किनारा दूर हटतो का

Submitted by सुप्रिया जाधव. on 15 November, 2016 - 12:16

नभाचा ध्यास मिटतो का
धरेचा पाश तुटतो का

हवेचा हात धरला मी
बघूया तोल सुटतो का

सुखाचा हट्ट का धरता
निनावी चेक वटतो का

असावा राहिला कच्चा
घडा अपसूक फुटतो का

तुझा तू मांड ना मुद्दा
बघू कोणास पटतो का

किनारी धावती लाटा
किनारा दूर हटतो का

उगवतो सूर्य नेमाने
दवंडी रोज पिटतो का

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users