मी वृथा हे मौन माझे पाळले...

Submitted by सत्यजित... on 17 December, 2016 - 22:17

मी वृथा हे मौन माझे पाळले...
मी तुझ्या शब्दावरी रे भाळले!

हो,तुझी ती शीळ घुमते ना इथे...
पाखरांचे बघ थवे,आभाळले!

केवढी बिनधास्त होते मी तरी...
हाक येता मन्मनी ओशाळले!

मी अबोलीच्या फुलांची पाकळी...
मोगऱ्याच्या सोबती गंधाळले!

अमृताच्या ओंजळी तू शिंपिल्या...
अन् ॠतुंचे वागणे चेकाळले!

डायरीचे पान मी चाळू किती??
हाय!त्याने नाव लिहिणे,टाळले!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हृदयस्पर्शी .......
छान!!!
पुढील कवितेसाठी शुभेच्छा.........

मला बहुतेक शेरांच्या पहिल्या आणि दुसर्‍या ओळींतले संबंध कळले नाहीत. माझी समज कमी असेल.

पण "मी व्यथा हे मौन माझे पाळले" याही ओळीचा अर्थ कळत नाहीए. "मी वृथा हे मौन माझे पाळले" असं म्हणायचं आहे का? की व्यथा या शब्दाचा आणखी काही अर्थ आहे?

ण "मी व्यथा हे मौन माझे पाळले" याही ओळीचा अर्थ कळत नाहीए. "मी वृथा हे मौन माझे पाळले" असं म्हणायचं आहे का? की व्यथा या शब्दाचा आणखी काही अर्थ आहे?>>>>>हो, मयेकर मलाही तेच वाटले. पण स्पष्ट लिहील्याबद्द्ल धन्यवाद.
सत्यजीत, छान लिहीलय.

अरे हो की!टाईप करता करता ‘वृथा'ऐवजी ‘व्यथा' लिहिलंय मी!
दुरुस्ती करतो आहे!
मनापासून आभार भरतजी,रश्मीजी!