येथला वटवृक्ष कोणी कापला ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 January, 2017 - 07:55

माणसांचा ओघ होता लागला
एकही त्यातील नव्हता आपला

झाड़ नाही एकही रस्त्यामधे
येथला वटवृक्ष कोणी कापला ?

चौकशी केली परतणाऱ्यांकडे
देव गाभार्यात नव्हता भेटला

शोधुनी उलटेच टांगा दया धुरी
लेखणीचा घाट ज्याने घातला

हासतो घेरून काट्यान्नी सदा
त्या गुलाबाला सखा मी मानला

चालले होते कुठे...आले कुठे ?
पोचल्यावर प्रश्न निष्फळ वाटला

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users