कंटाळा

Submitted by जयदीप. on 8 January, 2017 - 08:06

किती येईल कंटाळा प्रवासाचा
दिसू लागेल जेव्हा अंत रस्त्याचा

°

तराफा कोणत्या तंद्रीत आहे हा
इरादा चांगला नाही प्रवाहाचा

°

कुणाला पाहिजे ही पारदर्शकता
बिलोरी आरसे आहेत की काचा

°

पुढे नाही तुला मिळणार विश्रांती
तुला वाटेल हा टप्पा महत्वाचा

°

दिपवले का तुझे डोळे उजेडाने
भरवसा राहिला नाही उजेडाचा

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users