अमेरिकेतील चालू घडामोडी (राजकीय)

Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15

ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पण लूक्स लाईक ईट वॉज ओन्ली मिसइंटरप्रिटेशन. >> Proud ओके ! मला ह्यातून तो अर्थ, त्यातून हा अर्थ असे शब्द खेळ करण्यापेक्षा, टॅक्स ब्रेक दिल्याने इन्फ्लेशन खूप वाढत नसतं असे म्हणायचे होते, जे मी तीनदा म्हणले आहे. ते चुकीचे असेल तर स्टॅटिस्टिकल डेटा देऊन खोडलेस तर मी मान्य करायला तयार आहे. Happy

आता फारएंडची शंका.

जे कर्ज २०० ते २५०,००० वर ३० वर्षांसाठी आहेत, त्यांना इंट्रेस्ट रेट मुळे होणारा फायदा होणार नाही, हे खरे आहे, पण आता पूर्ण कॅलक्युलेशन बघ,

२७५००० कर्ज ४ टक्के व्याज, ३० वर्ष
प्रत्येक वर्षीचे व्याज - मिळणारी कर सवलत

$10,740.39 - $3,222.12
$10,546.52 - $3,163.96
$10,344.73 - $3,103.42
$10,134.69 - $2,635.02
$9,916.08 - $2,578.18

थोडक्यात पहिल्यावर्षी ३२०० आणि प्लस पाँइट्सचे आणि तर धरले, अगदी आणखी दुपटी एवढे तर ६४०० ( जे शक्य नाही, पण उदा करता) तरी नविन स्टॅन्डर्ड डिडक्शन - मॅरिड, फाईलिंग जाँईटली मध्ये साडेबारा हजार + ६४०० < २४००० म्हणजे तो व्यक्ती तरीही फायद्यात असणार.

मिलियन डॉलर कॅप वर मात्र थोडा फायदा होऊ शकतो. थोडक्यात मिडल क्लासने आणखी महाग घर घेण्यासाठी उद्युक्त करणे हा पवित्रा असू शकतो, कारण त्यातून जॉब निर्मिती होणार आहे, असा ट्रम्पचा होरा आहे, जो अगदीच चुकीचा आहे असे म्हणवत नाही.

शिवाय आपल्यासारखांना फायदा होणार आहे.

खेळते भांडवल वाढल्यामुळे स्पेंडिंग वाढणार हे सांगायला जोतिष्यी वा अर्थतज्ञाची गरज नाही, पण सध्याचा लोअर अन लोअर मिडलक्लास हा कर्जात बुडाला असल्यामुळे टॅक्स ब्रेक = लगेच रिटेल स्पेन्ड असे होईल असे वाटत नाही, तर अतिरिक्त पैसा = कर्ज परतफेड असेही थोडेफार होणार. थोडक्यात बरेच जण रिटेल स्पेन्ड वर भर देतील, जी जरूरी आहे ( गोईंग बॅक टू फिस्कल कन्झर्व्हेटिव्ह स्कुल ऑफ थॉट) आणि बरेच जण कर्जही थोडे थोडे फेडणार. म्हणून इट विल बँलस आउट आणि इन्फ्लेशन खूप वाढेल वगैरे असे त्यामुळेच वाटत नाही.

BTW इन्फ्लेशन इज पार्ट ऑफ इकॉनॉमीक सायकल एनीवे, त्यामुळे लगेच खूप काही धोका होऊन इकॉनॉमी ठप्प होईल असे नाही.

१५% corporate tax ( from 39.4% ??) हा खुपच मोठा बदल आहे. ह्यात हे short term मध्ये नुकसान होणार आहे ते कसे भरुन निघणार. कदाचित त्यासाठी One-time tax on overseas profits लावला असेल पण ते किती भरुन काढेल ते बघावे लागेल

long run मध्ये हॉगकॉग, सिंगापुर, आर्यलड मधले selling hub अमेरिकेत येउन corporate tax चे उत्पन्न वाढेल.

साहिल,
तसेही डेव्हलप्ड कंट्रींज मध्ये फ्रान्स वगळता कोणी इतका टॅक्स आकारत नाही. माझ्या मते १५ ऐवजी २० पण चालला असता, कारण २० मुळे अमेरिका प्रगत देशांच्या तुलनेत जवळ आली असती, आणि शेवटच्या वर्षी १५ करता आला असता. माझ्यामते ही एक वेलकम मूव्ह आहे. ( लोकं दोन्हीकडून ओरडणार) पण लाँग टर्म मध्ये बेस्ट मूव्ह.

सबुरीनं चालूद्या!
फायनान्स/ ईकॉनॉमी सगळा पर्स्पेक्टिव चा खेळ आहे. चूक बरोबर काही नाही. आपण फक्त शक्यता वर्तवू शकतो. ज्याला आपल्या अ‍ॅनालिस्सिवर जास्तं कॉन्फिडन्स तो आहे त्याला वाटं तो जिंकणार.
माझ्या मते पीक ईकॉनॉमी (पीक मार्केट ईंडेक्स, लोएस्ट अनएम्ल्पॉयमेंट, पीक मार्जिन्स, खालावणारी अ‍ॅसेट ईफिशिएन्सी, रिटेल सेक्टर टेकिंग हिट,पीकींग आऊट हाऊसिंग प्रायसेस, रायझिंग ईंट्रेस्ट रेट सगळी टेक्स्ट बुक लक्षणं आहेत ईकॉनॉमी हीटेड होत असण्याची) अश्या ईकॉनॉमी मध्ये कंझुमरच्या हातात अजून पैसा देवून , अकाऊंट डेफिसिट वाढवणे (तुम्हीच वाढीव स्पेंडिंग प्रपोज केलेलं असतांना आणि फंड्स नाहीत ह्या नावाखाली ईपीए, मील्स ऑन व्हील्स, चाईल्ड न्यूट्र्रीस्शन सारखे फंड्स कँसल केले असतांना) पुन्हा तो डेफिसिट डेट रेज करून भागवणे (असे न करून पर्यायच नाही) म्हणजे कंपनी डबघाईला आली मह्णून दिवाळीला नेहमीचा बोनस मिळाला नाही म्हणून कर्ज काढून मुलांच्या आधीच्या पेक्षा अता महाग झालेल्या फटाक्यासाठीचे बजेट अजून वाढवण्यासारखे आहे.
पुन्हा फेड ने हीटेड ईकॉनॉमी बघ्हून ईंत्रेस्ट वाढवला तर $१०० वाचलेल्या टेक्स्वर वाढीव रेट ने $१५० चा भूर्दंड पडणार नाही का?
अशी कन्फ्युझिंग / काँट्राडिक्टिंग मॉनेटरी आणि फिस्कल पॉलिसी कुठल्या ईकॉनॉमी ला सूट झाली आहे आजवर?
केदार हे बघ,
http://www.washingtonexaminer.com/yellen-the-fed-isnt-baking-trump-tax-c...

कॉर्पोरेट टॅक्स रेट काँपिटिटिव नव्हता हे मान्यच तो कमी होणारच होता पण त्याचे मॅग्निट्यूड तू म्हणतोस तसे सर्प्राईझिंग आहे. आता दुसर्‍या देशात पार्क करून ठेवलेल्या पैशांचं अ‍ॅपल सारख्या मोठ्या कंपन्या काय करतात , एवढी मोठी मेहेरनजर वरून अजून जर त्यांना ही टॅक्स हॉलिडे सारखं काही मिळाणार असेल तर मग अजूनच पैसा ऑतला जाणार.

टॅक्स ब्रेक दिल्याने इन्फ्लेशन खूप वाढत नसतं असे म्हणायचे होते, जे मी तीनदा म्हणले आहे. ते चुकीचे असेल तर स्टॅटिस्टिकल डेटा देऊन खोडलेस तर मी मान्य करायला तयार आहे. >>>>>> अर्र्र्र दादा! जे तो म्हन्लाच नाही ते कशा पायी तेच्या गळ्यात मारुन राहिलात हे कवाचं सांगत आहे वर तुम्ही मलाच स्टॅटीस्टिकल डेटा मागता म्हणजे कमाल आहे तुमची. Lol ठण्कवायची घाईच फार तुम्हाला. आधी बघा तर खरं नीट मानूस काय म्हन्तोय ते. Proud

हाबं, ही चिटिंग आहे. इथे मी तुम्ही न सांगता तुमची बाजू मांडून राहिलो अन तुम्हीच भस्कान गांधीगिरी सुरु करता ते काय बरोबर नाही. अशाने माबो वर कर्मणूक कशी होईल? Lol

ओन्ली जोकिंग. Happy

लेका सबुरींन चालू द्या म्हणून पळतोस होय. Proud

तुला असं का वाटतं की इकॉनॉमी डबघाईला आली / येणार म्हणून टेक्स बुक रूल अप्लाय केले? खरंच इतकी वाईट परिस्थिती आहे का? मग ट्रम्प मत द्या ह्याच कारणामुळे म्हणत होता का? की हे सर्व होणार असे तुझे प्रिडिक्शन / शंका आहे?

फेड ने हीटेड ईकॉनॉमी बघ्हून ईंत्रेस्ट वाढवला तर $१०० वाचलेल्या टेक्स्वर वाढीव रेट ने $१५० चा भूर्दंड पडणार नाही का? >> फेडनी टॅक्स बेक यायच्या आधीही ऑलरेडी रेट वाढवला आहे आणि तो येत्या वर्षात ५ टक्के पर्यंत गेला तरी आय विल नॉट बी सरप्राईज्ड.

मी वर उदाहरण दिले आहे. ४ % वर. त्याचे ८ टक्के कर. ( विच इज अनलायकली, पण अदर साईड ऑफ स्पेक्ट्रम ) तरीही फायद्यात राहणार. आणि आधी लिहिल्यासारखे, तू जर जास्त किमतीचे घर घेतले तर ओव्हरऑल अगदी जास्त इंट्रेस्ट रेट देऊन सुद्धा तू फायद्यात असणार. कारण मॉडगेज बेनीफिट अजूनही घेऊ शकतो, ते बंद नाही, त्यामुळे तुझा वाढीव व्याजाच्या घराच्या बाबतीतला मुद्दा टिकत नाहीये.

२७५०००, ८% , ३० वर्ष जम्बो

व्याज - टॅक्स बेनिफिट
$21,518.49 $6,455.55
$21,331.29 $6,399.39
$21,128.54 $6,338.56
$20,908.97 $5,436.33

आधी बघा तर खरं नीट मानूस काय म्हन्तोय ते. >>. अहो बुवा, तो अन मी " सेम पेज " वर आहोत, आम्हा दोघांनाही एकमेकांचे मुद्दे कळत आहेत. मला सुनवायला तुम्हाला नेहमी खुमखुमी असते, पण इथं अर्थशास्त्रात होल्ड करा जरा. Proud नाही तर माझा मुद्दा खोडन्यासाठी डेटा द्या अन तुमचे स्वतःचे मुद्दे मांडा, जे पटले तर मी लगेच +1 देईन अन्यथा खोडेन. Proud

केदार - थँक्स. म्हणजे एक थ्रेशोल्ड दिसतोय इण्टरेस्ट अमाउण्ट चा (मॅरीड कपल्स च्या दृष्टीने धरून) - ज्या पुढेच फक्त आयटेमाइझ्ड डिडक्शन्स फायदेशीर होतील घराचे इण्टरेस्ट असून सुद्धा.

एक ढोबळ अंदाज लावायचा तर $५०० के च्या पुढची लोन्स असतील तरच फायदा होईल. नाहीतर स्टॅ डि हेच जास्त होईल असे दिसते.

म्हणजे रेण्टवर घरे देणार्‍यांच्या कॅल्क्युलेशन मधे याने फरक पडेल.

एक ढोबळ अंदाज लावायचा तर $५०० के च्या पुढची लोन्स असतील तरच फायदा होईल >> थोडे जास्तच पण यू गॉट द पाँईट.

आणि तोच मुद्दा थोडे इमॅजिनेशन लावून पुढे न्यायचा तर ... २०० / ३०० अश्या लोअर व्हॅल्यू ( अगेन डिपेंड्स ऑन सिटी) घरांच्या किंमती आणखी खाली येण्याच्या शक्यता आहेत कारण आता त्यावर मिळणारा बेनिफिटच स्टॅन्डर्ड मध्ये मिळतो, त्यामुळे ते कारणच कमी झाले.
त्यामुळे एका रेंजचे होम मार्केट खाली येईल तर एका रेंजचे मार्केट वर जाईल.

ह्यावर फेडसचा एक पेपर ..
Do Mortgage Subsidies Help or Hurt Borrowers?

थोड्क्यात, येन केन प्रकारेण तुम्ही चांगल्या-वाईट गोष्टीत त्रुटी शोधत केजरीवालिझ्म जोपासणार...
अहो, सिरियावर हल्ला यात काही मी त्रुटी काढत नाहीये. मी फक्त या हल्ल्यासंबंधी काही जास्तीची माहिती लिहिली. बाकी ट्रंपला नावे ठेवणे यात कधीच काही चूक नाही.
नुसते काय घडले त्याचा विचार करावा.
ओबामाने नुसतीच पोकळ धमकी दिली. असे कधी करू नये. त्या मानाने ट्रंपने जे केले त्या मागे त्याचा स्वतःचा हेतू काहीहि असो. अमेरिका अजून या प्रश्नाकडे बघते आहे नि काही तरी करू शकते हे जरी जगाला नि रशियाला कळले तरी पुरे. आशा आहे की सगळे जनरल्स याहून अधिक इतक्यात काही करू देणार नाहीत ट्रंपला.
जेंव्हा जेंव्हा ट्रंपबद्द्ल काही लिहावे, बोलावे तेंव्हा तेंव्हा रिपब्लिकन लोकांची उत्तरे ऐकली की "खाई त्याला खवखवे" ही म्हण मला आठवते.

मिळकतीच्या ७.५% पेक्षा जास्त झालेला वैद्यकीय खर्च डिडक्टीबल असेल ना? नाहीतर बरेच ५० वर्षांवरील लोक बोंबा मारतील.
हे सगळे वाटते तितके सोपे नाहीये,
उगाच सोपे, सोपे करायचे म्हणून सरसकट एक नियम करायचा असे केले तर नुसती कॅल्क्युलेशन्स करून चालत नाही - इथे लोकांच्या जेवणाखाण्याचा संबंध आहे. श्रीमंतावरील कर रेगन, बुश दोघांनीहि कमी केले, पण नंतर क्लिंटन ने काय केले, बुशचे इराक युद्ध, बँकांवरील नियंत्रक नियम सैल करणे या सगळ्याचा परिणाम होऊन २००८ झाले.
तेंव्हा उगाच एकच मुद्दा घेऊन काहीतरी निर्णय घेऊन चालत नाही.
एव्हढा देश चालवायचा तर अक्कलहि तेव्हढीच लागते, त्या ऐवजी नुसते भांडत बसतात काही तरी एकच मुद्दा घेऊन.

दुप्पट केल्याने अमेरिकेतील अनेक स्वस्त मार्केट्स मधल्या ($२००-$३००़के) घरांची मॉर्टगेजेस असतील त्यांना त्यातून मिळणार्‍या फायद्यापेक्षा स्टॅ. डि. नेच जास्त फायदा होईल ना? इथे घरांच्या किमतीपेक्षा दरमहा जे इण्टरेस्ट भरायला लागते त्याच्याशी जास्त थेट संबंध आहे >> +१ स्वस्त मार्केट मध्ये घर असल्याने आणि संपूर्ण वर्ष काम न केल्याने मोर्गेज इंटरेस्टचा या वर्षी कर भरताना काहीही फायदा झाला नाही. डीडक्षन मध्येच ते कवर होत होतं.
नवे रेट किती इनकमला आहेत ते सांगितलं नाहीये ना?
बाकी हे डेफिसिट भरून काढायला काही प्लान दिला नाही तर उजवे लोकं हे बजेट अडवून नाही धरणार का?

मला सुनवायला तुम्हाला नेहमी खुमखुमी असते, पण इथं अर्थशास्त्रात होल्ड करा जरा. >>>> होल्ड करा म्हणजे?
खुमखुमी असं नाही. खुप ऑथॉरिटीनी वाक्य आलं की क्वेशचन करावासं वाटतं येवढच. Happy
हाबं आणि तुम्ही एका पेज वर असायचा काहीच संबंध नाही. ज्या मजकूराला बघून तुम्ही ठामपणे नाही म्हणालात त्या मागचं रिझनिंग विचारल्यावर हे लक्षात येतं की तुम्ही त्याचं वाक्य मिसइंटरप्रेट केलत. आणि ते करुनच्या करुन वर बाकी फाफटपसारा मांडला. डेटा वगैरे मागायचा प्रश्नच येत नाही.

उजवे लोकं हे बजेट अडवून नाही धरणार का?
उजवे म्हणजे रिपब्लिकन्स का?
त्यांना तर एकच माहित आहे - टॅक्स कमी करा. बाकी सगळे आपोआप चांगले होईल असे त्यांचे पक्के मत आहे.
जीडीपी ३ ते चार टक्क्यांनी वाढेल असे ट्रंप म्हणतो आहे ना, तसे झाले की आपोआप सगळे व्यवस्थित होईल. अगदी भिंत बांधायला सुद्धा वाट्टेल तेव्हढे पैसे देता येतील. असे त्यांना वाटते.
वर काही गणिते करून दाखवली आहेत तसली काहीतरी गणित करून दाखवले की त्यांना निवडून देणारे लोक पण म्हणतील, वा, वा.
शिवाय जे विरोधी मते देतील, ते पुढच्या निवडणुकीत जिंकणार नाहीत अशी धमकी ट्रंप देईलच.

ट्रंपचा पुनः पराभव झाला तर तो पुटिनला सांगून जगात कुठेतरी काहीतरी घडवून आणेल, मग घाईघाईने बिल पास करावेच लागेल नाहीतर अमेरिका बंद होईल ना!

होल्ड करा म्हणजे. हाबची बाजू घेऊन शब्दखेळ नको, कारण त्याचा मुद्दा मला समजला आहे. ( सेम पेज) सिरियस मुद्देसुद चर्चा ( मी तरी करत होतो) म्हणून होल्ड लिहिले . इथे खेचू नका टिपापावर खेचा, तिथे सिरियस काही नसते. असा त्याचा अर्थ आहे.

परत एकदा पहिल्या पोस्टी पासून ...

हाब - पैसा मार्केट मध्ये आला की किंमती वाढणार ईन्फ्लेशन वाढणार
मी - नाही. ( तुम्हीच ठणकावूण हा शब्द वापरला, मी नाही. Happy ) लोकांचा पैसा मार्केट मध्ये आला की इन्फ्लेशन वाढत नाही, जर सरकारने पैसा आणला ( प्रिंटिंग मनी) तरच इन्फ्लेशन वाढतं.

म्हणजे मी हाबच्या "इन्फ्लेशन" मुद्द्याला उत्तर देत होतो, कारण इन्फ्लेशनचे आणखी एक कारण सांगत होतो.

हाब - लोकांचा नाही रे, तो पैसा ते खर्च करून किंमती वाढवणारच (बुश ने २००८ मध्ये टॅक्स मनी परत दिलेला आठवतोय का, त्यानंतर काय झालं) ,

म्हणजे आम्हाला, आम्ही एकमेक काय बोलतो आहोत ते कळत होते. ( बुश टॅक्स रेफ )

इथपर्यंत तुमची एकही पोस्ट नव्हती. मग तुमची पहिली पोस्ट . ( त्या आधी वरची ही हाबची आहे, जी मी लिहिलेल्या मुद्द्याला उद्देशून

तुम्ही ..
मला उद्देशून - अगदी ठणकावून नाही? ... अरे पण सरकार काय येडं म्हणून पैसे छापतं का? आणि हाबं च्या वाक्यात लोकांचा असा शब्द कुठे आहे?

"ईंट्रेस्ट रेट रेज करून डेट वाढवून, पैसा मार्केट मध्ये आला की किंमती वाढणार ईन्फ्लेशन वाढणार" असं लिहिलय ना त्यानी?

म्हणजे इथ पासून मुद्द्याची गाडी डीरेल व्हायला सुरू झाली,
इथं सरकार पैसे छापन्याचा काही संबंध नाही, ते इन्फेशन वाढायला एक महत्त्वाचे कारण आहे, म्हणून मी तिथे लिहिले आहे.

मग माझे पोस्ट - हाबच्या वाक्यात इन्फ्लेशन हे वाक्य आहे. जे "अर्थ"साठी महत्त्वाचा आहे. मनी इन्फ्लो हा दोन मार्गांनी होतो हे त्याला माहिती असावे हे गृहितक आहे कारण तो इन्फ्लेशन हे वाक्य वापरत आहे. म्हणून ठणकावून नाही. टॅक्स ब्रेक दिल्यावर इन्फ्लेशन प्रचंड वाढत नसतं. म्हणून नाही.
पण तुम्ही दोना तीन पोस्टी नंतर तेच तेच लिहित होता. ज्यात मुद्दा काहीच नसून हाबला हे म्हणायचे नाही, पण तू (म्हणजे मी) असे मिस इंटरप्रिट करत आहे असे तुझे ( म्हणजे बुवांचे) म्हणणे होते. आणि पुढे तुम्ही मला उद्देशून लिहिले की, " ठण्कवायची घाईच फार तुम्हाला. आधी बघा तर खरं नीट मानूस काय म्हन्तोय ते. Proud"

त्यामुळे मग मी होल्ड करा असे लिहिले. कारण हाब आणि मी इन्फ्लेशन, मनी प्लो ( टॅक्स ब्रेक बुश संदर्भ) हे सर्व वापरून एकमेकांचे मुद्दे समजून पुढे जात होतो.

आणि जर तुम्ही टॅक्स ब्रेकचे + / - मुद्दे लिहिले असते, तर ते आपोआप चर्चेत आलेच असते, तसेही मी दोनदा लिहिले आहे. आणि अजूनही लिहित आहे.

इनफॅक्ट तुम्ही तुमच्या अन माझ्या तुम्हाला उत्तरार्थ पोस्ट वगळून चर्चा शांतपणे वाचा.

>>आधीच १९.८ ट्रिलिअन डेट मध्ये असलेल्या ईकॉनॉमीवर अजून टॅक्स कमी करून करंट अकाऊंट डेफिसिटचा बोजा टाकयचा. <<
वेरी पर्पज ऑफ धिस टॅक्स प्लॅन इज टु ड्राइव एक्नॉमिक ग्रोथ विच वुड ऑफसेट लॉसेस इन टॅक्स रेवेन्यु...

लोअर कॅपिटल गेन टॅक्स आणि रीपील ऑफ एएमटि इज ए वेल्कम चेंज. त्याचबरोबर पर्सनल टॅक्स डिडक्शन्स जाणार आहेत - त्यात स्टेट्/लोकल टॅक्सेसचा समावेश असेल. याचा फटका न्यु यॉर्क, मॅसेच्युसेट्स, कॅलिफोर्निया, इलिनॉय इ. हेवी टॅक्स असणार्‍या राज्य/शहरातील नागरीकांना बसेल. इंटरेस्टिंगली हि राज्य/शहरं सँक्च्युअरी सिटीज आहेत... Happy

पर्सनल टॅक्स डिडक्शन्स जाणार >> म्हणजे ४०१के पण जाणार का?
नाही Cohn said they would preserve tax breaks that incentivize homeownership, retirement savings and charitable giving. But almost all others would be jettisoned.

मी खेचत नव्हतो केदार. आय वॉज सिरियस.
मुद्दा परत तोच आहे, जो पहिल्या ३ पेस्ट केलेल्या वाक्यांमध्येच स्पष्ट होतोय.
"हाब - पैसा मार्केट मध्ये आला की किंमती वाढणार ईन्फ्लेशन वाढणार
मी - नाही. ( तुम्हीच ठणकावूण हा शब्द वापरला, मी नाही. Happy ) लोकांचा पैसा मार्केट मध्ये आला की इन्फ्लेशन वाढत नाही, जर सरकारने पैसा आणला ( प्रिंटिंग मनी) तरच इन्फ्लेशन वाढतं.
म्हणजे मी हाबच्या "इन्फ्लेशन" मुद्द्याला उत्तर देत होतो, कारण इन्फ्लेशनचे आणखी एक कारण सांगत होतो.

तुम्ही तुमच्या मते इनफ्लेशन कशामुळे होते हे सांगायला लागलात कारण तुम्ही समहाऊ पैसा मार्केट मध्ये आला की इन्फ्लेशन वाढतं असं हाबं म्हणत आहे असा समज करुन घेतला. त्याची पोस्ट नीट वाचल्यास लक्षात येइल की तो ते म्हणतच नव्हता.
आता पुढे येऊन तो तसं म्हणाला की नाही, मी तसच म्हणत होतो तर मग माझा मुद्दा मी मागे घेइन. पण मी पोस्ट लिहित असतानाच बहुतेक त्याचीही तेव्हाच पोस्ट आली. ज्यात त्यानी क्लॅरिफाय केलं की अर्थातच तो तसं म्हणत नव्हता. जे खरं तर त्याच्या पहिल्या पोस्ट मध्येच क्लियर आहे.
असं आहे, की एखाद्या मुद्द्याला काऊंटर करताना आपल्याला आधी मुद्दा समजला आहे का किंवा समोरचा माणूस नेमका काय सांगत आहेत हे कळलय का हे तपासून घ्यायची जबाबदारी आपलीच असते. मी तर म्हणतो एकदा विचारुन घ्यावं, की हा असा असा तुमच्या म्हणण्याचा अर्थं आहे का? तसा असेल तर मग पुढचा, म्हणजे मुद्दा काउंटर करायचा प्रपंच आपण मांडू शकतो.

बाकी, ते ठणकावून हे मी लिहिले होते ते मान्य आहे. तुम्ही अगदी कॉन्फिडंटली नाही म्हणून उत्तर दिलत त्यावरुन म्हणत होतो. बाकी रेट आणि डिडक्शन ची चर्चा वाचत आहेच. त्या बद्दल काहीच म्हणणं नाही.

अरे बुवा, तुझे पूर्ण गृहितक आहे की त्याला काय म्हणायचे आहे, ते समजावून घेतले नाही, आणि इतके वेळेस तेच सांगतो आहे की त वरनं ताकभात मी ओळखला आहे.
तो म्हणाला की इन्फ्लेशन वाढणार.

मी वर नाही म्हणण्याचे कारण गणित / रेट / डिडक्शन हे दाखवून सिद्ध केलं आहे आत्तापर्यंत. कारण नेट नेट गेन मॅरिडकपल + हाऊस ह्यांना कमीच असणार आहे. इथे नेट नेट गेन हा शब्द जास्त महत्त्वाचा आहे. कारण तोच पैसे किती खेळते राहिल हे ठरवणारा आहे. असे नाही होणार की सरसकट सगळ्यांना ( २४००० - १२७०० ) मिळणार. हे मला ती बातमी वाचल्यावरच कळले आणि तो मुद्दा पाहिल्यावर मी ठणकावून नाही, असे लिहिले आणि पुढील पोस्ट मध्ये मला वाटणारी आणि पटणारी आकडेवारी दिली.

तुला किंवा हाबला असे वाटत असेल की इन्फ्लेशन खूप वाढणार तर तू क्रॉस आकडेवारी दे, असे दोनदा त्यामुळेच लिहिले आहे. ती पटली तर मी होच म्हणीन. कारण ते का वाढणार नाही, ह्याबद्दल मी लिहित आहे.

आता आपण गोल गोल तेच ते बोलत आहोत असे मला वाटते. सो ठिक, मीच मिसइंटरप्रिट केले असे समजून पुढे जाऊ.

अरे बुवा, तुझे पूर्ण गृहितक आहे की त्याला काय म्हणायचे आहे, ते समजावून घेतले नाही, आणि इतके वेळेस तेच सांगतो आहे की त वरनं ताकभात मी ओळखला आहे.
तो म्हणाला की इन्फ्लेशन वाढणार.>>>>> बरोबर, इन्फ्लेशन वाढणार हे त्यानी लिहिलं पण त्यानी इंट्रेस्ट रेट आणि डेट हे दोन्ही मुद्दे क्लियरली लिहिले होते. इट मेक्स सेन्स. इंट्रेस्ट रेट आर्टिफिश्यली लो ठेवले की इनफ्लेशनचा प्रॉबलेम येतो कारण रेट लो ठेवल्यामुळे मार्केट मध्ये बॉरोइंग वाढतं. इकॉनॉमी ला मदत होते पण जास्त काळ तसा ठेवला तर ट्रेझरी मधला इन्फ्लो कमी होतो आणि बाकी ड्यु असलेल्या (डेट)कमिटमेंट्स ह्या ऑनर कराव्या लागतात. त्या करता पैसा प्रिंट करावा लागतो. अमेरिकेचं स्टँडिंग मार्केट मध्ये चांगलं आहे तो पर्यंत हा गमजा चालेल पण तरी डोमेस्टिक लेवल ला जास्त पैसा प्रिंट केल्यामुळे इनफ्लेशन वाढतं.
गोईंग बॅक टु हाबं स्टेटमेंट. रेट वाढले तरी दुसर्या बाजूला टॅक्स ब्रेक देऊन, इपिए च्या गाईडलाईन्स शिथिल करुन पुढे आणखिन डेट वाढलं तर त्याचा परिणाम म्हणून परत इन्फ्लेशन हा एक मुद्दा येतो. विच मेक्स सेन्स. ह्या आधी पण इतर ठिकाणी ह्यावर चर्चा झालेली आहे. मला वाटतं हाबं नी की धनि नी मुद्दा मांडला होता. जि ओ पी वाले प्रो बिझनेस वगैरे म्हणून ओळखले जातात आणि डेम्सना लो इन्कम धार्जिणे म्हणून हिणवलं जातं पण जि ओ पी वाल्यांच्या टॅक्स ब्रेक्सची अन प्रो बिझनेस पॉलिसिजची पण देश किंमत मोजत असतो पण फक्त वेगळ्या मार्गानी येवढच.

इंट्रेस्ट रेट आर्टिफिश्यली लो ठेवले की >>. त्यापुढील सर्व वाक्य एका गृहितकावर आधारित आहेत की ट्रम्प इंट्रेस्ट रेट आर्टिफिशली लो ठेवणार आहे. आणि मीच माझ्या पोस्ट मध्ये येत्या वर्षभरात ५ टक्के रेट होतील, असे मला वाटत आहे, हे लिहिले. इंट्रेस्ट फेड कंट्रोल करतात, त्यांनी अशातच व्याज दर वाढवले आहेत. त्यावरूनही ट्रम्पने दर वाढवले असा आरडा ओरडा डेम्सनेच केला होता. हे लगेच लोकं विसरले का? त्यामुळे हा मुद्दा बाद.

पुढे तू लिहितोस,

पण तरी डोमेस्टिक लेवल ला जास्त पैसा प्रिंट केल्यामुळे इनफ्लेशन वाढतं. >> हेच तर मी वर लिहिलं आहे की भाऊ. ( हे माझेच वाक्य आहे ना? जर सरकारने पैसा आणला ( प्रिंटिंग मनी) तरच इन्फ्लेशन वाढतं. )

म्हणजेच मी त्या मुद्द्याला ओळखून, ( त वरून ताकभात, कारण त्याने डेट, इंट्रेस्ट, इन्फ्लेशन लिहिले) जे तू आत्ता मांडत आहेस, ते त्याच शब्दात मांडले आहे की भाऊ. तर तू त्याला उत्तर देताना, "अरे पण सरकार काय येडं म्हणून पैसे छापतं का?" असे लिहिलेस. Happy

थोडक्यात, जे मी ऑलरेली मांडले. ओके, डेट हा शब्द न वापरता, तेच तू परत मांडत आहेस. म्हणजे तू माझ्याशी सहमत आहेस का?

आता थोडा वेगळा मुद्दा ..
जि ओ पी वाले प्रो बिझनेस वगैरे म्हणून ओळखले जातात आणि डेम्सना लो इन्कम धार्जिणे म्हणून हिणवलं जातं <<

लो इन्कम धार्जिने जर डेम्स असतील, तर आत्ता ह्या क्षणी, इकॉनॉमीचे काही होओ, डेम्सनी तर ट्रम्पला डोक्यावर घेऊन नाचले पाहिजे, कारण त्याने सरसकट ब्रॅकेटच जास्त करून त्यांना लो इनकम मध्ये दिलासा दिला आहे. पण ते तसे करणार नाहीत !

मी काही ट्रम्प सपोर्टर नाही, पण मला हे पाऊल योग्य वाटले आहे, इतके बोलून माझे दोन शब्द मी संपवतो, जय हिंद, जय भारत !
( भारत माता की, )

त्यापुढील सर्व वाक्य एका गृहितकावर आधारित आहेत की ट्रम्प इंट्रेस्ट रेट आर्टिफिशली लो ठेवणार आहे. >>>> आजिबात नाही, माझ्या पोस्टीत कुठेही पुसट सुद्धा हे गॄहितक जाण्वत नाही. मी फक्त थोडा बॅकग्राऊंड देत होतो पुढचा मुद्दा सांगायच्या आधी. इथेही परत त वरुन ताकभात ओळखायची घाई करत आहेस. Just calm down a little and try and see what the person is saying or writing before trying to assume or even prove anything, that's all I am saying.
मी फक्त हाबं नी जे लिहिलं त्याच्या सपोर्ट मध्ये पण माझ्या अँगलनी लिहिलं. बाकी तू आता परत लिहिले मुद्दे ज्यात तू समहाऊ मी म्हणत होतो तेच म्हणत होतास असं म्हणत आहेस ते मला समजत नाहीये. खुपच गोल गोल होत आहे ते.
आय थिंक इथेच थांबलेलं बरं.

लो इन्कम धार्जिने जर डेम्स असतील, तर आत्ता ह्या क्षणी, इकॉनॉमीचे काही होओ, डेम्सनी तर ट्रम्पला डोक्यावर घेऊन >>>>> बरोबर आहे. मी नीट लिहायला हवं होतं. माझा रोख कमी केलेल्या कॉर्प टॅक्स रेट कडे होता. ह्या उपर लो इन्कम धार्जिणे म्हणजे टॅक्स कट देतात अशा अर्थाने नाही तर त्यांच्या पॉलिसीज लो इन्कम असलेल्या लोकांना मदत होईल अशा असतात असं म्हणायचं होतं.

तू जे वर काही एका पोस्ट मध्ये लिहिले, इंट्रेस्ट रेट, सरकारचा पैसा छापने, मग त्यामुळे होणारे वाढीव इन्फ्लेशन अश्या काही मुद्द्यांना मी माझ्या पोस्ट मध्ये कव्हर केले आहे असे मी लिहितो आहे. म्हणून लिहिले, की माझ्या पोस्ट एकदा शांतपणे वाच.

ओके आता परत मुद्दा : तुझे वाक्य
" गोईंग बॅक टु हाबं स्टेटमेंट. रेट वाढले तरी दुसर्या बाजूला टॅक्स ब्रेक देऊन, इपिए च्या गाईडलाईन्स शिथिल करुन पुढे आणखिन डेट वाढलं तर त्याचा परिणाम म्हणून परत इन्फ्लेशन हा एक मुद्दा येतो. विच मेक्स सेन्स "

माझे उत्तर : ओबामा देखील २००८ मध्ये डेटच्या विरुद्ध होता, २०१६ मध्ये २००८ एवढी डेट आहे की कमी की जास्त? डेट आत्ता पर्यंत वाढली नाही असे म्हणायचे आहे का? आणि वाढिव डेट मुळे किती इन्फ्लेशन वाढले? ह्या प्रश्नाचे उत्तर काय?
किती टक्क्याने इंट्रेस्ट रेट वाढले? इकॉनॉमी गाळात गेली का?

लं. बाकी तू आता परत लिहिले मुद्दे ज्यात तू समहाऊ मी म्हणत होतो तेच म्हणत होतास असं म्हणत आहेस ते मला समजत नाहीये. खुपच गोल गोल होत आहे ते. >>. मी पण हेच वाक्य मागेच म्हणलं होतं दोन पोस्ट पूर्वी.

. Just calm down a little and try and see what the person is saying or writing before trying to assume or even prove anything, that's all I am saying. >>

वॉव. दोनदा इतर लोकांशी चर्चा कशी करावी अन ब्ला ब्ला असेच लिहिलेस. ओके ! पहिल्यांदा जाऊ द्या म्हणून त्यावर लिहिले नाही, पण आता लिहितो, हो यू डोन्ट माईंड.

व्हॉट मेक्स यू थिंक आय अ‍ॅम नॉट काम? मला, काही गृहित धरू नको असे सांगताना माझ्याबद्दलच मी "काम" नाही असे ठरवून, तू गृहितच धरत आहेस की. स्ट्रेंज Happy

उलट मी आत्तापर्यंत तीनदा लिहिले आहे की जर तू व्यवस्थित मुद्दा खोडलास तर मी तुझे मान्य करेन. तुला असे नाही का वाटत की हे लिहून मी आय अ‍ॅम फ्लेक्झिबल इनफ, असे दाखवतो आहे. सो आय डोन्ट नो, की तुला का वाटते आहे की, आय अ‍ॅम प्रुव्हींग एनिंथिंग व्हाय डू यू थिंक लाईक दॅट? कारणे देशील का?

आणि अगदी खरे खरे सांगायचे तर मला अनेक गोष्टींमध्ये गती नाही, पण तरीही मी इथे लिहित असतो.

ते जाउ दे

चर्चा कशी करावी हे तू मला सांगत आहेस. ( दोनदा ) तर तू मग मोठेपणा घेऊन मी हाब ला गृहितच धरतो आहे, असे सारखे सारखे न लिहिता इकॉनॉमीच्या चर्चेत योग्य मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला असतास तर? ( आपण कदाचित काही बाबतीत अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री अन काही बाबतीत सहमतही झालो असतो, असे आपले मला उगाच वाटते.)

इथं इकॉनॉमी कमी अन पर्सनल जास्त होतं चाल्लय असं आपलं मला उगाच वाटतं. मोठी झाली पोस्ट.

आय डोंट माईंड अ‍ॅट ऑल. Happy

व्हॉट मेक्स यू थिंक आय अ‍ॅम नॉट काम? मला, काही गृहित धरू नको असे सांगताना माझ्याबद्दलच मी "काम" नाही असे ठरवून, तू गृहितच धरत आहेस की. स्ट्रेंज>>>>>> जिथे माहिती द्यायची आणि काहीतरी सांगायची घाई दिसली म्हणून म्हणलं काम डाऊन.
वर हाबंनी २ कारणं दिली ज्यामुळे इन्फ्लेशन वाढू शकतं (अजूनही कारणं असतात पण त्यानी दोन कारणांचा उल्लेख केला) तिथे पुढे जाऊन तू पैसा बाजारात आला म्हणून नाही तर सरकारनी बाजारात पैसा आणला तर इन्फ्लेशन वाढतं असं म्हणालास. हे म्हणजे एखादा माणूस पर्यावरणाचा नाश करुन पाऊस कसा कमी जास्त होतो हे सांगत असताना त्याला "नाही" पाऊस कमी जास्त हा आभाळात ढग कमी जास्त असले की त्यामुळे आयदर कमी किंवा जास्त होतो असं म्हणण्यासारखं आहे.
सरकारला बाजारात पैसा का आणावा लागतो ह्या विषयी तो लिहित होता. पैसा सरकार बाजारात आणतं ही अत्यंत जनेरिक माहिती च्या बेसिस वर "नाही" असं म्हणून पुढे ते एक्सप्लेन करुन सांगणं म्हणजे समोरच्याच्या इंट्लेजिन्सला रिस्पेक्ट न करणं म्हणता येइल. हे सहसा माहिती द्यायची घाई झाली की होतं.

उलट मी आत्तापर्यंत तीनदा लिहिले आहे की जर तू व्यवस्थित मुद्दा खोडलास तर मी तुझे मान्य करेन. >>>>> व्यवस्थित मुद्दा असेल तर खोडायला प्रश्न येतो. पुढे जाऊन मी हे म्हणेन की बाकी तू लिहिलेली माहिती इंडीपेन्डंट माहिती म्हणून योग्य आहे असं जरी गृहित धरलं तरीही तो प्रश्न नाहीये ह्या ठिकाणी. ती माहिती द्यायची गरजच नव्हती हा मुद्दा आहे कारण हाबं अंडरलाईंग कारणाविषयी बोलत होता, विच मेड सेन्स.
हे आता सतरांदा सांगितल्यावर तू परत मुद्दा नीट खोड, नीट खोड म्हणत आहेस, खोडून खोडून पार कागद फाटायची वेळी आली आता. वरुन तू मला डेटा वगैरे मागत आहेस तेव्हा पासून तो म्हणजे कहर आहे. Lol

सरतेशेवटी, ह्या अशा चर्चांमध्ये खरं तर लोकांचा झालेल्या बदलांबाबत त्यांचा परस्पेक्टिव वाचून बरच शिकायला मिळतं. बेसिकली झालेल्या ह्या बदलांचा आपल्यावर आणि आपल्या परिस्थितीवर काय परिणाम होईल किंवा होतोय हे वाचायला फार इंट्रेस्टिंग वाटतं.
कसं आहे, माहिती सगळ्यांना बाहेर तीच उपलब्ध आहे. What helps is hearing how its applies in real life to real people. म्हणून खरं मला फारएण्ड सारख्या पब्लिकची फार मदत होते. माहिती देण्यापेक्षा he is keen on trying to understand and that's why he asks questions.

व्यवस्थित मुद्दा असेल तर खोडायला प्रश्न येतो. पुढे जाऊन मी हे म्हणेन की बाकी तू लिहिलेली माहिती इंडीपेन्डंट माहिती म्हणून योग्य आहे असं जरी गृहित धरलं तरीही तो प्रश्न नाहीये ह्या ठिकाणी. ती माहिती द्यायची गरजच नव्हती हा मुद्दा आहे कारण हाबं अंडरलाईंग कारणाविषयी बोलत होता, विच मेड सेन्स >>

अंडरलयिंग कारणामुळे डेट तयार होते असे तुझे आणि हाबचे म्हणणे आहे आणि त्यावर मी ओबामा अ‍ॅडमिनिस्ट्रेशनबद्दल एक छोटा प्यारा लिहिला आहे, त्यामुळे इन्फ्लेशन वाढले का? की ओबामा ने फोर्सफुली इंट्रेस्ट रेट मॅनेज केले? हे देखील विचारले आहे?

माझ्या पोस्ट मध्ये मी इन्फेशन, इंट्रेस्ट रेट, डिकक्शन आणि डेट अशी चर्चा करूनही तुझ्यामते, माझ्याकडे व्यवस्थित मुद्दाच नाही हा मुळ प्रश्न आहे. आणि आय अ‍ॅम शोइंग ऑफ, ही तुझी मुळ कन्सर्न आहे. ओके !

hearing how its applies in real life to real people. >> बाकी तुला काय आवडतं ह्यावरून मी चर्चा कशी करणार? पण तू फारएंड अन् त्याचा प्रश्न असे लिहिले आहेस आणि त्या विषयी मी डेटा देऊन ती शंका निराधार आहे ह्याविषयी विश्लेषण केले. त्या सर्व उदाहरणात श्रीमंत लोकांची चर्चा आहे का? त्या एकुण निर्णयाचे परिणाम ह्या सर्व विषयांची चर्चा आहे ना? की तसे नाहीच, आणि डेट आणि इपिए आणि इन्फ्लेशन एवढंच आहे? नेमका तुझा प्रॉब्लेम काय आहे?

बरं पुढे जाऊन तू लिहितोस की, आय अ‍ॅम प्रुव्हींग एनिंथिंग व्हाय डू यू थिंक लाईक दॅट? आणि आय अ‍ॅम नॉट काम, ह्याची कारणे देशील का?

अंडरलयिंग कारणामुळे डेट तयार होते असे तुझे आणि हाबचे म्हणणे आहे आणि त्यावर मी ओबामा अ‍ॅडमिनिस्ट्रेशनबद्दल एक छोटा प्यारा लिहिला आहे, त्यामुळे इन्फ्लेशन वाढले का? की ओबामा ने फोर्सफुली इंट्रेस्ट रेट मॅनेज केले? हे देखील विचारले आहे>>>> का? दॅट वॉज नॉट द पॉईंट.

बाकी तुला काय आवडतं ह्यावरून मी चर्चा कशी करणार? >> अरे ते जनरल लिहिलं होतं. तशी कोणाकडून अपेक्षा नाही डायरेक. फक्त प्रेफरन्स लिहिला माझा.

बरं पुढे जाऊन तू लिहितोस की, आय अ‍ॅम प्रुव्हींग एनिंथिंग व्हाय डू यू थिंक लाईक दॅट? आणि आय अ‍ॅम नॉट काम, ह्याची कारणे देशील का?>>>>> वर लिहिलं आहे. जिथे गरजच नाही तिथे माहिती फेकण्यात आली (त्या वरुन काम डाउन म्हणालो होतो), दॅट टू बेस्ड ऑन युअर ओन इंटरप्रटेशन की समोरच्याला ही माहिती नसेल असं गृहित धरुन. ह्याउपर जी माहिती आली ती पण अत्यंत ट्रिवियल आणि मूट पॉईंट असलेली होती.

जिथे गरजच नाही तिथे माहिती फेकण्यात आली >>

अरेच्चा ! फारएन्डने तो प्रश्न विचारला होता, आणि त्याला उत्तर देणे गरजेचे नव्हते का? वर तू म्हणालास की त्याचा प्रश्न विचारणे आवडले, आणि आता म्हणतो आहेस की मी माहिती फेकली, मेकअप युअर माइंड ड्युड !

याउपर जी माहिती आली ती पण अत्यंत ट्रिवियल आणि मूट पॉईंट असलेली होती. > Lol ओके. बरं बाबा. ते टॅक्स बिल कसे हाणीकारक आहे हे म्युट आणि टिविएल माहिती न देता सांगशील का?

कोणीतरी मला समाजावून सांगेल का? की ओबामाच्या काळात प्रचंड डेट वाढूनही इन्फ्लेशन का वाढले नाही.? इंट्रेस्ट्र रेट त्याने आर्टिफिशिएली** लो ठेवले होते का?* हुश्श, तिसरेंदा विचारले पण एनीवन? कारण बुवांच्या मते आता मुद्दाच नाही, आणि हाच हाबचा मुळ मुद्दा आहे अन तो मी बायपास करून माहिती फेकतो, प्रुव्ह करतो असेही ते म्हणत आहेत. ( म्हण़जे डेट आणि इन्फ्लेशनवर बोलायचे नाही का?

*हा शब्द बुवांचा आहे, ज्यांना सरकार रेट कंट्रोल करत नाही, तर फेड करत असतात, हे बहुदा त्यांना माहिती नाही.

इनफॅक्ट ह्या सर्व चर्चेत तू एकही मुद्दा मांडला नाहीस वा खोडला नाहीस. एक तर तू अ‍ॅलिगेशन्स करतोस, वर तसे का केलेस? असे विचारले की पळवापळवीचे उत्तर देतोस. पण हे नवीन नाही. सीम्स टू मी अ इगो इश्यू.

परत एकदा.. बहुदा अठराव्यांदा जर हे बील कसे हाणीकारक आहे, त्याचे परिणाम सामान्य माणासावर आणि इकॉनॉमीवर ( मॅक्रो आणि मायक्रोलेवल - हे उगाच माहिती फेकण्यासाठी. Proud ) कसे वाईट होणार आहेत, ह्याबद्दल बोलले अन पर्सनल बोलणे टाळले, तर आय अ‍ॅम स्टील ओपन टू चर्चा.

फारएन्डने तो प्रश्न विचारला होता>>>>. ही चर्चा तू दिलेल्या हाबं च्या पोस्ट वरुन सुरु झाली ना? हाब नी काहीतरी लिहिलं आणी त्याला नाही असं उत्तर देताना तू फारएण्डच्या प्रश्नाला उत्तर देत होतास? व्हॉट डज दॅट इवन मीन?

आली परत तुझी ओबामाची पुंगी? माझ्या पोस्ट मध्ये मी डेट, इंट्रेस्ट रेट आणि इन्फ्लेशन ह्या विषयी बोलत होतो. त्यात मी सरकारचा उल्लेख केला का? परत आता तू इथे तिसर्‍यांदा काहीतरी असूम केलस. ह्या ठिकाणी मी सरकारनी रेट कमी ठेवले असं कुठे लिहिलय का? १) लोकांना सरकार नी पैसा बाजारात आणला की इन्फ्लेशन वाढतं हे माहित नाही २) मी म्हणालो की ट्रंप इथून पुढे इंट्रेस्ट रेट लो ठेवेल ३) सरकार नाही तर फेड हे रेट कमी जास्त करतं हे मला माहित नाही. एका नंतर एक तुला समोरच्या ला माहिती नाही हे प्रुव करायच्या घाई मध्ये तू वाट्टेल ते असूम करत आहेस.
हा कोणता इश्यु आहे भाऊ तुझा? Lol म्हणून म्हणत होतो काम डाऊन.
मला ते सुडो इंटेलेक्चुअल बुल शिटची अ‍ॅलर्जी आहे थोडी म्हणून हा प्रपंच बाकी काही. Happy
आता इथून पुढे इथे परत आणखिन आर्ग्युमेंट मांडेन की नाही माहित नाही. थोडा कंटाळा आला. मला हौस आहे हे सुडो इंटलेक्चुअल बुलशिट, सटल हंबलब्रॅगिंग दिसलं की पॉईंट आउट करायची, ती थोडी भागवून घेतली.

परत एकदा फॉर द रेकॉर्ड -

टॅक्स ब्रेक देणं/ टॅक्स ब्रॅकेट खाली आणणं निव्वळ फार्स आहे. आधीच १९.८ ट्रिलिअन डेट मध्ये असलेल्या ईकॉनॉमीवर अजून टॅक्स कमी करून करंट अकाऊंट डेफिसिटचा बोजा टाकयचा. मग तो भागवण्या साठी पुन्हा नव्याने डेट रेज करायची त्यात फॉरेन ईन्वेसटर्स ना अ‍ॅट्रॅक्ट करण्यासाठी जास्तं ईंट्रेस्ट मान्य करायचा किंवा खोर्‍याने सवलती द्यायच्या (ईपीए चे नियम शिथिल केलेच आहेत). ईंट्रेस्ट रेट रेज करून डेट वाढवून, पैसा मार्केट मध्ये आला की किंमती वाढणार ईन्फ्लेशन वाढणार आणि तुम्ही आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी जास्तीचे पैसे आणि पर्यायाने जास्तीचा टॅक्स भरणार. पुन्हा टॅक्स कमी भरावा लागल्याने कंझुमर कडून जे स्पेंडिग होणार त्याने वाढलेल्या किंमतीवर एकंदर जास्तंच टॅक्स भरला जाणार. पण लक्श्य्त कोण घेतो?

>>

ही हाबची मुळ पोस्ट.

त्यातील रॅन्ट सोडली तर क्रक्स " डेट वाढवून, पैसा मार्केट मध्ये आला की किंमती वाढणार ईन्फ्लेशन वाढणार
पुन्हा टॅक्स कमी भरावा लागल्याने कंझुमर कडून जे स्पेंडिग होणार त्याने वाढलेल्या किंमतीवर एकंदर जास्तंच टॅक्स भरला जाणार. पण लक्श्य्त कोण घेतो?"

ज्याला मी नाही म्हणालो.

कारण मला २४००० "नेट नेट" नाहीत हे लगेच कळाले आणि ओबामाने खूप सारी डेट करून ठेवली तरी, इन्फ्लेशन खूप वाढले नाही, हे सत्य.

आणि ही कारणंही मी कालच माझ्या "नेट नेट" पोस्ट मध्ये मांडले आहे, तरी ते तू दुर्लक्षित करून आपलीच पुंगी वाजवत आहेस.

माझ्या सर्व पोस्ट मध्ये, इन्फ्लेशन, टॅ़क्स ब्रेक आणि सामान्य माणसाला होणारा फायदा ( सो कॉल्ड मूट पाँईटस आणि आकडेवारी) आहे.
पहिल्या आकडेवारीनंतर र हाबने परत १०० चे १५० असे उदाहरण दिल्यावर मी ८ टक्के व्याज दर केला तरी १६००० < २४००० अशी आकडेवारी दिली. आणि ते फायद्यात राहील असे लिहिले आहे.

परत २० पोस्ट नंतर डेट डेट असे तू म्हणालास, त्याला प्रतिमुद्दा म्हणून डेट = इन्फ्लेशन असे नाही कारण सरत्या कालावधीच डबल डेट होऊनही इन्फ्लेशन म्हणावे तितके वाढले नाही. असे मी दोनदा लिहिले आहे. कारण इकॉनॉमीत फुकटच्या गप्पांपेक्षा, काय झाले आणि काय होते आहे, ह्याला जास्त महत्त्व आहे.

मग मी ते प्रुव्ह ( तुझा शब्द) करण्यासाठी त्याला तू मी ओबामाला मध्ये आणलं असे म्हणतो आहेस, पण त्याने डेट वाढवून देखील इन्फ्लेशन खूप वाढलेलं नाही,हे सत्य तुझ्या पचनी पडत नाही आहे काय ?

आता ह्या सर्वाला प्रुव्ह करणे, काम डाउन , समोरच्याचे ऐकून घेत नाही आणि आता इंटलेक्चुअल बुलशिट, सटल हंबलब्रॅगिंग म्हणतो आहेस. पण ..

शब्दांचे बुडबुडे सोडण्यापेक्षा व्यवस्थित आकडेवारी दाखवून इन्फ्लेशन - डेट, नेट गेन्स् हे सगळे मांडले असते, तर देअर इज चान्स आय विल स्टील अ‍ॅग्री. पण ते करायचेच नाही तुला. तू अजूनही मुद्दा खोडू शकत नाहीस, का माहितीये? तुझ्याकडे खोडायला काही नाहीये असे मला वाटते. अन्यथा तू बुडबुडे सोडण्यापेक्षा व्यवस्थित पोस्ट लिहिल्या असत्यास.

तू व्यवस्थित चूक दाखवून दिली असतीस, तर मी प्राजंळपणे चारदा सांगीतले आहे की, मी मान्य करीन. पण तू तिथे मम ठेवतोस?

मी ऑलरेडी खूपदा थांबायचा प्रयत्न केला. पण समहाऊ तू ओढतच आहेस.

सुडो इंटलेक्चुअल बुलशिट, सटल हंबलब्रॅगिंग असे विविध शब्द वापरून "होलियर देन दाऊचा" अ‍ॅप्रोच आणून फायदा नाही कारण यु गॉट राँग ड्युड इनफ्रंट ऑफ यू. आय डोन्ट गेट ऑफेडेंड बाय यूर सच वर्डस एनिमोअर. अ‍ॅटलिस्ट मी शाब्दिक वांत्या न काढता मुद्दा मांडू शकतो. आय टेक दॅट अचिव्हमेंट अगेन्स्ट सच आर्ग्युमेंटस. ( परत एकदा इथे सुडो इंटलेक्चुअल बुलशिट, सटल हंबलब्रॅगिंग करून घेतो. Proud )

ते ओबामा च्या काळात इन्फ्लेशन का नाही वाढलं, इंट्रेस्ट रेट लो ठेवून सुद्धा हा प्रश्न पण टोटल अप्रस्तुत आहे. हाबंनी नॅशनल डेट आणि इनफ्लेशन हे रिलेटेड आहेत असं गृहित धरुन एक थियरी मांडली. जी बरोबर आहे कारण नॅशनल डेट आणि इन्फ्लेशन ह्यात कनेक्शन आहे. आता ओबामाच्या काळात "फेडनी" (परत मिसइंटरप्रेटेशन ला वाव नको Proud ) इकॉनॉमी सुधारावी म्हणून रेट लो ठेवले होते पण तेव्हा इन्फ्लेशन का नाही झालं ह्याचं कारण दुसरं काही नाही का असू शकत? तेव्हा इन्फ्लेशन वाढलं नाही ह्याचा अर्थं डेट आणि इन्फ्लेशन मध्ये कनेक्शन नाहीये असा कसा अर्थं निघू शकतो?

अ‍ॅडमीन तुम्ही काही पोस्ट उडवल्या पण त्यात माझा प्रश्नही का उडवला? मी लिहिले होते.

डेट आणि इन्फ्लेशन मध्ये कनेक्शन नाही असे मी कधी म्हणालो आहे? माझ्या तोंडात वाक्य? उलट मी प्रश्न विचारला होता की, " ओबामाच्या काळात डेट डबल होऊनही इन्फ्लेशन म्हणावे तसे वाढेल नाही, हयाची कारणे काय आहेत?

मला माझ्या प्रश्नावर उत्तर मिळालं नाही, पण ह्या ओळींमध्ये उडवन्यासारखे काय नाही नव्हते.

या टॅक्स प्लॅनमुळे मिडलक्लासचे टॅक्सेबल इंनकम वाढून त्यामुळे टॅक्सबील वाढेल ना? मग असे झाले तर कंझुमर स्पेडिंगवरही परीणाम होईल ना? रिटायर्मेंट सेविंगला सरळसोट धक्का लागणार नाहीये पण गृहकर्जावरचे व्याज, घराचे आणि स्टेटचे टॅक्सेस वजा करता येणार नसतील तर तसेही कर्जाचे हप्ते आणि रिटायरमेंट सेविंग ही कसरत जड जाईल ना? मला यात मिडलक्लाससाठी काय चांगले असेल ते कुणी सांगेल का?

Pages