही प्लीजच असा विचारही करु नका.तुम्हाला जो त्रास झाला आहे तो यामुळे भरून निघेल का? ज्याचे त्याचे प्राक्तन म्हणून स्वीकारा.मात्र याचा अर्थ असाही नव्हे की कुठलाही अन्याय सहन करा.

@शाम भागवत्,सुरेख विवेचन.ज्या मृदू आणि संयमित भाषेत हे लिहिले आहे त्यामुळे मनाला जास्त भिडले.
@ नानाकळा,तुमचाही प्रतिसाद सुरेख आहे.

Pages