तिचा सूड....... भाग १

Submitted by svaag on 29 August, 2016 - 07:02

तिचा सूड....... भाग १

प्रीती आणि रिया...... एकविसाव्या शतकातील आणि आजच्या आधुनिक युगाला साजेश्या (प्रातिनिधिक म्हणू शकतो) अशा जिवलग मैत्रिणी. एकाच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या. प्रीती नावाप्रमाणेच प्रेमळ आणि रिया तितकीच बिनधास्त.

.....................................................................................................................................

"रिया लवकर यार.... किती स्लो चालवतेस. सगळे एव्हाना पोहोचले सुद्धा असतील आणि आपण, ६ वाजत आले तरी अजून वाईला सुद्धा पोहोचलो नाही. काय करतेयस. चल ना, पळव ना गाडी."

"मॅडम, तुम्ही तर काही बोलूच नका? आयला, एकतर तुझ्यामुळे मी सुद्धा गेले नाही सगळ्यांसोबत आणि वरून मलाच बोलतेस. हाच आटिट्यूड घरी दाखवला असतास ना तर..... जाऊदे. त्यात तुझ्या तीर्थरूप.......... च्याआयला परमीशन देणार होतेच ना, मग इतका वेळ का खाल्ला फुकटचा........."

"ए माझ्या डॅडू बद्दल काही बोलायचे नाही.............."

"आली मोठी डॅडुची प्रिन्सेस. मग तू सुद्धा फास्टचा जप नाही गायचा हा आणि एवढचं वाटत असेल ना तर स्वतः ड्राइव करायचे, कळले. काय यार, त्यांनी लगेच परमीशन दिली असती तर आपण सुद्धा आता सगळ्यांसोबत महाबळेश्वरच्या थंड हवेत रॉक ऑन
म्यूज़िक , डान्स........... मस्त पार्टी करत असतो..............."

"हो ग. पण काय करू. सोड ना."

"ओके, अरे पण लेट झाला हे सुद्धा चांगलंच आहे. नाहीतर हे घनदाट जंगल आणि त्यातून जाणारा हा रस्ता, मस्त वारा आणि त्यावर सुसाट पळणारी आपली कार. क्या बात है. वॉट अं अमेज़िंग एक्सपीरियेन्स." रिया बोलत होती तरीही का माहित मला बेचैन वाटत होते. त्या धुंद करणाऱ्या संध्याकाळी, सुसाट ड्रायव्हिंगची मज्जा घेण्याऐवजी तिथून लवकरात लवकर महाबळेश्वरला कधी पोहोचतो असे झाले होते. रियाला तसे बोलले देखील..... पण ती काय, माझीच खेचत होती. मी उगाचच घाबरत होते की ती येणाऱ्या संकटाची चाहूल होती.

"मॅडम, का प्रत्येकवेळी एवढी सीरीयस असतेस. एनजोय करायला केव्हा शिकणार ग तू, " खरच रियाने माझ्या मनातील भीती लगेच ओळखली होती, आफ्टर ऑल शी इस माइ बेस्ट फ्रेंड. मी मात्र डोळे बंद करून तशीच पडून होते.

प्री...ती.., प्री...ती... अचानक कानावर आदळणारे आवाज ऐकून दचकलेच. डोळे उघडले आणि डोळ्यांसोबत तोंडही उघडले गेले. वूऊव....... वॉट अं अमेज़िंग व्यू ....... धिस इस अ रियल ब्यूटी..... आपसूकच उमटलेला प्रतिसाद आणि सुरु झाला आमचा सेल्फिएस चा क्लिक्लिकाट. मनसोक्त फोटोशुट केल्यावर आमची स्वारी पुन्हा मार्गी लागली. कित्ती मस्त..... ना प्रोफेसरची बडबड, ना घरातली वटवट...... फक्त उनाड वारा आणि अप्रतिम निसर्ग..... असे वाटले हा प्रवास संपूच नये. मनातील भीती काहीशी कमी झाली होती.

सरणाऱ्या दिवसाबरोबर अंधारही वाढू लागला तसे भीतीने पुन्हा डोके वर काढले. "रिया कधी पोहोचू ग आपण. काळोख बघ ना किती आहे. १० वाजत आले. भूक सुद्धा लागली आहे आता."
"डोण्ट वरी प्रितु. वाईला पोहोचूच पाचेक मिनीटात, ते बघ वाई फक्त ५ किमी वर आहे आणि तो बघ बोर्ड.... हॉटेल सनशाईन. तिथेच एखादी रूम बघू, पेटपूजा करू आणि ताणून देऊ मस्त आणि सकाळी वी विल कंटिन्यू अवर जर्नी टू महाबळेश्वर.......... वॉट से."

"नाही" मी जवजवळ ओरडलेच. "आपण इथे कुठेही थांबायचे नाही. नो नीड तो हॉल्ट एनिवेर. वी विल ड्राइव स्ट्रेटली टू महाबळेश्वर. आता डाइरेक्ट्ली तिथेच जाऊन थांबू. मला इथे थांबणे योग्य वाटत नाहीये." माझे शब्द रियापर्यंत पोहोचेपर्यंत आमची गाडी हॉटेलच्या दिशेने वळली सुद्द्धा. आता तिच्यासोबत आत जाणे भागच होते. गेट मधून आत शिरता शिरता कोणाची तरी चाहूल लागली. वळून पहिले तर कोणीच नाही. कदाचित भीतीमुळे भास होत असतील मला.
तितक्यात..... "भॉव...... हाहःहाहा....... कित्ती ग भित्री माझी मैत्रीण.......... हाहाहाहा "

"रिया..... काय ग हे.............. दचकले ना मी" वाढलेल्या श्वासांसोबत रियाच्या पाठीत एक बुक्का दिला.

"देर ईज़ नो वन बिहाइंड उस डार्लिंग. व्हय आर यू सो वरीड? . आपण पिकनिकला जात आहोत आणि तू अशी घाबरून काय मजा करणार आहेस. आइ अम विथ यू. मग का आणि कोणत्या गोष्टीला इतकी घाबरतेस. काढून टाक मनातली भीती अँड जस्ट चिल आउट. ओके?" रियाने मला जवळ घेत समजावण्याचा प्रयत्न केला, नेहमीप्रमाणेच. सो स्वीट ऑफ हेर. पण माझी भीती ह्यामुळे कमी नाही झाली.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

“नो मॅडम, एकही रूम अवेलबल नाहीये. वी आर सॉरी. वी कॅंट हेल्प यू.” – हॉटेल इनचार्ज .

“ प्लिज़ चेक वन्स अगेन." रिया

"मॅडम, जर रूम अव्हेलेबल असता, आइ वुड हॅव डेफनेट्ली अकॉमडेट यू. वाइ वुड ई कीप यू वेटिंग इफ एनी रूम इस वेकेंट. वी आर सॉरी. वी कॅंट हेल्प यू.” बिच्चारा हॉटेल इनचार्ज. ह्या स्थितीतही मला त्याची कीव वाटली आणि हसूही येत होते. गेली १०-१५ मिनिटे तो रीयाशी हुज्जत घालत होता.

"ओके, नो इश्ूझ, आइ होप यू डोण्ट माइंड आम्ही इथे लॉबीत बसून राहिलो तर. राइट?" रियाने बॅग्स सोफ्यावर ठेवताना म्हटले. इनचार्जचे एक्स्प्रेशन्स पाहण्यालायक होते आणि मला मात्र हसू आवरत नव्हते (आइ विश मी इनचार्ज सोबत एक सेल्फ़ि काढला असता, लाईक्सचा रेकॉर्ड ब्रेक झाला असता.................. Happy ).

“रिया लेट्स गो, तसेही इथे रूम अव्हेलेबल नाहीये. सो लेट्स नॉट वेस्ट टाइम न मूव.”

“ नमस्कार मॅडम". , लोकल वाटणारा एक माणूस हात जोडून आमच्याकडे पाहत उभा होता. " मी अजय म्हात्रे. मी एक लोकल ट्रॅवेल एजंट आणि गाईड आहे. हे माझे कार्ड. रोड-वे नावाची एक छोटी ट्रव्हेल एजन्सी आहे माझी." आम्हाला बोलण्याची संधी न देता, कार्ड रियाच्या हातात ठेवत तो पुढे बोलत राहिला "मी मघापासून पाहतोय. इथे रात्र काढण्यासाठी रूम नाहीये. जर तुमची काही हरकत नसेल तर, इथे जवळच एक चांगले हॉटेल आहे. तुमच्यासाठी एकदम सोयीस्कर. तुम्ही बेफिकीरपणे राहू शकाल आणि रेट्स सुद्धा त्यामानाने खूपच कमी आहेत. चला मी दाखवतो तुम्हाला." आमच्या बॅग्स उचलता उचलता आमच्याकडे पाहून बोलत होता. मी काहीशा रागानेच पाहिल्यावर जरा वरमला असेल नसेल पण मला तसा भास मात्र झाला. "नाही म्हणजे तुमची काही हरकत नसेल तरच" अजूनही आमच्या बैग्स त्याच्या हातात होत्या. त्याची ती नजर, बोलण्याची लकब, ओवरॉल मला त्याच्यावर विश्वास ठेवावासे नाही वाटले.

कार्ड न वाचता फक्त हातात उलटे सुलटे फिरवून रियाने मला सोबत निघायला सांगितले. “रिया लिसन, लेट्स मूव फ्रॉम हियर” पण माझ्या बोलण्याकडे रियाचे लक्ष नव्हतेच. हॉटेल सनशाईन मधून आम्ही बाहेर पडलो. “रिया, इथून निघूया ना इथून आणि महाबळेश्वरला जाऊ. आइ अम नॉट कम्फार्टेबल हियर. प्लिज़ रिया. रिया लिसन टू मी” गाडीजवळ येत येत मी रियाला खेचले.

“कम ओन् प्रीती, वाइ यू सो वरीड? . लुक वी नीड तो हॅव रेस्ट आणि त्यासाठी धिस लोकल गाइ गॉना हेल्प उस. हे बघ, आपण जाऊया त्याच्यासोबत, जर तुला त्याने दाखवलेले हॉटेल नाही आवडले तर आपण इमिजिएटली निघू, आइ प्रोमीस. निदान जाऊन बघायला काय हरकत आहे. डोण्ट बे सो नेगेटिव." माझ्या गळ्यात हात टाकत रिया मला समजावत होती. "डोण्ट वरी डियर, मैं हु ना”. शाहरुख स्टायलमध्ये रियाला पाहून मला हसू आले आणि मला हसताना पाहून रियाला बरे वाटले.

अजय म्हात्रे, लोकल गाईड.
आमची गाडी त्याच्या सोबत हॉटेलच्या दिशेने पळत होती.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users