अमेरिकेतील चालू घडामोडी (राजकीय)

Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15

ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फा, हो ना. फॉक्सचं कवरेज बघत होतो. काही आर्ग्युमेंट ठीक वाटले पण नंतर फार वाहवत गेले ते. Lol

https://www.yahoo.com/news/reports-trump-said-firing-nut-job-comey-took-...

ट्रंपच्या एक एक वक्तव्यांवरुन वाटतय की तो इतका मुर्ख कसा असू शकेल? म्हणजे कोमी ला फायर केलं म्हणजे वेट ऑफ माय शोल्डर असं समजेल? त्याला किंवा त्याच्या अडवायजरांना असं केल्यास लोकांची शंका बळावेल इतकी साधी गोष्ट कळणार नाही असं वाटत नाही.
दुसरी गोष्ट काय होतं नेमकं असली विधानं करुन? इपिंचेबल ऑफेन्स थोडीच आहेत ती? ऑब्सट्रक्शन ऑफ जस्टीस पुराव्यानी शाबित केल्या शिवाय काय खरं आहे? बातम्यांमध्ये फुल्ल टू वन टु पंच डिलिवर झालाय ट्रंप ला असं लिहित आहेत, म्हणजे काय नेमकं? अमेरिका थोडी बरी वाटायची, बातम्यांमध्ये सनसनीखेजपणा न घुसडण्यासाठी पण इथेही अगदी भडक स्वरुपात नसलं तरी सरतेशेवटी तेच सुरु आहे की!

इम्पिच काही लगेच होत नाही याच्याशी सहमत. स्पेशल कौन्सिलला ६० दिवसात फक्त या चौकशी साठी प्रिलिमिनरी बजेट द्यायचय, मग म्युलरच्या स्टाफचा सिक्युरिटी क्लीअरंस, त्याला सिक्युअर्ड जागा, म्युलर जी काही कागदपत्र मागेल (ट्रंपचा डब्लू २ Biggrin का जो काय टॅक्स रिटर्न असेल तो ) त्यावरून व्हाईट हाउस बोंब मारणार, मग त्याच्या कोर्ट केसेस होणार सो हे अजून कित्येक महिने चालणार आहे.

ऑब्सट्रक्शन ऑफ जस्टीस क्रिमिनल ऑफेन्स आहे. आणि स्पेशल कौंसिलला सपिना करण्याचे आणि आलं नाही तर दंडुका उगारण्याचे अधिकार आहेत. ज्युरी सुद्धा बसवू शकतो. इपिंच काय एका दिवसात होणार नाहीच, फास हळूहळू आवळला जाईल ना?
इवेस्टिगेटिव्ह ऑफिसरला फायर करणे, त्याला जास बोलू नको तुझ्या बोलण्याच्या टेप पण असू शकतात अशा धमक्या देणे, ह्याची चौकशी थांबव, त्या सगळ्या लोकांना जेल मध्ये टाक असलं काही बाही सांगणे, सिक्रेट माहिती राशालाच रिव्हील करणे हे इतकं बाहेर आलंय. अ‍ॅक्चुअली चौकशी चालू झाली की आणखी काय काय घडलंय ते समजेलच. खरंतर कदाचित नाहीच समजणार. कारण कोन्ग्रेशनल चौकशी सारखी ही चौकशी उघड असणार नाही. बंद दाराआड चालेल. फायनल रिपोर्टही पब्लिक करायचा का नाही हे रोझेन्स्टाईन ठरवेल, ज्यावर कुठलही कोर्ट काहीही करू शकणार नाही. जर चार्जेस फाईल करायचे ठरवले तर मात्र सगळं जाहीर होईलच.

ट्रंपचा मेजर लोचा आहे त्याचं तोंड. त्याला अनेक अधिकार आहेत, ते बजावायचे ठरवले तर अनेकदा कोर्ट आणि सिनेटही फार काही करु श़कत नाही पण हा वाट्टेल ते बोलतो (उ.दा. ट्रॅव्हल बॅन लावायचा तर शांत डोक्याने लावला असता, अद्वातद्वा संविधानाच्या विरोधी बोलला नसता तर कोर्ट कितपत काही करू शकलं असतं मला शंका आहे. चूज द बॅटल हे त्याला शि़कवा कोणी तरी)
केस कोर्टात गेली की अगदी आपला बॉलिवुडी वकिल पण पहिली गोष्ट सांगतो मला विचारल्याशिवाय काहीही बोलायचं नाही. नाही तर केस वीक होउ शकेल. हा एकाहुन एक आपलेच किंवा व्हाईट हाउस स्टाफचे शब्द फिरवून स्फोटक मुलाखती देतोय. ते नाही तर १४० शब्द लिहितोय.
गॉड ब्लेस अमेरिका.

<<केस कोर्टात गेली की अगदी आपला बॉलिवुडी वकिल पण पहिली गोष्ट सांगतो मला विचारल्याशिवाय काहीही बोलायचं नाही. नाही तर केस वीक होउ शकेल. >>
------- वकिलाने तसे सन्गितल्यावर तो वकिलाला फायर करणार, शेवटी मान्जराच्या गळ्यात...

https://www.yahoo.com/news/trump-wasn-t-always-linguistically-083054278....

Now this is interesting and makes sense! आपण इथे आणि इतर बाफंवर बर्‍याच वेळा बोललोय ह्या बाबतीत. इन फॅक्ट चेष्टेचा विषय झालाय त्याचे वक्तव्य म्हणजे. I now feel bad about him for sure but that actually makes it more of a setback in terms of, how he can rule effectively.

हे खरे आहे... त्याचे जुने ईंटरव्यूज बघितले तर तो आजच्यापेक्षा नक्कीच जास्तं मुद्देसूद आणि क्लीअर बोलत असे. मी आधीही ह्याबद्द्ल कुणाशीतरी बहुधा ईथेच बोललो होतो.
एक प्रकारचा कॉग्निटिव डिसोनन्सच आहे हा. प्ण म्हणून त्याची दया वगैरे नाही येत.
आणि ह्यामुळेच तो जिंकला दुसर्‍या बर्‍यापैकी 'सेन' कॅंडिडेटला हिलरीबद्दल अ‍ॅवढे अ‍ॅग्रेसिव बोलणे जमले नसते.

हाब +१

दया असं नाही पण त्याच्या इन्कोहेरेंट बोलण्यावर भरपूर टिका केली जाते त्या वरुन म्हणत होतो. अनकल्चर्ड असल्यामुळे खराब भाषा वापरणे आणि कॉग्निटिव डिकलाईन्मुळे अशी भाषा असणे ह्यात फरक आहे. He gets a lot of flak for being incoherent.
सरतेशेवटी, एक तर आधीच खराब अ‍ॅटिट्युड आणि त्यात कॉग्निटिव डिक्लाईनची ठळक लक्षणं म्हणजे अवघड काम आहे. हे सगळं मी म्हणलो तरीही एक दिलासा असा आहे की कॉन्स्टिट्युशन मधल्या तरतुदींमुळे त्याला वाट्टेल ते करता येत नाही हे अगदी अधोरेखित झालं ह्यावेळी.
म्हणजताबडतोन्ब डूम्सडे वगैरेची शक्यता कमी आहे.

तो टेड क्रुझ ला जे काही गलिच्छ बोलला तेव्हाच त्याच्या सो कॉल्ड कॉग्निटिव डिक्लाईनच्या लक्षणांचे 'गंभीर रुग्णं' असे निदान झाले होते, असे मला वाटते.
आणि हे डिक्लाईन बहुधा जोरदार कंटेजियस असावे ऊगीच नाही स्पायसर, आणि कॉनवे मुक्ताफळं ऊधळंत फिरत असतात.

बर्ग Happy

कॉग्निटिव डिकलाईन्मुळे अशी '' (आपापल्या सोयीनुसार विशेषण घालून घ्या) भाषा असणे नि कॉग्निटिव डिकलाईन्मुळे अशी incoherent बोलणे ह्यांमधे अंतर आहे. हिलरी च्या वयाकडे बोट दाखवल्यानंतर नेमक्या त्याच गोष्टिची सूट कशी मिळेल ?

डिक्लाईन बहुधा जोरदार कंटेजियस असावे ऊगीच नाही स्पायसर, आणि कॉनवे मुक्ताफळं ऊधळंत फिरत >> Lol

<<<प्ण म्हणून त्याची दया वगैरे नाही येत.>>>
त्यापेक्षा जास्त या देशाची दया येते!
त्याने या पुढे आणखी काही भानगड केली नाही, तर इथले रिपब्लिकन सिनेट व हाऊस त्याला नीट सांभाळून घेतील - म्हणजे तो वाट्टेल ते बोलला तरी वाट्टेल ते करू देणार नाही. अर्थात रिपब्लिकनांचा अजेंडाहि देशाचे काही भले करतो असे नाही, पण कदाचित २०१८ मधे त्यांचेहि वर्चस्व कमी होईल. म्हणजे मह पुढील चार वर्षे सुद्धा मागील आठ वर्षांसारखी काहीहि बदल घडू न देता जातील. नि लोक ट्रंपला विसरतील. मग स्नूकी किंवा किम कार्डॅशियन बनेल प्रेसिडेंट!!

हाबं Lol

असामी, मी फक्त तो जे शब्द रिपीट करतो. परत परत बोलून शेवटी पॉईंट असा काही येतच नाही त्याच्या वक्तव्यातून त्याबद्दल म्हणत होतो. केलेले ग्रोस, लूड कॉमेंट हे डिक्लाईनच्या नावाखाली ढकलत नाहीये मी.

>>> ते नाही तर १४० शब्द लिहितोय. <<< म्हणजे ट्विट करतोय का? १४० शब्द की अक्षरे?
मला ट्विटर कधि समजलेच नाही Sad

पर्यावरणा सन्दर्भातल्या पॅरिस करारामधुन अमेरिका बाहेर पडणार आहे. Sad
निर्णय घेताना WH ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ज्यान्च्या सन्शोधनाचा आधार घेतला आहे त्यान्नीच आता या निर्णयावर टिका केली आहे. ०.२ से. फार मोठा बदल नाही असे मानणेच खुप धोकादायक आहे. जर तुम्ही ०.२ साठी चे एक छोटे पाउल उचलत नाही तर २ से चा बदल साध्य होणे आवाक्या बाहेरचे आहे.

http://news.mit.edu/2017/mit-issues-statement-research-paris-agreement-0602

मुळ लेखकान्नी त्यान्चा डेटाचा अर्थ ट्रम्प यान्नी चुकीच्या पद्धतीने लावला आहे, आणि पर्यावरण विषयक आपले अज्ञानच प्रकट केले आहे असे म्हटले आहे.

पॅरिस करारातुन बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे अमेरिका आता सिरिया आणि निकाराग्वा यान्च्या रान्गेत बसला आहे.

याच्याकडे बॉब मुलरला फायर करायची पॉवर नाही, पण ज्याला मुलरला फायर करायची पॉवर आहे त्याला फायर करायची पॉवर आहे. आजच्या ट्वीटवरून रोझेनस्टाईन वर तलवार चालणार लवकरच असं दिसतंय.

काल पार पडलेल्या स्पेशल इलेक्शन्स (कँसस, साउथ कॅरलायना, मांटॅना, जॉर्जिया) मध्ये जीओपीने चारहि कंग्रेशनल सीट्स जिंकल्या. यात आमचा डिस्ट्रिक्ट हि होता; इथे डेम्स्नी जवळ्जवळ $५० मिलियन्स खर्च केले असं म्हणतात.

डेम्स्/लिबरल्स ची नेगेटिव पब्लिसिटी चालत नाहि आहे कि मिडियाने उभी केलेली ट्रंपची वास्त्वदर्शी(खालावलेली?) प्रतिमा?.. Happy

मोदीजी येताहेत अमेरिकेत. ट्रंपजींनी खास खाना आयोजित केला आहे, बरेच आठवड्यापासुन त्याची तयारी सुरु आहे असे वाचनात आले. अमेरीकेत मोदी येणार म्हणुन कितपत उत्सुकता आहे? विशेषतः ट्रंपजींसोबत पहिलीच भेट असल्यामुळे आणि बराकभौंसोबतच्या सौहार्दपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर??

विठ्ठल - बराक आता इतिहासात आहे. आज डोलॉल्ड आमचा खास मित्र... बराक यान्चा उल्लेख टाळण्याचा अतोनात प्रयत्न अस्ले. नवे नेतृत्व, नवे विचार...

भारत, भारताची जनता ट्रम्पला किती मानते याचे एक उदा - तो राष्ट्राध्यक्ष होण्याच्या अगोदर दिल्लीत त्याचा वाढदिवस आम्ही साजरा केला होता... ट्रम्प दिल्लीला येणे शक्य नव्हते म्हणुन ट्रम्पच्या फोटोची आरती, पुजा. हे प्रेम आजचे नाही...

असो, दोन्ही देशातले मैत्री सम्बन्ध दृढ होण्यासाठी, आणि मोदी- ट्रम्प शिखर परिषद, यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा.

<<काल पार पडलेल्या स्पेशल इलेक्शन्स (कँसस, साउथ कॅरलायना, मांटॅना, जॉर्जिया) मध्ये जीओपीने चारहि कंग्रेशनल सीट्स जिंकल्या>>
----- हा निकाल महत्वाचा पण आष्चर्यकारक वाटला...

उत्सुकता वगैरे काहीच नाहीये मोदी -ट्रम्प भेटीची. देशी पेप्र वाचले नाही तर कळणार पण नाही कधी आले अन गेले.
रोजच्या बातम्यांमधे एखाद्या ओळीची बातमी असेल - नसेल. मागल्या वेळी ते मॅडिसन स्क्वेअर गार्डन ला आले होते तेव्हा जरा होतं कव्हरेज. आणि लोकल देशी कम्युनिटीमधे चर्चा पण होती, कदाचित पहिल्यांदाच आले होते त्यामुळे असेल.

<<<<दोन्ही देशातले मैत्री सम्बन्ध दृढ होण्यासाठी, आणि मोदी- ट्रम्प शिखर परिषद, यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा.>>>>

जमेल तिथून, जमेल तसे भारत देशाचे कल्याण करून घ्यावे, असे माझ्यासारखे ज्या लोकांना वाटते त्यांच्या दृष्टीने ही भेट स्वागतार्ह आहे.

भारतीय हितसंबंधांच्या दृष्टीने, म्हणजे भारतीय निर्यात वाढवणे, नवीन टेक्नॉलॉजी मिळवणे, भारतीय लोकांना अमेरिकेत येऊन जमल्यास इथे धंदे चालू करून भारतीय मालाची निर्यात वाढवणे इ. अनेक कामे करण्यासाठी भारत अमेरिका संबंध चांगले राहिले पाहिजेत.
विशेषतः नवीन टेक्नोलॉजी - जी अमेरिकेत आहे नि भारतात नाही ती भारतातहि संशोधन करून तयार करता येते पण जगाशी स्पर्धा करण्यात भारताला तेव्हढा वेळ नाही. टेक्नॉलॉजी अवगत झाल्यावर भारताने, वेळ आल्यावर, स्वतःची जीपीएस सिस्टीम बनवली, सॅटेलाइट प्रक्षेपण इ, महत्वाच्या गोष्टीत यश मिळवले.
ट्रंपच बरा - त्याला अमेरिकेची काही पडली नाहीये. त्याला स्वतःचा धंदा, पैसे वाढवायचे आहेत, त्यासाठी अमेरिकेचे कायमचे शत्रू राष्ट्र असलेल्या रशियाशी त्याची मैत्री आहे, तशी भारताशी मैत्री होऊ शकली तर बरेच - भारताचे. मग ट्रंप गेला त्या आपल्या ह्याच्यात.

बाकी इथे बरीच वर्षे राहिलेले आहेत नि ज्यांना ट्रम्पबद्दल थोडी फार महिती आहे असे माझ्या सारखे लोक जे आहेत, त्यांना ट्रंपचे अजिबात कौतुक नाही. ते लोक जरी रिपब्लिकन असले किंवा नसले तरी ट्रंप विषारी आहे असे त्यांचे मत आहे. आणि दुर्दैवाने ज्यांच्याबद्दल आशा करावी असे रिपब्लिकन दिग्गजसुद्धा ट्रंपला पाठिंबा देतात ही अमेरिकेच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे, पण भारताचा फायदा होत असेल तर तिकडे कशाला लक्ष द्यायचे.

सध्या इथे ट्रम्प च चौकशीच्या फेर्‍यात आहे. "रशिया" इतर सर्व विषयांपेक्षा जास्त फुटेज खात आहे. त्यामुळे इतर देशप्रमुखांच्या भेटी वगैरेला सध्या न्यूजव्हॅल्यू नाही.

Pages