सहज मी हरणार नाही......

Submitted by संजय मेहेंदळे on 22 January, 2017 - 18:33

गर्वोद्धत शिडांस वारा, अनुकूल नित असणार नाही
हातावर ठेवून हात, स्वस्थ मी बसणार नाही
.
चहू दिशा अंधारता, वाट हि दिसणार नाही
होईन मीच दीपस्तंभ, परत मी फिरणार नाही

काजळमाया, डोहकाळिमा; गूढ नियती कळणार नाही
मीच माझा भाग्यविधाता, ध्रुव माझा ढळणार नाही
.
चाटूगिरीच्या या बाजारात, स्वत्व हे पिकणार नाही
मोडेन ही मी; पण इमान माझे विकणार नाही
.
मर्त्य मी ही; अंती विजयी ठरणार नाही
मारिता मारिता मरेतो झुंजेन, सहज मी हरणार नाही
.

Group content visibility: 
Use group defaults

चाटूगिरीच्या या बाजारात, स्वत्व हे पिकणार नाही
मोडेन ही मी; पण इमान माझे विकणार नाही>>>>>अप्रतिम.....
.