पाणथळीचे पक्षी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 24 January, 2017 - 01:57

खालील सर्व फोटो गुगल क्रोमवरच दिसतील

मागील आठवड्यात मायबोलीकर साधना, एशू बरोबर पाणजे येथील खाडीवर जाण्याचा योग आला. खर तर आमची जाण्याची वेळ संध्याकाळची असल्याने थोडक्यातच समाधान मानून यावे लागले कारण सूर्यनारायण मावळतीला निघाले होते. पण जो वेळ तिथे घालवला तो पक्षी दर्शनाने सार्थक झाला ह्याचे मनोमन समाधान लाभले.

काही पक्षांची नावे माहीत नाहीत ती जाणकार देतीलच.

१) चित्रबलाक - Painted Stork

२) भक्ष्याच्या दिशेने पाऊल.

३) मिळले

४) शेकाट्या/पाण्टिलवा/Black Winged Stilt
ह्याच्या टोकदार चोचीचा उपयोग करून हा गोगलगाय खडकांवरील कालव देखिल खाऊ शकतो.

५)

६) हे पाणबगळे जास्त असतात. नक्की नाव माहीत नाही.

७)

८)

९) खंड्या/ कॉमन किंगफिशर
हा आमच्यासाठी विशेष आकर्षण होता. कारण ह्या जातीतला खंड्या प्रथमच पाहीला.

१०) हे खंड्याबाळ असावे.

११) हिरवा तुतारी/Green Sandpiper

१२)

१३) चांदवा/Eurasian Coot

१४) Black headed gull
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

१५) पाठच्या पक्षांचे एकसाठ पिछे मुड

१६)

१७) आम्ही पक्षी पहात असताना एक फॉरेस्ट ऑफिसर आणि तिथला लोकल पक्शी प्रेमी असे दोघ जण एका पिशवीत पक्षी घेऊन आले. त्या पक्षाने काहीतरी खाऊन तो रक्ताच्या उलट्या करत होता. मग त्या स्थानिक मुलाने फॉरेस्ट ऑफिसरला कळवून त्याला ट्रीटमेंट दिली आणि दोघ त्याला आकाशी झेप घेण्यासाठी सोडायला आले होते व आमच्या समोरच त्याने भरारी घेतली.

१८)

१९)

२०)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी ते नावच काढते. म्हणजे कोणाची गफलत नको व्हायला. मी परत पाणज्यात गेले की हा पक्षी दिसला तर अजुन क्लियर फोटो घेण्याचा प्रयत्न करेन. मग आपण नाव शोधू.

जागु तो उद्देश नाहीये ग. पक्षी ओळखता येणे महत्वाचे. Water Pipit असता तर तुझ्या नावाची नोंद झाली असती. त्या करता नीट चेक केले.

मला खरच खुप आनंद झाला असता केपी. म्हणुनच आपण परत क्लियर फोटो पाहून कन्फर्म करू. मी लवकरच परत तिथे जाईन.

Pages