मायबोली मास्टरशेफ - रायगड - याम ब्रेड

Submitted by रायगड on 9 September, 2016 - 01:41

तर मायबोली गणेशोत्सव २०१६ च्या मास्टरशेफ स्पर्धेकरीता सादर करत आहे - याम ब्रेड.

पाकृ करीता लागणारे मुख्य घटक म, य, ब, ल वरून हवे आहेत हे वाचल्यापासून डोक्यात याम घोळत होता. मग विचार करताना याम ब्रेड बनवावा का असं डोक्यात आलं. बनाना ब्रेड नेहेमी करते तर आता ट्वीस्ट म्हणून याम ब्रेड करून बघायचा ठरवलं. माझ्या पाकृ कौशल्याच्या मानाने बरा बनला. Happy

तर मुख्य पदार्थ :

मैदा
याम - १ कंद
लोणी अथवा टर - ०.५ कप
दाम पावडर - १/४ कप

इतर पदार्थ :

बेकिंग पावडर - २ टी स्पून्स
ब्राऊन साखर - १ कप
दही - १ कप
व्हॅनिला इसेन्स - - १/४ टी स्पून

कृती :

१. ओव्हन ३५० deg F ला तापायला लावा.
२. भांड्यात बटर व साखर घेऊन ते फेटावे. मी स्टँड मिक्सर वापरला.

Click for the larger version.

३. एकीकडे मैदा, बदाम पावडर व बेकिंग पावडर चाळून घ्या.

Click for the larger version.

४. याम थोडा उकडून (पूर्ण शिजवायची गरज नाही), किसून घ्या.

Click for the larger version.

५. आता बटर व साखर मिश्रणात व्हॅनिला इसेन्स व दही घाला. फेटा.
६. आता किसलेला याम घाला व मिसळा.
७. मैदा व बदाम पावडरचे मिश्रण घाला.
८. सर्व नीट मिसळून घ्या.

Click for the larger version.

९. १३ * ९ च्या बेकिंग पॅनला आतून बटरचा हात लावा.
९. बेकिंग ट्रे मध्ये ओता व ओव्हन मध्ये बेक करायला ठेवा व ४० मिनीटे बेक करा.

Click for the larger version.

मस्त खरपुस सुगंध पसरलेला, गरमा-गरम तय्यार झालेला याम ब्रेड हादडा.

YamBreadFinal.jpg

टीप : यात मैदा हा मुख्य घटक घेतलाय. एरव्ही मी बनाना ब्रेड बनवताना कणिक वापरते. आणखीन खरपुस होतो.
न्युट्रीशन व्हॅल्यू वाढवायला मी बनाना ब्रेड मध्ये देखील बदाम पावडर टाकते. ती आयतीच इथे नियमात बसणारी निघाली.

अंडी घालून बनवता येईल. इथे शाकाहारी पाक्रु हवी असल्याने मी अंड्यांऐवजी दही वापरले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच रेसिपि...

याम म्हणजे रटाळ्याचाच एक प्रकार आहे. चव पण जवळपास सारखीच असते. आकाराने जरा मोठे असतात.

तयार ब्रेड भारी दिसतोय. स्लाइस करून फोटो टाकायला हवा होता.

रच्याकने, मला एकच फोटो दिसतोय, बाकी सगळे ब्लॅन्क आहेत.

तयार ब्रेड भारी दिसतोय. स्लाइस करून फोटो टाकायला हवा होता. >> +१
हेच लिहीणार होते Happy
मस्तं वाटतोय ब्रेड.

रच्याकने, मला एकच फोटो दिसतोय, बाकी सगळे ब्लॅन्क आहेत.>>>> अगदी ! मलाही शेवटचाच फोटो दिसतोय. पण मलाच वाटतय कि काय म्हणून बोलले नाही.

रच्याकने, मला एकच फोटो दिसतोय, बाकी सगळे ब्लॅन्क आहेत.>>>> अगदी ! मलाही शेवटचाच फोटो दिसतोय. पण मलाच वाटतय कि काय म्हणून बोलले नाही.

वा! आवडला ब्रेड ऐकून आनंद झाला. धन्यवाद!

स्लाइस करून फोटो टाकायला हवा होता. >> तोच प्लॅन होता. पण घरातल्या दोन उंदिरमामांना सांगितलेलं की फोटो काढून होईपर्यंत हात लावायचा नाही ब्रेडला. पहिला - आख्ख्या ब्रेडचा फोटो काढला. नंतर जरा एक दुसरी रेसिपी पण करत होते दुसर्‍या बाजूला तिथे बघायला गेले. (मास्टरशेफ मध्ये अजून एक रेशिपी येणार याची चाणाक्ष वाचकांनी नोंद घेतलीच असेल!) टपलेल्या दोन्ही उंदीरमामांनी फोटोत जरा स्टाईलभाईगिरी करायला ठेवलेली सुरी उचलून तडक वेडावाकडा कुरतडून काढला. आणि मटकावायला सुरुवात केली. आता गणपती बाप्पाच्या दिवसांत उंदरांना कुठे ओरडा? म्हणून शांत राहिले. तसंही त्यांच्या मते फायनल फोटो काढून झालेला..

मैद्याचं प्रमाण द्यायचं राहिलं का? १ कप घ्यायचा मैदा.

किचन वापरतेस तर म्हणजे कधीकधी. >> हो. काल वापरलं किचन (१ सोडून २ रेशिप्या बनवल्यात, आहेस कुठे??) ...आजू-बाजूच्या रेस्टॉरंटवाल्यां कडे सुतकी वातावरण होतं म्हणे काल!!

रच्याकने, मला एकच फोटो दिसतोय, बाकी सगळे ब्लॅन्क आहेत. >> अरेच्या! शेवटचा माबो वर अपलोड केलाय. बाकीचे गूगल ड्राईव्ह वर टाकून लिंक दिल्ये. म्हणून होतेय बहुतेक पण बाकिच्यांना दिसतायत Sad

ज्यांना हाफ़ीसातून फोटो दिसत नाहीयेत त्यांनी आपापल्या मोबाइलवरून पाहा.।। मला फक्त मोबाईल वर सगळे फोटो दिसताहेत।.

सगळे फोटो व्यवस्थित दिसत आहेत. फक्त शेवटचा फोटो लगेच दिसतो आणि बाकीचे पाच मिनिटांनी लोड होतात.

जबरदस्त दिसतोय ब्रेड... तोंपासु!!

मी आत्ताच घोषणेच्या धाग्यावर यामबद्दल मुक्ताफळं उधळून आले आहे. पण इकडे म, ब, ल असे तीन घटक आहेत त्यामुळे य सोडून देता येईल Wink

या मयबल मुळे याम नावाचा एक नवीन प्रकार कळला,
अन्यथा शीर्षक वाचून मला जाम ब्रेड सारखे काहीतरी वाटले होते Happy
छान जमलाय

Pages