ठसे

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 January, 2017 - 07:36

कशावर कशावर कळेना कसे
सदासर्वदा वेंधळे मन बसे

हृदय पाहिले आज उघडून मी
तुझ्या पावलांचे निघाले ठसे

मनाच्या वहीवर कितीही लिहा
कसे राहते पान कोरे असे ?

खटाटोप हे विसरण्याचे तुला
फसावी करुन आत्महत्या तसे !

बदलतात दृष्ये क्षणार्धान्मधे ;
कि ऐनेमहालातले आरसे ?

असाव्यात माफक अपेक्षा तिच्या
मनावर कुणी घेतले फारसे ?

तुझ्या सावलीने मला स्पर्शणे
खुल्या वाळवंटात थोडे नसे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुन्दर!!
तुझ्या सावलीने मला स्पर्शणे
खुल्या वाळवंटात थोडे नसे
हा शेर तर अप्रतिम.

हृदय पाहिले आज उघडून मी
तुझ्या पावलांचे निघाले ठसे.... हजारो वेळा अप्रतिम म्हणावे लागेल ... तेव्हां कुठे या ओळींनी दिलेल्या आनंदाची भरपाई होईल... Happy

वाह...