Go to Webinar बद्दल माहिती हवी आहे

Submitted by राज1 on 1 February, 2017 - 05:55

Go to Webinar बद्दल माहिती हवी आहे
यापूर्वीही Go to Webinar बद्दल माहिती विचारली होती. Webinar साठी कॉम्पुटर मध्ये काय सेटिंग करावी ते समजत नाही. हि सेटिंग कदाचित Webinar च्या वेळेलाच ओपन होतात व त्यावेळी काही चूक झाली तर आपण काहीच करू शकत नाही. असे Webinar I.T. कंपन्यामध्ये बऱ्याचदा होत असतील. Laptop वर किंवा मोबईल Webinar साठी काय सेटिंग करावी?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

We binar link needs to be provided by the person or authority holding the Webinar. Check your mail for the link and open it at that time. If not able to login call the person.

अश्विनी मामी
प्रतिसादा बद्दल धन्यवाद
आमच्या email वर webinar लिंक आली होती, mobile वर ती लिंक webinar च्या वेळी ओपन केली, त्यांनी दिलेला आंतरराष्ट्रीय call नंबर dial केला, पण त्याच्यावर webinar I.D. कुठे टाकायचा ते समजले नाही त्यामुळे त्या लोकांचा आवाज येत होता, आमचा आवाज त्यांना एकु जात नव्हता व आम्हाला video पण दिसत नव्हता, असे webinar आमच्या ऑफिस मध्ये ४ वेळा झाले, तीन वेळा हाच प्रॉब्लेम आला. Webinar चालू झाल्यावरच webinar सेटिंग ची विंडो ओपेन होते, त्यामुळे त्यावेळी काहीच करता येत नाही.

आधी citrix च्या साईटवरुन प्रोग्राम डाउनलोड करुन इन्स्टॉल करायला हवा ते केलेय का?
नसल्यास डाउनलोड & टेस्ट वर क्लिक करुन, टेस्ट करुन घ्या.

https://care.citrixonline.com/gotowebinar

मानव
प्रतिसादा बद्दल धन्यवाद
mobile वर व laptop वर दोन्ही ठिकाणी आम्ही gotowebinar install केले आहे.
काल webinar mobile वर घेतले होते व याआधी laptop वर पण दोन्ही वर same प्रोब्लेम म्हणजे त्या लोकांचा आवाज आपल्याला ऐकु येतो, आपला आवाज त्यांना ऐकु जात नाही व video पण दिसत नाही. laptop वर webinar च्या आधी video चेक केला होता. mobile वर Audio व video चेक करावा लागत नाही ना?
VoIP म्हणजे काय?

You can raise an IT ticket for this issue with the IT department of your company.

जिज्ञासा
प्रतिसादा बद्दल धन्यवाद
आमची Interior Decorator company आहे, लहान company आहे आमचे सर मोठ्या सामाजिक संस्थेचे सभासद आहेत. त्यांचे हे webinar असतात.

राजेंद्र तुमचा प्रश्न सरांना नीट समजावून सांगा ते डिरेक्ट करतील किंवा तुमची सर्वांची एकत्रित कंप्लेंट नोंदवतील. तसेच तुमची एक कंपनी असे इतरही कंपनीतले लोक वेबिनार बघणा रे असतील तर त्यांच्याकडून समजावून घेता येइल . व सर्व जण एकत्र मिळून वेबिनार घडवून आणनार्‍या कंपनीच्या आयटी डीप. शी बोला. हा नक्कीच
आयटी डीपार्मेंटचाच प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे असे आयोजित करतत तेव्हा आयटीवाले आधी टेस्ट करतात व होईपरेन्त स्टँद बाय वर असतात.

मी एक बिग डाटा कोर्स केला होता तेव्हा हे सर्व करून पाहिले आहे. एकदम विचित्र वाटते. समोर काहीच नाही आणि कुठल तरी बंगलोर मधला इथला तिथला माणूस जीव तोडून काहीतरी शिकवतो आहे. इत्यादि.

राजेन्द, बरेचदा ते आपले माइक म्युट करतात, कारण सगळ्यांचे माईक कायम ऑन असले तर बराच गदारोळ एकु येतो. तसे तर नाहीय ना?
ऑडियो प्रॉब्लेम्स साठी हि लिंक.
http://support.citrixonline.com/en_US/Webinar/help_files/G2W050053

आणि त्यांचे व्हिडिओज पण आहेत पहिल्यांदा वापरणार्‍यांसाठी, कुठले ब्राउजर वापरतो त्यानुसार,
इथे: http://support.citrixonline.com/en_US/Webinar/videos

अश्विनी मामी
आमचे सरच ह्या webinar ला असतात (ऑफिस मधल आजून कोणीही नाही). मी व आमच्या ऑफिस साठीचा कॉम्पुटर maintenance चा माणूस आम्हाला जमतील तसे laptop वर किंवा mobile वर सेटिंग करतो, ते नेहिमी fail जात. मी, कॉम्पुटर maintenance चा माणूस व आमचे सर तिघांनाहि webinar च्या सेटिंग बद्दल काहीही माहिती नाही, मी Google वर जी माहिती मिळेल त्याप्रमाणे सेटिंग करण्याचा प्रयत्न करतो.
आमची कंपनी खूप लहान आहे, ह्यात .I.T. Department नाही.
आम्हाला प्रत्येकवेळी webinar ला प्रोब्लेम येतो पण आमचे सर webinar organize करणाऱ्या कंपनीशी बोलत नाहीत.
मानव
बरेचदा ते आपले माइक म्युट करतात पण आपली बोलायची वेळ आल्यावर आपण बोलत आसतो पण आपला आवाज त्यांना ऐकु जात नाही, व ते दाखवतात तो Video हि दिसत नाही. आम्ही mobile वर ऐकण्यासाठी Headphone वापरला.