काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्न, हनीमून होऊन गेलेल्या झी मराठीच्या नायिका नवर्‍याने रोमँटिक होऊन जवळ ओढलं की भूत दिसल्यामुळे बोबडी वळल्यासारख्या एक्स्प्रेशन्स देतात.
>>>>>>>>>>>

Rofl

ही सिरियल नाही बघत आता,,, शिव तर बघवत नाहि आता..
आधी बघत असताना गौरीच इश्श ऐकलं होतं.. एकतर इश्श कोण म्हणतं आता आणि ते ही इतकं कृत्रिम..

भरत..... rofl.gif

अगदी पटलं!!!
मस्त नीरिक्षण!

अगदीच बालिश व कल्पना दारिद्र्य असलेले प्रकार दाखवताहेत. सेट स्पष्टपणे कळून येणारे कृत्रिम घर, बाहेर भांडी घासणे, मोजोंनी सतत तिच्या वर ऑब्सेस्ड असल्या सारखी बारीक नजर ठेवणे, शिव चे खोटे खोटे एक्स्प्रेशन्स..... आणि पूर्वी पण हिने शिव ला मिर्च्या खायला घातल्या होत्या ना...? त्यावर आजीने काहीतरी वेगळाच उपाय सांगितलेला ..बहुतेक दही भाताचा!!

सारखं काय तेच तेच? काल मोजो म्हणे की दूध पाण्याची गुळणी धरुन बसायला सांग तिला... काहीही...!!!!
तुम्हीच आधी मिठाची गुळणी धरुन बसा म्हणावं!!!!!

आजी रॉक्स. जावयाला म्हणते ब्रम्ह राक्षसाला तुमची सर येयाची नाय. जाम टोमणे मारत असते. शिव गौरी पोळी व भाजी बनवतात ते गोड
वाटले पण मिरची लागल्यावर इतका काय तो नाटकी पणा. ग्रोन प आहे ना? त्यापाई नवरा वडील गॅसवर. हे काय? किती लाडवून ठेवले आहे तिला.

भरत अनुमोदन.

दमा आला दमा आला.

या सीरियलपेक्षा त्याचवेळी कलर्सवर लागणारी 'सख्या रे' जरा तरी बघणीय असते. फक्त त्या अभय टिळकचे पोट सोडून.

भरत Lol मस्त पोस्ट

फक्त त्या अभय टिळकचे पोट सोडून. .. >> हिरा Rofl

माझा भाऊ कितीतरी महीने सख्या रेच लावतो, आईला ही सिरीयल लावू देत नाही. माझा टीव्ही बंद असतो यावेळी. पण सख्या रे मधली ज्ञानदा आवडते मला फार गोड, छोटीशी आहे.

आचरटपणा चालू आहे सध्या.

पण गवरी चक्क चांगली दिसत होती अलीकडच्या एपिसोड्समध्ये व अभिनयही बरा करत होती.

भरत. Biggrin

लग्न, हनीमून होऊन गेलेल्या झी मराठीच्या नायिका नवर्‍याने रोमँटिक होऊन जवळ ओढलं की भूत दिसल्यामुळे बोबडी वळल्यासारख्या एक्स्प्रेशन्स देतात.>> Rofl
अगदी अगदी.

सख्या रे मध्ये सुयश टिळकच आहे. पण त्याचं पोट एवढं सुटलंय?? दुराव्यात थोडंसच दिसायचं. Happy

सख्या रे मध्ये सुयश टिळकच आहे. पण त्याचं पोट एवढं सुटलंय??>>> खूप वजन वाढलंय, दुराव्यात स्लिम होता तसा. त्या आधी दुर्वामधे पण जाड वाटायचा, सेम तसाच दिसतो परत. भुमिकेची गरज आहे म्हणून वाढवलं असं कुठेतरी वाचलं.

>>> लग्न, हनीमून होऊन गेलेल्या झी मराठीच्या नायिका नवर्‍याने रोमँटिक होऊन जवळ ओढलं की भूत दिसल्यामुळे बोबडी वळल्यासारख्या एक्स्प्रेशन्स देतात. शिवगौरी श्रीजान्हवीचा कित्ता गिरवताहेत.
--- हाहाहाहा!

अशोक सराफ: "ये अशी मिठीत ये साजणी..."
चारुशीला साबळे: "पाप् पाप् पाप् पाप् पाप् पाप्"
https://youtu.be/M2h0PTS2WCg?t=3m41s

गौरीकडेही गोड बातमी> नाही . ते उगाच शिव नाटक करत आहे.
हे प्रेग्नन्सीचे नाटक म्हणजे शुद्ध गाढवपणा वाट्तोय. काहिही दाखवतात.

अर्रे सगळ्यांनी बघायची सोडली का मालिका?
शिव गौरी बनारसला गेले. हम्मा मध लावलेल्या सुरीने रादर ब्लेडनी गौरीला इथे तिथे जखमा करतेय आणि हे कोणालाही कळत नाहीए. आपल्या नशिबाने गौरीला कळलंय. ती आता ऑफिसातही गेलीय आणि तिथेपण सुपरवुमनगिरी करेल बहुतेक.

तिकडे अम्मा मुन्ना मुन्ना करत बसते, मग सरला शिवला फोनवर ओरडते, तो फोन गौरीने उचललेला असतो, मग ती बाबांना समजावते कि आता ते माझे घर ती माझी माणसे- मला जाऊ द्या, बाबा होकार देतात.

आपल्या नशिबाने गौरीला कळलंय. >>>पण वळत नाही Happy ती अम्मा डोक्यावरचा पदर खाली करून म्हणते कि तुम्हें पल्लू लेने कि कोई जरुरत नही, किचन में काम करने कि कोई जरुरत नही तर हि बया मक्ख चेहे-याने बघत ऐकते. तिकडे माताजी त्यावरुन बोंबलायला लागली. हिने म्हणावे ना कि आता मला सगळीच सुट दिली आहेच तर मला जसे करावेसे वाटते, जे काम करावेसे वाटते ते करु द्या. उगाच आपल्या डोक्यावरून पाणी जाऊपर्यंत बघत बसायचे न मग गळे काढायचे!!!

अरे..किती बोअर करताहेत! म्हणजे डायलॉग्ज पण सलग आणी सुसंगत नाहीत. गवरी काहीतरी म्हणत होती की ये टॅक्सीयोंके बिजीनेस मे "प्रॅक्टीकल" प्रॉब्लेम्स है! म्हणजे काय...ते काही नीट् कळेना....शिवाय सासूला ही नसता शहाणपणा करत्येय असे वाटते ते वेगळेच.
आणि काल तर निशा तिच्या आईला म्हणत होती ..प्रकाश जिजाजी बद्दल..."तो नाही का गं....लग्नात होता बघ....जाडगेलासा, गोल चेहेर्‍याचा...
प्रकाश 'इंजीनीअर' आहेत म्हणे!!....इतकं हसायला आलं....स्वतःचीच हटाई करताहेत हे लोक......

अजून संपली नाही का ही झी मराठीवरची हिंदी मालिका?
झी वाल्यांनी चर्‍हाट वळायाचा कारखाना काढायला हवा!

>>>टायवाला रात्री पण टाय लावून फिरतो.... त्यातच जन्मला वाटतं
कारण त्याला बिझनेस 'टाय'कून व्हायचं आहे Lol

Pages