दिल दोस्ती दुनियादारी - भाग २

Submitted by अक्षय. on 13 January, 2017 - 08:18

कैवल्य :- कैवल्य आणेल काय तुमचा तुम्ही बघून घ्या मला एक जिंगल द्यायची आहे उद्या आणि मिनल याला खाजवणं नाही वाजवनं अस म्हणतात.
सुजय :- आशू माझे कपडे आणलेस का इस्त्री करून मला उद्या मिटिंगला जायचंय.
कैवल्य :- तो किंजल सोबत बिझी आहे फोनवर.
अॕना :- आशू माझा फोन आता गेलास तू ??
सुजय :- काय माणूस आहे हा याला स्वतःची कामं नसतात आणि दुसऱ्याच्या वस्तू वापरतो.
आशू :- हे बघ स्कॉलर मला कामं असतात.
अॕना :- काय माझा बॕलेंस संपवायची ही मिनल माझे सगळे ड्रेस घालून मोठे करते आ..
मिनल:- ये अॕना जाडी कोणाला म्हणतेस तू तर ना गेलीस आता
कैवल्य :- अरे काय बाजार मांडलाय मला उद्या जिंगल बनवून द्यायची आहे जरा शांत बसा.
मिनल :- म्हणजे तुला कामं असतात आम्ही रिकामटेकडे असच ना.
कैवल्य :- मी असं म्हणालो नाही मी फक्त शांत बसा एवढेच बोललो.
रेश्मा :- अरे कसला उच्छाद मांडलाय एकतर दिलेली काम होत नाहीत तुमच्या कडून फक्त मोबाइल पाहिजे व्यसन झालाय मोबाइल म्हणजे त्या डबड्यासाठी जिवावर उठला आहात का रे एकमेकांच्या ??
निकम आजी :- अरे काय चाललय कसला गोंधळ आहे हा ??
रेश्मा :- बघाना निकम आजी मी ह्या सुजयला भाजी आणायला सांगितलं तर ह्याला फोन येतो. ह्या मिनलला वाण्याकडे यादी देऊन जा म्हणाले तर हिला पण फोन येतो ह्या कैवल्यला काही सांगितलं की ह्याला जिंगल बनवायची असते
मिनल :- ए भेंडी रेश्मा उगाच पराचा कावळा करू नको एवढं काही झालं नाहीये
रेश्मा :- होका काही झालेलं...
(निकम आजी रेश्माला थांबायला सांगून बोलू लागतात )
निकम आजी :- अरे काय आहे हे तुम्हा आजकालच्या पोरांना काय झालंय. व्यसन झालंय नुसता मोबाइल, तुमचं प्रेम जमतात मोबाइलवर, तुटतात पण मोबाइल वरतीच, पार्ट्यापण मोबाइल वर, एवढेच नाहीतर मैदानात खेळायचा क्रिकेट पण हल्ली तुम्ही मोबाइलवरतीच खेळता . Candicrush आणि Tinpattichya बाहेर खूप मोठ्ठ जग आहे. अरे अमच्या वेळेस आम्ही वेळ घालवण्यासाठी पुस्तकं वाचायचो. नवीन पुस्तकांचा वास तुम्हा मोबाइल वाल्यांना काय कळणार. आम्ही रोज रात्री सगळे अंगणात जमायचो गप्पा मारायचो वेगवेगळे खेळ खेळायचो नाहीतर तुम्ही बघाव तेव्हा खाली मुंडी. मला मान्य आहे मोबाइल ही काळाची गरज आहे पण, गरजेला व्यसन नका रे बनवू. शेवटी गुलजारने म्हणलेल आहे कितांबे गिरणे सवरनेसे रिश्ते बन जाते थे ओ मजा मोबाइल मै कहा.
सुजय :- आजी माफ करा थोडं उद्धट बोलतोय असं वाटेल , पण आम्हाला त्याची गरज आहे. म्हणजे तुमच्या पिढीचा आमच्या पिढीशी हा प्राँब्लेम आहे मे बी ते बरोबरही असू शकतं. पण आम्हाला आमची बाजू मांडायचा एकतरी chance द्या.
निकम आजी :- बरं बाबा ऐकवा तुमची बाजू.
कैवल्य :- स्कॉलर थांब मी बोलतो. तर आजी हा मोबाइल ज्याला तुम्ही आणि ही काकूबाई व्यसन म्हणताय, हीच काकूबाई जेव्हा आई बाबांची आठवण येते तेव्हा लगेच गावी नाही जाऊ शकत पण हा फोन काही सेकंदात गावी पोचतो आणि आता तर व्हिडीओ काॕंलिंग सुद्धा आहे. हा सुजय एखाद्या दिवशी आजारी असला की, इथे बसून काम करु शकतो त्याचा लॕपटाॕप आणि मोबाइल वापरून.
अॕना :- हो मी पण डिझाईनमध्ये काही problem आला की मी पटकन मोबाइल उघडून Google वर बघते.
मिनल :- खरतर मी पण व्हिडीओस् बघते डायलाॕग्स ची रेंज बघायला बरं पडत ते.
रेश्मा :- मी पण नवीन नवीन पदार्थ बघते.
आशू :- मला पण किंजल फोनवरून काम सांगते मग मी पटपट करतो.
कैवल्य :- बाळ आशूतोश कशाला नसलेल्या भाग वापरतोयस, तु करतोस त्याला काम करणे नाही रे फुकटची हमाली करणे म्हणतात.
आशू :- असूदे मला आवडतं ते.
निकम आजी :- हे झालं कामाचं पण नात्यांचं काय ?? नात्यांची मजा ही ती हळूवार उलगडण्यात आहे. तुमची नाती उलगडण्या आधीच संपतात कारण त्यांना तुम्ही फुलू देत नाही.
सुजय :- बरोबर आहे आजी तुमचं नात्यांची मजा ही ती हळूवार उलगडण्यात आहे मान्य पण त्याच बरोबर तितकेच महत्त्वाच आहे ते विश्वास. मग नातं कोणताही असो विश्वास असेल तर ते टिकतं नाहीतर तुटतं. मग काळ तुमचा असो वा आमचा. आम्ही अजूनही आमच्या घरी रोज फोन करतो सगळे बोलतात. उलट लांब असल्यामुळे आम्हाला त्यांची किंमत जास्त कळते. आयुष्यात स्पर्धा वाढल्यात पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाची साथ देतो हा मोबाइल. फक्त एकदा चार्ज करा हा तुमचं सगळं ऐकतो.
कैवल्य :- आणखी एक आजी आमच्याकडे पण एक बुक आहे ज्याला नविन पुस्तकाचा वास येत नसेल पण नाती बनतात.
निकम आजी :- ते कोणतं आता ??
कैवल्य :- फेसबुक. आणि आम्ही आमच्या रोजच्या बिझी शेड्यूल्ड मधून पण आमच्या मित्रांशी व्हाटसआप आसो फेसबुक असो वा हाइकच्या माध्यमातून रोज बोलतो. काळ बदलाय मान्य पण माणूस तोच आहे आणि आता नविन पिढीच देशाला पुढे घेऊन जाईल. फक्त तुमचे आशीर्वाद रूपी धाक कायम पाठीशी असूदे. हा काहीजण याचा गैर वापर करतात पण बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है निकम आजी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद Abdul sir. दोन्ही भाग वेगवेगळ्या वेळी जर कोणी वाचत आसेल तर त्यांना बर पडेल म्हणून थोडा भाग पुन्हा रिपीट केलाय. पुन्हा एकदा दिलेल्या प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद

अरे व्वा! मस्तच लिहिलंय. वाचत असताना सर्व चित्र डोळ्यासमोर उभ राहिलं Happy
नात्यांची मजा ही ती हळूवार उलगडण्यात आहे>> MPM Happy