काबिल-ए-तारीफ (Movie Review - Kaabil)

Submitted by रसप on 27 January, 2017 - 00:38

हृतिक रोशन हा आजच्या काळातल्या अतिशय मेहनती अभिनेत्यांपैकी एक आहे. कदाचित अभिनय क्षमतेत इतर काही लोक त्याच्याहून सरस असतीलही, नव्हे आहेतच. खास करून संवादफेकीत तो खूप कमी पडतो, असं माझं एक निरीक्षण आहे. बऱ्याचदा त्याच्या वाक्यांच्या शेवटचा शब्द नीट समजून येत नाही. वाचिक अभिनयात कमी पडत असला तरी आपल्या मेहनतीतून तो त्यावर मात करत असतो. भारतात लोकप्रिय ठरलेला आजवरचा एकमेव देशी सुपरहिरो म्हणूनच तर तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरवू शकला आहे !
'काबिल' ही त्याने गाठलेली अजून एक उंची मानता येईल. 'मोहेंजोदडो'च्या वेळी 'रुस्तम' अक्षय कुमारशी हृतिकची टक्कर झाली होती. तेव्हा नकारात्मक प्रसिद्धीचा फटका त्याला बसला होता. मात्र तरीही पुन्हा एकदा एका मोठ्या सिनेमासमोर उभं राहताना हृतिक डगमगत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच, ह्यासाठी दाद द्यायला हवी. ह्या वेळी तर चक्क किंग खान च्या 'रईस' समोर हृतिकचा 'काबिल' उभा ठाकला आहे आणि believe me, ह्यावेळी तो नक्कीच मात खाणार नाही.

Kaabil Movie Poster.jpg

'काबिल'मध्ये 'काबिल-ए-तारीफ' होण्यासाठीचे जवळजवळ सर्व ingredients आहेत.
रोहन भटनागर (हृतिक रोशन) आणि सुप्रिया भटनागर (यामी गौतम) हे एक अंध दांपत्य. नवीनच लग्न होऊन आलेल्या सुप्रियावर स्थानिक नगरसेवक माधवराव शेलार (रोनित रॉय) च्या लहान भावाची (अमित - रोहित रॉय) वाईट नजर असते. तो व त्याचा मित्र तिच्यावर अत्याचार करतात. हे सगळं कथानक ट्रेलर्समधून स्पष्ट समजून आलंच असेल. ह्यानंतर, सूडभावनेने पछाडलेला अंध रोहन ह्या सगळ्या बाहुबलींचा बदला घेण्याचा प्लान आखतो. कसा ? तो किती यशस्वी ठरतो ? आणि त्यानंतर त्याला काय परिणाम भोगावे लागतात ? हे उर्वरित कथानक, जे ट्रेलर्सनी दाखवलेलं नाही.

पटकथेत काही त्रुटी आणि काही पळवाटाही आहेत. सगळ्यात मोठी पळवाट म्हणजे रोहन आणि सुप्रियाला कुणीही नातेवाईक नसणं. ह्यामुळे कुठलाही पसारा न होता फक्त मुद्द्याचं कथानकच मांडता येण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. अश्या अजूनही काही बाबी आहेत, पण ते सगळं किरकोळच.

दिग्दर्शकं संजय गुप्ता, त्यांच्या उचलेगिरीसाठी (कु)प्रसिद्ध असले, तरी कथानकाची वेगवान मांडणी मात्र त्यांच्या सिनेमात दिसून येतेच. तशीच ती इथेही आहे. नाही म्हणायला, अगदी सुरुवातीला गती जराशी धीमी आहे, पण लौकरच वेग पकडला जातो. त्यांच्या नेहमीच्या आवडत्या पिवळ्या व लाल रंगांची अनावश्यक उधळण इथे नाही, हे एक विशेष !

यामी गौतम अतिशय सुंदर दिसते. अंध व्यक्तीचा वावर सहज नसतोच. मात्र ते अवघडलेपण पडद्यावर सहजपणे आलं पाहिजे, अशी काहीशी विचित्र मागणी ह्या भूमिकांची होती आणि त्यात दोघेही कमी पडलेले नाहीत. यामीच्या भूमिकेला फारशी लांबी नाहीय. मात्र असलेल्या वेळेत तिने स्वत:ला चांगलंच सिद्ध केलेलं आहे.

'रोहित रॉय' गुप्तांचा आवडता असावा. इंडस्ट्रीतील साईड लाईन झालेल्या अनेक चांगल्या अभिनेत्यांपैकी रोहित रॉय एक असावा. कुवत असूनही एकही लक्षणीय भूमिका आजपर्यंत त्याला मिळू नये, हे एक दुर्दैवच. त्याचा बॅड बॉय अमित खूपच कन्व्हीन्सिंग आहे. अगदी पहिल्या फ्रेमपासून त्याची इमेज आपल्या मनात बनूनच जाते.

'रोनित रॉय' च्या करियरने गेल्या काही वर्षांत जो आकार घेतला आहे, त्याची अपेक्षा त्याने स्वत:देखील कधी केली नसावी. सोनी टीव्हीवरील एका टुकार मालिकेतील दमदार भूमिकेनंतर ह्याचे सगळे गहच पालटले आहेत ! ९० च्या आसपासच्या हिंदी सिनेमाच्या दळभद्रीणाचे जे काही चेहरे होते, त्यांच्यापैकी एक रोनित रॉय. पण आजकाल त्याला पडद्यावर पाहताना विश्वासच बसत नाही की जान तेरे नाम, बॉम्ब ब्लास्ट वगैरे टुकारक्यांतून सहनशक्तीचा अंत पाहणारा तो हाच का ? त्याचा हा कायापालट केवळ अविश्वसनीय आहे. गुंड आणि बेरकी 'माधवराव शेलार' लक्षात राहील. ग्लासआडून त्याने फिरवलेली नजर - ट्रेलरमध्येही दिसेल - तर हायलाईटच !

सिनेमा हृतिकसाठी आहे आणि त्याचाच आहे. सिनेमाच्या सुरुवातीला असलेल्या 'कदम से कदम जो मिले...' गाण्यावरील हृतिकच्या नाचासाठी त्याला सलाम आहे ! अप्रतिम कोरिओग्राफ केलेलं आणि सादर केलेलं गाणं खासकरून पाहायलाच हवं असं आहे.
वर म्हटल्याप्रमाणे अंध व्यक्तीच्या अवघडलेपणाला अत्यंत सहजपणे हृतिकने सादर केलं आहे. त्याची हताशा आणि नंतर मनात भडकलेला सुडाग्नी त्याने अप्रतिम रंगवला आहे. प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या प्रयत्नांत पूर्णपणे यशस्वी होते, तेव्हा एक त्रयस्थ म्हणूनही आपल्याला एक समाधान मिळतं. हृतिकचा 'रोहन भटनागर' पाहताना ते समाधान मिळेल.

व्हेटरन राजेश रोशन आजच्या काळाशी सुसंगत संगीत देतात. काबिल हूं, कदम से कदम.. आणि 'सारा जमाना..'चं रिमिक्स मस्त जमली आहेत.

अधिक काही लिहित नाही. बऱ्याच दिवसांनी 'रईस' आणि 'काबिल' अशी डबल ट्रीट आहे. बॉक्स ऑफिसचे आकडे ह्याला 'लढत' ठरवतील आणि दोघांतल्या एकाला विजेताही बनवतील. पण प्रेक्षकांनी ह्याकडे लढत म्हणून न बघता मनोरंजनाची मेजवानी पाहायला हवं. कारण जर एक 'दमदार' आहे तर दुसराही 'काबिल-ए-तारीफ' आहे.

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/01/movie-review-kaabil.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

तिला तेवढेच रोल बरे पडत असावेत. जास्त अभिनय झेपत नाही तिला.
हृतिक कोई मिल गया पासून डोक्यावर परिणाम झालेला वाटतोच आता आंधळा पण केलाय. ट्रेलर बघतानाही असह्य वाटलेले दोघेही आंधळेपणच्या अभिनयाची परिकाष्ठा करताना.

हृतिक कोई मिल गया पासून डोक्यावर परिणाम झालेला वाटतोच आता आंधळा पण केलाय. ट्रेलर बघतानाही असह्य वाटलेले दोघेही आंधळेपणच्या अभिनयाची परिकाष्ठा करताना. कोई मिल गया पासून डोक्यावर परिणाम झालेला वाटतोच आता आंधळा पण केलाय. ट्रेलर बघतानाही असह्य वाटलेले दोघेही आंधळेपणच्या अभिनयाची परिकाष्ठा करताना. >>>> माझं सुद्धा हेच मत. हृतिकचे डान्सेस पहावेत किंवा ऐश्वर्या रायसारखे हृतिकचे स्टील्स पहावेत. दोघेही चित्रासारखे सुंदर आहेत, पण मॉडेल्स म्हणुन किंवा स्टील्समधे. दोघेही अ‍ॅक्टिंग करायला लागले कि अजिबात झेपत नाहीत. तरी हृतिकला ZNMD किंवा लक्श मधल्या फौजी सारख्या सिरिअस रोलमधे पहावलं होतं, बाकी त्याचे सुपरस्टार क्रिश किंवा लक्श मधला कॉलेज बॉय किंवा करीना बरोबरच्या काही मुवीज मधे पहावत नाही. (ऐश्वर्या रॉयचा कोणताही मुवी आठवत नाही हा रोल बरा केला असं वाट्लं होतं.)
तर एकुणात काय तर 'काबिल' टिव्ही वर येण्याची वाट पहाणे.

यामी ला आंधळी नाही दाखवली असती तरी चालले असते. असाही फोकस " आंधळ्याने घेतलेला सुड" याच मुद्द्यावर जास्त होता.

स्टोरीत काही वेगळेपण नाही. अगदी सनी देओलचा घायल वगैरेचा जमाना आठवला. किंवा फार तर संजय दत्त आणि काजोलचा दुश्मन.

सादरीकरण चांगले असेल तर चित्रपट बघणेबल होतो पण त्याला उचलून घेऊ शकत नाही.
यामी गौतमी आणि हृतिक रोशन या जोडीला कास्ट केले तिथेच क्लीअर झाले की चित्रपट मुख्यत्वे नेत्रसुखद बनवण्याकडे कल आहे.

हृतिक माणूस म्हणून फार आवडतो.
कलाकार म्हणून फक्त कहो ना प्यार है आणि कोई मिल गया मध्ये आवडला. आणि काही अंशी मिशन काश्मीरमध्ये.. आणि या आता बालपणीच्या आठवणी झाल्या आहेत. त्यामुळे मुद्दाम त्यासाठी बघावे असे नाही.

मुद्दाम जिच्यासाठी चित्रपट बघावा अशी बॉलीवूडमध्ये एकच हिरोईन आहे, आपली सनी लिओन. त्यामुळे यामीसाठीही मुद्दाम चित्रपट बघावे असे नाही.

एखाद्या डेलीसोप सिरीअलमध्ये शोभावेत असे व्हिलन घेतले आहेत त्यांच्याबद्दल आणखी काय बोलावे. चित्रपटात हृतिल आंधळा बहिरा मुका लंगडा लुळा दाखवला असता तरी त्यांना ठोकून काढले असते असे ट्रेलर बघताना तरी वाटले.

संगीत आवडलेय चित्रपटाचे. पण तेवढ्यासाठी कोणी दरडोई चारशे रुपये आणि चार तास खर्च करून थिएटरात जात नाही.

बरं मी स्वत: उत्कृष्ठ बाथरूम डान्सर असल्याने आणि आमच्या बाथरूममध्ये फुलसाईज आरसा असल्याने मला हृतिकच्या नाचाचेही फारसे कौतुक नाही.

एकंदरीत केबललाही हा चित्रपट बघेन याची ग्यारंटी नाही. कोणी पायरेटेड कॉपी पुरवली तरी अगदीच बघितलेच पाहिजे अशी फिलिण्ग आल्याशिवाय मी माझ्या आयुष्यातील तीन तास खर्च करत नाही. तेवढ्या वेळात मायबोलीवर सहा धागे निघतात.

थोडक्यात सांगायचे झाल्यास रईस दोन वेळा बघेन पण काबिल बघणार नाही...

रुन्मेश्भौ... काबिल न बघ्तच इत्क मोथा परिच्चेद तक्ल तुम्हि... तुम्हि शखा चे फेन ... तुम्हि कबिल बघ्नार नहि यत विसेस नहि...
माय्बोलिवर ६ धागे कध्ने म्हन्जे तुम्हि स्वतचे ३ तास वय घल्वतच पन इतरन्चेपन असे नहि क... त्यपेक्श रयिस ३ वेला बघ...

 च्रप्स,
आधी एक गंमतीशीर निरीक्षण,
ती एक "च" ची भाषा असते ना.. त्यात धागाकर्ता रसप यांचे नाव लिहिले तर च्रप्स असे होईल का Happy

आता अबाऊट टॉपिक बोलायचे झाल्यास मायबोलीच्या वाचक वर्गापेक्षा बॉलीवूडचा प्रेक्षकवर्ग नक्कीच जास्त असावा. मग सांगा हा चित्रपट बनवून हृतिकने किती लोकांचा किती वेळ वाया घालवला Happy

म्हणे यामीचा हा सिमिलर रोलचा तिसरा चित्रपट आहे. ती मेल्यावर बदला घेण्याचे. एकतर मला हे बदला टाइप पिक्चर फार आवड्त नाहीत. त्यात आज काल रितिक सर्व मुव्हि मधे सेमच वाटतो .म्हणजे ह्रितिक वाटतो, जे काही कॅरॅक्टर आहे ते वाटत नाही. त्यामुळे कणभरही इन्टरेस्ट नाहीये हा बघण्यात. रोनित रॉय मात्र खरच किति पुढे गेलाय. त्याचे सर्व रोल्स आवडतात आजकाल.

तस कोनचे रेविएव्स वचुन मोवि पहिला नहि पहिजी.. स्वत बघुन थर्वा...
एक नसीर चा मोवि होता...
एन कोन्तेर थ किल्लिन्ग - खूप मस्त होता... रेविएव्स चन्ग्ले नवते.. पन खूप चान होता

नहि तीना ... सीन बीन मागे पदतोय यमि पेक्शा... २०११ ( नेद स्तर्क) नन्तर अजुन मेला नहिय तो ...
यमि बकि फुल्ल फोर्म मदे आहे... यमि > सीन बीन

च्र्प्स

तुम्ही एक वेगळा धागा काढून पुर्ण कथा लिहा. मस्त मनोरंजन होईल . तुम्ही लिहिलेले समजून जोडाक्षरे जुळवून घेऊन कथा वाचायला मायबोलीकरांचे तब्बल ३ तास तरी नक्कीच जातील.

च्र्प्सजी,मी तर फक्त तुमचेच प्रतिसाद वाचले...खूप मस्त वाटतंय वाचताना,जाम हसू येतंय...तुम्ही असच लिहा....
आणि मी कालच म्हणणार होते पण आज दीपस्त यांचा प्रतिसाद वाचून म्हणतेच...तुम्ही खरचं एक लेख लिहाच...खूप मनोरंजन होईल..
ढन्यवाद .......

सिनेमा न बघताच केलेल्या निगेटिव्ह कमेंटस पाहुन आश्चर्य वाटलं .
रसप अगदी यथार्थ परिक्षण .
खरचं अमेझिंग मुवी आहे , नक्की बघा लोक्स .

सिनेमा न बघताच केलेल्या निगेटिव्ह कमेंटस पाहुन आश्चर्य वाटलं .
>>>>
ट्रेलरवरून बांधलेले अंदाज आहेत ते Happy

बरं मी स्वत: उत्कृष्ठ बाथरूम डान्सर असल्याने आणि आमच्या बाथरूममध्ये फुलसाईज आरसा असल्याने मला हृतिकच्या नाचाचेही फारसे कौतुक नाही << :ऑ

अंघोल करताना अर्शात बघुन नाचता तेवा तुमि स्वताला हरेथिक शी कंपर करता हे वाचून आच्चर्य वातले.
एक वेदीयो येव दया तुंच्या नाचचा ( बतरुम बहेर शूत करा पलीज).

मुद्दाम जिच्यासाठी चित्रपट बघावा अशी बॉलीवूडमध्ये एकच हिरोईन आहे, आपली सनी लिओन. त्यामुळे यामीसाठीही मुद्दाम चित्रपट बघावे असे नाही.>>>>
रुंमेशभौ तुमि राईस शरुक साथी बगणार का सनी साथी..
बाकि सदया कबिल मागे पदला आहे राईस च्या बिननेस मदे हे सत्य आहे..
मी उदया राईस बगनार आहे... कबिल पुदच्या विकेंद ला..

Pages