मनातले काही !!!

Submitted by असुफ on 6 January, 2017 - 13:49

कदाचित या विषयावर चर्चा झाली असेल पण लिहावंसं वाटलं.

सतत कोणत्या तरी कारणाने आपण इतरांना दोष देतो, आपल्याला त्यांचे विचार, वागणं आवडत नाही, पटत नाही आणि हे दोन्ही बाजूने होत असतं
आणि मग विखारी भाषा, कृती इत्यादी माध्यमामधून आपण हे व्यक्त करत राहतो. वेगवेगळ्या वेळी प्रत्येक जण हे वागत असतो कमी जास्त प्रमाणात. मी सुद्धा.
बरेच वेळा मग कटुता निर्माण होते, एखाद्याला शाब्दिक त्रास देण्यापासून ते पार मारहाणीपर्यंत, या दोन टोकांमधील कोणत्या ही स्वरूपाच्या घटना घडतात.

कुठे तरी वाचलेलं आठवतंय, जगात दोन प्रकारची माणसं असतात,
विचार करणारी आणि विचार न करणारी
(विचार न करता येणारी, विचार करायची इच्छा नसलेली, विचार करता येतोय पण व्यक्त करता न येणारी, ज्यांना विचार करु दिला जात नाही अशी, आणि या श्रेणीतील इतर इत्यादी)
बाकी सगळं वागणं हे या दोन मूळ प्रवृतींचं आणि त्यामधील वेगवेगळ्या घटकांचं जाहीर प्रकटीकरण.

विचार बरोबर की चूक, एखाद्याला वाटतंय ते बरोबर की दुसऱ्याला वाटतंय ते बरोबर, हे कसं आणि कोण ठरवणार?
प्रत्येक विषयाला सर्वसाधारपणे दोन बाजू असतात, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आणि प्रसंगानुरूप कधी हे तर कधी ते बरोबर असं होऊ शकत.

ज्यावेळी विचार बाजूला पडतो, अनवधानाने म्हणा किंवा हल्ली बरेच वेळा जे पाहण्यात येतं त्याप्रमाणे, सोयीसाठी विचार बाजूला फेकला जातो, त्यावेळी प्रश्न गंभीर, कुटील होत जातात किंवा मुद्दामहून केले जातात.
निष्कर्ष इतकाच निघतो की अस्थिरता निर्माण होते. काही जणांना हेच बहुतेक हवं असतं.
जितक्या जास्त प्रमाणात प्रत्येक जण संयम आचरणात आणण्याचा प्रयत्न करेल, दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करेल, विचार करून वागण्याचा प्रयत्न करेल तितक्या प्रमाणात प्रश्न कमी निर्माण होतील, सुटतील ही कदाचित.
हे लिहिणं जितकं सोप्प आहे त्याहून सामुदायिक रित्या आचरणात आणणे फारच कठीण.

सध्याची एकूण परिस्थिती पाहून जे मनात आलं ते कागदावर उतरवण्याचा हा छोटासा प्रयत्न.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच छान विचार आहेत.
पण दुर्दैवाने ते प्रत्यक्षात फार प्रमाणावर दिसत नाहीत.
संतुलित विचार करणे एवढे सोपे नाही, पण एवढे अवघडही नाही.