अंतर्मनाची शक्ती (intuition) की बोला फुलाला गाठ - देव जाणे

Submitted by वृंदा on 8 February, 2017 - 16:15

अंतर्मनाची शक्ती (intuition) की बोला फुलाला गाठ - देव जाणे

असं म्हणतात की सगळ्यांना अंतर्मनाची शक्ती असते फक्त अनेकांना माहित असते किंवा माहित असले तरी वापरता येत नाही.
अनेकांना पुढे काय घडेल ह्याचा अंदाज येतो (logical thinking )किंवा उत्स्फूर्त (intuition )पणे सुद्धा कळते.

मला सुद्धा अंतर्मनाची शक्ती आपल्यात आहे हा शोध आत्ता म्हणजे २-३ वर्षांपासून लागला आहे किंवा तो माझा भ्रम पण असेन . पण काहीतरी आहे हे नक्की .. माझे लॉजिकल थिंकिंग माध्यम आहे म्हणजे त्या पलीकडे असे नक्कीच आहे . मी माझे अनुभव सहज म्हणून शेअर करतेय .

१. २०१४ ची गोष्ट नुकताच व्हाट्स अँप वापरायला सुरू केलेले . तेव्हाचा हा अनुभव . त्या वर्षी अनेकदा लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्या बद्दल लेख ग्रुप वर पाठवायचे ते पाहून मला खूप अस्वस्थ आणि वाईट वाटायचं जे सगळ्यांनाच वाटते . एकदा मात्र न राहवून एका अशाच ग्रुप ला म्हणाले "आपण काहीतरी करू या " असे वाटत होते की फंडस् गोळा करून (like help age India ) त्यांना पैसे पाठवू या पण कोणी म्हणजे कोणीच प्रतिसाद दिला नाही मग मी पण व विषय सोडून दिला पण आईला म्हणाले " आई , कोणीतरी मोठे माणूस किंवा प्रसिद्ध लोकांनी पुढाकार घेऊन त्या लोकांना मदत केली तर बरं होईन त्यांचे लोक पण ऐकतील ( कारण माझे कोणी ऐकले नाही) " खूप तळमळीने म्हणाले आणि काय आश्चर्य पुढच्याच वर्षी सप्टेंबर २०१५ ला नाना पाटेकर आणि मकरंद अनारसपुरे ह्यांनी "नाम " म्हणून संस्था स्थापन केली आणि हो माझा खूप आवडता नट म्हणजे अक्षयकुमार ने सुद्धा आत्महत्याग्रस्त लोकांना मदत केली !!
मला तर खूप खूप आनंद झाला माझं खरे ठरले त्यापेक्षा काहीतरी चांगली सुरुवात झाली त्याचा !!

२. २००२ ची गोस्ट तेव्हा नुकतंच टीव्ही केबल घेतलेलं तेव्हा "सुरताल" म्हणून गाण्यांचा प्रोग्रॅम लागायचा झी मराठी वर .. तेव्हा एक ६-७ वर्षांची चिमुरडी एका छोट्या स्टुलावर बसून गाणे गायची ..आवाज तर खूप चॅन होता पण त्यापेक्षा ती खूप गोड आणि सुंदर दिसायची मी तेव्हा एकदा म्हणाले " हि मुलगी पुढे हिरोईन होणार बघ " आणि तसंच खरं ठरलं ती म्हणजे "टाइमपास " पिक्चर ची हेरॉईन केतकी माटेगांवकर !!!
अगदी तसंच २००९ ला "लिटल चॅम्प सारेगमपा " ला जेव्हा मी आर्या आंबेगावक ला पहिला तेव्हा ती नववीत आणि सगळ्यात मोठी कॉन्टेस्टंट होती . मी म्हणाले हि छान आहे दिसायला फक्त दात ठीक केले कि छान दिसेन आणि तसं आणि तसाच घडले . आर्या ने हेरॉईन म्हणून सुरुवात "ती सध्या काय करते " मधून केली !!!

३. मला थोडीफार पत्रिका कळते माझ्या एका मैत्रिणी ची सहजचं पत्रिका पहिली ( मी ज्योतिषी नाही आणि चुकून पण होणार नाही ... कारण नंतर सांगेन ) तर तिच्या पत्रिकेत "प्रेम विवाहाचे " योग होते आणि तिचे पण एका मुलावर प्रेम होते पण घरचे जात वेगळी म्हणून विरोध करत होते म्हणून त्याच्याशी लग्न होईल का म्हणून विचारात होती .. मी म्हणाले "काळजी करू नकोस .. घरचे कितीही विरोधात असले आणि अरेंज मॅरेज साठी कितीही प्रयत्न केले ..मुले पाहिलीस तरी तुझे लव्ह मॅरेज च होणार " तसंच खरं झालं त्या मुलाशी लग्न झालं पण माझ्यामनात ते लग्न यशस्वी होणं नाही असं मन सांगत होतं आणि झालंही तसंच खूप वर्षांनी कळले तीच त्या मुलाशी डिवोर्स झाला आणि लगेच तिचे दुसरे लग्न ठरले आणि मजा म्हणजे त्या मुलाने मागणी घातली आणि तिला हि आवडत होताच म्हणजे दुसरेही लव्ह मॅरेज !!

साल २००७ ची गोस्ट असेन अजून एक मैत्रिणीची पत्रिका पाहिली पण सगळीकडे डिव्होर्स चे योग होते पण मी तसं तिला सांगितलं नाही नंतर कळलं कि तिचे वैवाहिक लाइफ चांगले नव्हते आणि लवकरच डिव्होर्स घेणार आहेत आणि तो झालाही .. मला त्याचे खूप मनापासून वाईट वाटले !!!

४. साल २०१४ असेच एका मैत्रिणीची पत्रिका बघून सांगीतल की तु आणि तुझा नवरा नक्कीच abroad ला जातील आणि लगेच २-३ महिन्यात गेली पण !!( आजकाल १० पैकी ८ जातात ..त्यामुळे हा फक्त योगायोग होता ) मला खरंतर बघून नाही कळत पण सगळे उत्स्फूर्त पणे बोलून गेले !!

५.साधारण एप्रिल २०१४ ची गोस्ट असेन मी जवळच्या ' खंडोबा ' मंदिर ला आई बरोबर गेले . तेव्हा मी आई ला खंडोबा चा इतिहास विचारत होते
पण ती म्हणाली फारशी माहिती नाही तेव्हा मी म्हणाले ' खंडोबाची ' माहिती कुठून मिळाली तर बरे होईन किंवा ह्यावर कुठली सिरीयल यायला हवी आणि काय आश्चर्य लगेच म्हणजे मे २०१४ पासून "जय मल्हार " नावाची सिरीयल सुरु झाली !!

अनेकदा मी जे बोलते तसंच नंतर घडते किंवा तशी बातमी कानावर येते.

मजा म्हणजे मी जे काही खात असेन म्हणजे भेळ , एकादी भाजी किंवा काही खाण्याचं विचा येत असेन तसंच थोड्यावेळाने t.v सिरीयल मध्ये दिसते . मला ह्याची मात्र खूप गम्मत वाटते.

असे अनेक आणि बरेच अनुभव आहेत फक्त खंत म्हणजे स्वतःबद्दल काही फारशी intuition नाही . एवढा आठवतंय २००४ ला खुप अस्वस्थ होते खूप म्हणजे खूपच !!! पुढचा आपला काळ कठीण आहे हे मला आतून वाटत होते ( कदाचित कुणाला नकारात्मक विचार वाटेन ) आणि तसच झालें कठीण काळ अजूनही संपला नाही त्यात अनेक ज्योतिष वाऱ्या झाल्या पण समाधान नाही उलट काही ज्योतिष लोकांमुळे उरले सुरले hopes पण संपलेत ( काही चांगले पण ज्योतीषी असतील )आणि मिळाला तो म्हणजे नुसता मनस्ताप !!!( अजूनही अस्वस्थ आहे आणि मी ह्यावर काहीतरी लिहावे असे वाटते .. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढली तरी चालेन पण ज्योतीषीच्या नादी लागू नये .. तुम्हाला फक्त संताप आणि मनस्ताप मिळेल .. म्हणजे कसं आ बैल मुझे मार )

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>> आत्ताच माझ्या अंतर्मनाने सांगितले की लेमनटेमनजींनी त्यात तुला पकडलेले नाही. Happy <<<<
नक्कीच नाही प्रकाशराव (मग भले तुम्ही अन्निसकरता कामही करीत असा - पण तुम्ही वेगळे आहात, अभ्यासू व्यासंगी आहात). Happy तुमच्या अंतर्मनाने बरोबर सांगितले.

आपण जे आयुष्य जगतोय ते तसेच दुसर्‍या एका मितीत घडलेले असते. कदाचित अश्या कैक मिती असतील. आपण एका मितीतील आयुष्य जगून पुन्हा साधारण तसेच आयुष्य जगायला दुसर्‍या मितीत जातो. त्या मितीतले मध्येच काहीसे आठवते आणि त्यामुळे हे असे अनुभव येत राहतात. जर दुसर्‍या मितीत काही कारणांनी जन्म घेता आला नाही तर त्याच मितीत पुन्हा जन्म घेतो. याला पुनर्जन्म असे म्हणतात. या सर्वामागे लॉजिक हेच आहे. फक्त आपल्याला ते सिद्ध करता येत नसल्याने आपण श्रद्धा अंधश्रद्धा या चर्चेत अडकलोय. प्रत्यक्षात आहे हे विज्ञान. जसे विश्वाचा पसारा अनंत आहे तसेच आत्मा अमर आहे. तो एका मितीतून दुसर्‍या मितीत जातो. फक्त ती वाट मेल्याशिवाय दिसत नाही Happy

काही लोकांच्या डोक्यात मेंदूऐवजी कांदे बटाटे भरलेले असतात पण विज्ञानाला ते सिद्ध करता येत नसल्याने आपण श्रद्धा अंधश्रद्धा या चर्चेत अडकतो. जसं हवा दिसत नसली तरी तिचं अस्तित्व जाणवतं तसंच अशा लोकांशी वाद घातल्याशिवाय आपल्याला कळत नाही.

अंतर्मनाच्या शक्तीचा अनुभव मलाही आला आहे. टिव्हीवर एखादा जरा जुना हिंदी सिनेमा बघताना मी जेव्हा मनात आणते की या सिनेमात कादर खान नको बुवा, तर त्या पुढच्या ३ मिनिटांत स्क्रीनवर कादर खानची एंट्री होते. एकदा तर इतका कहर की माझ्या मनात विचार आला आणि पुढच्याच दृष्यात भिंतीवर हारासकटच्या फ्रेममध्ये कादर खानचा फोटो होता.

तरी नशिब, अंतर्मनाच्या शक्तीमुळे जिथे तिथे शक्ती कपूर दिसत नव्हता.

@ मानव पृथ्वीकर : नमस्कार , तुम्हाला माझे अनुभव हे " अंतर्मना ची शक्ती " intuition वाटत नसतील तर काही हरकत नाही . हा तुमचा दृष्टीकोन असेन आणि योग्यही असेन !! मी बोलले ह्या घटना शुल्लक वाटत असतील तर नाईलाज आहे !! अर्थात जे सांगितले त्यात बनाव नाही कि अगोदर योजना केली मग सांगितले बघा मी सांगितलेले खरे ठरले !!!असो . तुम्ही म्हणालात >>
यातले कुठले अनुभव नक्की इन्ट्यूशन (आतला आवाज) या प्रकारात मोडतात असे तुम्हाला वाटते?
कारण जे वाचले त्यावरुन तरी तसे जाणवले नाही.
इंट्यूशन म्हणजे तसे काही कारण नसताना, तर्कसुसंगत नसताना अचानक काहीशी जाणीव होणे / आतून आवाज येण्यासारखे वाटणॆ. (किंवा तार्कीक विचार, अनुभव एक सांगत असताना, त्याच्या उलट अथवा वेगळेच काही असण्याचा/ करण्याचा आतून संदेश येणे / तीव्र इच्छा होणे.)
उदा. भरधाव गाडी चालवत असताना अचानक गाडी थांबण्याची, वेग एकदम कमी करण्याची तीव्र इच्छा होणे. आणि मग पुढे अचानक झाडाची मोठी फांदी तुटुन रस्त्यात पडणे, वगैरे. >> असे अनुभव हे उच्च अंतर्मनाची शक्ती असलेल्या लोकांना कदाचित येत असेन . मी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि सर्वसामान्य असणे म्हणजे काही कमी नाही :). थोडे अवांतर पण जे उदाहरण दिलेत ते " F inal Destination " मूवी मध्ये आहेत कदाचित जर मूवी पहिले असतील तर कळेलच !!!

@ टग्या >> काही लोकांच्या डोक्यात मेंदूऐवजी कांदे बटाटे भरलेले असतात पण विज्ञानाला ते सिद्ध करता येत नसल्याने आपण श्रद्धा अंधश्रद्धा या चर्चेत अडकतो. जसं हवा दिसत नसली तरी तिचं अस्तित्व जाणवतं तसंच अशा लोकांशी वाद घातल्याशिवाय आपल्याला कळत नाही.>>
तुम्ही म्हणालात कि काही लोकांच्या कांदे बटाटे भरलेत .. तर हे वाक्य मला खूप खटकले .. असे कसे तुम्ही बोलू शकता कुणालाही !! सगळेच काही तुमच्यासारखे किंवा न्यूटन,आईन्स्टाईन नसतात !! पण म्हणून सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेल्या ना जगण्याचा अधिकार नाही का ??

@limbutimbu : मला वाटतं तुम्ही ज्योतिषी आहात पण तरी तुम्ही मानवजी ची बाजू घेतली .. हरकत नाही पण म्हणून ज्योतिष पुस्तकात जे लिहिलंय म्हणून ते खरे आणि माझे अनुभव हा फक्त लॉजिकल योगायोग होता असे नाही ना होत अर्थात हे माझे मत आहे .

माफ करा पण सध्या जोतिषांवर विश्वास नाही म्हणजे ज्योतिष शात्रावर नाही असे नाही तर आजकाल योग्य , अभ्यासू माणुसकी असलेले , माणसाची पारख असलेले ज्योतिषी नाहीत . त्यामुळे मन कटू झालंय त्यांच्याबद्दल अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि जसा अनुभव तसेच आपले मत बनते !! ज्योतिषांनी माणूस पाहून त्यःची मनस्थिती आणि क्षमता पाहून भविष्य सांगावे असे वाटते भले मग खोटे खोटे चांगले सांगावे आणि वाईट हे मनातच ठेवावे !

एक गोस्ट सांगते त्यावरून मला जे म्हणायचंय ते तुम्हाला सांगते ! जी सकाळी पेपर मध्ये ४-५ वर्षांपूवी आली होती आणि हि सत्य घटना आहे
एक माणूस होता खूप निराश आणि हताश होता कारण त्याचा जॉब गेला होता त्यात त्याला कर्ज पण होते त्यात बायको आणि दोन छोट्या मुलांची जबाबदारी पण होती. एकंदरीत खूप वाईट आणि निराशाजनक परिस्थिती होती. मग तो एका ज्योतिषी कडे गेल आणि त्यांना पत्रिका व परिस्थिती दोन्ही सांगितली . ज्योतिषाने पत्रिका बघून सांगितले तुमच्या पत्रिकेत "शनी मंगळ युती " आहे त्यामुळे तुमचे कधी चांगले होणार नाही अशीच वाईट परिस्थिती शेवट पर्यंत रडत खडत दिवस काढावे लागतील !! तुमचे कधीच चांगले होणं नाही !!!. आधीच निराश झालेला तो माणूस खूप अस्वस्थ आणि सैरभैर झाला . मग तो घरी आला आणि त्याने आपल्या दोन मुलांना , बायकोला मारून स्वतः आत्महत्या केली !!! खूप वाईट झाले कदाचित त्या ज्योतिषाने खोटे का असेना पण आशेचा किरण दाखवायला हवा होता . एका ज्योतीषी मुळे १ नाही ४ लोकांचा हकनाक प्राण गेला !! तो निराश होता तरी त्याला जगण्याचा हक्क होता ( Live and Let Live)

मला वाटते ज्योतिषी हा ज्योतिषी कमी आणि प्रेरणा देणारा मार्गदर्शक असावा .

मी सांगितलेल्या गोष्टीची लिंक : http://mr.upakram.org/node/3638

राहिले शाप आणि आणि आशीर्वाद .. मला तरी मी जे शाप किंवा आशिर्वाद खरे ठरताना पाहिलेत स्वतः डोळ्याने अर्थात जेवढी इंटेन्सिटी तीव्र तेवढा रिझल्ट !!!

>>तुम्ही म्हणालात कि काही लोकांच्या कांदे बटाटे भरलेत ..
कृपया "डोक्यात" हा महत्वाचा शब्द वगळू नका

>>तर हे वाक्य मला खूप खटकले .. असे कसे तुम्ही बोलू शकता कुणालाही !!
का खटकले? हे शुद्ध विज्ञान आहे. फक्त सिद्ध करता येत नाही. पण आपल्या सगळ्यांना डोक्यात कांदे बटाटे भरलेल्या लोकांचा अनुभव वरचेवर येतच असतो

>>सगळेच काही तुमच्यासारखे किंवा न्यूटन,आईन्स्टाईन नसतात !! पण म्हणून सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेल्या ना जगण्याचा अधिकार नाही का ??
मी कधी म्हटलं की मी न्यूटन किंवा आईन्स्टाईन आहे? मी कधी म्हटलं की ज्यांच्या डोक्यात कांदे बटाटे असतात त्यांना जगण्याचा अधिकार नाही? तुम्ही ज्या प्रकारे प्रतिवाद करत आहात त्यावरून असं नाही वाटत की माझ्या विधानाला पुष्टी मिळतेय?

वृंदा, मी सुद्धा सामान्य माणुसच आहे.
"अंतर्मनाची शक्ती (intuition) की बोला फुलाला गाठ - देव जाणे" हे शिर्षक तुम्ही दिले आहे.
intuition वगैरे काही नसते, ते सांगणारा बनाव करतोय, असे मी मानत नाही.
तर ती मानवी मेंदुने विकसीत केलेली कला आहे असे मी मानतो.
तुम्ही दिलेल्या उदाहरणांमधुन मी (माझ्या परीने म्हणुया आता) इंट्यूशन शोधत होतो आणि तसेच यात योगायोगाची कितपत शक्यता हे ही बघत होतो, आणि तुम्हाला प्रश्न विचारले. पत्रिकेच्या दोन उदाहरणांपैकी एका उदाहरणात तुम्ही ’मला खरंतर बघून नाही कळत पण सगळे उत्स्फूर्त पणे बोलून गेले” असे म्हटले. म्हणुन पत्रिकेची दोन्ही उदाहरणे ही पत्रिकेवरुन सांगितली अशी घ्यावी की अंत:स्फूर्ती म्हणुन घ्यावी हा ही पडलेला प्रश्न, ज्याचा खुलासा तुम्हीच करु शकाल असे वाटले.
माझे विचारणे तुम्हाला खटकले असे दिसतेय.

असो. तुम्ही माझी पोस्ट कृपया इग्नोर करा.

टग्या, माझी बायको प्युअर व्हेजीटरीयन आहे. ती अधून मधून माझे डोके खात असते. तेव्हा माझ्या डोक्यात कांदे बटाटेच भरलेले असणार.

मी मेल्यावर इतर अवयवदाना बरोबरच माझ्या मेंदुचा भेजा फ्राय बनवून तो शाकाहारी लोकांना खाउ घालावा असे फॉर्ममध्ये नमूद करत आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा.

मनापासून वाचला लेख.
पहिल्या दोन उदाहरणांच्याबाबतीत ठोस सांगता येईल. टांझानियातील एक वैज्ञानिक आंबनुव्ह येलकोंडो यांच्या थिअरी प्रमाणे हे शक्य आहे.
पहिल्या दोन्ही वातावरणात तुम्ही व्हॉट्स अ‍ॅप व टीव्ही ही माध्यमे वापरली आहेत. येलकोंडो यांच्यामते मोबाईल व टीव्हीतून किरणं निघत असतात. आपण जे बोलतो त्या उर्जेचं रुपांतर होत असतं. उर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही हा त्या आपल्या ह्या न्यूटन चा नियम आहे हे व्हॉटसअ‍ॅप वर वाचले असेलच. उदाहरण द्यायचे म्हटले तर एमसवर्ड मधला मजकूर आपण मायबोलीमध्ये कॉपी पेस्ट करतो, किंवा लॅपटॉपमधला व्हिडीओ पेनड्राईव्ह मधे घेऊन टीव्हीवर पाहतो किंवा एव्हीआय फाईलचे रुपांतर मोबाईल मधे चालणा-या व्हिडीओफाईल मधे करतो. वायफायद्वारे अथवा ब्ल्यूटूथद्वारे व्हिडीओ मोबाईलमधे शेअर करतो. पण तरीही त्या सिनेमातले कंटेन्ट बदलतात का ? उत्तर आहे नाही. त्यातल्या भावभावना या मूळ सिनेमाप्रमाणेच आपल्याला अपील करतात. थोडक्यात काय तर थिएटरमध्ये माहेरची साडी पाहताना माझी आजी जितकी रडली होती तितकीच ती स्मार्टफोनवर तो सिनेमा पाहताना रडली.

तुम्ही जेव्हां व्हॉटसअ‍ॅप वर आवाहन केले ते अशाच पद्धतीने सगळीकडे पोहोचले. एकाची सर्दी दुस-याला होते त्याप्रमाणे या भावना इतर अनेक पोस्ट्स कॅरी करत राहिल्या आणि या पोस्टला घासून गेलेल्या पोस्टी व्हायरल होत होत जेव्हां मकरंद किंवा अक्षयकडे पोहोचल्या तेव्हां त्या पोस्ट्सला तुमच्या मूळच्या पोस्टचे चिकटलेले भावजंतू सक्रीय झाले व त्यांनी या दोघांच्या भावविश्वात प्रवेश केला आणि काम झाले. टीव्हीच्या बाबतीत इतकेच म्हणता येईल की जी रेडीओ ऎक्टीव्ह किरणे तुमच्यापर्यंत पोहोचली त्यांचा आणि तुमच्या भावनांमुळे तुमच्या भोवतालच्या कॉस्मिक किरणांमधे झालेल्या बदलांचा संयोग होऊन वातावरणातल्या एक्टोप्लाझमवर परिणाम होऊन त्यात एलेक्ट्रोमॆग्नेटिक रिअ‍ॅक्शन झाली असावी. वीज ज्याप्रमाणे पाण्याशी संपर्क झाल्यावर पाण्याच्या स्त्रोतापर्यंत जाते त्याचप्रमाणे तुमची केमिकल रिअ‍ॅक्शन टीव्हीकेंद्रापर्यंत पोहोचली असावी व तेथून व्हायरल झाली असावी....

अजून प्रतिसाद वाचले नाहीयेत. कदाचित काही प्रकाश पडू शकेल ..
माझे अंतर्मन असे सांगतेय की ट्रंपजी आणि मोदीजी हे कुंभमेळ्यात हरवलेले भाऊ असावेत.

>>>> @limbutimbu : मला वाटतं तुम्ही ज्योतिषी आहात पण तरी तुम्ही मानवजी ची बाजू घेतली .. हरकत नाही पण म्हणून ज्योतिष पुस्तकात जे लिहिलंय म्हणून ते खरे आणि माझे अनुभव हा फक्त लॉजिकल योगायोग होता असे नाही ना होत अर्थात हे माझे मत आहे . >>>>
एकतर मी कुणाचीही (व्यक्तिची) बाजू घेतली नाही तर एकंदरीत चर्चेवर माझे मत मांडले आहे. तसेच माझ्या आख्ख्या पोस्ट मध्ये, तुम्ही जे काही लिहिलेत ते खरे की खोटे याचीही वास्तपुस्त घेतलेली नाही. क्रुपया माझ्या पोस्टी परत वाचा.
कायेना, की कित्येकदा, मलाही माझ्या पोस्टचा अर्थ समजुन घ्यायला माझ्या मलाच परत परत वाचाव्या लागतात. Proud

@limbutimbu हाहा..हे मात्र खरंय .. मलाही नीट कळले नाही ..असो पण तुमचा नक्कीच भरपूर ज्योतिषाचा अभ्यास दिसतोय त्याबद्दल नक्कीच आदर आहे आणि मी पुन्हा सांगते की ज्योतीषशात्रा बद्दल आदर आहे . फक्त ज्योतिष लोकांनी त्याचा उपयोग ते जे दुःखी निराश आहेत त्यांना आशेचा छोटा का होईना किरण दाखवावा ह्यासाठी करावा इतकंच !!!

@मानव पृथ्वीकर: नक्कीच च्रप्स म्हणाले तसे तुमच्या पोस्ट ला इग्नोर करणे योग्य होईन आणि मनापासून धन्यवाद की तुम्ही योग्य आणि सौम्य शब्दात हे सांगितलंत Happy

@ टग्या : मला वाटते आपण इथेच थांबावे .उगाच वाद वाढवून नको तो मनस्ताप किंवा दुखावणे नको कारण जे बोलायचे होते तुमच्या पोस्ट बद्दल ते बोललेय. तुम्ही नावा प्रमाणे आहात. अशा लोकांपासून मी लांब राहणे पसंद करते Happy म्हणजे दोन्हीकडील लोक खुश !!!

@ सपना हरिनामे >> खूप चांगले वैज्ञानिक विश्लेषण दिले आहे . तसंही विचारांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग /लहरी असतात हे सिद्ध झालंय आणि ह्या लहरीना ऊर्जा असते हे हि खरंय . न्यूटन च्या नियमाप्रमाणे Energy cannot created nigher destroy.It can be transform from one state to another state आणि त्यानुसारच काही घटना घडल्या असतील !!

http://cdn1.maayboli.com/node/48359?page=1 या धाग्यावर वेगवेगळ्या मितींचे खूप सुंदर शास्त्रीय विवेचन केले आहे. तिथला एक उतारा इथे देतोय

{क्वांटम थेअरी मध्ये बघणे/अनुभवणे यामुळे वस्तुला एक स्थिती प्राप्त होते, इतर वेळी ती सगळ्या शक्य स्थितींमध्ये एकाच वेळी असते असे जे म्हटले आहे. ते बघणे / अनुभवणे म्हणजे एका conscious mind ने केलेले निरिक्षण.
Double slit experiment नुसार conscious mind निरीक्षण करत नसेल तर एक electron एकाच वेळी दोन्ही फटींतून जातो, पण जर conscious mind निरिक्षण करत असेल तर मात्र तो एकावेळी एकाच फटीतून जातो}

तर याच अनुसार जेव्हा conscious mind निरीक्षण करत असेल, म्हणजे एक्स रे, सिटी स्कॅन वगैरे करत असू तेव्हा डोक्यातले कांदे बटाटे अचानक मेंदूसारखे दिसू लागतात पण एरवी ते कांदे बटाटेच असतात

धन्यवाद वृंदा.
इक्वेडोर मधे डॉ. जिबारो शुआरा यांच्या नेतृत्वाखाली जे संशोधन चालू आहे त्याबद्दल इथे लिहावे कि न लिहावे या विवंचनेत आहे.

इक्वेडोर मधे डॉ. जिबारो शुआरा यांच्या नेतृत्वाखाली जे संशोधन चालू आहे त्याबद्दल इथे लिहावे कि न लिहावे या विवंचनेत आहे. >>> नका लिहू. ते खूप सिक्रेट संशोधन आहे. तुमच्यापर्यंत पोहचलेच कसे याचे आश्चर्य वाटत आहे.

डॉ. शुआरा यांनी संशोधनात जी किरणे वापरली त्यातील एक किरण तुम्ही तर नव्हे?

सपना,
मस्तच लिहिलेय.
कृपया या दोन्ही शास्त्रज्ञांच्या महान कार्यावर एक दोन लेख लिहून आमच्या डोक्यात ज्ञानाची किरणे पाडा.

उर्जा अक्षय्यतेचा नियम आणि उदाहरण खासच आहे.

किती हुशार आहात हो तुम्ही!

@सपना हरिनामे
>टांझानियातील एक वैज्ञानिक आंबनुव्ह येलकोंडो यांच्या थिअरी प्रमाणे हे शक्य आहे.
हो मी ही थियरी वाचली आहे. पण ते "येलकांडो" आहे , "येलकोंडो" नाही.

>थोडक्यात काय तर थिएटरमध्ये माहेरची साडी पाहताना माझी आजी जितकी रडली होती तितकीच ती स्मार्टफोनवर तो सिनेमा पाहताना रडली.
स्मार्टफोनवर सिनेमा पाहताना फोन कुणाच्या हातात होता? माझी आजी थियेटरमधे जास्त रडली. कारण स्मार्टफोनवर सिनेमा पाहताना एका हातात फोन, दुसर्‍या हाताने डोळे पुसणे सुरु झाल्यावर ती म्हणाली त्यापेक्षा थियेटरमधेच जाऊन बघू पुन्हा.

>एकाची सर्दी दुस-याला होते त्याप्रमाणे या भावना इतर अनेक पोस्ट्स कॅरी करत राहिल्या आणि या पोस्टला घासून गेलेल्या पोस्टी व्हायरल होत होत जेव्हां मकरंद किंवा अक्षयकडे पोहोचल्या तेव्हां त्या पोस्ट्सला तुमच्या मूळच्या पोस्टचे चिकटलेले भावजंतू सक्रीय झाले व त्यांनी या दोघांच्या भावविश्वात प्रवेश केला आणि काम झाले.
हो हो. असेच होते. हीच नवीन टेक्नोलॉजी नवीन नोटांमधे वापरली आहे त्यामुळे त्या नोटा कुणी, कधी , कुठल्या कामासाठी वापरल्या आहे हे आता ट्रॅक होते. इतकेच नाही तर व्यवहार करताना नोटा देणार्‍याच्या आणि घेणार्‍याच्या भावना त्या त्या वेळेस काय होत्या हे ही ट्रॅक होते.
हे ट्रॅक होऊ नये म्हणून एक सोपी ट्रीक आहे. प्रत्येक वेळेस नोट दिली किंवा घेतली की तुम्ही एक चुटकी वाजवली तर , चुटकी वाजवणार्‍याचे काहीही ट्रॅक करता येत नाही.

LoL,
या धाग्यात दुसरा "माचु पिचू" चा धागाहोण्याचे पोटेन्शिल आहे Happy

@मामी, सपना हरिनामे
>इक्वेडोर मधे डॉ. जिबारो शुआरा यांच्या नेतृत्वाखाली जे संशोधन चालू आहे त्याबद्दल इथे लिहावे कि न लिहावे या विवंचनेत आहे. >>> नका लिहू. ते खूप सिक्रेट संशोधन आहे. तुमच्यापर्यंत पोहचलेच कसे याचे आश्चर्य वाटत आहे.

सहमत. त्यापेक्षा डॉ. जिबारो शुआरा यांनी ग्वाटेमालामधे जे संशोधन केले ते तुम्ही वाचले असेलच. ते मराठी वाचकांपर्यंत पोहोचण्याची आज जास्त गरज आहे.

@वृंदा
माहितीपूर्ण लेख
>( मी ज्योतिषी नाही आणि चुकून पण होणार नाही ... कारण नंतर सांगेन )
प्लीज प्लीज . सांगा ना आम्हाला कारण.

अगं बाई , मला मेलीला एखादा विषय भावला कि काय बोलू नि काय नको असं होऊन जातं !
माझी टिंगल तर नाहीत ना करत ? ते व्याजोक्ती कि श्लेष अलंकार असं काही तरी असतं ना ? ( मराठीच्या पेपरला मी ग्रामर ऑप्शनला टाकलेलं )

किरण वरून काहीतरी गौरसमज झालेला दिसतो. मी कुणा आमीरखानची बायको नाही हो ..

गौरव समजा तुमचा >>> कुमार ? नाही हो, माझा फेव्ह तर सखा आहे.
सखा वरून आठवलं, त्याचं कुठल्या हिरविनीशी जुळलंय असं वाचलं की माझ्या अंतर्मनात लहरी उठायच्या की ब्रेक अप व्हावा आणि तसंच व्हायचं. ऐश्वर्याचं तर तळपट व्हावं असं एकदा तीव्रतेने मनात आलेलं आणि तिचं लग्न अभिषेकशी झालं.

मी गेले सोळा वर्षांपासून अंकशास्त्राचा अभ्यास करतोय. ज्यांना मार्गदर्शन केलंय त्यांना चांगलेच अनुभव आलेत. माझं निरिक्षण व निष्कर्ष अचूक असतात असे लोक म्हणतात. माझ्या अभ्यासामागे धंदेवाईकपणा नसण्याचे ते एक कारण आहे. ज्याला जेव्हा योग्य सल्ला मिळायचा असतो, तेव्हा काहीही झाले तरी तो कुठूनतरी मिळतोच असं निरिक्षण आहे. सल्ला मिळूनही लोक पाळत नाहीत तेव्हा खड्ड्यात पडतांना देखील पाहिले.

एका जातकाला अमूक एका मुलीशी लग्न करू नको असे सांगितले. त्याने ऐकले नाही. एंगेजमेंट करून बसला. का तर म्हणे मुलगी नेहमीच्या बघण्यातली आहे. सुशिल-संस्कारी(?) आहे, वैगेरे. मी म्हटलं, तू खड्ड्यात पडतोयस बघ. त्याने ऐकले नाही. लग्नाच्या चार दिवस आधी मला फोन आला. लग्न मोडले म्हणे. त्या पोरीचा बॉयफ्रेंड ह्याला फोन करून करुन धमक्या देत होता. प्रचंड त्रास होऊन ते लग्न मोडले. पोलिस केस वैगेरे झाली. मुलीकडचे लग्नाचा खर्च ह्यांच्याकडून वसूल करायला दबाव आणायला लागले. अजून काय काय. तरी त्याच्या भावा आणि बहिणीच्या दोघांच्याही लग्नाच्या वेळेस त्याला सल्ला दिला होता की निवडलेली पार्टी सुटेबल नाही. मी दिलेला सल्ला तेव्हाही मनावर घेतला नाही. पण अनुभव तर आलेच. ते कसे नाकारणार?

एक एवढ्यातच संपर्कात आलेले गृहस्थ आहेत. मागच्या जानेवारी २०१५ मधे ते माझ्याकडे एक समस्या घेउन आले. त्यांच्या भावाचे ३३-३४ वय झाले तरी लग्न जुळत नाही अशी समस्या होती. मी सांगितलं की ते २०१६-१७ दरम्यानच होईल. तर ते लोक एका स्थळाशी ठरलंय. आम्ही फायनलच केलंय. तुमच्याकडे सल्ल्यासाठी आलोय (की ठरलेलं बरोबरच आहे असं तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा बास..) वैगेरे बोलत होते. मी म्हटलं, “अहो पण हे लग्न शक्यच नाही”. त्यावर ते त्वेषाने, "नाही हे होईलच." मी म्हटलं, "कसं काय?" तर गंमत बघा. माझ्या कडे आलेत ते २२ जानेवारीला. त्यांची युएसवरून बहिण येणार होती फेब्रुवारीच्या ४ ते १२ च्या दरम्यान. तेव्हा ९ तारखेचा मूहूर्त आम्ही फिक्स केलाय. सगळे तयार आहेत. साधासाच समारंभ होईल. यांव त्यांव. मला कळले की हे लोक फक्त घेतलेला निर्णय ठोकबजावून घेण्यासाठीच आलेत. मी बोललो, ठिकाय करा तुमच्या मनासारखे. मनाने चिंतले तर सर्व शुभच होईल.

दोन महिन्यांनी कळले की ते लग्न झालेच नाही. का? तर वरपित्याचा योग्य मान वधुपित्याने राखला नाही. लग्नाचे फिक्स होण्याआधी वरपित्याने नाराजी दर्शवली. लग्न मोडले. दॅट्स इट.

Pages