कुत्र्याला छानसे "मराठी" नाव सुचवा.

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 12 January, 2017 - 10:41

दादाच्या फर्माईशीनुसार कुत्रा घरी आणायचे ठरवले आहे. पूर्वतयारी झाली आहे. म्हणजेच घरच्या सर्वांची मनाची तयारी झाली आहे. कारण आमच्याकडे पर्यायच नाही. आईबाबांनी दादाकडून एक वचन घेतले आहे. सून आम्ही आमच्या पसंतीची आनणार. बाकी तू कोणालाही घरी घेऊन ये. म्हणून दादाचे मित्रमैत्रीणी अधूनमधून आमच्या घरी येत जात राहतात. पण बहुधा आता त्याचे कुठेतरी जुळले असावे. म्हणून घरच्यांनी वैतागून स्वत:च्या पसंतीची सून ही अट मागे घ्यावी यासाठी त्याने घरच्यांना त्रास द्यायला कुत्रा घरी आणायचे ठरवले आहे. मुक्या प्राण्यांचा वापर लोक कसे करतील सांगता येत नाही. तरी खाण्यासाठी करण्यापेक्षा हे केव्हाही चांगलेच.

तर आता रस्त्यावर कुत्रा दिसला तर फूटपाथ बदलून चालणारी, आणि दोन कुत्रे दिसल्यावर आल्या पावली परत फिरणारी आमच्या घरची साधीभोळी माणसं. त्यांनीही बहुधा दादासाठी कुठेतरी मुलगी शोधून ठेवली असावी. कारण ते दादाचा हा प्लान हाणून पाडायाच्या पुर्ण तयारीत आहेत. घरी एखादे नवीन बाळ, वा गेला बाजार आयुष्यातील पहिली कार घ्यावी तश्या उत्साहात हल्ली रोज कुत्र्याच्या आगमनाची चर्चा चालते. ती एक मजेशीर असते. पुन्हा कधीतरी सांगते. पण परवा मात्र येणार्‍या कुत्र्याला / कुत्रीला नाव काय ठेवायचे याची चर्चा चालू होती. हो, कुत्रा की कुत्री अजून ठरलेले नाही. ते तितकेसे महत्वाचेही नाही. आमच्यासाठी दोन्ही सारखेच. तर त्याचे नाव काय ठेवायचे याचा विचार करता नेहमीची आपली टॉम-टॉमी-टायगर, निकी-मिकी-सूझी, जिमी-जॉनी-जेनी ईत्यादी भारतात प्रचलित असलेली ईंग्रजी नावे एकेकाच्या तोंडावर आली. ते ऐकून आमची आज्जी पटकन म्हणाली, मेल्यांनो ईंग्रजी नाव काय ठेवता रे. मराठी नाव ठेवा एखादे. आपल्या बाळांना आपण अशी ईंग्रजी नावे ठेवतो का? मग कुत्र्यांना तरी का ते इंग्रजी नाव ठेवायचे?

पॉंईंट आहे आज्जी. आम्ही एकसूरात म्हणालो आणि मराठी नावे शोधायला लागलो.
बाबा म्हणाले, मोती ?
आम्ही म्हणालो - श्या, तो तर साबण असतो.
आई म्हणाली - टिपू ?
आम्ही म्हणालो - नाह, त्यापेक्षा सुलतान नाव चांगलेय.
आजोबा म्हणाले - शेरू ?
ओये शेरू पाजी, कि गलं करतंया. मराठी नावं सुचवा ... हे आज्जी म्हणाली, आणि आमची गाडी ईथेच अडकली.
तर बघा, जरा धक्का द्या. आमच्याकडे येणार्‍या छानश्या गोंडस कुत्र्याच्या पिल्लाला तितकेच गोडुले मराठी नाव सुचवा.

पत्रिका त्याची बनवायचा विचार नाहीये. त्यामुळे अक्षर कुठलेही चालायला हरकत नाही.
तेवढे पुढे आडनाव सरकार शोभेल असे बघा Happy

अ‍ॅडवान्समध्ये धन्यवाद म्हणते,
अर्चना सरकार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

-- आमच्या गल्लीत एक कुत्र होत..त्याला आम्ही "मोती" हे नाव ठेवल होत ...
त्याचा रंग ऑफ व्हाइट मोत्या सारखा होता म्हणुन...

त्याच्या जोडिदार म्हणुन कॉलनीतल्या काकान एक कुत्र आनलेल.. त्याच नाव "ठिपक्या" ठेवलेल..
ते कुत्र खुप व्हाइट होत व त्यावर काळे ठिपके होते, म्हणुन "ठिपक्या"...
खुप नंतर.. मोठे झाल्यवर कळल तो "ठिपक्या" हा Dalmatian / डल्मेशीयन होता... Lol

- मोती
- ठिपक्या

आमच्याकडे भारतीय प्रजातीची कारवानी कुत्री होती तिचे नाव हरिणी होते. तिच्यावर मी पूर्वी एक लेखसुद्धा लिहिला होता.

कोणत्या जातीचे आणि कुत्रा की कुत्री ते कळले तर नाव सुचवता येईल

आपला कुत्रा छानच असणार, पण मोती खूप कॉमन नाव आहे दादा.
आम्ही काहीसे हटके विचार करतोय, पण ते एखाद्या कुत्र्याला शोभेल असेही हवे. नाहीतर मुलांची नावे शोधली तर हजारो मिळतील.

-- आमच्या गल्लीत एक कुत्र होत..त्याला आम्ही "मोती" हे नाव ठेवल होत ...
त्याचा रंग ऑफ व्हाइट मोत्या सारखा होता म्हणुन...

त्याच्या जोडिदार म्हणुन कॉलनीतल्या काकान एक कुत्र आनलेल.. त्याच नाव "ठिपक्या" ठेवलेल..
ते कुत्र खुप व्हाइट होत व त्यावर काळे ठिपके होते, म्हणुन "ठिपक्या"...
खुप नंतर.. आम्ही मोठे झाल्यवर कळल तो "ठिपक्या" हा Dalmatian / डल्मेशीयन होता... Lol

- मोती
- ठिपक्या

तुमच कुत्र कोणत आहे?

हरिणी सुंदर नाव आहे सुमुक्ता

कुत्रा कोणत्या जातीचा हे ठरायचेय अजून. ते दादाच्या अखत्यारीत आहे. त्याचा विचार चालूय.
फक्त आमच्या घरच्या रेसिस्ट मंडळींनी त्याला काळ्या रंगाचा नको आणूस म्हणून सांगितलेय.

सारमेय >> है शाब्बास. महाभारतकालीन श्वानाचे नाव वाटतेय. पण आवडले. इंटरेस्टींग आहे

फक्त आमच्या घरच्या रेसिस्ट मंडळींनी त्याला काळ्या रंगाचा नको आणूस म्हणून सांगितलेय. >>> आमची हरिणी काळी होती. खूप जोरात धावणार्‍या जातीची म्हणून हरिणी.

http://www.maayboli.com/node/50791

भूभू Happy
आमच्या शेजारच्या घरात एक गोडुलं पिल्लू आहे. रात्री बाहेर कुत्र्यांचे आवाज सुरू झाले की तो मम्मीला बोलतो, मम्मा भौ भौ आले .. हे त्याच्या आवाजातच ऐकण्यात मजा Happy

>>कोणत्या जातीचे आणि कुत्रा की कुत्री ते कळले तर नाव सुचवता येईल<<

बरोबर, नाहितर आम्हि सुचवु 'वाघ्या' आणि तुमचा दादा आणायचा डाक्शुंड किंवा चिवावा... Happy

धृष्टद्युम्न, किंवा धृतराष्ट्र असे ठेवा. म्हणजे कसं अगदी पौराणिक, अस्सल भारतीय नाव होईल!

Happy

राज | 12 January, 2017 - 21:26 नवीन
>>कोणत्या जातीचे आणि कुत्रा की कुत्री ते कळले तर नाव सुचवता येईल<<
बरोबर, नाहितर आम्हि सुचवु 'वाघ्या' आणि तुमचा दादा आणायचा डाक्शुंड किंवा चिवावा...

>>>>>

Lol
Lol

हो..कुत्र कोणता आहे..त्याचा आकार, रंग ह्यावरुन पण खुप नाव सुचवता येतात...!!!

कुत्रा कोणत्या जातीचा हे ठरायचेय अजून. ते दादाच्या अखत्यारीत आहे. त्याचा विचार चालूय.>>> तुम्ही ऋ दादाला विचारुन बघा त्याच्याकडे बरीच नावे असतील. Lol

काही नावं मी पण सुचवतो Proud
पांडु
सख्या
चिंट्या
पप्या

माझ्याकडे डॉबरमॅन होता. त्याच नाव आम्ही ठेवल होत 'शेरा' Happy
आमच्या शेजारी सुद्धा एक कुत्रा होता त्याला ते 'बच्चु' म्हणायचे.. (नाही नाही...हे कुत्र दुनियादारी चित्रपटाच्या आधीच देवाघरी गेलं...त्याचा आणि स्वजोचा काहीएक संबंध नाही... आमच्या शेजारचा बच्चु स्लिम ट्रिम, रोज व्यायाम करणारा, फिट अँड फाईन आत्मा होता Happy ).

लहानपणी आमच्या खालच्या दोन शेजारी मुलं होती, प्रचंड arrogant आणि इंग्लिश मिडीयमची, आम्हांला ती अजिबात आवडायची नाहीत. आम्ही दोघीनी एक स्वप्न बघितलं होत; एक कुत्रं पाळू मी त्याला बंटी बोलावणार, बहीण त्याला बॉबी बोलावणार. ती मुलं आमच्या कडे यायला जिना चढायला लागली आम्ही दोघी बंटी / बॉबी छू असं करणार. मुलांना कळणारच नाही आम्ही नक्की कोणाला छू करतोय ते. आईनी as usual आमचा प्लान हाणून पाडला. कुत्रं-बित्र काही पाळायचं नाही फर्मान काढून Sad

बंटी नाहीतर बॉबी नावं ठेवा आवडलं तर Happy

देवाच< नाव ठेवा - विठू, खंड्या, किंवा रखमा , कृष्णी वगैरे. येता जाता नामस्मरणाचे पुण्य लागेलच. शिवाय शेजारपाजारचे , आले गेलेले लोक शिव्या घालणार नाहीत.

आडनावाला जुळतं पाहिजे असेल तर बादल, ब्रिटिश

Pages