पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 12 December, 2016 - 10:23

महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे?????
>>>
ते कळायला पुणेकर असावं लागतं, ऐर्‍यागैर्‍याला नाही कळायचं ते Proud

पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही.
>>
Rofl हो की काय? बरे हं!

तसे पुणे हे मला आवडत नाही
>>
बरं मग? तुम्ही कोण? पु.ल की मायकल जॅक्सन?

चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.
>>
हे ही स्वतःचं स्वतः करता येत नाही म्हणजे फारच झालं बुवा... पुणेकरांनी शिकवायचं तरी काय काय आणि कोणा कोणाला?

एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
>> सगळं पुणेकरांनीच केलं तर तुम्ही काय माश्या मारत बसणार की काय?

बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत. >>> Lol

खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.
>>>
अभ्यास वाढवा Lol

बाकी आशूचा प्रतिसाद +१ पण माझ्याकडे जरासा फुकट वेळ होता म्हणून हसुन घेतलं.

>>म्हणजे मुंबईत काय वाईट आहे ते कळेल.<<

नाॅट ए चांस. मुंबईकराला काहि वाईट दिसणार तर नाहिच पण तिथे बाहेरुन आलेलाहि मुंबईच्या प्रेमात पडतो... Happy

हे जे सगळे पुण-याबाहेरचे कर्तुत्ववान लोकं आहेत,
ते सगळे पुण्यातच कशाला आले त्यांचे कर्तुत्व दाखवायला? पुण्यातील मुळचे लोक असे लेखात सांगितलेल्याप्रमाणे वाईट्ट असताना?
त्या सगळ्यांनी आपापल्या मुळ गावातच स्वतःचे कर्तुत्व का नाही दाखवले?

सेम फॉर पारसीज अ‍ॅन्ड गुज्जुज इन मुंबई.

आशूचा प्रतिसाद +१ चंमत ग बघायला पाडलेला आणखी एक धागा!

याकडे टाईमपास म्हणून पण बघवत नाहिये राव!! Wink तुम्ही तर सातारकर म्हणून पण शोभत नाही! Wink

मागे तुम्ही कधी तरी तुमच्यावर उपचार सुरु आहेत असं लिहिलं होतं! लवकर बरे व्हाल अशी प्रार्थना करतो! Happy

Proud तरीही लोक त्यांच्या लेकरा-बाळींना आमच्या पुण्यात शिकायला पाठीवतात.

तरीही लोक नोकरीकरता आमच्या पुण्यातच येतात.

तरीही लोक पुण्यात घराकरता जागा घेतात.

तरीही लोक पुण्यात गणपती बघायला येतात.

तरीही लोक पुण्यात व्यापाराकरता धडपडत येतात.

लोक पुण्याचा आणी पुणेकरांचा द्वेष करतात, तरीही पुणे पुणे असेच भजन करतात.

रिया Lol

सिंजी - तुम्ही छुपे पुणेप्रेमी दिसता. या सगळ्या दिग्गज लोकांचा Good->Great प्रवास पुण्यात आल्यानंतर झाला हे यापेक्षा चांगल्या रीतीने एखादा/दी पुणेकर सुद्धा लिहू शकले नसते.

तरीही लोक पुण्यात व्यापाराकरता धडपडत येतात. << तरीही लोक पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवाला जातात :प

फक्त माझ्यासाठी मुंबई म्हणजे जिथे टॅक्सी ऐवजी रिक्षा सुरू होते तिथे ती संपते.>>>>> सौ टका सच.

बाकी लेख गरमागरम आहे. बाकीचे फटाके वाचते.

>>In life, in general, DON'T BE A HATER!<< दैत्य +११११

सिंथेटिक जिनियस सातर्‍यात जे आहे तो इतिहास आहे. आणि पुण्याचा इतिहास सुद्धा समृद्ध आहे. एकतर्फी लेख, वैयक्तिक असुयेपोटी उदंड इतिहास लाभलेल्या संपूर्ण शहराचा अपमान करणे कितपत योग्य हे तुम्हीच ठरवा.

भा - आप तो सिरीयस हो गये. शाळेसारखे समजा हो. सुरूवातीला शाळा तुम्हाला मोठी करते. तुमचा ग्राफ तसाच पुढे गेला तर मग तुम्ही शाळेला मोठे करता. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचे उत्तर "दोन्ही" आहे. Happy

आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते. >> अग आई ग . काय हे

>>म्हणजे मुंबईत काय वाईट आहे ते कळेल.<<
नाॅट ए चांस. मुंबईकराला काहि वाईट दिसणार तर नाहिच पण तिथे बाहेरुन आलेलाहि मुंबईच्या प्रेमात पडतो. >> +१११११

सगळं चांगलच दिसावं असा आग्रह नाही, पण काहीच चांगल दिसू नये ? अरेरे..

रच्याकने,
डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा ?? स्थापना असे लिहीतात... पुण्याच्या ण ची बाधा की काय ते...

पुणेकरांना अपमान नविन नाही.. पुणेरी अपमान नावाचा प्रकार पुणेकरांनीच चालु केला आहे. Wink इतरांचा अपमान करण्यात पुणेकरांना जितकी मजा येते (खास अभिमानाने एकमेकांना सांगतात पण ) इतकी स्वतःचा ऐकण्यात मात्र येत नाही हे खरे.

Happy

पुण्यात आदीवासीपाडा असेल तर सिंजी "अभ्यास" करायला जाऊन या. तर तुमच्या अभ्यासावर शिक्का बसेल.>>> तेवढ्याने काय होतेय, बेफाम जनरलाईज्ड विधाने करायला आणि संशोधनाचा आव आणायला जमणार आहे का त्यान्ना?

आगाऊ बरोबर आहे तुमचे
पण किमान सुरुवात करायला हवी. सुरुवातीला पडतील, आपटतील, चार शब्द ऐकतील, कुठे उघडे पडतील, परंतू नंतर सवय होईलच की.

>>> या सगळ्या दिग्गज लोकांचा Good->Great प्रवास पुण्यात आल्यानंतर झाला <<< अचूक.... Happy
बाकी आशूचॅम्प ला अनुमोदन.... चालुद्यात.... !
या हल्लीच्या बाहेरुन पुण्यात आलेल्या लोकांनी पुण्याची फारच वाट लावलीये हे मात्र या लेखावरुन नक्की कळते Wink (अपवादः कोकंणांतून आलेले पेठी लोक Proud त्यांच्यामुळेच पुण्याचे पुणेरीपण टीकुन आहे... अन बाहेरच्या लोकांना पुणे म्हणले की "त्यांनाच टारगेट करायचे अस्ते" , अगदी त्या जक्कलसुतारपासून [ज्यांनी म्हातारेकोतारे बघुन खून केले], ते भांडारकरवर हल्ला चढविणार्‍या ब्रिगेड्यांपर्यंत [ज्यांनी भांडारकरमधिल वयस्कर पांढरपेशांना अन स्त्रीयांना धमकावत धुमाकुळ्/तोडफोड केली] सगळ्यांना)

पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक ..............mag aalat kashala punyat .........

पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे?????
>>>
ते कळायला पुणेकर असावं लागतं, ऐर्‍यागैर्‍याला नाही कळायचं ते .......agdi barobar

आशु व रिया यांना प्रचंड अनुमोदन!

इथे अवांतर होईल पण- सवाई मधे कोणा कोणाचे गाणे आवडले? किती राग कळले? म्हणजे तुम्हाला त्या गाण्याची/रागांची गोडी लागेल असे काहि ते 'लोक' गायले का?
एखादी सुरावट/वादन ऐकुन मन डोलायला लागले असे काही झाले का?
खुपच अवांतर आहेय पण जावुदे.
तुमचे चालुदे सादळलेल्या काड्या घालणे.

Pages