तुझी वाट पाहताना दिवस संपला आता

Submitted by निखिल झिंगाडे on 28 October, 2016 - 21:44

डोळ्यात तू वाच माझ्या मनाला आता
तळमळत मी इथे तुझ्याविण शून्य झाले

मनाला सावर मी ना भेटेन तुला आता
कसे हे जीवन तुझ्याविण अगम्य झाले

जेव्हा भेटून ओढ लागली मनाला आता
हसणे सरलेले रडणेही कारुण्य झाले

तुझी वाट पाहताना दिवस संपला आता
सळसळत तारुण्यही आता वार्धक्य झाले

काळजी नको रे हीच क्षणा क्षणाला आता
आगळे अनामिक हे दास्य मला मान्य झाले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील काव्याला गझल म्हणण्यास खालील बाबींची कमतरता आहे.

वरील काव्यात गझलेचा पहिला शेर म्हणजे "मतला" नाही. अशा पहिल्या शेरातील दोन्ही ओळीत यमक (काफिया) /अंत्ययमक (रदीफ) असते.

याशिवाय यातील काफिया (यमक) शून्य/अगम्य/कारुण्य/वार्धक्य/मान्य, इत्यादी प्रत्येक ओळीत व्यवस्थित यमक साधत नाहीत.

अर्थात प्रत्येक गझलमधे यमक आणि अंत्ययमक दोन्हीही असावेतच असे बंधन नाही, मात्र ते दोन्ही असतील तर व्यवस्थीत असावेत.
संपुर्ण गझलमधे केवळ यमक असेल आणि अंत्ययमक नसेल तरी चालते.

मी माझ्या अल्पमतीला स्मरुन गझलचे हे थोडेसे नियम सांगितले. बाकी चूकभूल देणे घेणे.