अश्रू केवळ मौनाचे भाषांतर होते...

Submitted by बाळ पाटील on 5 December, 2016 - 16:45

बाकी सारे शब्दांचे विषयांतर होते
अश्रू केवळ मौनाचे भाषांतर होते

जर का सोबत नसते तुझिया नजरेचे धन
उरले जीवन ठरलेले गंडांतर होते

काळ असाही आला म्हणजे झुलवत नेतो
दिवसाकाठी भासे एक युगांतर होते

बोलायाचे होते पण मग नव्हते सुद्धा
भाव तिचेही भोळे एक समांतर होते

आत्म्याचा तो एक खुबीने जपता यावा
नश्वर बाकी देहाचे धर्मांतर होते
_बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह