एका बापाचे आत्मचरित्र

Submitted by kalyanib on 17 January, 2017 - 05:22

शीर्षका वरून तुमच्या लक्षात आलेलेच असेल हे माझे आत्मचरित्र. मी शरद पहिला बाप जो आई झाला. गोंधळून जाऊ नका. मी सत्य बोलतोय मी आई झालोय माझ्याच ३ लेकरांची. माझ्या बायकोला जाऊन खूप वर्ष झाले तेंव्हा पासून आजतागायत मी आई झालोय. माझ्या लेकराचं सगळं मी केलाय जे एक आईच करू शकते. शी-सु पासून सगळं. पण हे सगळं मी कसा करू शकलो हे तुम्हाला सविस्तर वाचून कळेल.
अतिशय बुद्धिमान, स्वावलंबी, असा मी आणि माझी श्यामल (माझी सहचारिणी ) जी अतिशय तठस्थ, कणखर, असे आम्ही दोघं आणि आमचा संसार ज्यात काय न्हवतं ? आम्ही दोघं, ३ मुलं,आई बाबा सगळं कसा एखाद्या चित्र सारखं. आमच नवीनच घर बांधून झाला होतं त्यात श्यामल आता प्रिन्सिपॉल होणार होती. सगळंच छान , नीटनेटकं आणि उत्तम. पण म्हणतात ना कि सगळं चांगलं असणं हे नियतीला मान्य नसतं . तसच झालं आणि श्यामलला कॅन्सर डिटेक्ट झाला, माझं आयुष्यच बदलून गेलं. ज्या दिवशी आम्हाला कळालं कॅन्सर बद्दल त्या दिवसा पासून मी झोपलेलोच नाही. आपल्या श्यामलला ठणठणीत बरं करायचे असं ठरवून कामाला लागलो. माझे ३ मुलं, लहाना तर अगदीच २.५ महिन्याचा होता. मुलींच्या शाळा होत्या कसा केलं मी?आत्ता पण नाही कळत. तिचं दुखणं बघवत न्हवत तिला कॅन्सर ची ट्रीटमेंट देणे सुरु झाले होते. chemotherapy सुरु होती. सकाळी उठायचं मुलींचे डबे करायचे, आणि स्वतःचे करून निघायचे. श्यामल करता देवाचे उपवास आणि जो जे सांगेल ते सुरु होत. बघवत न्हवते ते माझ्या चिऊल्यांचे डोळे. आई सतत का झोपलेली असते ? बाबा रात्र भर का जागे असतात? आईच्या ऐवजी रोज बाबा का अभ्यास घेतात? आई का कण्हत असते ? बाबा का रडतो आजकाल? असे असंख्य अनुत्तरित प्रश्न त्यांच्या डोळ्यात दिसायचे. पण मी हरणार न्हवतो. मी रोज नव्याने सुरवात करायचो. आता श्यामलचे ऑपेरेशन करायचे ठरविले. मुलींना आई बाबां जवळ ठेऊन मी ,श्यामल आणि लहाना मिरजेला गेलो. तिथे ऑपेरेशन झाले. परत घरी आलो. या कालावधीत मी अनेकदा रडलो पण मी सांभाळला स्वतःला माझ्या मुलां करता.
पण होऊ नये ते झालं, त्या दिवशी मुलांना सकाळी ५ ला उठवला कि बाबांनो उठा आईला भेटून घ्या बरं . मग आई दिसणार नाही आपल्याला. मुलं बिचारी कावरी बावरी होऊन बघत बसले आई, मावशी, आजी आजोबा का जमलेत सगळे? आणि Dr का आलेत ? आई का काहीच बोलत नाही आहे ? आणि आपल्याला सगळे असे का बघत आहे. मी हे सगळं बघत होतो. रडायचं नाही असा निर्धार केला. आता आई बनायची वेळ आली होती. श्यामलचं सगळं विधिवत केलं. आणि मग राहिलो आम्ही ४ जण. आता तर सकाळ पासूनच कामं. बाया सगळं कसा निमूटपणे करत असतात. आपल्याला जाणीव होते ती आपल्याला करावे लागते तेंव्हा. तर रोज सकाळी उठा पाणी गरम करा मुलींना उठवा, यांचा ब्रश करून देण्याचा कार्यक्रम अर्धा तास चाले. मग उगाच रागावून आपणच करून द्यावा लागे. मग दूध नाश्ता, तेवढ्यात लहाना उठायचा त्याचं करा असे बरेच दिवस केले. श्यामलच्या आठवणींनी मन व्याकुळ होत असे. माझ्या मुलांचा अभ्यास घेण्या पासून ते न्हाऊ घालण्या पर्यंत मी सगळे केले प्रेमानी.
एक बाप आता आई झाला होता. त्याला दुसरे जगच उरले न्हवते. लेकरांचे कोडकौतुक करणे, वेळ प्रसंगी धाकात ठेवणे आणि रात्री गोष्टी सांगणे असा संसार चालला होता. आई मुलांचे नाते वेगळेच असते पण आमच्या नात्याला तर काही नावचं न्हवते. मी एक बेस्ट dad झालो. श्यामल नेहमीच आमच्या सोबत असते. आता मुले मोठी झाली. आता ते माझी आई झाले आहेत. मजा येते फार. तुम्ही पण एकदा आई बनून बघा.

श्यामल गेली तेंव्हा तिच्या करता लिहिलेली कविता -

डोळ्यातील गहिवर ओले, भावना सांद्र घननीळ
तृप्तीचा मोहर फुलाला , सौख्याची गंधित वेळ
शकुनाचे तोरण देही, शालीन रूप अलवार
ती प्रसन्नतेने नटली, मायेचा मंद फुलोर,
ओथंब टपटपे ऐसा, कि झाले जीवन गाणे
शब्दांना साथ सुरांची , नि गावे सुलभ तराणे......

टीप- ह्या कथेतील प्रत्येक पात्र खरा आहे. आमचे ज्यांनी अगदी सगळे केले त्या माझ्या बाबांनं करता. शब्द हि अपुरे पडतील एवढा त्यांनी आमच्या करता केलय. त्यांच्या सारखा बाबा प्रत्येकाला मिळो. त्यांची जागा आमच्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही. आमची आई गेल्यावर जे आईही करू शकली नसती एवढा बाबांनी केलय. आणि आज पण कारण आहे. मध्यरात्री उठून भूक लागल्यावर आज पण तेच पराठे करून देतात. खोकला आल्यावर तेच औषध देतात. रडू तर मुळीच देत नाही आम्ही रडलेलो त्यांना आवडत नाही. पण आज सुद्धा आई च्या आठवणींनी हळवे होतात. आम्ही घडलो आणि जे पण शिकलो ते केवळ बाबांमुळेच. माझे बाबा उत्तम स्वयंपाक करतात. त्यांना उत्तम २ वेण्या घालता येतात, त्यांना उत्तम कविता करता येतात थोडक्यात काय तर त्यांना सगळे उत्तमच येते . तुम्ही सुद्धा तुमच्या बाबा आई वर असेच प्रेम करा. ते खूप निरपेक्ष प्रेम करतात. ते जे सांगतील ते ऎका. आणि होऊ एकदा तरी बाबांना "आई" म्हणून हाक माराच..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय लिहू..........शब्दच नाही...
तुमच्या बाबांना माझ्याकडून आदरपूर्वक नमस्कार...
खूप छान लिहिलं आहे....

डोळ्यातून पाणीच आले.तुझ्या बाबांना उदंड आयुष्य लाभो आणि येथून पुढील आयुष्य कमीत कमी कष्टाचे जावो, सुखाचे दिवस लवकर यावेत हीच सदिच्छा.

_/\_

कल्याणी तुमच्या बाबांना नमस्कार

नियतीला हरवतात आणि आयुष्याला जिंकतात अशी माणसं .. बाबांना नमस्कार _/\_
Submitted by ऋन्मेऽऽष on 17 January, 2017 - 22:33 <<< छान प्रतिसाद ऋ

साष्टांग दंडवत ...

छान लिहिलं आहेस... तुझ्या बाबांना नक्की वाचायला दे.

मस्त लिहिलंस वाचून डोळ्यांत पाणी आले. तुझ्या वडिलांना माझा नमस्कार...थोडेफार असेच माझे बाबा सुद्धा आहेत. सावत्रपणात खरेपणा येत नाही म्हणूनच कि काय माझे बाबा सुद्धा कधी कधी माझी आई बनतात.

तुमच्या बाबांना दंडवत! __/\__
इतक्या आगळ्यावेगळ्या 'आई'बद्दल आणि तुमच्या हटके बालपणाबद्दल आणखी वाचायला आवडेल. आणि स्वतः त्यांनीच लिहिलं तर सोन्याहून पिवळं!

बाबांना आदरपुर्वक नमस्कार.

अतिशय बुद्धिमान, स्वावलंबी, असा मी >> हे वाक्य वाचल्यावरच तुमच्या बाबांनी नाही तर तुम्ही लिहीलंय हे जाणवते. तेव्हढा बदल करता आला तर बघा.