विनंती कोलंबीचे लोणचं पाक कृती

Submitted by गीता राणे on 19 January, 2017 - 23:15

नमस्कार
बखर या वरील लिंक्स delete झाल्यात, तरी क्रुपया रेसिपी share करावी

धान्यवाद सर्व लिखानकरांसाठी आणि inspiration s
God Bless U All
(Have wtitten d Request but not abke to trace back, hence dis repeated request
Plz bear, Thnx again)

Group content visibility: 
Use group defaults

मायबोलीवरची कुठलीच रेसिपीची पाने डिलीट झालेली नाहीत. फक्त त्याना विषयाप्रमाणे/विभागाप्रमाणे शोधायची सोय सध्या काम करत नाहीये. या अडचणीवर काम सुरु आहे.

PicsArt_01-20-12.48.55.jpgनमस्कार, माझे रुचिरा grantha नसल्याने केरला kruti वापरलि. यामध्ये कोलंबिच्या निम्म्या वजनाचे आले व लसून पेष्ट वापरतात, अँक्चुल करताना गंम्मत झाली.
खालिल प्रमाणे लोणचं बनवले

साफ केलेलि कोलंबी तिखट,मिठ हळद (काश्मिरी मिरचीचा लाल -तयार मसाला- चविनुसार) मुरण्यासाठि ठेवले

कोरडा मसाला 1 - मोहरी 2चमचे, 10-15 मेथी दाणे -भाजुन,मिक्सरमध्ये याबरोबरच गरम मसाला, लाल तिखट, हळद, थणे-जिरे पावडर 2चमचे, पुड करून घेतली.

ओला मसाला 2-

कोलंबी वजन केलेली नव्हती, तेव्हा वाडग्यातिल कोलंबी च्य अंदाजे आले-लसून-हिरवी मिरची (फ्री ज मध्ये सुकलेली 2 मिरच्या) यांची मिक्सरमध्ये पेष्ट केली,

क्रुति -

कढईत- तेलावर कोलंबी परतुन झाकण (झाकणावर पाणि ठेवुन) शिजवुन भांड्यात काढुन ठेवल
त्याच कढईत आणखी तेल घालुन आले-लसूण-हिरवी मिरची याची पेष्ट घालून( खरपुस ) परतुन घेतलं

त्यात अंदाजे कोरडा मसाला घालून परत व्यवस्थित परतून घेतलं

आता त्यात शिजवलेली कोलंबी घातलि

गरजेनुसार मीठ घा त ले
सर्व एकजीव झाल्यासारखे वाटले तेव्हा गॅस बंद करून लिंबाचा रस घातला व पुन्हा सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळून घेतले व काचेच्या वाडग्यात लोणचे काढून ठेवले

सुरुवातीला म्हणजे पहिला घास कडवट वाटलं
थोड्या वेळातच सुंदर चव आली

मूळ रेसिपी माध्ये व्हिनेगर वापरलाय, मला व घरातील कुणालाच अजुन व्हिनेगर ची तितकिशी ओळख नसल्यामुळे, व्हिनेगर टाळले,

चुकभुल माफ करावी, मूळ केरळ रेसिपी करांना खूप खूप धन्यवाद, आणि आपण सर्वाना तुमच्या खास वेगवेगळ्या रेसिपी ज मुळे मला असे प्रयत्न करायला प्रोत्साहित केल्या बद्धल, कोटी कोटी धन्यवाद, I mean it, with Love,
PicsArt_01-20-12.48.55_0.jpg