वेब डेव्हलोपमेंट आणि डिझायनिंग शिकणे

Submitted by वृंदा on 9 January, 2017 - 15:46

खूप वर्ष झाली मला वेब डेव्हलोपमेंट आणि डिझायनिंग शिकायचंय .
तसं बेसिक HTML येतंय. पण मला वेब डेव्हलोपमेंट मधील सुरुवाती पासून शेवटपर्यंत शिकायचंय .
specially VB Script , Java Script , PHP शिकयचंय .
php ह्यासाठी की ते open source आणि free (?) आहे . अजून कुठल्या lagnguage येणे गरजेचे आहे ?

माझं खूप वर्षाचे स्वप्न आहे वेब डेव्हलपमेंट आणि designing मध्ये व्यवसाय करायचा पण ह्या स्वप्नासाठी मी काहीच प्रयत्न करत नव्हते ते आता करतेय .
अजून बऱ्याच आयडिया आहेत वेब डेव्हलोपमेंट उपयोगाबद्दल ज्याचा सगळ्यांना फायदा होईन .. बघू कसं जमतंय

कोणी मला घरीच शिकण्यासाठी books , website , PDF files , online material suggest कराल का ??
कोणी अनुभवी वेब डेव्हलपर आहे का ?? काही मदत मिळेल ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी देखिल हेच शिकायला गेली काहि वर्षे धडपडतोय, पण हार्डवेअर्/सॉफ्टवेअर चे बेसिक सोर्सेसच उपलब्ध न झाल्याने स्वप्नच राहिले Sad

http://www.w3schools.com/html/
ही माझी ऑलटाईम फेवरिट साईट आहे.
बाकीच्या पाहिल्या पाहिजेत.
खरेतर मला असे एक टूल हवे आहे,
की ज्यामधे ड्रॅग ड्रॉप करून वेब डिझाईन करता येईल,
आणि वेब पेजेस मधला फ्लो, तसेच साईड बार, मेनू, हवे तसे बदलता येतील,
मध्यंतरी मी बरीच डोकेफोड केली होती PHP आणि एक सर्वर होता त्यावर,
पण ते फारच वेळखाऊ किचकट काम वाटले.

मुद्दे खालील प्रमाने

१. तुम्हाला नेमक काय करायच आहे ? म्हणजे व्यवसाय , नोकरी की छंद ...त्य प्रमाणे उत्तर बदलत जात ...
२. "वेब डेव्हलोपमेंट आणि डिझायनिंग" हा असा आयसोलेटेड प्रकार नसतो (ज्या मध्ये HTML, JavaScript इ.) तो अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंटचा एक भाग असतो आणि मुख्यता ऐन्ड युजर आणि अ‍ॅप्लिकेशन युजेबिलीटी मध्ये मोडतो... उ.दा. "कार शोरुम" जिथे आपण जाउन कार खरेदी करतो.. पण "कार शोरुम" हे सगळ नव्हे त्या मागे.. कार च. डिझाइन, प्रोटोटाइप, टेस्टीन्ग, प्रोडक्श्न, फिचर्स इ. प्रोसेसेस मधुन जाते व "कार शोरुम" मध्ये उपलब्द होते.. "कार शोरुम" हा ऐन्ड युजर च्या पर्चेस एक्स्पिरीयन्स चा भाग होतो..
तसच अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये खुप सारे घटक आहे त्या मध्ये ""वेब डेव्हलोपमेंट आणि डिझायनिंग" ने जे तयार होत ते ऐन्ड युजर च्या एक्स्पिरीयन्स चा भाग होतो..

३. ओपन सोर्स आणि फ्री आहे म्ह्नुन नका कोणती technology निवडु नका..जवळपास सगळ्या technology आणि फ्रेमवर्क्स हे फ्री आहेत..आणि ओपन सोर्स म्हनाल तर वेब डेवलपरला त्याची केव्हा गरज पडते अस वाटत नाही... शेवटी कोणतीही technology जेव्हा कमर्शीयल होस्टींग वर येते तेव्हा पैसे लागतातच ...

आजुन लिहतो पुढच..

धन्यवाद morpankhis ..
मला व्यवसाय करायचाय ..नोकरीची पण ईच्छा आहे पण आता वय नाही त्यामुळे व्यवसायच आणि मी सिरिअसली विचार करतीये
सध्या तर झिरो पासून सुरुवात करायचीय . php मध्ये इंटरेस्ट आहे .

ideas तर डोक्यात भरपूर आहेत फक्त दिशा आणि प्रत्यक्षात येत नाही

काही मार्गदर्शन मिळाले तर खूप बरं होइल

ओ के.. व्यवसाय करायचा आहे तर .. कस मॉडेल असनार आहे ?

- फ्रि लान्स डेव्हलपमेंट - या मध्ये तुम्ही / तुमच्या सर्व्हिस मार्केट मध्ये अव्हेलेबल असतात.. व छोट्या कंपन्या त्याना एखादी नविन वेबसाईट बनवुन हवी आहे तेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात.. ( त्याना मोठ्या सॉफ्ट्वेअर कंपन्याचे रेट परवडत नसतात वा मोठ्या सॉफ्ट्वेअर कंपन्या लहान वेबसाईट प्रोजेक्ट नाही घेत)... किंवा एखाद नविन फिचर त्याना बनवलेली वेबसाईट मध्ये अ‍ॅड करायच असेल वा त्या मधे काही बदल करायचे असतात जे लुक, कॉस्मॅटीक स्वरुपाचे असतात तेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात.

- प्रोडक्ट डेव्हलपमेंट - या मध्ये तुम्हि तुमचे स्व:त चे वेब प्रोडक्ट बनवता व ते विकायला ठेवता उ.दा. शाळेची
विद्यार्थी गुणवत्ता मॉनिटरींग सिस्टीम, स्मॉल फर्म साठी प्रोडक्ट डिस्ल्पे (सेल्स नाही) वेब साईट इ..इ..

- सॉफ्ट्वेअर सर्वीस - या मध्ये तुम्ही स्वःता वेबसाईट बनवता.. ती होस्ट करता..त्यची देखभाल दुरुस्ती हि जबाबदरी तुमची असते व ति तुम्ही भाड्यने वापरायला देत ( वार्षिक वा मासिक तत्वावर) ज्या फर्मना स्वःता वेबसाइट होस्ट वा देखभाल जमत नाही त्याना तुम्ही हि सर्विस विकता...

तुमच कोणत मॉडेल असनार आहे ? त्या नंतर ठरवा कोणती टेक्नोलॉजी घ्यायची

काही उ.दा.
डाटाबेस... : MySQL, Ms-SQL, PostgreSQL etc.
वेब सर्वर ओ.एस: Windows or Unix/Linux based.
वेब सर्वर : IIS, Apache, or Something else.
फ्रेमवर्क / भाषा : .NET/ASP, PHP, Java/JSP
वेब भाषा : HTML, JavaScript
वेब फ्रेमवर्क : JavaScript based - Angular, Ember, jQuery, Knockout etc.

वृंदा.

तुमचे सर्व प्रतिसाद वाचले. मला जे कळले ते असे मांडतो.(मलाही बेसिक एचटीएमएल येते व स्वतंत्र डिझाईन करुन मी बेसिक वेबसाईट डेवलप करु शकतो. एचटीएमएल टेम्प्लेट साईट्मधे मनासारखे बदल करण्याइतपत मला कोडिंग चे ज्ञान आहे. त्यापुढे पीएचपी, वगैरे बिगटिकिट्स कामे मी प्रोफेशनल्स कडे सोपवतो. तसेही मुळात माझ्या कामाचा भाग कोडींग डेवलपमेंट नाही, ते मी आउट्सोर्स करतो.)

तुम्हाला इच्छा आहे वेब डेवलपमेंट व डिझाइन शिकायची. ही आवड आहे की व्यवसायाची गरज आहे की थोडे पैसे हातात येतील म्हणून आवडीला व्यवसायात बदलण्याकडे कल आहे? हे आधी स्पष्ट व्हावे.

१. तुम्हाला खुप वर्षांपासून वेब डेव व डि शिकायची इच्छा
२. तुम्हाला वेब डे व डि मधे व्यवसाय करायची इच्छा
३. तुम्हाला तुमच्यकडच्या काही नाविन्यपूर्ण आयडियाज वेब डे व डि द्वारे उपयोगात आणायच्यात.

केवळ पहिला पॉइन्ट प्रायोरिटी असेल तर तेवढं आधी शिका. शिकण्याची इच्छा पूर्ण करा. व्यवसायाचा विचार तूर्तास बाजूला ठेवा.शिकण्याची उर्मी+व्यवसायाची इच्छा+नवीन कल्पना ही माझ्यामते तीन वेगवेगळ्या दिशांकडे खेचल्या जाणारी गाडी आहे.

दुसरा व तिसरा पॉइण्ट प्रायोरिटी असेल तर आधी व्यवसाय मिळवण्याचा प्रयत्न करा. तो मिळालेला व्यवसाय एखाद्या फ्रीलान्सर वेब डीझायनर-डेवलपरकडून करुन घ्या. क्लायंट मिळवणे+त्याच्या गरजेला समजून घेणे व ते काम वेबडीडे कडून करवून घेणे हे व्यवसायाचे भाग आहेत. जो मी सध्या करत आहे. व्यवसाय मुख्य वाटत असेल तर व्यवसाय मिळवणे व प्रोसेस करुन घेणे ह्याकडे लक्ष द्यावे, वेब्डी व डे शिकायची तशीच काही गरज नाही.

तुमच्या नाविन्यपूर्ण आयडिया हे एक विशेष लक्ष वेधून घेणारी बाब वाटली. नेमकं काय तुमच्या मनात आहे व ते वेबच्या माध्यमांतून कसं येईल, लोकांच्या व्यवसायाला कसा उपयोग होईल हे सांगितलं तर सल्ला देता येईल. आयडिया सांगायची नसेल तर काही हरकत नाही. पण आयडिया प्रायोरिटी असेल तर प्रोफेशनल वेबडेवल्पर हाताशी घेऊन थेट आयडियावर काम सुरु करावे व त्या क्लायंटला प्रपोज कराव्या. इथे तुमच्या आयडिया ह्या केंद्रस्थानी आहेत त्यामुळे वेबडिझाइन शिकण्यावर वेळ व एनर्जी घालवू नये.

तुम्हाला प्रोफेशनल डेवलपर व्हायला किमान दोन वर्षे तरी लागतील. किमान एक वर्ष इन्डस्ट्रीत काम करण्याचा अनुभव घ्यावा लागेल, लाइव प्रोजेक्टवर काम करावं लागेल, त्यानंतरच स्वतंत्र व्यवसाय करणे योग्य राहिल. अन्यथा सगळं अर्धवट राहून काहीच न मिळवता आल्याचं शल्य हाती येईल.

मी अजिबात डिस्करेज करत नाहीये तर तुमच्या लिखाणावरुन मला जाणवलेलं ते बोलतोय. तुमचं एक असं निश्चित ध्येय दिसलं नाही. वाईट वाटल्यास मनापासून सॉरी. पण ह्या क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून आहे. अनुभवाचे बोल म्हणून समजून घ्या.

धन्यवाद नानकळाजी ..

प्रथम मला पहिल्यापासून मनापासून शिकायचंय ..अर्थात जर अगोदर स्वप्न होते तर अगोदरचका नाही शिकले असं कोणी म्हणू शकतं ..
आता मागचा विचार आणि जर तर म्हणून उपयोग नाही. मागचे मागे आणि पुढचे पुढे !! तसंही ही गौतम बुद्ध ने म्हटलंय की तुमचा भूतकाळ कसाही असू दे नवीन सुरुवात आपण कधीही करू शकतो ..आणि त्याचे ज्वलंत उदाहरण ते स्वतःच आहेत ! Happy

मुळात मला आवड आणि समाधान ह्यासाठी शिकयचंय पुढे कामे किंवा पॆसे मिळणे व्यवसाच्यादृष्टीकोनातून हा तसा खूप पुढचा विचार आहे .

थोडे विषयांतर होतेय पण मला बोलल्याशिवाय राहवत नाही म्हणून बोलतेय ..
तुम्ही मला तुमचे निश्चित ध्येय नाही हे बोलणे आवडले नाही .. मला कोणी वैयक्तिक बोललेले नाही आवडत मी पण स्वतः शक्यतो दुसर्यांना बोलणे टाळते जरी इच्छा असली तरी ! फक्त कोणी माझ्यावर हल्ला केला तर मग मी प्रतिहल्ला छोटा का होईना पण करतेच. कारण आपण इथे आपले मत मांडायला आलो आहोत आपण कसे आहोत हे मत मांडायला नाही . त्यामुळे असं कोणी बोललं तर बाकीचे नसतील पण मी तरी दुखावते , अजिबात आवडत नाही आणि कोणीतरी प्रोत्साहन देण्यापेक्षा खच्चीकरण केल्यासारखे वाटते. आता हेच बघा ना तुम्ही मांडलेले सगळेच मुद्दे पटले . चित्र पण क्लिअर झाले, पण नेमके माझ्याबद्दल बोललेले जास्त लक्षात राहिले .

तसेही मला अनेक लोक भेटलीत ज्यांना निश्चित असे ध्येय नाही ..मग त्यांनी आनंदाने जगूच नये का ?? कि त्यांनी लवकर मरून जावे ??
कारण अशा भरकटलेल्या लोकांनां जगण्याचा अधिकार नाही !!!! Happy

वृंदा | 10 January, 2017 - 02:16
पण मला वेब डेव्हलोपमेंट मधील सुरुवाती पासून शेवटपर्यंत शिकायचंय .

>>>>>>>>>>

तुमचा हा अ‍ॅटिट्युड आवडला... ये हुई ना बात.. चला तर करु सुरवात..
प्रथम तुम्ही technology stack समजावुन घ्या..

तुम्ही PHP हे सांगीतलय खर पण फक्त टेक्नोलोजीचा परत एकदा फेर विचार करा... कारण एकदा त्यात घुसल की मग ते आपण सहजा सहजी बदलत नाही.. खुप ग्रुप/स्टॅक आहेत..तुम्ही सांगितलेला ग्रुप म्हणजे LAMP.
या ग्रुप मधील सर्व पार्ट्स ची माहीती नीट हवी...स्टॅकची निवड करताना त्याला असलेली मागणी, त्याला उपलब्द सपोर्ट , डेव्हलपमेंट आणि दुरुस्तीची सुलभता याचा विचार करा...

- LAMP (Linux/Apache/MySql/PHP) its also called technology stack..
- Microsoft ( Windows/IIS/SqlServer/.NET)
- J2EE/Java/JSP etc

स्टॅक निवडा मग पुढच सांगता येईल...

आणि किती येईल / जमेल याचा नका विचार करु.. किती समजेल हे लक्षात ठेवा. एकदा बेसीक कन्सेप्ट क्लीअर झाले..मग काहीच प्रोब्लेम नाही येत पुढे..

प्राजक्ता | 11 January, 2017 - 05:15
मला नोकरी मिळवताना अ‍ॅडिशनल स्किलसेट म्हणुन याकडे बघायचे आहे , आणी जमल आवडल तर कन्टिन्यु करायचय >>>>

नक्किच ... बर तुम्ही जॉब साठी मुख्य प्रोफाइल म्हणुन काय निवडताय, ज्याला वेब डेव्हलोपमेंट आणि डिझायनिंग हे अ‍ॅडिशनल स्किलसेट म्हणुन लावनार आहत..त्या प्रमाणे सुचवता येइल..

मी फेबु वर hunarr नावाच एक पेज बघितलं होतं...त्यात बहुतेक courses etc ची info detail मध्ये आहे... अजून info साठी त्यांनी नंबर दिला आहे त्यावर बघा विचारुन 088282 00040

वृंदा,

आपल्याला खटकेल हे मला वाटले म्हणून मी आधीच माफी मागून घेतली. परत एकदा सॉरी. तुम्हाला दुखावण्याचा किंवा खच्चीकरण करण्याचा कोणताही हेतू असण्याचे मला काही कारण नाही.

पण कृपया मी बोललेलं वैयक्तिक घेऊ नका. इथे जेवढं लिहिलं जातं त्या तुटपुंज्या माहितीवर आधारित प्रतिसाद दिले जातात व ते सार्वत्रिक, तुमच्यासारख्याच आणखी काही लोकांचे प्रातिनिधिक प्रश्न म्हणून दिले जातात. ते तुमच्या विषयावर-धाग्यावर असले तरी तुमच्यावर वैयक्तिक रोख ठेवून दिलेले नसतात. तुमचं खच्चीकरण करुन मला काय फायदा? उलट तुम्ही चांगलं शिकलात तर माझ्यासाठी हक्काचा एक मायबोलीकर वेबडेवलपर मिळेल मला. हो की नाही? Happy

करिअर मार्गदर्शनाची ती पद्धत मला आवडते ज्यात व्यक्तिच्या स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, ध्येय, आवडी व मनोवस्था ह्या गोष्टी ध्यानात घेऊन त्याला मार्गदर्शन करणे. त्यापद्धतीत एखाद्या क्षेत्रातली त्या व्यक्तीला गरज असणारी नेमकी सुसंगत माहिती व्यवस्थित पोचवली की भागते. एखाद्या क्षेत्राचा फाफट पसारा मांडून ह्यातून काय ते निवड म्हटले की व्यक्ती गोंधळून जायची शक्यता असते. कारण मार्गदर्शकाला जरी त्या क्षेत्राची चांगली माहिती अनुभवातून असेल पण नवीन माणसाला काय चांगले ते माहित नसते, काळ घालवल्यावर मला डेवलपमेंट नाही डिझाइनमधे, कन्स्पेप्चुलायझेशनमधे जास्त आवड होती, किंवा कोडींग आता अजून किती शिकत बसायचे अशीही मनाची अवस्था होऊ शकते.

व्यक्तीचा अ‍ॅप्टीट्यूड व डेडीकेशन बघून स्पेसिफिक मार्गदर्शन हे मोलाचे. बाकी कोणत्याही क्षेत्राबद्दल भारंभार माहिती तर जालावर गुगलूनही मिळते. हे फक्त तुमच्यासाठी नाही तर विषय मांडलाय म्हणून सर्व वाचकांना सांगावेसे वाटले म्हणून लिहिले आहे. गैरसमज नसावा. धन्यवाद!

- आपला एक भावी क्लायंट,

मला LAMP (Linux/Apache/MySql/PHP) बद्दल इन्टरेस्ट आहे.

त्या संदर्भातील योग्य पुस्तक सुचवलं का ?

हे सर्व रोचक वाटतय.
मलाही हे सर्व म्हणजे कोडिंग आवडतं. आता सर्वात प्रथम एक सामान्य मनुष्य लगेच काय शिकू शकतो आणि ते वापरू शकतो हे पाहिलं तर HTML आणि CSS. ते वेबसाइट्सवरती उपलब्ध तर आहेतच त्याचबरोबर त्याचा इथे संस्थळांवर लिखाणात वापरून पाहाता येते. हे युजरसाइडचं कोडिंग आहे. वेबसाइटचं कोडिंगसाठी जावास्क्रिप्ट आहे हे कळलं. त्याचे काही रेडिमेड कोडसुद्धा अॅप्सवर उपलब्ध आहेत परंतू हे चाचणी करण्यासाठी मार्ग नाही.
आपण जेव्हा निरनिराळ्या वेबसाइट्स पाहतो तेव्हा एक गोष्ट लगेच जाणवते ती म्हणजे त्याची रचना. नंतर वापरताना दुसरी अती महत्त्वाची बाब लक्षात येते की हँग होत नाही व एका भागातून दुसय्रा कोणत्याही भागात जाण्याचा मार्ग कायम ठेवलेला असतो. तर इथे वेबसाइटचा कोड लिहिणाय्राचे कौशल्य दिसून येते. चांगल्या सुबोध अॅप्समध्येही असेच असते.

वृंदा | 12 January, 2017 - 02:40
मला LAMP (Linux/Apache/MySql/PHP) बद्दल इन्टरेस्ट आहे.
त्या संदर्भातील योग्य पुस्तक सुचवलं का ? >>>>>

मला - Microsoft ( Windows/IIS/SqlServer/.NET) बद्दल माहीती आहे..

LAMP बद्दल कोणाला असल्यास त्यानी ती शेअर करावी...

प्राजक्ता | 11 January, 2017 - 07:41
क्युए टेस्टिन्ग!
>>>>

प्राजक्ता मग तुला जर क्युए ला स्प्लीमेंटरी करायच असेल तर तु SQL कर.. ते जास्त सुट होत..
तु SQL चा कोणताही एक फ्लेवर शिकुन घे..(PL-SQL or T-SQL).

असू दे technology डिफरेन्ट असली तरी path तर सारखा असणार ना ..
.net बद्दल माहिती पण आवडेन आणि कदाचित उपयोगी पण ठरेन.

वॄंदा, माफ करा जरा स्पष्ट बोलतेय. असं 'कोण्तीही टेक्नॉलॉजी चालेल' ह्या अ‍ॅटिट्युड ने शिकणं अवघड आहे. तुम्हाला नक्की काय करायचे आहे नक्की माहित नाहीये असे वाटत आहे. मला वाटते तुम्हाला बेसिक एचटीएमएल येत असेल तर त्यात अजुन शिका. एचटीएमेल५ मध्ये बर्याच नव्या कन्सेप्ट्स अ‍ॅड झाल्या आहेत त्या पूर्ण करा. एसक्युएल शिका. ह्या दोन गोष्टी पूर्ण झाल्यावर बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्या. डब्ल्यू३स्कूल्स ही वेबसाईट पाहिली तरी कळेल तिथे किती मटेरिअल आहे. करायचे म्हटले तर तिकडूनच भरपूर शिकता येईल. तुम्हाला शुभेच्छा!

बस्के +१
मी फ्रंट एंड वर काम करत नाही, म्हणून आधी लिहिलं न्हवतं. पण एकूणच टेक फिल्ड मध्ये शिकायचं म्हणून शिकून काही उपयोग नाही. programming कधी शिकला नसाल तर कुठलीही एक भाषा वापरून थोडे कन्सेप्ट तरी शिकाच. पायथॉन मे बी गुड स्टार्ट. डेटाबेस स्कीमा इ. वापरा.

सगळ्यात सोपं: एक प्रोजेक्ट घ्या आणि ते बेसिक लेव्हलला पूर्ण करा. मग त्यात आणखी फीचर्स वाढवत न्या.
ज्या फीचर्सचा उपयोग करायचाय ते शिका, याने आत्मविशवास यायचा असेल तर लवकर येईल किंवा ते जमत नाहीये असं होणार असेल तर ते ही लवकर कळेल. तसं होणार असेल तर जमत नाहीये शिक्का मारून मूव्ह ऑन चटकन होता येईल. थेअरी आणि भाषा शिकत बसलात तर कधी संपणार नाही आणि कामाचं करायला लागलात की अडयाला होईल.
एक भाषा आधी शिका म्हटलं कारण डेटा स्ट्रक्चर इ. ज्ञान असेल की कुठल्याही टेक मध्ये ते वापरता येईल.