मायबोली मास्टरशेफ -सायु-मटकी, चवळी चे वडे

Submitted by सायु on 13 September, 2016 - 02:52

यंदा मायबोली गणेशोत्सव मास्टर शेफ खरच डोक्याला चालना देणारे आहे.. म य ब ल ह्या अक्षरांपासुन सुरु होणारे कीमान तीन घटक पदार्थ वापरुन पाककृती सादर करायची आहे.
म्हणुन मटकी, बेसन पीठ, लसूण वापरुन हे घटक वापरुन पाककृती देते आहे.

गणपती बाप्पाचे नैवेद्दाचे पान म्हटले की गोडा सोबत वडे/ भजी या तळलेल्या पदार्थींना पण तेवढाच मान असतो.यांच्या शिवाय नैवेद्दाचे पान अपुर्ण वाटते..

मायबोली गणेशोस्तवाच्या निमीत्याने नागपूरच्या प्रसिद्ध आणि खमंग कडधान्याच्या वड्यांची पाककृती देतेय...

जिन्नस :
टकी= १ वाटी
चवळी = २ वाटया
मुगाची सालाची डाळ = १ वाटी
बेसन पीठ = १/२ वाटी
सुण = १ अख्खा (१५-१६ पाकळ्या)
हिरव्या मिरच्या - २
आल्याचा - १ ईंचीचा तुकडा

तीळ, ओवा, हळद, तिखट,हिंग मीठ = अंदाजे

धणे पुड = २ चमचे
जीरे पुड = १ चमचा
बारीक चिरलेला कढी पत्ता
तेल = तळणा करता

वर दिलेले कडधान्य आणि डाळी रात्री वेगवेगळ्या भिजत घालाव्या. सकाळी उपसुन घ्याव्या.
मटकी आणि चवळी मिक्सर वरुन जाडसर गिरवुन काढा, लगदा व्हायला नको, चवळीचे तुकडे दिसले पाहिजे. मग मुगाची डाळ( सालासकटच) मिक्सर मधुन जाडसर फिरवुन घ्या.

आता हे सगळ वाटण एका परातीत / गंजात काढुन घ्या. त्यात तीळ, ओवा , हळद, तीखट, मीठ, हिंग, धणे पुड, जीरे पुड , १/२ वाटी बेसन पीठ (बाईंडीग साठी),बारिक चीरलेला कढी पत्ता, मिरची, लसुण, आल्याची पेस्ट घाला. त्यावर दीड पळी भर कडकडीत मोहन घाला.

कढईत वडे बुडतील ईतपत तेल तापवायला ठेवा. या मिश्रणाचे तळहातावर थापुन चपटे वडे करा. त्याला मधोमध भोक करा, आणि मंद आचेवर लालसर तळुन घ्या. एखादा वडयाचे तळल्यावर तुकडे करुन खात्री करुन घ्या की आतुन कच्चा तर नाहीये ना! आणि मग त्या प्रमाणे बाकीचे वडे तळायला घ्या..
गरम गरम वडे सोबत कढी आणि पंचामृत तर हवेच हवे...:)

तसेच विदर्भात, कार्यप्रसंगी,भातावर, हा वडा कुसकरुन त्यावर खंमग हिंग मोहरीच कढवलेल तेल ,जोडीला कढी आणि पंचामृत असा बेत हमखास असतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नागपूर च्या "वडा-भात" मधला वडा हा च असतो का ? कि फक्त बेसन पीठाचा असतो ?
पंचामृत ची पा.क्रू. टाकाल का इथे जमले तर ?

Pages