कोण येथे नेहमीचा अमर झाला

Submitted by इस्रो on 31 January, 2017 - 20:53

जीवनाचा मार्ग कोणा सुकर झाला?
कोण येथे नेहमीचा अमर झाला?

जाहलो आस्तिक, बदललो कशाने मी?
काय प्रेमाचा तुझ्या हा असर झाला?

कोण आधी अन उशीरा किती आले
वाद हा भेटीत त्यांच्या जबर झाला

वापरुनी लोक गेले असे मज की
शेवटी माझा ठशाचा रबर झाला

राजकारण "राजकारण" कुठे आता?
व्यर्थ चर्चेचा विषय देशभर झाला

- नाहिद नालबन्द 'इस्रो'
[भ्रमणध्वनी: ९९२११०४६३०]

Group content visibility: 
Use group defaults