नमस्कार मंडळी !!
मायबोलीच्या गणेशोत्सवासाठी 'मायबोली' च्या आद्याक्षरांपासून सुरु होणार्या तीन घटक पदार्थांपासून मी ही गोड पाककॄती स्पर्धेसाठी सादर करीत आहे.
या पदार्थाचे नाव आहे,
मका बेसन शाही रोल्स
लागणारा वेळ - १ तास
साहित्य
स्पर्धेच्या नियमानुसार मुख्य घटक पदार्थ
१. म - मका पीठ -पाव मेजरींग कप
मक्याचे पोहे - ३-४ लहान चमचे
२. ब - बेसन - अर्धा मेजरींग कप
बदाम - अर्धा मेजरींग कप पावडर करुन
३. ल - लोणी - अर्धा मेजरींग कप
इतर साहित्य
१. पिठीसाखर - पाव मेजरींग कप
२. दूध - पाच मोठे चमचे
३. केशर , वेलची पावडर, जायफळ पावडर, बदाम, पिस्ते काप - स्वादानुसार
विशेष सुचना -
या पा. कॄ. त. नियमानुसार लोणी वापरायचे होते. मी यासाठी पारंपारीक पद्धतीने घरी सायीला विरजण लावून ताक करुन जे लोणी काढतात ते घरचे लोणी वापरले आहे.
कॄती
१.सर्वप्रथम बेसन लोण्यात भाजायच्या आधी त्याचा हरवसपणा निघून जावा यासाठी बेसन मंद आचेवर कोरडेच खमंग भाजून घेतले.
२. आता बेसनात थोडे थोडे लोणी टाकत पुन्हा बेसन त्यात भाजून घेतले. मोजून घेतलेल्या लोण्यापैकी पाव भाग लोणी बाजूला ठेवले. बाकी सर्व बेसन भाजण्यासाठी वापरले. बेसनाचा खमंग वास येऊ लागताच ५ ते ६ चमचे दूध घालून गॅस बंद केला.
३. आता दुसर्या कढईत मक्याचे पीठ मंद गॅसवर कोरडेच भाजून घेतले. खरपूस झाल्यावर बाजूला काढले.
४. वगळलेले पाव भाग लोणी एका ताटलीत घेऊन ते मथले.
( खाजाचे कानवले करत असताना जी तूप मथण्याची प्रक्रिया आहे, ती लोण्यावर केली. ज्यांना तूप मथणे माहित नाही अशांसाठी - एका ताटलीत तूप घेऊन ते बोटांच्या पेरांनी घुसळतात जेणे करुन तुपातील रवाळपणा निघून गुळगुळीत पेस्ट बनते, जी कानवल्याच्या सारणासाठी आवश्यक असते.)
इथे तुपाऐवजी लोणीच असल्यामुळे मथण्याची क्रिया झटकन झाली.
५. या मथलेल्या लोण्यात भाजून ठेवलेले मका पीठ थंड झाल्यावर घातले.
६. यातच ग्राईंडरवर वाटून घेतलेली कोरड्या बदामाची पावडर 'शाही' या शब्दाला जागण्यासाठी, तसा शाहीनेस यावा म्हणून मिसळली. दोन ते तीन चहाचे चमचे पिठीसाखरही घातली. किंचित वेलची व जायफळ पावडर मिसळली व फोटोत दाखवल्याप्रमाणे बॉल्स बनवून ठेवले.
७. या स्टेपला अचानक कानात शब्द घुमु लागले की अपार्ट फ्रॉम बेसन अँड लोणी, ' मका' इज ऑल्सो द हिरो ऑफ द डीश' आणि म्हणून साहित्याचा जो फोटो आहे त्यात नसलेला घटक अॅड करायची खुमखुमी आली आणि तो म्हणजे मक्याचे पोहे म्हणजे आपल्या बोलीभाषेत कॉर्नफ्लेक्स. तर थोडे कॉर्नफ्लेक्स हाताने चुरुन या मका, बदामाच्या बॉल्सवर घोळले.
८. इथे पोहोचेपर्यंत बेसन गार झाले होते. मोजून घेतलेली पिठीसाखर गुठळ्या मोडण्यासाठी एकदा ग्राईंडरमधून फिरवून बेसनात मिसळली. बेसन लाडू वळण्यासाठी तयार आहेत.
९. पण गोलमटोल बेसन लाडू तर बनवायचेच नव्हते. तसंच मोदकाचा आकारही मला अपेक्षित नव्हता. म्हणून मी मुदाळ्याकडे कूच केले.
१०. मुदाळ्यात बेसन-पीठीसाखरेचे मिश्रण भरुन मध्यभागी आरपार खळगा केला आणि त्यात वर बनवलेला मका बदामचा बॉल हळूच सरकवून बेसनाच्या आवरणाने वरील भाग बंद केला.
११. मुदाळ्यातून बाहेर काढल्यावर सजावटीसाठी केशर काड्या वापरल्या. तसंच बदाम इज ऑल्सो द हीरो ऑफ धिस डीश, म्हणून बदाम, पिस्ते सजावटीसाठी कापाच्या रुपात विराजमान झाले.
धन्यवाद मायबोली प्रशासन, संयोजक आणि समस्त मायबोलीकर.
आशिका छान केले आहे तुम्ही.
आशिका छान केले आहे तुम्ही. शुभेच्छा!
अरे वा! छान आहे पाकृ.
अरे वा! छान आहे पाकृ. स्पर्धेसाठी शुभेच्छा.:स्मित:
अरे एक नंबर.. गणपती स्पेशल
अरे एक नंबर..
गणपती स्पेशल पदार्थ झाला आहे!
मस्तच.
मस्तच.
मस्तच!
मस्तच!
आशिका सॉलिड भारी. प्रेझेंटेशन
आशिका सॉलिड भारी. प्रेझेंटेशन सुरेख. दंडवत ग बायो तुला. शुभेच्छा.
म हा न ! कल्पकता भारी आहे!
म हा न ! कल्पकता भारी आहे! मी पण भाग घेणार होते...आता नाही घेत :ड
मस्तच. रायगड, भाग घे. (आणि
मस्तच.
रायगड, भाग घे. (आणि नंतर क्रोनिकलचा पुढचा भाग येउदे यावर, कुकिंग विथ फॅमिली )
हा! हा! अमित...तसंही
हा! हा! अमित...तसंही चिरंजीवांना ही स्पर्धा सांगितल्यापासून आपण दोघे भाग घेऊया म्हणून मागे लागलाय. त्याच्याबरोबर काही बनवलं की पुढल्या फॅ. क्रो. ची निश्चिती (पदार्थाची तर आहेच, पण ती नुस्तं मी काही केलं तरी असतेच ) !
मस्तं पाकृ., प्रेझेंटेशन छान
मस्तं पाकृ., प्रेझेंटेशन छान दिस्तंय..
ही प्रवेशिका बघितल्यापासून
ही प्रवेशिका बघितल्यापासून बेलांची फारच आठवण येत होती. कर्मधर्मसंयोगानं आज वेळ आणि साहित्य हाताशी होतं त्यामुळे लग्गेच करून बघितले. जित्याची खोड असल्यानं शॉर्ट-कट मारून सारण म्हणून इलायची घातलेली पिस्त्याची पूड वापरली आहे. एकुणात फारच भारी प्रकार झाला.
व्वा! मस्तचं शाही डिश !
व्वा! मस्तचं शाही डिश !
सिंडरेला -मस्त दिसत आहे
सिंडरेला -मस्त दिसत आहे पदार्थ.
या माझ्या पा. कॄ.ला इतक्या उत्स्फूर्तपणे आलेल्या प्रतिक्रिया पाहून मी केलेल्या श्रमांचं चीज झाल्यासारखं वाटतंय. अगदी घरच्या मंडळींची कौतुकाची थाप पडल्यासारखं फिलिंग!! इतक्या भरभरुन दिलेल्या प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार !
या स्पर्धेची घोषणा वाचताच काहीतरी हटके पण गोड पदार्थ बनवायचा हे पक्के केले होते. त्यानुसार आणि घटक पदार्थांच्या नियमानुसार असं काहीसं सुचलं.
आता या पदार्थाच्या चवीबद्दल - मी वर धाग्यात याबद्दल काहीच नाही लिहीलं हे नंतर लक्षात आलं. तर हा पदार्थ - बाहेरच्या बाजूला बेसन लाडूसारखाच व आतले स्टफिंग अगदी जिभेवर ठेवताच विरघळून जावे असे किंचित गोड व क्रीमी लागत होते. मधुनच बदामाची चव व कॉर्न फ्लेक्सचा क्रिस्पी स्वाद खूप छान लागत होता. घरी सर्वांना आवडला. माझ्यासारख्या गोड घाश्यांसाठी तर पर्वणीच ! आज सकाळी एकच खाल्ला आणि पोट भरले, मग नाश्ता स्किप केला.
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार !
मस्तच!
मस्तच!
अप्रतिम्,अहाहा होतय फोटो
अप्रतिम्,अहाहा होतय फोटो बघून. पाकक्रुती सुध्दा सोपी आणि सहज. स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा.
सिंडरेला, पदार्थ सुंदर
सिंडरेला, पदार्थ सुंदर दिसतोय. पाकृ यो जा टा कृ.
शाही मिठाई झक्कास जमून आली
शाही मिठाई झक्कास जमून आली आहे..
सस्मित, ही इथली कृती वाचूनच
सस्मित, ही इथली कृती वाचूनच पदार्थ केला आहे. याहून दुसरी कुठली यो. जा. आहे?
सुरेख! दिवाळीत करायला हटके
सुरेख! दिवाळीत करायला हटके मिठाई आहे, सिन्डि चे व्ह्रर्जन आणि फोटो पण भारी!
वाह आशिका क्या बात!!
वाह आशिका क्या बात!! प्रेझेंटेशन, फोटो मस्तच... अगदी तोंपासु
@ सिंडरेला. ओह ओके. हा वरचाच
@ सिंडरेला. ओह ओके. हा वरचाच पदार्थ केलाय का?
तुम्ही बेला लिहिलेत आणि मग वेलची चालुन पिस्त्यांचं सारण, म्हणुन मला वाटलं वेगळा काही पदार्थ आहे.
आणि यो जा टा कृ म्हणजे योग्य जागी टायपा कृपया
सुरेख दिसत आहे
सुरेख दिसत आहे
झक्कास!!
झक्कास!!
नुसते फोटो बघूनच खाण्याची
नुसते फोटो बघूनच खाण्याची इच्छा झाली. ही रेसिपी नक्की ट्राय करणार.
वाह!! सुंदर दिसत आहेत शाही
वाह!! सुंदर दिसत आहेत शाही मुदी.
रोल का म्हणते आहेस तू आशिका?
सुरेख ..य्ममी... मस्त दिसतय.
सुरेख ..य्ममी... मस्त दिसतय.
सिंडरेला, सुरेख.
सिंडरेला, सुरेख.
सिंडी खूप सुंदर दिसत आहेत
सिंडी खूप सुंदर दिसत आहेत पिस्तायुक्त शाही मुदी.
पाककृती खासच!
पाककृती खासच!
खरंच शाही पाककृती आहे ही.
खरंच शाही पाककृती आहे ही. करायला जरा कॉम्प्लिकेटेड वाटतेय पण चवीची कल्पना करुन तोंपासु !!
सिंडी, काय फोटो आहे जबरी !! एक मूद तोंडात टाकाविशी वाटतेय लगेच...
Pages