पॅनकेक सँडविच, शाही रोल्स, याम ब्रेड आणि कटलेट, एम्पेनाडा, पम्पकिन रोल, मटकीचे वडे, बदामाचा ब्रेड वगैरे चाखून झाल्यावर येडा बनके बटाटा खाता खाता आपण गारेगार मॉकटेल पिऊया.
४ ग्लास (मॉकटेलचे नव्हेत, घरातले नेहमीचे सरबताचे) मॉकटेलसाठी:
मोसंबी - ६, सोलून आणि गर काढून
लवंगा - ३, कोरड्या भाजून पूड करून
बटरस्कॉच सिरप - ४ चमचे आणि शिवाय टॉपिंगसाठी
पिस्ता आईसक्रिम - ७-८ स्कूप
मोसंब्यांच्या गरात लवंगेची पूड आणि ४ चमचे बटरस्कॉच सिरप घालून ब्लेंड करून घ्या आणि गाळून घ्या. त्यात पिस्ता आईसक्रिमचे स्कूप घालून स्लो स्पीडवर ३-४ मिनिटं ब्लेंड करा. ग्लासमध्ये ओतून बटरस्कॉच सिरपचं टॉपिंग करून मस्त गारेगार मॉकटेल चवीचवीने प्या.
पग्यासारखाच गणपतीसमोर ठेवलेल्या आणि आलेल्या फळांचं काय करायचं हा प्रश्न पडला होताच. तशी फळं येताजाता खाऊन संपतात पण मास्टरशेफ स्पर्धेसाठी काही पाककृती करावी हे डोक्यात होतं. ठाण्याला सत्कार रेसिडेन्सीमधे लिंबूरस, स्प्राईट, दालचिनी पावडर आणि व्हॅनिला आईसक्रिम या सगळ्याचं 'लेमन कूलर' असं मॉकटेल मिळतं, टॉपिंगला पुदिना असतो. त्या धर्तीवर घरातली मोसंबी सत्कारणी लावत हे मॉकटेल तयार केलं. बटरस्कॉच सिरप घरी होतंच, दालचिनीऐवजी लवंगेची पूड घालून पाहावीशी वाटली, कारण स्पर्धेच्या नियमांत बसत होती. व्हॅनिला आईसक्रिमने लवंग आणि बटरस्कॉचचा स्वाद लपला जाईल असं वाटून सौम्य स्वादाचे पिस्ता आईसक्रिम वापरले. आणि मोसंबी, लवंग, बटरस्कॉच, पिस्ता असे सगळे स्वाद एकमेकांबरोबर मस्त मिळून आले.
पिस्ता आईसक्रिमऐवजी टेन्डर कोकोनट आईसक्रिम वापरता येईल पण व्हॅनिला किंवा स्ट्रॉबेरी आईसक्रिम नको. दोन तीन घोट घेऊन झाल्यावर लवंगेचा स्वाद जाणवायला सुरूवात होते. लवंगा जास्त झाल्या तर टाळूला त्याचा ऊग्रपणा जाणवतो त्यामुळे त्या जरा बेतानेच वापरा.
मस्त!
मस्त!
मस्तं दिसतय मॉकटेल.
मस्तं दिसतय मॉकटेल.
हटके एकदम, शुभेच्छा.
हटके एकदम, शुभेच्छा.
मस्त.. हटके आहे
मस्त.. हटके आहे
अरे वा! वेगळाच प्रकार आहे.
अरे वा! वेगळाच प्रकार आहे. पग्या म्हणतोय तसं यात टेन्डर कोकोनट आइसक्रीम चांगलं लागेल. स्पर्धा संपल्यावर पायनॅपल पण घालून बघा
मस्तच गं! गारेगार!
मस्तच गं! गारेगार!
तुम्हा लोकांना एवढ्या आयडीया
तुम्हा लोकांना एवढ्या आयडीया सुचतात कशा? मस्त गारेगार दिसतयं. स्पर्धेसाठी शुभेच्छा.:स्मित:
सुचतं खरं एकेक! प्रश्न एक -
सुचतं खरं एकेक!
प्रश्न एक - आता मत कुणाला द्यायचं?
प्रश्न दोन - हे "स ग ळे" पदार्थ आयते करून कोण खाऊ घालेल?
प्रश्न तीन - हे सगळं बघून रोजच स्वतःच्या बेसिकमें राडा स्वयंपाकाला सामोरं कसं जायचं?
सुचतं खरं एकेक! प्रश्न एक -
सुचतं खरं एकेक!
प्रश्न एक - आता मत कुणाला द्यायचं?
प्रश्न दोन - हे "स ग ळे" पदार्थ आयते करून कोण खाऊ घालेल?
प्रश्न तीन - हे सगळं बघून रोजच स्वतःच्या बेसिकमें राडा स्वयंपाकाला सामोरं कसं जायचं?
मन्जु स्लर्प
मन्जु स्लर्प
वॉव सुपरकुल. हे मस्तच
वॉव सुपरकुल. हे मस्तच लागणार!
मस्त गारेगार दिसतयं.
मस्त गारेगार दिसतयं. स्पर्धेसाठी शुभेच्छा.
मस्त आहे मॉकटेल!
मस्त आहे मॉकटेल!
वा..मस्तंच दिस्तंय मॉकटेल..
वा..मस्तंच दिस्तंय मॉकटेल..
कसलं क्लासी दिसतंय हे, भारीच!
कसलं क्लासी दिसतंय हे, भारीच!
छान आहे मॉकटेल.
छान आहे मॉकटेल.
भारी आहे !
भारी आहे !
Pages