निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गर्द गुलाबी रंग नाहिये त्या फुलांचा दिनेश. जरा फिकीच आहेत. अणुशक्ती नगराच्या डोंगरावर पण आहेत तीच झाडं.

सध्या पूर्व दुतगती महामार्गावर सगळीकडे गुलाबी फुलांची झाडे फुलली आहेत. कोणी सांगू शकेल का त्यांचे नाव?>>
निर्मल, टॅबेबुइया असणार तो.>>

मला वाटतं उंदिरमारी/गिरीपुष्प असावं दिदा..
सायंटीफीक नेम : Gliricidia sepium

धत्ततेरेकी...झालं होय शंकानिरसन...

दिदा, फोटो मस्ताय सारेच.. जॉयजॉय..नाव भारीच...

काही दिवसांपूर्वी कात्रज घाटात झाडं बघायला गेलो होतो तेव्हा काढलेला हा फोटो..
Gliricidia sepium उर्फ गिरीपुष्प उर्फ उंदिरमारी..

हे खरतर विदेशी झाडं आहे..मध्य अमेरिका तसेच मेक्सिको हे त्याचं मुळं गावं.. पण भारत त्याला चांगलाच मानवला..

उपयोग :
याची मुळे खोलवर जाऊन माती पकडून ठेवतात.
याच्या मुळांवर रायझोबियम जीवाणू सहजीवन पद्धतीने राहत असल्यामुळे जमिनीत नायट्रोजन फिक्सेशन करण्यात याचासहभाग होतो.
याच्या शेंगा उंदरांना आकर्षित करतात पण त्या खावून ते मरतात त्यामुळे यांस 'उंदिरमार' असे संबोधतात.
यांच्यात असलेल्या विशिष्ट घटकद्रव्यामुळे डासांना सुद्धा अटकाव होतो म्हणुन बरेच ठिकाणी याला जाळून धुर करतात.
गिरीपुष्पाची वाढ फार झटपट होते म्हणुन Quick Stick अशी याची ख्याती आहे. तसेच धुर न करता जळण्याची क्षमता असल्याने इम्धन म्हणुनसुद्धा याचा वापर लोकं करतात.
उंदिरमारीच्या पानांचा लगदा करुन तो जनावरांना लावून त्यांची आंघोळ घातल्याने त्यांच्या पाठीवर असलेले गोचिड, पिसवा, जळवा अशा परपोषींचा त्रास आटोक्यात येतो.

टिना छान माहीती.

त्या वृक्षगान पुस्तकाची ओळख इथेही टाक.

या पक्ष्याबद्दल असलेला गोंधळ नाही न झाला दुरुस्त अजुन... Lol
पाणथळीचे पक्षी या धाग्यावर लेटेस्त आलेल्या प्रतिसादातील पक्षी याचाशी बराच साम्य दाखवतो.. मादी आहे ती त्या पक्ष्याची...बघुन तर ये जरा..

खुप खुप खुप खुप म्हणजे खुपच मंदावले आहे सारे निसर्गप्रेमी या धाग्यावर Sad

बाटलीतली शेतीचे आराखडे येउ द्या लोकहो इथं..

मी गाजराच्या चकत्या ठेवल्या आहे मिठ साखरेच्या पाण्यात.. त्याची पाने भाजीत घालता येईल का मला ?

सॉरी पण संपादित करायला बहोत वेळ घेताय म्हणुन अजुन एक प्रतिसाद नव्याने देतेय..
जागू, फोटो खुप सुपर्ब आलाय गं..
अन् टबातल्या प्रचिचा फोटो येउदे इथं..माती कशी रचली आणि रेतीतल्या मेथीच्या डिटेलवार माहितीसह..

वा नितीन तो जपानी पंखा वाटतोय.

नितीन तुझ्या बाटलीतले प्रयोग लवकरच टाक इथे.

टिना वरच्या फोटोबद्दल केपीने सांगितले की तो स्टोनचाट फिमेल आहे. मराठी नाव गप्पीदास. खरच तो खुप गप्पामारत होता ग.

ईनमीन तीन, मस्तच फोटो...
जवळून बघायला फारच मस्त वाटतो..
आम्हाला नाही मिळाला एकही गेंद..
हा माझा झब्बु...

बाकी एक माहिती..
या वृक्षाला टेनिस बॉल न म्हणता 'बॅडमिंटन बॉल ट्री' असे म्हणतात. मराठीत म्हणतात 'चेंडूफळाचा वृक्ष' .
फ्लॉवर्स ऑफ इंडिया मधे त्यांनी ही माहिती पुरविली आहे. Parkia biglandulosa हे त्याचं शात्रीय नाव.
वेस्ट आफ्रिकेतील मुळ वृक्ष.

आता प्रश्न असा आहे कि याचं कॉमन इंग्रजी नाव जर बॅडमिंटन बॉल ट्री असं असेल तर टेनिस बॉल ट्री नेमकं कुणाला संबोधतात.
कारण गुगलबाबावर या नावाने शोधल्यास असल्या नसल्या डोक्याचं दही होतं इतके सारे ऑप्शन तो देतो..
कवठं,
बेल,
कैलासपती आणि काय काय .. त्यामुळे जाउंदेत.. टेनिसबॉल तर टेनिसबॉलही सही...

ते शाल्मली वा सेअल नाव कसलं सुंदर वाटत ना ?
काटेसावर म्हणजे अरसिकतेचा कळस वाटायला लागलयं मला Proud
शास्त्रीय नाव : Bombax ceiba
यात पिवळा रंग सुद्धा आढळतो. हा बहारात आला कि पक्ष्यांची चंगळ असते मात्र.. जागूच्या फोटोत दिसतचं आहे..

जागू, तेरे फोटोंको झब्बु ..

कळी की कळा ?

हे फुलं :

गाजराची पाने कडवट लागतात. त्यापेक्षा बिट आणि मूळ्याची पाने चांगली लागतात चवीला. हळीवाची पानेही छान लागतात चवीला.

न्यू झीलंडच्या बोटॅनिकल गार्डन च्या कँटीनमधे अशी वेगवेगळी हर्ब्ज लावलेल्या छोट्या छोट्या कुण्ड्या टेबलबर ठेवलेल्या होत्या.
खुपदा तिथे दुकानात, छोट्या कुंड्यातून अशी रोपेच विकायला असतात. घरी हवी तर वाढवताही येतात. आपण अगदी करवंटीमधेही असा प्रयोग करु शकतो. करवंटीला खाली आधार मात्र द्यावा लागेल.

करवंटीत, लसणाची पात, कोथिंबीर, हळीव असे लावता येतील. पातीचा कांदाची येईल.

ओके दिदा...
करवंटीची आयडीया भारीए.. त्याला एखादी कडी लावता येईल आधाराला, माठाला लावतो तशी चुमडी (पाण्याचं भरणं डोक्यावर घेताना बाया कापडाची गुंडाळी करतात ती).. थोडं डेकोरेट केलं तर उन्ह येणार्‍या खिडकीत सुद्धा ठेवता येतील अश्या करवंट्या.. किंवा तार अथवा सुतळीने (नारळाची मऊ असणारी दोरी) हँगिंग सुद्धा करता येईल जरा कल्पकतेने सजवल्यास नाही का?

हो पण जर स्प्रे वगैरेने पाणि दिल्यास त्याकरीया वेगळि तजवीज करायची गरज पडणार नाही असं वाटत..
बाकी पाण्याचा निचरा हि गोष्ट ग्राह्य धरुनच चाललीए..

कांद्याची पात मस्त येते कुंडीत. मी २-३ छोट्या कुंड्यांमध्ये लावल्यात. वांग्याच्या भरतासाठी प्रत्येक कुंडीतून २-३ पाती तोडल्या की भरीत एकदम टेस्टी. लसूण पण लावलाय, पण तो सावकाश वाढतोय. १ वर्ष झालं Happy
आता बीट आणि मुळा लावायचा मोह होतोय. पानं खायला नक्कीच आवडेल. गार्डन फ्रेश सॅलड सारखं दुसरं काही नाही Happy

हो पण जर स्प्रे वगैरेने पाणि दिल्यास त्याकरीया वेगळि तजवीज करायची गरज पडणार नाही असं वाटत>> नाही गं टीने, तसं theoretically वाटतं आपल्याला, पण तसं नाही होत. करून बघितलंय :Dकुंडीला ड्रेनेज असणं अगदी आवश्यक आहे, माझ्या अनुभवाप्रमाणे.
दिनेशदा तुम्ही अळशी लावून बघितलाय का कधी? अत्ता नेट वर बघितलं तर त्याची फुलं छान दिसतायेत. ब्लू जिरेनियम सारखी.

कुंडीला ड्रेनेज असणं अगदी आवश्यक आहे, माझ्या अनुभवाप्रमाणे.>> अग्गं बाई, मी म्हणतेय की जरा झोकानं पाणी दिलं तर बाईर येणार नाही किंवा कमी येईल..बाकी खाली छिद्र ठेवायच नाही असं नाही म्हटल मी ... Lol

Pages