बागकामाची सुरवात- पालक

Submitted by विनिगिता on 9 September, 2016 - 05:06

इतके दिवस फक्त मायबोलिकरान्चे बागकामाचे लेख वाचुन प्रेरणा घेत होते..पण मागच्या आठवड्यात अखेर सुरवात केलीच.. त्याचीच ही फळे...सॉरी..पाने Happy

IMG_20160907_215056.jpgIMG_20160903_075201.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

बिया लावल्या का ? मी पण सुरूवात केली आहे नुकतीचं, नर्सरीतून आणलेल्या रोपांना फुलं आलेली बघून धन्य धन्य झाले, आता हळूहळू बिया पेरेन.

मस्तच. पातीचा कांदा पण असाच वाढवू शकता . त्याला तर मातीत पेरायची पण गरज नाही, पाण्यात मुळं बूडवून ठेवली तरी पात उगवेल.

छान झालाय पालक.

मुंबईत मूळासकट पालक नाही मिळत, पानेच मिळतात फक्त. पण मूळासकट मिळणार्‍या कुठल्याही पालेभाज्या अश्या वाढवता येतात.

मूळा, गाजर, बीट वगैरेंचा जो वरचा भाग असतो, तो कापून लावला तर तो रुजतो.
मूळ्याला सुंदर निळसर गुलाबी फुले येतात आणि मग डिंगर्‍या लागतात.
गाजराला छान शोभिवंत पांढरी फुले येतात आणि मग त्यात बडीशेपेसारख्या बिया धरतात ( या बिया खाऊ नयेत.)
बीटची, खास करून लाल बीटची पाने सलाद मधे वापरता येतात.

रताळी, सुरण, बटाटा, कोनफळ यांना कोंब आले तर तेही लावता येतात. याचे कंद तयार व्हायला मोठी कुंडी हवी, पण
रताळ्याची पाने सुरेख दिसतात ( त्याची भाजी पण करतात पण ती पाने आधी भाजून घ्यायची असतात ) त्याला सुंदर गुलाबी फुले येतात.
सुरणाच्या पानाची छत्री तयार होते, त्याचीही भाजी करतात. त्यालाही सुंदर फूल येते पण त्या फुलाला भयानक दुर्गंधी येते.

बटाट्याला निळी किंवा पांढरी फुले येतात.

कोनफळाला लाल देठाची सुंदर पाने येतात.

पालक मस्तच.. मी देखिल बाजारारुन भाजी आणलेली, मुळासकट होती पाने खुडुन घेतली आणि मुळं मातीत खोचुन दिले, छान वढलेला पालक... फोटो शोधावा लागेले..

दा, कीत्ती छान माहिती..

माझ्याकडच्या टेरेस गार्डनमध्ये पालक, कारली, टोमॅटो, पुदीना, इ. भाज्या फारच छान आल्यात सवडीने फोटो टाकेन.
आपल्या बागेतील ताज्या भाजीची गंमत काही औरच असते.

वॉव !!

मी लहान असताना , आम्ही तळमजल्याला रहायचो . माझ्या आजीने ,बिल्डीन्गच्या आवारात आमच्या खिडकी समोर , काही भाज्या लावल्या होत्या . चवळी , अळू , सुरण - त्या आठवल्या . सुरण आणि चवळीची ताजी पालेभाजी मस्त लागायाची .

केळी , पेरु , सिताफळ - फळझाड .

अबोली , कर्दळ , झेन्डु , सदाफुली , अनंत , तगर , पारिजातक , जास्वन्द , गुलाब - फुलझाडं

खिडकीत मिरची आणि कडीपत्ता . -- Granny had a green thumb!!!

माझी पण फार ईच्छा आहे , पण माझ्या हातून झाड फारशी वाढत नाहीत Sad
मला गाजर , टोमॅटो लावायची ईच्छा होती.

आता लेकाने आणि त्याच्या आज्जीने अननस लावला आहे . वाट बघतायेत कधी येतो ते Happy

मला घरी बाल्कनीत थोड़ी स्वयम्पाकासाठि उपयुक्त झाडे लावायची आहेत..उदाहरणार्थ टोमॅटो मिरची कडिपत्ता पुदीना ओवा काकडी तोंडल.. मसाल्याचे काही झाड म्हणजे मीरी लवंग... काही ऑक्सिजन हवेत जास्त सोडणारी... काही औषधि अडुळसा वगेरे...म्हणजे शोभेचि झाडे न लावता आपल्याला उपयुक्त रोपे लावयचीत.. पुण्यात कुठे मिळेल हे सगळ एका ठिकाणी...????