शब्दांचे घाव

Submitted by santosh bhosale on 18 December, 2016 - 03:24

पहीलीच कविता पोस्ट करत आहे चुकल्यास कळवावे
शब्दांचे घाव

माझे मन मला एकदा म्हणाले
चल शब्दांच्या गावी जाउ
कशी चिरली जातात हृदय शब्दाने
आपणही एकदा पाहुन येउ

मी मनाला समजावण्याचा प्रयत्न केला
नको रे बाबा शब्दांचे घाव तुला नि मलाही नाही सोसायचे
एखादा शब्द ऐकलास तर
टचकन डोळ्यात पाणी यायचे .

पण मन मात्र ऐकेना
ते हट्ट धरुन बसलं
शब्दांच्या गावी जाण्यासाठी
माझ्यावरती रुसलं

मग मात्र मला ऐकाव लागलं
मनाला माझ्या
शब्दांच्या गावी न्यावं लागलं

गावाच्या वेशीवरती
स्वागत मात्र हसुन झालं
मलाही आश्चर्य वाटलं अरेच्चा,
हे गाव इतकं कसं बदललं

मध्यरात्र झाली मला गाढ झोप लागली होती
चाहूल लागली कुणाचीतरी ......
उठून पहातो तर काय घाव घालण्यासाठी .
शब्दांची रांग लागली होती .

santoshbhosale998@gmail.com
8796467346

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम ! ! !
सर,तुमचा पहिला प्रयत्न असला तरी खूप छान लिहिली आहे कविता..
पुढील कविता लवकरात लवकर येवो.....