स्त्री-पुरुषांमध्ये टीव्ही जास्त कोण बघते?

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 13 January, 2017 - 04:32

द्या ऊत्तर ..

लावा अंदाज ..

मी सांगू ...

९० टक्के लोकांचे उत्तर,

बायकाच टीव्ही जास्त बघतात हेच असणार.

पण हे साफ चूक आहे.

हे मी नाही बोलत. तर तसे अधिकृत सर्वेक्षणातून पुढे आले आहे. बायकांपेक्षा पुरुषच बघतात जास्त वेळ टिव्ही.
आणि हे सर्वेक्षण बार्क म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ईंडियाने केले आहे. म्हणजे शंका घ्यायला वावच नाही.

http://maharashtratimes.indiatimes.com/tv/male-watches-tv-more/articlesh...

तसेच टिव्ही बघताना बायका हातात काहीतरी काम घेऊन बसतात किंवा एक नजर कूकरच्या शिट्टीवर असते. नाहीतर किचनमध्येच काम करता करता अधूनमधूनच टीव्ही बघितला जातो. असे मुद्दे जर यात लक्षात घेतले गेले, तर ईडियट बॉक्स समोर निवांत ठाण मांडून बसणार्‍यांमध्ये पुरुषांचा वेळ महिलांपेक्षा आणखी जास्त भरावा.

ही वाचनात आलेली बातमी फक्त एवढ्यासाठीच शेअर करावीशी वाटली, की आपल्याला असेच वाटते, (अगदी मलाही आजवर असेच वाटत होते), की टिव्हीचे वेड बायकांमध्येच जास्त असते. प्रत्यक्ष सत्य मात्र वेगळे आहे ..

हा धागा पुरुषांना चिडवायला काढलेला नाहीये. तर फक्त स्त्रियांना हे सत्य माहीत असलेले बरे या भावनेतून काढला आहे.
तर मैत्रीणींनो, यापुढे जर तुमच्या घरातील पुरुष मंडळी तुमच्या मालिकांना कात्री लावायला आले, तर त्यांना ही बातमी जरूर दाखवा Happy
आणि तुमच्या घरची परिस्थिती यापेक्षा वेगळी असेल तर जरूर सांगा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यिप्पी..... माझे साबुच जास्त बघतात टिव्ही. झी आणी कलर्सचा झिम्मा आलटुन पालटुन असतो. बातम्या आणी क्रिकेटची मधून मधून खिरापत असते.

मी कश्याला विश्रांती घेतोय. मायबोली दोन दिवस बंद होईल तीच माझी विश्रांती.

@ धागा, या फोरजी फाईव्हजी सुपरफास्ट जिओ लिओ ईंटरनेट कॉप्म्युटरच्या जमान्यात टिव्ही फक्त जुनी माणसेच बघतात ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नसतो. ज्यांना कॉम्प्युटर फारसा वापरता येत नाही.,

माझी बायको टीव्ही बघते मी प्रोग्रॅम्स बघतो. म्हणजे मी अधून मधून न्यूज, फुटबॉल असे प्रोग्रॅम्स बघतो, बायको सर्व वेळ टीव्ही ऑन ठेवून जे समोर चालले असेल ते "बघत " बसते. काय वाट्टेल ते!

आता जवळ्जवळ दोन वर्षानंतर सुद्धा सर्वेक्षणाचा निर्णय तोच आहे का? (लिंक ऊघडत नाहीये)
क्रिकेट/स्पोर्ट्स्/न्यूज चॅनेलचेच सर्वेक्षण केले असेल तर रिझल्ट बायस्ड असणार.

क्रिकेट/स्पोर्ट्स्/न्यूज चॅनेलचेच सर्वेक्षण केले असेल तर रिझल्ट बायस्ड असणार.
>>>>

मला वाटते टीव्ही म्हणजे टीव्ही.. मग त्यावर काहीही बघा.

पण एक आहे. भारतातल्या पुरुषांना क्रिकेटची आवड असते. एक वनडे मॅच पाहिली की आठ तास बिलेबल. हल्ली त्यात पुढे मागे एकेक तास मॅच एनालिसीस सुद्धा असते. झाले दहा तास. त्यात ईंडिया जिंकली की हायलाईटस बघणे आले. टोटल अकरा तास. तेच कसोटी असेल तर पाच दिवस हेच. आयपीएल सुरू झाली की दोन महिने हेच.
क्रिकेटपाठोपाठ राजकारणाचे वेड.. टीव्हीवरच्या चर्चा आणि बातम्या.. २०१४ ला मोदी आल्यापासून नागरीकशास्त्रात कॉपी करून पास होणारयांचाही राजकारणातला ईंटरेस्ट वाढला आहे. आणि क्रिकेटसारखेच राजकारणाची आवडही पुरुषांनाच जास्त.
थोडक्यात हा निष्कर्श काढायला कुठल्याही सर्व्हेची गरज नव्हती. फुकट खर्चा केलाय. रिकामटेकड्या लोकांनी..

त्यापेक्षा कोण काय क्वालिटीचे बघते यावर सर्व्हे घ्यायला हवा होता.

काही कार्यक्रम नसेल तर गाणी बघत बसतो..
>>>>
मलाही मोबाईल लॅपटॉपपेक्षा टीव्हीवर गाणी बघायला आवडतात. मोबाईलवर आपण पुन्हा पुन्हा वेड्यासारखी तीच तीच बघत बसतो. टीव्हीवर रॅन्डम वेगवेगळी बघितली जातात आणि कित्येक विस्मरणात गेलेली छान छान गाणी बघितली जातात जी आपण स्वताहून मुद्दामून कधी बघितलीही नसती.

आपापल्या घरी स्त्रिया आणि पुरुष दिवसातून सरासरी किती तास / मीनीट टीव्ही बघतात ते लिहा. (कटप्पा मोड वाटला ना! त्यांचा एक धागा वाचवला.)

आमच्या घरी
स्त्रिया: ६ तास
पुरुष (मी वगळून): ६ तास
(मी धरून): ३.५ तास

(जर घरात एखादीच व्यक्ती इतरांच्या तुलनेत खूप कमी किंवा खूपच जास्त टीव्ही बघत असेल तर तिला वगळून आणि धरून अशा दोन्ही सरासरी लिहा.)

मी आज सकाळपासूमच टीव्हीला चिकटलोय.
आताच कोहलीने हेझलवूडला एकाच ओवरला तीन कडकनाथ चौकार मारले.