नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिरो मस्तच आहे, मी त्यांच्या फेसबुक पेजला पण कळवलं त्यांच्या. अभिनय उत्तम, सहज त्याचा आणि चेहेऱ्यावरचे सूक्ष्म हावभावपण छान दाखवतो, पण हिरोईन फिकी पडते त्याच्यापुढे. ती नाही मला आवडली. ती पण एक चांगली कलाकार आहे पण इथे नाही आवडली. त्यामुळे नाही बघत मी.

मुख्य नायक-नायिका यांच्यापैकी एकजण नाही आवडलं तर माझा मालिकेतला इंटरेस्ट संपतो.

बन मस्का मला पण आवडतेय. फार्सिकल अंगाने आहे. उगाच डोक्याला शॉट नाही.
फ्रेशर्स पण चांगलीय.
सक्षम मोठा झालाय असं वाटतच नाही>> +१
त्याच धिश्यापिट्या सासू सुनेपेक्षा वेगळं पहायला मिळतय यात समाधान Proud

युवागिरी कोणी बघतं का? तो कार्यक्रम फार सुरेख आहे. मला वेळ असेल तर मी आवर्जुन बघते. रात्री एकदा रिपीट हवा होता तो, पण नसतो.

बन मस्का मधील सौमित्रची g/f voice over artist आहे?
इतक्या दिवसात हा उल्लेख पहिल्यांदाच ऐकला.. सौमित्र सोडून बाकी कोणीच काही काम करताना दिसत नाही..मला वाटलं सगळे college मधे आहेत..

पण साडीमधे ती छान दिसत होती परवा.
तिचं खरं आणि सिरियल मधलं नाव काय आहे?

खरं नाव शिवानी रंगोळे, सिरीयलमधे बहुतेक मैत्रेयी. ती नुकत्याच आलेल्या & नावाच्या मुवीत होती, मृणाल कुलकर्णीची मुलगी.

Aaj l3 madhe tya vinay che baba n raghav yancha dance ky bhari hota ::-D:-D it's really entertaining....hi ekach serial baghat ahe sadhya.

हो भारी होता. त्यांचे दोघांचं एकमेकांना विचारणं डान्स करताना, सॉलिड होतं. मला आवडते L 3. कामे छान करतात सर्वजण. सुमित-काव्या पेअर क्युट. जमायला हवं त्याचं.

अरूण झी फॅमिलीला मी इमेल केली होती असा असा चॅनल अ‍ॅड करा म्हणून. त्यांचा रिप्लाय आला अ‍ॅड केले की कळवतो.. तुम्हीही इमेल करा..

माझा क्लासमेट आहे त्या लव्ह लोचा मध्ये. ओंकार गोवर्धन. चांगलं काम करतो तो..

बस्कु, मस्तच! घो मला असला हवा मध्ये राधिका आणि तो भारी आहेत एकदम Happy क्युट आहे तो..
मी लव्ह, लग्न, लोचा आणि फ्रेशर्स बघते. फ्रेश स्क्रिप्ट आणि अभिनय आहे दोन्हीमध्ये.
इटातं ची थीम चांगली आहे पण स्क्रिप्ट खूप बाळबोध आणि दवणीय वाटतं त्यामुळे एक दोन भागात सोडून दिली.
श्रावणबाळ ok आहे पण तो श्रावणबाळ नॉन महाराष्ट्रीयन असल्यामुळे मराठी वेगळ्याच ऍक्सेन्टमध्ये आणि पाठ केल्यासारखं बोलतो, त्यातून तो कोल्हापूरचा दाखवलाय. पण श्या! भाषेत कोल्हापूरचा ठसका, रांगडा बाज सगळंच मिसिंग..

तो श्रावणबाळ नॉन महाराष्ट्रीयन असल्यामुळे मराठी वेगळ्याच ऍक्सेन्टमध्ये आणि पाठ केल्यासारखं बोलतो, >> तरीच मला.वाटलं होतं की.हा मराठी नसावा.

Aaj l3 madhe tya vinay che baba n raghav yancha dance ky bhari hota >> खरंच भारी होता. मज्जा आली बघताना Happy
घो मला असला हवा मध्ये राधिका आणि तो भारी आहेत एकदम स्मित क्युट आहे तो..>> "घो मला..." पाहिला तेव्हाच तो खुप आवडला. त्यावेळी त्याचं नाव शोधुन काढलं होतं नंतर तो कुठल्यातरी नाटकाच्या प्रमोशनसाठी चहयेद्या मधे आला होता. क्रश आहे त्याच्यावर आणि त्याच्यासाठीच पाहते ही मालिका Happy
सुमित-काव्या पेअर क्युट. जमायला हवं त्याचं.>>+१

भाग्यश्री ओंकार क्युट आहे, खळ्या छान पडतात आणि हाईटपण मस्त.

राघवचे डोळे छान आहे.

तो श्रावणबाळ दिसायला चांगला पण आवडत नाही आधीपासूनच, डायलॉग म्हणता येत नाहीत.

झी युवा वाल्यांनी नं दिलेत, तिथे मी फोन केला होता. दुस-या दिवसापासून झी युवा दिसायला लागलं आमच्याकडे.

Ho mhanun raghav avadto mala n Sumit cha tr kai prashnach nai..good looking ..good acting.. .agdi ideal bachelor type's ahe to ....konihi mulgi premat padel tyachya ...
Yesss sumit kavya cute pair aahe agdi

Kavya la aadhi kuthe tari pahilya sarkh vatate ...chan ahe ti disayla fakt thodi gaddi ahe.. Happy

काव्या आधी झीच्या माझिया प्रियाला प्रीत कळेना मधे होती बहुतेक, मधे स्टार प्रवाहवर व्हिलन होती कुठेतरी. पहीली सिरीयल काही आठवडे बघितली, स्टार प्रवाहवर रुंजी बघितली थोडे दिवस (आमची माधवी होती म्हणून मग कंटाळले, सोडली Wink ) तेव्हा एकदोनदा दुस-या सिरीयलच्या प्रोमोत दिसली होती काव्या, नाव विसरले सिरीयलचं. काव्याचं खरं नाव रुचिता जाधव आहे.

'लव लग्न लोचा' मधे विनयच लग्न शेवटी त्याच्या साठी मुली बघणार्‍या त्या संस्थेच्या ऑफीस मधल्या मुलीशीच ठरेल..

ती संस्थेतली मुलगीच टायटल साँगमधल्या तीन मुलींच्यात आहे, त्यामुळे तीचंच होणार विनयशी. मेन नायिका आहे तीपण.

मी श्रावणबाळ सोडून सगळ्या सिरियल्स बघतेय. मला श्रावणबाळच्या हिरोची डायलॉग डिलिव्हरी नाही आवडत.

तशी मला तंबूची हिरॉईन पण नाही आवड्त. पण त्यातले इतर कॅरॅक्टर्स इतके मस्त आहेत की त्यांच्यासाठी बघाविशी वाटते. तंबूचा पहिला एपिसोड खूप फ्लॅट गेला. दुसरा त्याहून बरा होता. इन्स्पे सावंतानी तो जरा सुसह्य केला. पण त्यानंत्र प्रत्येक एपिसोड्मध्ये काही ना काही धमाल चालूये. आणि काही धमाल सीन्सचे डायलॉग्ज मस्त खुसखुशीत आहेत. इमोशनल इन्स्पेक्टर सावंत, लाऊड जांभळे ("नांदा"मधले काका), भूतांशी बोलणारा ज्ञानू माळी, बहादूर नावाचा भित्रा वॉचमन, शाकाहारी मांसाहारी वाद घालणारे आण्णा इस्माईल, पैसे खाणारा अतरंग, अभिनयाची आवड असणारा चिमाजी आणि रामाश्रयात येणारे वेगवेगळे कस्ट्मर्स त्यांच्या वेगवेगळ्या स्टोर्‍या... सगळं फुलटू धमाल आहे. आत्ता चालूयेत ते गणपतीचे एपिसोड्स बघा. धमाल येतेय... लललो मधला नाच बघताना आली ना तशी...

बाकीच्या सिरियल्स मस्त आहेतच. बनमस्का मध्ये हिरो हिरॉईन छान आहेत पण जास्त मजा हिरोच्या बाबांमुळे, आजीमुळे आणि काही मित्रांमुळे येतेय.
फ्रेशर्स आणि लव्ह लग्न लोचाची स्टोरी आणि सगळे कॅरॅक्टर्स आवडतायत.

फ्रेशर्स आणि लव्ह लग्न लोचाची स्टोरी आणि सगळे कॅरॅक्टर्स आवडतायत.>> मला पण. Happy कोणी अभिनयात कमी पडतंय, ओव्हरअॅक्टींग करतायत किंवा बोअर मारतायत असं काही काही या सिरियल्सच्या बाबतीत अजिबातच नाहीये. सगळे अगदी तोडीस तोड आणि फ्रेश आहेत.

Pages