संत्रे पाक

Submitted by सायु on 14 December, 2016 - 07:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

संत्री = ३
साखर = दीड वाटी
जायफळ वेलचीची पुड
लिंबु = १/२

क्रमवार पाककृती: 

नागपूरला साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी, हा संत्राच्या खास मोसम असतो. या दरम्यान चांगली मधुर आणि रसा़ळ संत्री चाखायला मिळतात.. फ्रीज मधली थंड गार संत्री, नुसती सोलुन नाही तर मोसंबी सारखी चिरुन, आणि त्यावर तिखट, मिठ, चाट मसाला घालुन खाणे ..आ हा हा ! केवळ स्वर्ग सुखच...

आमच्या कडे शेकड्यानी संत्री येतात.. आणि संपतातही Happy
आणि हा संत्रे पाक दोन तीन दा तरी केलाच जातो..:)
तर वळु या कृती कडे....

संत्री निवडतानाच, पातळ सालाची घ्यावी, चवीला हमखास गोड असतात...

संत्री सोलुन फोडी वेगळ्या करुन घ्या.. सुरीने फोड उकलुन वरचं आणि पाठीकडचं आवरण, बिया वगैरे
काढुन, आतला गर सोडवुन घ्या.. त्याचे काप करुन घ्या..

एका जाड बुडाच्या पातेल्यात दीड वाटी साखर बुडेल ईतपत पाणी घाला आणि एकतारी पाक करुन घ्या. साधारण १५ ते २० मीनिटात होतो.. मग त्यात संत्राच्या सोललेल्या फोडींचे काप घाला आणि फक्त ५ ते ७ मी. मंद आचेवर उकळु द्या.. अर्धा लिंबाचा रस पीळा आणि गॉस बंद करा.. गार झाला की जायफळ विलायची ची पुड घाला.. आणि काचेच्या हवाबंद बरणीत भरुन ठेवा..
रंग आणि चव एकदम छान..

पुर्‍या,पराठे, ब्रेड कशा बरोबर ही खाउ शकता.. खुप छान लागतो..

संत्रे पाक गरम असताना...

आणि गार झाल्यावर.. ईतपत आळतो..

अधिक टिपा: 

लिंबाचा रस सगळ्यात शेवटी घालायचा आहे.. छान सुधारस सारखी चव येते..

माहितीचा स्रोत: 
माझी आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहेबच्या देशात 'ओ माय ग्वाड इंडियन मर्मलेड' म्हणून साहेब लोक्स मिटक्या मारत ओरपतील बहुदा हा आयटम,

झक्कास पाकृ

(संत्रे अन संत्रा सीझन आठवून हळवा झालेला) बाप्या

मस्तच. मी साधारण असाच पाक केला होता आणि चॉकलेट क्रिम्मधे मिक्स केला. आणि ते क्रिम केकवर लावले होते. भारी लागत होते. आता हा पाक पण करुन बघणार. भारी रेसिपि.

मी पण करून पाहणार....मुलांन्नाही आवडेल हा प्रकार अस दिसतय

कावेरि, सोन्याबापू,जाई, हेमा ताई,देवकी, यो, विद्या, अन्जु रिया,चनस सृष्टी, करुडी, रावी, सनम्,आरती, नरेश सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन खुप छान वाटले.. मनःपुर्वक आभार...-------/\-----

साहेबच्या देशात 'ओ माय ग्वाड इंडियन मर्मलेड' म्हणून साहेब लोक्स मिटक्या मारत ओरपतील बहुदा हा आयटम++ : D

मस्तच. मी साधारण असाच पाक केला होता आणि चॉकलेट क्रिम्मधे मिक्स केला. आणि ते क्रिम केकवर लावले होते. भारी लागत होते+++ मस्तच कल्पना..

मस्त दिसतोय. किती दिवस टिकतो?+++ दोन तीन महिने सहज टीकतो.. पक्का पाक केला तर अजुनही टीकु शकेल...