दोन्हीचेही स्वागत आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 4 January, 2017 - 21:35

काय कुणाचे मागत आहे
मनासारखे वागत आहे

ओठांवरती ओठ टेकले
सवय नको ती लागत आहे

झोप येत नाही त्यालाही
चंद्र रात्रभर जागत आहे

गुणाकार केला दुख्खांचा
सौख्य सुखाने भागत आहे

येतो तर ये जातो तर जा
दोन्हीचेही स्वागत आहे

उपचाराविण सर्दी गेली
सुंठेवाचुन भागत आहे

मी माझी मी, तो त्याचा तो
कोण कुणाचे लागत आहे ?

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users