अंतर्मनाची शक्ती (intuition) की बोला फुलाला गाठ - देव जाणे

Submitted by वृंदा on 8 February, 2017 - 16:15

अंतर्मनाची शक्ती (intuition) की बोला फुलाला गाठ - देव जाणे

असं म्हणतात की सगळ्यांना अंतर्मनाची शक्ती असते फक्त अनेकांना माहित असते किंवा माहित असले तरी वापरता येत नाही.
अनेकांना पुढे काय घडेल ह्याचा अंदाज येतो (logical thinking )किंवा उत्स्फूर्त (intuition )पणे सुद्धा कळते.

मला सुद्धा अंतर्मनाची शक्ती आपल्यात आहे हा शोध आत्ता म्हणजे २-३ वर्षांपासून लागला आहे किंवा तो माझा भ्रम पण असेन . पण काहीतरी आहे हे नक्की .. माझे लॉजिकल थिंकिंग माध्यम आहे म्हणजे त्या पलीकडे असे नक्कीच आहे . मी माझे अनुभव सहज म्हणून शेअर करतेय .

१. २०१४ ची गोष्ट नुकताच व्हाट्स अँप वापरायला सुरू केलेले . तेव्हाचा हा अनुभव . त्या वर्षी अनेकदा लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्या बद्दल लेख ग्रुप वर पाठवायचे ते पाहून मला खूप अस्वस्थ आणि वाईट वाटायचं जे सगळ्यांनाच वाटते . एकदा मात्र न राहवून एका अशाच ग्रुप ला म्हणाले "आपण काहीतरी करू या " असे वाटत होते की फंडस् गोळा करून (like help age India ) त्यांना पैसे पाठवू या पण कोणी म्हणजे कोणीच प्रतिसाद दिला नाही मग मी पण व विषय सोडून दिला पण आईला म्हणाले " आई , कोणीतरी मोठे माणूस किंवा प्रसिद्ध लोकांनी पुढाकार घेऊन त्या लोकांना मदत केली तर बरं होईन त्यांचे लोक पण ऐकतील ( कारण माझे कोणी ऐकले नाही) " खूप तळमळीने म्हणाले आणि काय आश्चर्य पुढच्याच वर्षी सप्टेंबर २०१५ ला नाना पाटेकर आणि मकरंद अनारसपुरे ह्यांनी "नाम " म्हणून संस्था स्थापन केली आणि हो माझा खूप आवडता नट म्हणजे अक्षयकुमार ने सुद्धा आत्महत्याग्रस्त लोकांना मदत केली !!
मला तर खूप खूप आनंद झाला माझं खरे ठरले त्यापेक्षा काहीतरी चांगली सुरुवात झाली त्याचा !!

२. २००२ ची गोस्ट तेव्हा नुकतंच टीव्ही केबल घेतलेलं तेव्हा "सुरताल" म्हणून गाण्यांचा प्रोग्रॅम लागायचा झी मराठी वर .. तेव्हा एक ६-७ वर्षांची चिमुरडी एका छोट्या स्टुलावर बसून गाणे गायची ..आवाज तर खूप चॅन होता पण त्यापेक्षा ती खूप गोड आणि सुंदर दिसायची मी तेव्हा एकदा म्हणाले " हि मुलगी पुढे हिरोईन होणार बघ " आणि तसंच खरं ठरलं ती म्हणजे "टाइमपास " पिक्चर ची हेरॉईन केतकी माटेगांवकर !!!
अगदी तसंच २००९ ला "लिटल चॅम्प सारेगमपा " ला जेव्हा मी आर्या आंबेगावक ला पहिला तेव्हा ती नववीत आणि सगळ्यात मोठी कॉन्टेस्टंट होती . मी म्हणाले हि छान आहे दिसायला फक्त दात ठीक केले कि छान दिसेन आणि तसं आणि तसाच घडले . आर्या ने हेरॉईन म्हणून सुरुवात "ती सध्या काय करते " मधून केली !!!

३. मला थोडीफार पत्रिका कळते माझ्या एका मैत्रिणी ची सहजचं पत्रिका पहिली ( मी ज्योतिषी नाही आणि चुकून पण होणार नाही ... कारण नंतर सांगेन ) तर तिच्या पत्रिकेत "प्रेम विवाहाचे " योग होते आणि तिचे पण एका मुलावर प्रेम होते पण घरचे जात वेगळी म्हणून विरोध करत होते म्हणून त्याच्याशी लग्न होईल का म्हणून विचारात होती .. मी म्हणाले "काळजी करू नकोस .. घरचे कितीही विरोधात असले आणि अरेंज मॅरेज साठी कितीही प्रयत्न केले ..मुले पाहिलीस तरी तुझे लव्ह मॅरेज च होणार " तसंच खरं झालं त्या मुलाशी लग्न झालं पण माझ्यामनात ते लग्न यशस्वी होणं नाही असं मन सांगत होतं आणि झालंही तसंच खूप वर्षांनी कळले तीच त्या मुलाशी डिवोर्स झाला आणि लगेच तिचे दुसरे लग्न ठरले आणि मजा म्हणजे त्या मुलाने मागणी घातली आणि तिला हि आवडत होताच म्हणजे दुसरेही लव्ह मॅरेज !!

साल २००७ ची गोस्ट असेन अजून एक मैत्रिणीची पत्रिका पाहिली पण सगळीकडे डिव्होर्स चे योग होते पण मी तसं तिला सांगितलं नाही नंतर कळलं कि तिचे वैवाहिक लाइफ चांगले नव्हते आणि लवकरच डिव्होर्स घेणार आहेत आणि तो झालाही .. मला त्याचे खूप मनापासून वाईट वाटले !!!

४. साल २०१४ असेच एका मैत्रिणीची पत्रिका बघून सांगीतल की तु आणि तुझा नवरा नक्कीच abroad ला जातील आणि लगेच २-३ महिन्यात गेली पण !!( आजकाल १० पैकी ८ जातात ..त्यामुळे हा फक्त योगायोग होता ) मला खरंतर बघून नाही कळत पण सगळे उत्स्फूर्त पणे बोलून गेले !!

५.साधारण एप्रिल २०१४ ची गोस्ट असेन मी जवळच्या ' खंडोबा ' मंदिर ला आई बरोबर गेले . तेव्हा मी आई ला खंडोबा चा इतिहास विचारत होते
पण ती म्हणाली फारशी माहिती नाही तेव्हा मी म्हणाले ' खंडोबाची ' माहिती कुठून मिळाली तर बरे होईन किंवा ह्यावर कुठली सिरीयल यायला हवी आणि काय आश्चर्य लगेच म्हणजे मे २०१४ पासून "जय मल्हार " नावाची सिरीयल सुरु झाली !!

अनेकदा मी जे बोलते तसंच नंतर घडते किंवा तशी बातमी कानावर येते.

मजा म्हणजे मी जे काही खात असेन म्हणजे भेळ , एकादी भाजी किंवा काही खाण्याचं विचा येत असेन तसंच थोड्यावेळाने t.v सिरीयल मध्ये दिसते . मला ह्याची मात्र खूप गम्मत वाटते.

असे अनेक आणि बरेच अनुभव आहेत फक्त खंत म्हणजे स्वतःबद्दल काही फारशी intuition नाही . एवढा आठवतंय २००४ ला खुप अस्वस्थ होते खूप म्हणजे खूपच !!! पुढचा आपला काळ कठीण आहे हे मला आतून वाटत होते ( कदाचित कुणाला नकारात्मक विचार वाटेन ) आणि तसच झालें कठीण काळ अजूनही संपला नाही त्यात अनेक ज्योतिष वाऱ्या झाल्या पण समाधान नाही उलट काही ज्योतिष लोकांमुळे उरले सुरले hopes पण संपलेत ( काही चांगले पण ज्योतीषी असतील )आणि मिळाला तो म्हणजे नुसता मनस्ताप !!!( अजूनही अस्वस्थ आहे आणि मी ह्यावर काहीतरी लिहावे असे वाटते .. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढली तरी चालेन पण ज्योतीषीच्या नादी लागू नये .. तुम्हाला फक्त संताप आणि मनस्ताप मिळेल .. म्हणजे कसं आ बैल मुझे मार )

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दोन महिन्यांनी कळले की ते लग्न झालेच नाही. का? तर वरपित्याचा योग्य मान वधुपित्याने राखला नाही. >>> असल्या फाजील कारणांनी लग्न मोडणार्‍यांना अंतर्मनातून हाताकडे प्रक्षेपित झालेली शक्ती दाखवायला हवी.

आवरा लोक्स!
धागा भलतं वळण घेतोय असे वाटतेय.

तर वरपित्याचा योग्य मान वधुपित्याने राखला नाही. >>> असल्या फाजील कारणांनी लग्न मोडणार्‍यांना
>>>>>

यात फाजील कारण काय समजले नाही... वरपित्याचा योग्य मान या राखला नाही हे चुकीचेच आहे... ते वरपित्याची योग्य मान राखली नाही असे हवे ना.. गळा राखला.. मान राखली... व्याकरणाच्या चुकीला माफी नाही.. अवांतराबद्दल क्षमस्व !

वरचे अनुभव माझ्या ब्लॉगवरुन कॉपी-पेस्ट आहेत. त्या मुलीचे लग्न त्या मुलाशी झाले नाही हे अतिशय उत्तम झाले. ते मोडायचे कारण कितीही क्षुल्लक असू देत. दोघांमधे १४ वर्षांचे अंतर होते, मुलाचे लग्न 'वय जास्त व कमाई-शिक्षण फार नसल्याने' होत नव्हते, तेव्हा त्यांनी हे अत्यंत गरिब घरचे, पाच मुली असलेले, त्यामुळे आपल्या पायाखाली राहतील, वरचढ होणार नाहीत असे सोयरे शोधून आणले होते. मुलीच्या वडिलांना ह्यांची उपकाराची भाषा पटली नसावी. आणि झाले ते चांगलेच झाले.

मुद्दा हा आहे की ज्योतिष आणि अंतर्मनाची साद हे म्हटले तर वेगळे, म्हटले तर एकत्र असे प्रकार आहेत. मी जे काही प्रेडिक्शन करतो ते कट्टरपणे गणिताधारित नसतात, साधारण ७०-८० टक्के आतला आवाज असतो, फक्त जातकाशी जोडल्याजाण्याचे माध्यम (वर लिंबू यांनी सांगितल्याप्रमाणे शरिर-हस्तस्पर्ष वगैरे असते) माझ्याबाबतीत जन्मतारिख आहे असे जाणवले आहे.

अनेकदा आपसूक एखाद्याला भेटल्यावर त्याची जन्मतारिख विचारल्या जाऊन काहीतरी सूचक सांगितल्या जातं, त्या-आधी-त्यानंतर तो माणूस कधी भेटलेला नसतो, भेटणार नसतो. आणि काही रोज भेटत असलेली, घरोब्याचे संबंध असलेली-खुप सांसारिक समस्या असलेल्या व्यक्तिलाही काही सांगायचे-विचारायचे अजिबात सुचतही नाही. हे का घडते हे एक कोडेच आहे.

तर अंतर्मनाचा आवाज असतो, तो जाणतोही सगळ्यांना. काही लोकांची इन्ट्युशन्स खूप स्ट्राँग असतात... पण कालांतराने विरळ होतात, काहींची साठी-सत्तरीनंतर खूप स्ट्राँग होतात-त्याआधी त्यांना कधी तसे जाण्वलेले नसते. साधना, संयम व इतर अनेक पथ्ये असतील ज्याकारणे इन्ट्युशन पावर वाढत कमी होत असेल... बाकी ह्या सगळ्या गोष्टी थोतांड वाटणारांनी अंधश्रद्धा पसरवतो वगैरे इत्यादींचा जास्त विचार करु नये. ह्या जगात अनेक प्रकारची लोकं असतात, प्रत्येकाला कसे वाटते हे दुसर्‍याला विज्ञानाच्या आधारे समजू शकणार नाहीच.

रुन्मेषच्या प्रेडिक्शनच्या चॅलेंजबद्दल: इन्ट्युशनचे असे काही चॅलेंज नसते, ते आकडेमोड करणारे ज्योतिष नाही, तो एक फील आहे, जाणीव आहे, जाणीवेला चॅलेंज देऊ शकत नाही.

बाकी, जगात ७०० कोटी लोक आहेत, ७०० कोटी गुणिले २४ तासात प्रत्येकाला काही ना काही सुचत असतंच, जाणवत असतं. तेव्हा आजूबाजूला काही ना काही घडत असतंच. ती बोलाफुलाची गाठ समजू शकतो. कारण जे चिंतले ते घडलं असं नसून जे घडलं ते ज्या कोणी घडण्याआधी चिंतलं असतं त्याला बरोबर आठवतं.

मला कधी कधी सूचक स्वप्ने पडतात, अगदी फुल्ल एचडी बिलियन कलर्स.. एकदा असेच स्वप्न पडले की कुठल्या तरी ओसाडटाईप भागात, गावाखेड्यात मी फिरतोय, मुस्लिम माणसे भेटत आहेत, रोजचे जीवन चालू आहे आणि अचानक भूकंप येतो. अगदी त्याच स्वप्नाच्या आगेमागे चार-पाच तास अफगाणिस्तानमधे भूकंप झाला होता. ही बातमी मात्र मला माध्यमांतून आठेक दिवसांनी समजली.छायाचित्रे बघितली तेव्हा स्वप्नात दिसली तशीच होती. कोणीच विश्वास ठेवणार नाही आणि मी सिद्ध करु शकत नाही. अशी भूकंपाची स्वप्ने दोन-तीन पडली आहेत.

मात्र कधी कधी असेही होत असते की तुम्ही एखादी बातमी वाचली, त्याची तुमच्या जागृत मनाने नाही पण सुप्त मनाने नोंद करुन टाकली, आणि काहीतरी केमिकल लोच्या होऊन तुम्हाला ती बातमी हॉन्ट करत राहते आणि अस्वस्थ होऊन तुमच्या जागृत मनाला ती बातमी कुठेतरी सापडते आणि आपल्याला वाटते की आपले इन्ट्युशन फलद्रूप झाले. असे नसते. इन्ट्युशन हे प्युअरेस्ट फॉर्ममधे असले तरच ते इन्ट्युशन समजावे. अन्यथा सुप्तमनाचे फीडींग आहे, केमिकल लोच्या आहे.

अजून एक गंमत. विपश्यनेला गेलो होतो, तेव्हा अगदी पहिल्या क्षणापासून आपल्यासोबतची इतर शिबिरार्थी कोण, काय करतात, कामधंदा, शि़क्षण, नावगाव काहीही माहित नसते. ते थेट दहाव्या दिवशी बोलायची परवानगी मिळाल्यावरच. मी कटाक्षाने सर्वत्र मौन पाळले. तेव्हा चौथ्या-पाचव्या दिवशी अगदी एका सेकंदासाठी माझ्या मनात एक हिशोबाचा विचार चमकून गेला, एका औषध कंपनीच्या प्रतिनिधीला काहीतरी ऑर्डर द्यायची आहे, व त्याचे मागचे बील बघायचे आहे, असा एक अंधुक-पुसट पण ठाशीव विचार येऊन गेला. जणू मी कोणी औषधांच्या क्षेत्रातला माणूस आहे. आश्चर्याचा धक्का मला दहाव्या दिवशी बसला जेव्हा कळले की माझ्या बाजूला नियमित बसणारा व्यक्ति हा मेडिकलच्या दुकानाचा मालक आहे व त्याची बायको त्याच्या अनुपस्थितीत दहा दिवस ते दुकान सांभाळत आहे आणि त्याला हे दहाही दिवस दुकान नीट चालू असेल काय ह्याची चिंता लागून होती. हे कसे घडले ह्याबद्दल मला आजही संभ्रम आहे. दहाव्या दिवशीच कळले की तो व्यक्ती बोलणे, व्यक्त होणे ह्याबाबतीत खूप अग्रेसिव, लाउड आहे. कदाचित ते त्याचे विचार असे बाहेर येऊन माझ्या डोक्यापर्यंत पोचले की काय....? म्हणजे विचारांचे तरंग असतात असे जे म्हणतात ते खरे मानायचे? Wink

जाताजाता: माझी बायको म्हणते की मी मनकवडा आहे. बायकोने असा खिताब देणे भाग्याचे लक्षण आहे, एवढीच एक गोष्ट खरी असावी हे तुम्ही मानू शकता Happy

मेगाबायटीसाठी क्षमस्व!

@संतोष किल्लेदार >>( मी ज्योतिषी नाही आणि चुकून पण होणार नाही ... कारण नंतर सांगेन )>> मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे मी ज्योतिष शास्त्र / कला ह्याच्या विरुद्ध नाही तर जे ज्योतिषी व्यावसायिक म्हणून काम करतात पैसे कमावतात पण समोरच्या माणसाची मनस्थिती आणि परिस्थितीपाहून भविष्य सांगत नाहीत त्याचा मनस्वी संताप आणि खंत आहे .

मी कधीच ज्योतिषी होणार नाही अगदी पोटापाण्यासाठी पण नाही कारण मी पाहिलंय की ज्योतिषाने जर काही वाईट सांगितले आणि तसेच घडले तर त्या जातकाला वाईट तर वाटतेच पण ज्योतिषाचा आदर वाढण्याऐवजी मनस्वी संताप आणि मनस्ताप होतो . त्यामुळे जातक धन्यवाद देण्याऐवजी त्या ज्योतिषाला शिव्याशाप देण्याचीच शक्यता जास्त !! तसेच उलटे म्हणजे कोणी चांगले सांगितले आणि तसे घडलेच नाही तर पुन्हा त्या ज्योतिषावरच चरफडणार आणि चिडणार कि का खोटं सांगितलं तर एखाद्या ज्योतिषाला तोच मनापासून मानतो ज्याच्याबद्दल काही चांगले सांगितले असते आणि ते खरे ठरते . कुठे ना कुठे ज्याना ज्योतिषाचा वाईट अनुभव आला आहे त्यांची तडफड हि त्या ज्योतिषाला लागतेच लागते (कदाचित कुणाला हि अंधश्रद्धा वाटू शकते ) आणि म्ह्णूनच मी कितीही आर्थिक परिस्थिती वाईट असो( जी आता आहे ) हा व्यवसाय नाही करणार !!

काही काही लोकांचे आयुष्य हे खूप सवेंदनशील असते . मला स्वतःला अनुभव आहे कि काही चुकीचे केले की शिक्षा लगेच कुठल्या ना कुठल्या कारणाने मिळते पण तेच चांगले केले कर्म तर त्याचे फळ मात्र मिळतेच असे नाही .. ( हे मी खूप अनुभवा अंती लिहिले आहे . हे मनाचे खेळ किंवा अंध श्रद्धा नाही त्यामुळे प्लिज विरोधी मत लिहिले तरी चालेल पण हेटाळणी नको ). जसे input तसेच output हे कर्माला पण लागू आहे फक्त कॉम्प्युटर नाही !! Happy

Live and Let Live !!! Happy

नानाकळा आणि वृंदा, तुमचे प्रतिसाद पटले.

पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तोललेली आहे हे विज्ञान आहे. अध्यात्मिक विज्ञानाला नावं ठेवणारांची तोंडं आता गुरुत्वलहरींच्या शोधाने बंद झालेली आहेत. खरं तर शेषनाग ही उपमा आहे. या लहरी आणि अध्यात्मिक लहरी वेगळ्या नाहीत. कॉस्मिक लहरी किंवा हिलिंग हे खूळ आत्ता आत्ता आलेलं आहे. आमच्याकडे यावर लाखो वर्षांपूर्वी संशोधन झालेलं आहे. हे विश्व अध्यात्मिक लहरींनी बांधलं गेलेलं आहे. जो केंद्रस्थानी असतो त्याला गुरू असं म्हटलं जातं. केंद्रापासून लहरी निघत असतात. आज गुरुत्व लहरी मान्य झाल्या तरी गुरूत्व हे केव्हांच अध्यात्मात आहे. अध्यात्म समजण्यासाठी गुरू लागतो. इथेही गुरूचं महत्व आहे. जीवनात सर्वत्र गुरूचं महत्व आहे. गुरूपासून निघणा-या लहरींनी आपल्यावर प्रभाव पडतो. ज्याप्रमाणे ग्रहांचा गुरूत्वलहरींमुळे एकमेकांवर प्रभाव पडतो. आपलं ज्योतिषशास्त्र याच सिद्धांतावर आधारीत आहे. आता सायन्स ला कळेल की ग्रहांचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो. आईनस्टाईनला गेल्या शतकात जे जाणवलं ते आमच्या खगोलशास्त्रात पूर्वीपासून आहे.
पौर्णिमेला समुद्राला भरती येते, अमावस्येला ओहोटी. यामागे चंद्राच्या लहरी आहेत. म्हणून आमचं कॅलेंडर ल्युनार कॅलेंडर आहे. तरी देखील आमच्या आणि त्यांच्या कालमापनामधे फारसा फरक नाही. आम्हाला चंद्रावरून हे गुपीत कळालं म्हणून आमचं कॅलेंडर चंद्राने सुरू होतं आणि दक्षिणायन, उत्तरायणाच्या सत्याशी आमचे सण निगडीत असतात. किती प्रगत होतो आम्ही. जर हे ज्ञान पुढे गेलं असतं तर गुरुत्वलहरींच्या शोधाचं श्रेय आमच्या ग्रंथांना मिळायला हवं होतं. पण मुघली सत्तेने आमचे ज्ञान आगी लावून नष्ट केलं. आमचे ग्रंथ आम्हाला वाचू दिले नाहीत. त्याच्यावर कर लावले.
पण गो-यांनी याचे अचूक अर्थ लावले. भारतावर स्वारी केल्यापासून त्यांना ज्ञानाचा खजिना खुला झाला. इथे बसून एकेक ग्रंथ वाचून त्यांनी एकेक शोध लावले आणि त्याचा फायदा उपटला. तेव्हां आता तरी जागे व्हा !

पण गो-यांनी याचे अचूक अर्थ लावले. भारतावर स्वारी केल्यापासून त्यांना ज्ञानाचा खजिना खुला झाला. इथे बसून एकेक ग्रंथ वाचून त्यांनी एकेक शोध लावले आणि त्याचा फायदा उपटला. तेव्हां आता तरी जागे व्हा !
--> नक्कि कोन्ते शोध लव्ले ? कहि उदहरन देवु शकाल का?

अशी भूकंपाची स्वप्ने दोन-तीन पडली आहेत.

भूकंपाचे पहिले स्वप्न पडले , ते खरे ठरले, तर त्यानंतरची दोन तीन स्वप्ने तुम्ही आगाऊ नोंदवली का नाहीत ? मुसलमानानी नको म्हणून सांगितले का?

पण मुघली सत्तेने आमचे ज्ञान आगी लावून नष्ट केलं. आमचे ग्रंथ आम्हाला वाचू दिले नाहीत. त्याच्यावर कर लावले.

किती हसू बाई !!!!

तुमच्या पुस्तकात भविष्यकला लिहिलेली होती , तर त्याच पुस्तकानी , मुघल भविष्यात ते पुस्तक जाळणार आहेत, हे तुम्हास आधीच सांगायला हवे होते आणि तुम्हीही त्याच्या पाच सहा आवृत्या / प्रिंट आउट आधीच काढून ठेवायचे होतेत की !!! की तुमच्या पुस्तकात भविष्यज्ञान लिहिलेलेच नव्हते ?

मुघलांचे राज्य संपूर्ण भारतावर कधीच नव्हते, ज्या ठिकाणी त्यांचे राज्य नव्हते त्या ठिकाणची पुस्तके कुठे गेली ?

Proud

गोर्‍यानी त्यांचा अर्थ लावला !

आता तर अजुनच हसु येतय ! हिंदुंचे ज्ञान संपले... का? तर मुसलमानानी पुस्तके जाळली !! मग गोर्‍याना पुस्तके कुठून मिळाली ?

Proud

सपना हरिनामे, एकदम पटले.
तुमचा हा प्रतिसाद एक संपूर्ण लेख लिहायला हवा असा उतरला आहे.
>पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तोललेली आहे हे विज्ञान आहे
आणि पृथ्वीवरच्या प्रत्येकाच्या मस्तकात कामवासनेचा नाग दडला आहे तो त्या शेषाशी कायमचा संपर्कात असतो. हे दोन नाग एकाच विश्वरुपी नागाच्या दोन बाजू आहेत जशा एका नाण्याच्या दोन बाजू असतात तशा.
तुम्ही एक वेगळा लेख लिहाच या विषयावर.

तुमचं क्यालेंडर ल्युनार आहे... मुसलमानांचेही ल्युनारच आहे. तुमचे क्यालेंडर नावाला ल्युनार आहे. पण अधिक महिना घालून तुम्ही ते शेवटी सोलारलाच प्यारलल केलेत.... मुसलमानी क्यालेंडर मात्र पक्के ल्युनारच आहे.. ल्युनार ल्युनार असे बडबडून शेवटी सोलारलाच म्याच करायचा नाटकीपणा मुसलमानी क्यालेंडरात नाही.

अहो anilchembur ,
वर नानाकळा आणि वृंदा यांच्या प्रतिक्रिया पहा त्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे सापडतील.
>गोर्‍यानी त्यांचा अर्थ लावला !
नानाकळा म्हणतात त्या प्रमाणे तुम्ही काहीतरी एक ओळ वाचली आणि ती तुमच्या जागृत मनाने नाही पण सुप्त मनाने नोंद करुन टाकली, आणि काहीतरी केमिकल लोच्या होऊन तुम्हाला ती आता हॉन्ट करत राहते आहे. ते सोडून पुढे चला. का तर वृंदा म्हणतात तसे Live and Let Live !!!
>ल्युनार ल्युनार असे बडबडून शेवटी सोलारलाच म्याच करायचा नाटकीपणा मुसलमानी क्यालेंडरात नाही.
वा किती तर्कनीष्ठ विधान आहे. हाच नाटकीपण वेगळ्या प्रकारे दाखवण्यासाठी "ल्युनार चे सोलार" नावाचे नाटक तुम्ही लिहावे अशी तुम्हाला नम्र विनंती करतो. कुठे उगाच त्या तर्ककर्कश्श प्रतिसादांमागे लागता !

म्हटले तर मनाचे खेळ म्हटले तर अंतर्मनाची शक्ती आणि म्हटले तर योगायोग. पण या साऱ्या गोष्टी सध्या तरी वैज्ञानिक परिकक्षेत येत नाहीत. म्हणून अजून तरी याला स्युडोसायन्स म्हणतात. याच्यात ढोबळ मानाने प्रकार पडतात. तुमच्या लेखामध्ये सर्वांची सरमिसळ झाली आहे. पण इंग्लिशमध्ये त्याला विविध नावे आहेत.

१. Intuition: म्हणजे तीव्रतेने वाटणारा अंदाज. याला ठोस असा पाया नसतो किंवा व्यवहारी कारणमीमांसा पण नसते. हे कधीकधी अनुभवावर आधारित असते पण फार थोड्या प्रमाणात. उदाहरणार्थ: अनेकदा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे पाहिल्या पाहिल्याच त्या व्यक्तीशी आपली तार जुळेल असे वाटते. हे Intuition. "अंतर्मनाचा आवाज" वगैरे.

२. Premonition: हे पण Intuition असते. पण शक्यतो वाईट. जागेपणीच एखादी गोष्ट घडण्याआधीच तिचा अंदाज लागणे. उदाहरणार्थ: फोन घेण्याआधीच मन उदास होणे आणि वाईट बातमी असणार असे वाटणे आणि तसेच होणे.

३. Precognition: हे स्वप्नात किंवा स्वप्नवत असते. एखादी घटना घडल्याचा भास होणे किंवा तसे स्वप्न पडणे. आणि त्यांनतर थोड्याच अवधीत तसे खरेच घडणे.

४. Clairvoyance: एकाच वेळी पण दुसऱ्या ठिकाणी काय घडले असेल त्यासंबंधी तीव्र भास होणे. उदाहरणार्थ: घरात निवांत बसले असताना दूर अंतरावर कुठेतरी भूकंप झाला आहे किंवा एखादी आपत्ती कोसळली आहे असे तीव्रतेने जाणवत राहणे.

५. Telepathy: दुसऱ्या व्यक्तीच्या मनात काय विचार सुरु आहेत याबद्दल माहिती होणे. किंवा आपल्याला जे वाटते आहे ते कोणत्याही प्रकारच्या संवादाशिवाय त्यांच्याहि मनात पोहोचणे. मग हि व्यक्ती कितीही लांब अथवा जवळ असो.

६. Retrocognition: हा थोडा उलट प्रकार आहे. एखाद्या ठिकाणी (किंवा व्यक्तीच्या आयुष्यात) पूर्वी काय घडले असेल त्यासंबंधी अंदाज येणे. थोडक्यात "माहित नसलेल्या भूतकाळात पाहणे". उदाहरणार्थ: एखाद्या व्यक्तीने कुणाचातरी खून केला आहे असे मन:चक्षुंना भास होणे आणि प्रत्यक्ष तपासांती त्याने अथवा तिनेच खून केला आहे असे लक्षात येणे.

वर उल्लेख केल्याप्रमाणे, अर्थात या सर्वाना सध्यातरी कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

लेखात आणि प्रतिक्रियांमधून ज्योतिष आणि भविष्य सांगण्या संबंधी उल्लेख आहे. पण माझ्या मतानुसार भविष्य सांगण्याचा प्रकार हा या सर्वांपेक्षा भिन्न आहे. त्याचे अनुभवजन्य ठोकताळे आहेत व त्यावर ते आधारलेले असते. ज्याला Heuristic Knowledge म्हणतात तो प्रकार. उदाहरणार्थ: एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी ग्रह ताऱ्यांची स्थिती अमुक अमुक असेल तर त्या व्यक्तीचे आयुष्य अमुक अमुक प्रकारचे असते असे आजवरचे अनुभवजन्य ज्ञान आहे. यामध्ये मनाच्या किंवा अतींद्रिय शक्तीचा संबंध जवळ जवळ नाहीच. अर्थात हे माझे वैयक्तिक मत.

हरी (ण) नामे बाई ,

२०१२ साल हे अखेरचे वर्ष असणार , असा माया संस्कृतीतील एक शिलालेख माचु पिचु नावाच्या पठारावर की डोंगरावर सापडला होता म्हणे.

त्यावर मायबोलीवर एक अती भयानक धागा येउन गेला.

http://www.maayboli.com/node/2876

धन्यवाद
ते हरीनामे तेव्हढं नीट लिहीत चला.

मला इंट्युशनचा प्रत्यय परवाच पिक्चर बघताना आला. पिक्चरचं नाव लिहित नाही पण त्यात हिरोची प्रेमिका मरणार आणि तिचं अंतिम कार्य त्यालाच करावं लागणार हे मला पिक्चरमध्ये घडायच्या पाच मिनिटं आधीच लक्षात आलं होतं. पहिल्यांदाच बघत होते हा पिक्चर. त्याबद्दल काही वाचलेलंही नव्हतं पूर्वी. म्हणजे माझ्यातही काही सुप्त शक्ती दिसतेय. Wink

>>>या धाग्यात नेक्स्ट माचुपिचू धागा होण्याचे पोटेन्शिल आहे---
तेवढे आचरट कुणी नसावे आता.

रुन्मेषच्या प्रेडिक्शनच्या चॅलेंजबद्दल: इन्ट्युशनचे असे काही चॅलेंज नसते, ते आकडेमोड करणारे ज्योतिष नाही, तो एक फील आहे, जाणीव आहे, जाणीवेला चॅलेंज देऊ शकत नाही.
>>>>>

मी काही तुम्हाला उद्याच्या लॉटरीचा निकाल किंवा सोन्याचा भाव नाही प्रेडीक्ट करायला सांगत आहे. एखादी गोष्ट ठरवून तिच्याबद्दल विचार करा आणि काय जाणवते ते सांगा असे नाही म्हणायचेय.
तर कोणत्याही अबक क्षयज्ञ गोष्टीबद्दल जो काही ईंट्युशन मनात उत्पन्न होईल तो ईथे मांडा.
जर दहा उत्पन्न झाले तर दहा मांडा. जे घडल्यावर वा न घडल्यावर ईतरांनाही खरेखोटे करता येतील असे मांडा.
बघूया तरी कोणाचे किती ईंट्युशन खरे होतात. की बस्स जेव्हा खरे होतात तेव्हाच आपल्याला वा व्वा आपला विचार खरा झाला म्हणून आनंदाच्या उकळ्या फुटतात, मात्र त्या सोबत येणारे जे शेकडो विचार कधीच खरे होत नाहीत ते हवेत विरून जातात असे तर नाही होत आहे ना हे समजेल Happy

ऋन्मेऽऽष , तू म्हणतोयस ते बरोबरच आहे. पण असं नाही ठरवून सांगू शकत कोणी. ठरवून सांगण्याइतकी सिद्धी असणारे कदाचित माबोवर, आंजावर मिळणारही नाहीत. हजारो जाणीवा मनात उमटतात. प्रत्येकीचा ट्रॅक ठेवणं अशक्य असतं. जी खरी झाली ते रिकॉल होते इतकंच. बाकी खर्‍या न होणार्‍या कशा ट्रिगर होतील? त्या तर आठवतही नाहीत. अनेकांना तर पाहिलेली जबरदस्त स्वप्नेही अजिबात आठवत नाहीत. त्या स्वप्नांचा हॅन्गोवर असतो पण स्वप्न काहीकेल्या आठवत नाही. असो.

ह्या मनोव्यापारांमध्ये वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध करण्याजोगे काही नसते. त्यामुळे ते असत्य आहे असेही नाही. ज्यांना अनुभव येतात, त्यांनाच खात्री पटते. वरिल माझ्या कमेंटमधे एका मुलीशी लग्न करु नको म्हणून सांगितलेले. त्या मित्राला त्याच्या बहिणीच्या, भावाच्या लग्नाच्या वेळेला जे प्रेडिक्शन दिले ते तंतोतंत खरे ठरले. पण स्वतःच्या वेळेसही त्याने माझा सल्ला धुडकावून लावून एन्गेजमेंट केलीच, पण नाही झाले लग्न. आता तीन वर्षांनी ह्या वर्षी झाले.. यावेळेस माझा सल्ला आवर्जून घेतला त्याने. आता ही बढाई नाही.. जस्ट अनुभव आहे.

दुसर्‍या एका प्रसंगात एक कुरिअरवाला घरी आला तेव्हा त्याने माझ्या घरी लावलेला अंकजोतिषाभ्यासकेंद्राचा फलक पाहिला, व त्याने मला सहज विचारले त्याच्या लग्न झालेल्या मुलीबद्दल, तीची व नवर्‍याची जन्मतारिख विचारली आणि त्या नवराबायकोंची गेल्या सहामहिन्यातली एकमेकांसोबतची वागणूक सांगितली... तो हैराण झाला आणि मीही. ते तंतोतंत तसेच घडले होते. आता वाचकांना थापा वाटू शकतील.. पण असो.

(डिस्क्लेमरः मी आता अंकज्योतिष व्यवसाय म्हणून करत नाही-आता फक्त अभ्यास, ज्याला जेव्हा योग येतील तेव्हा आपसूक मार्गदर्शन मिळतेच, त्यामुळे माझे प्रतिसाद कोणत्याही प्रकारे जाहिरात समजू नये ही विनंती.)

खरंतर लिहावे का नाही विचार करत होते कारण काही गोष्टी खूप संवेदनशील असताना आपण बोलून जातो तरीही वाटलं लिहावे अर्थात काहीजणांना हि अंधश्रद्धा पण असतील माझा स्वतःचा प्रवास तरी विज्ञानवादी दृष्टिकोनातून श्रद्धा -अंधश्रद्धा कडे चालला आहे अर्थात माणूस हा नेहमी बदलत असतो आणि हा बदल अनुभवातूनच घडतो असे मला वाटते .

जानेवारीची गोष्ट माझ्या ओळखीचे काका आहेत . बरेचसे स्पष्टवक्ते पण माणूस बघून बोलणारे आहेत आणि गजानन महाराजांचे खूप मोठे भक्त आहेत!त्यांना नॉर्मल आणि के .पी . पद्धतीने पत्रिका बघता येतात . आत्तापर्यंत माझ्या बऱ्या म्हणजे बऱ्याच ज्योतिषांच्या चक्रा झाल्यात . हिशेब काढला तर १०-१२ हजार तरी खर्च झालाय . अगदी आदिनाथ साळवीकडे पण जाऊन आलेय पण तसं योग्य मार्गदर्शन कोणी केल नाही पण ह्या काकांचा अनुभव खरंच चांगला आला अगदी त्यांनी काही वाईट सांगितलेलेही खरे ठरलंय अर्थात त्यांनी आडुन आणि सौम्य शब्दात सांगितलं त्यामुळे उगाच वाईट / निराश नाही वाटलं . तर सांगायचं म्हणजे हे काका फी घेत नाहीत . मुळीच घेत नाही अगदी जातकाच्या " इच्छेप्रमाणे " अशीही नाही ( अर्थात मोफत सल्ला मिळतोय म्हणून मी उठसूट जात नाही अगोदर खूप प्रयत्न करते पण काहीच मार्ग दिसला नाही तर आणि तरच त्यांच्याकडे जात होते ).

तर एकदा मी न राहवुन विचारले "काका , तुम्ही पैसे का नाही घेत ? प्रश्न पैशाचा नाही पण तुम्ही दुसऱ्यांना 'वेळ ' देता आणि माणूस पाहून योग्य मार्गदर्शन करता त्याची तरी किंमत नको का ??" तर ते म्हणाले मी का घेत नाही पैसे त्याला कारण आहे . हि विद्या घेण्यासाठी बरीच मेहनत घेतलीये तासन तास इतर प्रसिद्ध ज्योतिषांकडे थांबलोय वेळ घालवला अनेक प्रश्न विचारले तर तेव्हा मी त्यांचे आयुष्य जवळून पाहिलं आणि एक निरीक्षण केलं की जे ज्योतिष जातकाकडून भरमसाठ दक्षिणा /फी घेतात अनेकांची तर ऐपत किंवा इचछा पण नसते तर हे पैसे घेऊन ते बरेच श्रीमंत होतात निदान आर्थीक परिस्थिती तरी सुधारते पण त्याची किंमत पण मोजावी लागते . मी अनेक ज्योतिषांचे पर्सनल आयुष्य पाहिलंय आणि एक गोष्ट नोटीस केली की जे असे भरमसाठ पैसे घेतात त्यांचा एक तरी मुलगा तरुण पणी अचानक देवाघरी गेलाय. तसंही ह्या कलेचा उपयोग पैशासाठी करुं नये तर अडलेल्या लोकांना मदत म्हणून करावा असे आपल्या वेदा मध्ये लिहिलंय !!" हे ऐकून मला कसतरीच झालं आणि असं काही नसतं उगाचच काकांना असे वाटते म्हणुन दुर्लक्ष केलं . पण हे वाक्य माझ्या चांगलंच लक्षात राहिलं !!

कालच माझ्या मावशीचा गावावरून फोन आला खरंतर अचानक तेही दुपारी कधीच करत नाही मनात विचार आला आणि फोन घेतला. तिने जे सांगीतले ते ऐकून धक्काच बसला !! त्यांचे एक जवळचे नातेवाईक जे ज्योतिषाचा व्यवसाय करतात आणि त्या व्यवसायामुळे खूप श्रीमंत झालेले तर त्यांचा मुलगा काल झोपेत हार्ट अटॅक ने गेला ! मी विचारले काय होते त्याचे वय तर तिने २८ वय होते हे सांगितले म्हणजे मुलगा तरुण होता . खरंतर त्याला परवाच छातीत दुखत होते म्हणून डॉक्टरकडे गेला त्यांनी सलाईन लावले आणि ऍडमिट व्हा सांगितले पण घरच्यांना कळले तर ते काळजीत पडतील म्हणून ऍडमिट होणे टाळले . त्याला वाटले ऍसिडिटी मुळे दुखत असेन . तो मग घरी आला . अगदी त्याने सलाईन लावलेला हात सगळ्यांना दिसेल म्हणून रुमालाने बांधलेला होता . रात्री मुलीला (४ वर्षाची मुलगी आहे ) भूक लागली म्हणून स्वतः दूध तापवून तिला दिले . सकाळी त्याचे वडील अजून आपला मुलगा आपल्याला उठवायला कसा आला नाही म्हणून गेले तर तो गेला होता !! Sad

ह्या मुलाचे वडील हे खूप प्रसिद्ध ज्योतिषी आहे अनेक यज्ञ आणि शांती पण करतात .अर्थात त्यांनी ही कला / ज्ञान बरीच मेहनतीने कमावलंय तर हा मुलगा वडिलांना व्यवसायात मदत करत होता. त्यांचे राजकीय अंदाज पण अचूक असायचे त्यामुळे मोठेमोठे लोक पण त्यांचे क्लायंट होते . प्रसिद्ध आणि अचूक अंदाज त्यामुळे त्यांनी खूप म्हणजे खूप अफाट पैसा मिळवला अगदी त्यांच्याकडं मंगल कार्य असेन कुठलंही तर काजूची उसळ,पंचपक्वानं असायची !!

त्यांच्या कडे ४ वेगळेवेगळ्या प्रकारची चारचाकी आहे . खूप मोठा बंगला आहे . पण काय उपयोग त्याचा मुलगा तर हकनाक गेला ना ! त्या मुलाला एक ४ वर्षाची मुलगी आणि २ वर्षाचा मुलगा आहे . बायकोचे वय पण बरेच तरुण म्हणजे २२-२३ आहे . त्याला एक बहीण आहे ती तर खूप म्हणजे प्रचंड रडत होती "भैय्या ..भैय्या " म्हणून !! Sad Sad

राहून राहून वाटत होते कि आपल्या मुलाच्या पत्रिकेतील हा कुयोग त्याच्या वडिलांना का नाही अगोदर कळला !!!????

खूप म्हणजे खूप वाईट वाटले ! त्या मुलाला एक हिंट मिळाली होती ना जर घरच्यांना न घाबरून ऍडमिट झाला असता तर कदाचित वाचला पण असता !! निसर्ग ( इथे मी अंतर्ज्ञान शक्ती किंवा ज्योतिष म्हणत नाहीये .. ते खोटे असेनही .. निसर्ग तर खोटा नाहीये ना ) अनेकदा आपल्याला संकेत देत असतो आपण थोडेतरी ओळखायला हवे !!

शेवटी त्या ज्योतिषकाकांनी जे कारण सांगितले पैसे न घेण्यामागचे सांगितलेले ह्यात काही तथ्य आहे असे वाटायला लागले आहे ( अर्थात पूर्ण विश्वास नाही बसत ).

>> माझा स्वतःचा प्रवास तरी विज्ञानवादी दृष्टिकोनातून श्रद्धा -अंधश्रद्धा कडे चालला आहे>> हे वाक्य वाचल्यावर खरंतर पुढचं न- वाचून, झालेला मनस्ताप, चिडचिड टाळता आली असती. पण काय जित्याची खोड मेल्या शिवाय......अर्र पण मी मरायला माझे बाबा ज्योतिषी थोडीच आहेत!!
धन्य आहात तुम्ही!___/\___ कोपरापासून.

म्हणजे ?? मला काही कळले नाही ??
एनीवे माणूस बदलत असतो नव्हे वेळ पण बदलत अ सते काल जसा दिवस असतो तसे आज नसतो मग माणूस सारखा कसा राहीन .
आणि हो मी बदलेली ते अनुभव मुळेच ना .. चुकीचेही असेन .. रावाचा पण रंक होतो तसं समजा हवं तर !!

हो पण मी काही गंडे दोरे , रत्ने ,यज्ञ , नवस , उपास तपास नाही करत !!

तुमच्यासारख्या विज्ञानवादी लोकांना जगायचा आणि बोलायचा अधिकार आहें तसंच श्रद्धाळू आणि अंध श्रद्धाळू लोंकांनाही !!

आता हे वाचल्यावर चुकून पण पुढचे माझे पोस्ट वाचू नका . तुम्ही इंटेलिजन्ट आहात .. इंटेलिजन्ट पीपल इग्नोर !! सो जस्ट इग्नोर !! हाहा
तुम्ही पण खुश (म्हणजे मनस्ताप होणार नाही ) आणि मी पण खुश !! Win -Win situation ! Happy Happy

व्यवसाय करुन श्रीमंत होणं व बरमसाट पैसे आकारुन श्रीमंत होणे या दोन बिन्न गोश्टी आहेत.

कितीतरी इन्फर्टिलिटी एक्स्पर्ट स्वतः बिनमुलाम्चे असतात.
कितीतरी सायकियाट्रि क स्वतः आत्महत्या करतात.
स्वतः कार्डिअ‍ॅक स्पेशालिस्ट असलेले हार्ट अटॅकने मरतात.

याचा संबंध फीशी जोडायचा का ?

ज्यांचा कर्मावर आणि त्यांच्या फळावर विश्वास नाही त्यांना कदाचित पटणार नाही ! असो .

मी स्वतः ह्या धाग्यावर लिहिलंय ११ फेब्रुवारी ला .. पटत असेल तर घ्या नाहीतर सोडा .

ज्योतिषाने जर काही वाईट सांगितले आणि तसेच घडले तर त्या जातकाला वाईट तर वाटतेच पण ज्योतिषाचा आदर वाढण्याऐवजी मनस्वी संताप आणि मनस्ताप होतो . त्यामुळे जातक धन्यवाद देण्याऐवजी त्या ज्योतिषाला शिव्याशाप देण्याचीच शक्यता जास्त !! तसेच उलटे म्हणजे कोणी चांगले सांगितले आणि तसे घडलेच नाही तर पुन्हा त्या ज्योतिषावरच चरफडणार आणि चिडणार कि का खोटं सांगितलं तर एखाद्या ज्योतिषाला तोच मनापासून मानतो ज्याच्याबद्दल काही चांगले सांगितले असते आणि ते खरे ठरते . कुठे ना कुठे ज्याना ज्योतिषाचा वाईट अनुभव आला आहे त्यांची तडफड हि त्या ज्योतिषाला लागतेच लागते

@taimur : मेहनतीने व्यवसाय करून श्रीमंत होणे आणि भरमसाठ फी आकारून श्रीमंत होणे ह्यात फरक आहे .
तुम्ही जे व्यवसाय सांगितले ते मेहनतीने आणि ज्ञानाच्या जोरावरचे व्यवसाय आहेत उलट त्यांनी थोडे जास्त पैसे घेतले तरी चालतील .

किती ज्योतिषी स्वतः गरीब राहून जातक श्रीमंत व्हावे म्हणून उपाय करत असतात ?? उलट गरीब माणूस दिसला किंवा परिस्थितीने गांजलेला म्हणून ते चुकूनही प्रसिद्ध ज्योतिषी आपली फी कमी करत नाहीत !! कधी कधी तर भरपूर पैसे घेऊन अगोदरच खचलेल्या माणसाला निराश आणि खच्ची करतात .. हि कुठली माणुसकी ??? !!!!!!

Pages