बिन्डोकडी

Submitted by kokatay on 2 November, 2016 - 15:54

आज माझी बिन्डोकडी तीन वर्षाची झाली ! माझ्या पायथ्याशी बसलेली हि काळी मांजर आता माझं तिसरं मुलंच झालं आहे हे माझ्या लक्षात आले. कुणासठाऊक कां पण जेव्हा ती घरात आली म्हणजे आणली गेली तेव्हा तिचे ऑफिशिअल नाव " डचेस " असे मुलांनी ठेवले होते, पण तिला फारसं काही समजत नाही अशी माझी समज आणि राग असल्यामुळे तिला मी "बिनडोक " असं म्हणायला सुरुवात केली, आणि आज रागाने नाही पण प्रेमाचं ते नाव झालं आहे .

घरात एक "पेट" असलाच पाहिजे असं माझ्या दोघे हि मुलांचा हट्ट होता. सुरुवातीला त्यांच्या ह्या मागणी ला अजिबात महत्व द्यायचे नाही असे माझे आणि माझ्या पतींचे ठरले. बरेचदा लहान-मोठ्या भूक हडताळी झाल्या, तरी आम्ही मन घट्ट करून लक्ष दिले नाही, काही वर्ष आणि सरले, पण माझी मोठी मुलगी जेव्हा हायस्कुल ला गेली तेव्हा तर तिने सांगूनच टाकले कि आता दोन वर्षाने मी कॉलेज साठी घरा बाहेर पडणारच आहे तरी तुम्ह्लाला माझी इच्छा पूर्ण करायची नाहीये कां ? असे अनेक भावुक डायलॉग मारण्यात आले. मग एके दिवशी ती म्हणाली तिच्या वर्गमैत्रिणी च्या मांजरी ला "किट्टन" झाल्या आहेत आणि तिला त्यातलं एक मला द्याची इच्छा आहे तर मी आणू कां ? आपण आणून बघूया, फारच त्रास झाला तर परत देऊन टाकूया अशी व्यवस्था केली गेली, आम्ही दोघे मुलंच मांजरी च सर्व करू असं हि वचन दिलं गेलं.
तर आता हो म्हणन्या पलीकडे दुसरा उपाय नाही असे म्हणत नाईलाजाने / रागाने जेमतेम ट्रायल म्हणून 'बिन्डोकडी " आमच्या घरात आणि जीवनात प्रविष्ट झाली.

भारतातून माझ्या आईचा फोन आला तेव्हा तिलाही सांगिलतलं असं काळ मांजर पाळलं आहे , जणू तिच्या हातून फोन खाली पडायचाच राहिला अशी ती दचकली आणि रागातच म्हणाली : तुला मिळून हा एकच प्राणी मिळाला कां ? आत्ताच्या आत्ता परत देऊन टाक, माहित नाही असी बुद्धी तुला झालीच कशी....

काळी मांजर हे नाव ऐकताक्षणी डोळ्या समोर विचित्र भुताटकी नाचू लागते. काळी मांजर म्हणजे अपशकुन, असच आपण ऐकून असतो. हा प्राणी अपशकुनी आहे असे इतिहास मध्ये कुठे लिहिले आहे हे बघायला अभ्यास सुरु केला, जोडी ला बरेच लोकंच्या पुढे हा प्रश्न मांडला कि कां म्हणून काळी मांजर अप्शुकुनी असते?

त्यातून एक माहिती अशी कि सर्वात पहिले अमेरिकेत हि कथा प्रचलित झाली कि रात्री जादूगरणी [ विच ] काळ्या मांजरीचे रूप धारण करते. दुसरी माहिती अशी कि स्कॉटीश संस्कृती मध्ये काळी मांजर घरात येणे म्हणजे भाग्योदय असतो !

असो, आमची बिन्डोकडी आमच्या घरातली जणू राणीच आहे, तीच जग म्हणजे आम्ही चौघे, आणि आमच्या चार भिंती. इतकी भित्री भागूबाई आहे कि कुणी हि घरात आलं कि पटकन जाऊन लपते, अगदी जवळची मित्र मंडळी नी सुद्धा तीला बघितली नाहीये.
मात्र मला बरं नसलं तर मला चिकटूनच तासनतास बसून राहणारं हे काळ कुळकुळीत गोंडस बाळ अपशकुनी कसं असूशकत हा प्रश्न काही सुटत नाही.
--ऐश्वर्या कोकाटे
मराठी कल्चर एंड फेस्टिवल्स

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे सध्या एक माऊबाई बाळंतपणाला आल्या आहेत. अजून पिल्ले झालेली नाहीत. तिच्याकडे पाहून मांजरं गोड असतात यावर माझा आता थोडा विश्वास बसायला लागलाय! एका जागी बसून घरातील सगळ्यांना आपली सरबराई करायला लावण्याची तिची किमया अफलातून आहे!

मलाही मांजर कधीच आवडत नव्हते पण आता घरात आणल्यापासुन मत बदलले आहे. मात्र मांजर हा अतिशय आळशी, कमी बुद्धीचा प्राणी वाटतो. जीव लावतो, पण आपला जीव सांभाळुनच. कुत्र्याच्या मानाने सांभाळायला सोप्पा. फिरायला न्यायला नको, बाहेर ७/८ तास जायचा प्रॉब्लेम नाही. कुत्र्याला एकटे सोड्लेले बिलकुल आवडत नाही पण मांजराला एकांत बराच वाटतो.

@ राया, मांजर हे कन्व्हिनिअंटली बिनडोक असते. आमचे तरी आहे >>> Biggrin

म्हणजे नक्की करते काय, बिनडोकपणा? नाही म्हणजे मला मांजरांचा अनुभव नाही म्हणून विचारलं.

म्हणजे नक्की करते काय, बिनडोकपणा? नाही म्हणजे मला मांजरांचा अनुभव नाही म्हणून विचारलं. --

हाक मारलेली कळ्त नाही (किंवा कळत नाही असे दाखवणे). हातात वस्तु लपवुन, पुन्हा दाखवली तरी भलतीकडेच शोधणे. स्वतःचा तोल न सांभाळता येईल अशा ठिकाणी जाउन बसणे आणी मग धपकन पडणे. उतरता येणार नाही अशा ठिकाणी चढुन बसणे आणी केविलवाणे म्याव म्याव करणे. असे बरेच आहेत. Happy

@ राया, मांजराच्या बिनडोकपणाची उदाहरणे वाचून गंमत वाटली. हो ना! तुनळीवर असले व्हिडिओ बरेच पहायला मिळतात. मला वाटायचं त्यांच्याकडून असं चुकून होतंय. पण नाही! ते त्यांच्या बिनडोकपणामुळे होत असायचं, होय! Biggrin

मांजराच्याबाबतीत मला एकदाच अनुभव आलाय. मी कॅन्टीनमध्ये खिडकीजवळ असलेल्या टेबलावर बसून जेवत होतो. मस्तपैकी बांगडाफ्राय खात होतो. एका मांजरीने त्या खिडकीच्या कठड्यावर बसून, माझ्या बांगड्यावर नजर लाऊन, म्याव म्याव करत मला हैराण करून सोडले होते. पण मी पण होतो सावध. मला माहित होतं, माझी नजर गुल तर बांगडा गुल. मी एक डोळा मांजरीवर ठेऊन बांगडा खात होतो. आणि अचानक माझ्या एका मित्राने मागून हाय केले. आणि काय सांगू तुम्हाला? मी एकच क्षण मागे वळून पहाताच मांजरीने माझ्या ताटातून बांगडा पळवला कि हो! अक्षरशः अर्धपोटी ताटावरून उठावे लागले ना मला!! Biggrin

खालच्या लिंकमध्ये पहा एक वात्रट मांजर चालत जाणाऱ्या एका लहान बाळाच्या पायात पाय घालून त्याला कसे पाडते ते.

https://drive.google.com/file/d/0B-lhvOFqgsDzVk1GMnZERHY0Um8/view?usp=dr...

मला मांजर हा प्राणी अजिबात आवडत नाही . लबाड कुठचा .
रच्याकने शरदिनी डहाणूकरांचा एक धडा 12वीच्या पुस्तकात होता , सयामी मांजर म्हणून . त्याची आठवण म्हणून..

बिन्डोकडीचा फोटु पहायला मिळाला असते तर बरे झाले असते. मला मांजरे आवडतात, पण दुसर्‍यांच्या घरातली.:फिदी: आमच्या घराच्या मागे ( माझ्या माहेरी) एक गब्बु, पांढरे शुभ्र मादी मांजर होते. तिने आमच्या घरात ३ पिल्लांना जन्म दिला, पण त्यातल्या एका पिल्लाला एका दुष्ट,:राग: बोक्याने मारल्याने मला खूप वाईट वाटले, मग मी कधीच मांजराला घरी बाळंतपणाला येऊ दिले नाही.

ह्या मांजरीला जेव्हा दुसर्‍यांदा पिल्ले झाली तेव्हा तिने शेजार्‍यांचा शेव- फरसाण-चिवडा पुडा चोरुन आणला आणी आमच्या बागेत बसुन पिल्लांबरोबर खाल्ला होता.:खोखो:

गोड आहे बिन्डोकडी.

तुमची आणि रायाची मांजर मंद क्याटेगरीतली असावी. माणसांमध्ये कमी-अधिक बुद्धिमत्तेची लोकं असतात तसंच मांजरींमध्ये पण असतं. माझ्या एका मैत्रिणीची एक मांजर भयंकर मंद होती, तिचं नावच मंदा ठेवलं गेलं. आमच्याकडे एक बोका होता तो पण कमालीचा आळशी आणि मंद. ही एक-दोन उदाहरणं वगळल्यास इतर सर्व मांजरी भयंकर चपळ आणि हुशारच बघितल्या आहेत मी तरी.

क्यूट आहे तुमची मांजर.
मांजरानं ३० सेकंदात खापरी पापलेटांची पिशवी पळवलेली पाहिली आहे. बाळंतीण होती. सज्जात बसून पिलांना खाऊ घातले मासे. Happy

लहानपणापासुन आईबरोबर वाढलेली मांजरे हुशार असतात. आई सगळे शिकवते ना. ईथे किटन्सना महिनाभरातच सेपरेट करतात. आमचा बोका एकटाच होता शेल्टरमध्ये महिन्यापासुन. म्हणुन असा असावा. बघु हळुहळु प्रगती. आत्ताशी तीन महिन्यांचा झाला.

धन्यवाद !अहो माझी बिन्डोकडी खूपच हुशार आहे, तिला भरजरी शालू, दागिने ह्याची पण खूपच आवड आहे , मी पार्टीत जायला तैयार होताना ती अक्षरश: माझ्या आजूबाजू उड्या मारत असते, अगदी कौतुकाने सगळं निरीक्षण करते.