काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवचे कपडे >>>> काय? गौरी शिवचे कपडे घेऊन मुम्बईला आली? पण ती तर शिववर रागावून मुम्बईला आली होती ना?

डोळसपणे प्रेम करायचं म्हणजे सासरकडच्यांचा विरोध असला, तर प्रेम विसरून दुसरीकडे लग्न करायचं का?>>>नाही, पण पुढे काय होऊ शकते, त्यासाठी आपण काय तयारीत असले पाहिजे किंवा आपल्याला नक्की काय हवे आहे याच विचार तरी करायला हवा. त्यावर होणार्‍या जोडीदाराशी, त्याच्या घरच्यांशी बोलायला हवे. म्हणजे आता होते तशी दोन्ही कुटुंबियांची रडारड तरी थांबली असती. बरे घरच्यांचे सोडा, घरात असे कितीही भांडणतंटे असून सुद्धा एकमेकांबरोबर आनंदात राहणारे असतात तसेही हे दोघे नाहीत.
मधे गोरी शिवला म्हणत असते कि लग्नानंतर इकडे यायचा निर्णय तुझा तू घेतलास, ईथे सतत डोक्यावर पदर घेऊन रहावे लागते...डोके खूप दुखते, आता नोकरी करु नकोस असे सांगतोस. घ्या, म्हणजे फक्त लग्न करायचे एव्हढेच डोक्यात होते का तिच्या?

काय? गौरी शिवचे कपडे घेऊन मुम्बईला आली? पण ती तर शिववर रागावून मुम्बईला आली होती ना?>>> नाही. तो सुद्धा मुंबईला जाणार असतो. पण ती ईकडे तो तिकडे, फोन जवळ नाही, एकमेकांशी नीट बोलणे नाही या गोंधळात तो आपली बॅग भरतो आणि ती बॅग गोरीची म्हणून अम्मा लॉजवर पोचवते.

नोकरीचा इश्यु येईतो सगळं नॉर्मल होतं की. आणि लग्नानंतर नोकरी करता येणार नाही , हे गौरी आणि बहुतेक शिवलाही अनपेक्षित होतं.

मग कमाल आहे. आपल्या घरात कोणीच बाई नोकरी करत नाही तर घरातल्या मोठ्या लोकांना ते आवडेल कि नाही याची थोडी तरी कल्पना शिवला असायला हवी होती.

परप्रांतातल्या, परजातीतल्या मुलीशी लग्न यापेक्षा नोकरी करणं हा मोठा इश्यु आहे का?

तरीपण शिवचं वागणं नोकरीच्या ट्रॅकपासून बदललंय किंवा गडबडलंय किंवा त्याची स्त्रीपुरुष समानता बेगडी आहे. गजरा माळणे, जीन्स घालणे असल्या खर्‍याखुर्‍या प्रागतिक गोष्टीसाठी लावून धरलं; अम्माच्या कामाची कदर व्हावी म्हणून (फसलेलं) नाटक केलं, पण बायकोने नोकरी करावी हे त्यालाच पटत नाही. आता तो स्वतःही नोकरी सोडून दुकानात साड्यांच्या घड्या घालणार आणि घरी रांधा वाढा करणार असेल, तर बरंय.

Happy

काही विशेष नाही , मी ओव्हरऑल म्हणत्येय.
काल किती चांगला दिसत होता !! आणि तो इतका ठाम आहे निशा बद्दल...तर हे लोक त्याला भंडावून सोडताहेत...तिला घरात घे म्हणून.......काहीही...गवरी काल त्यालाच दाटत होती..."काय समजता रे तुम्ही पुरुष स्वतःला.....बायको म्हणजे काय नारळ आहे का..वाटला तर पूजेत ठेवला आणि वाटला तर होळीत टाकून दिला....यंव न त्यंव...!! कोण लिहीतं असले भंपक संवाद....
काहीही!!

बहुदा तोच लेखक असावा..."मी चांगलं प्रेमाचं झाड लावलं होतं..पण त्यावर ही गौरी येऊन बसलीय ना!!" - इति मीतू! !!

धन्स आगो !
अरेरे फारच वाईट डायलॉग...नारळ काय होळी काय, मग काय फक्त स्त्री-दाक्षिण्य म्हणून निशा ला माफ करायच असं म्हणायचं आहे का तिला?

गौरी ते संवाद थंड डोळ्याने म्हणून मग शुन्यात बघत राहिली. पाठ केल्यासारखे म्हटले... त्या निशात काय इतकं बदल पाहिला? आणि ते निशा म्हणजे उपडं घडा प्रकरण आहे.

------
ते शिवचे बाबूजी येवून काय समजावणार होते. ते आपलाच लगाम ओढणार होते की नोकरी करु देणार नाही, त्यामुळे त्या बाबूजीचा फुकटचा आव होता की हम बात करने गये वगैरे. जेव्हा आपलच म्हणणं लादणार होते तो संवाद कसला... आणि मग गौरीच्या बाबाला नाहितरी ते पसंतच न्हवतं. त्यामुळे वाद तसाही होणारच होता.
शिवने गौरीला नीट आधीच का नाही सांगितलं की नोकरी चालणार नाही.? मला तरी मधुसुदन बोलले ते बरोबरच वाटले.... गावंढळ पणे हाजी हाजी करत रहाणे म्हणजे संस्कृती जपणे का?
-------
आजच्या काळात फोनवर चुकामूक, रस्त्यात चुकामूक म्हणजे अतिच....

आजचा कळीचा प्रश्ण- तो शिव काय आता साड्या विकणार काय?

उद्याचा कळीचा प्रश्ण - गौरी ती बॅग उघडून कधी बघणार? ती मग शिवकडे पळत जाईल का त्याचे कपडे पाहून...

>>परप्रांतातल्या, परजातीतल्या मुलीशी लग्न यापेक्षा नोकरी करणं हा मोठा इश्यु आहे का?<<

तो पण इशु होताच ना म्हणून ती अम्मा अजून खेळ खेळतेय...

भरत....ते समजलं हो आम्हाला! पण काय ते लॉजिक आणि काय ती भावशून्य डायलॉग डिलीव्हरी!
ती अशी पाठ केल्या सारखे घडा घडा एकदाचे संवाद म्हणून परत थंड डोळ्यांनी शून्यात बघत बसते.....विशेषतः आता मुंबईला आल्यावर परत पूर्वीची थंड 'ग व री' झाली आहे! बनारस मधे तरी जरा (इतरांच्या संगतीने का होईना) बरे एक्स्प्रेशन्स द्यायची !!!!
आता ती गावंढळ नथनी, आणि सिंदूर .....अर्रार्रा.........

गौरी ते संवाद थंड डोळ्याने म्हणून मग शुन्यात बघत राहिली. >>> अजूनही असंच का? मी मागे डायरेक्ट त्यांना कळवलं, त्यांनी गौरीच्या डोळ्यांवर पोस्ट टाकली तेव्हा. गौरी तू दिसतेस सुंदर, डोळेही सुंदर पण त्या डोळ्यात कधीही भाव दिसत नाही. अभिनयात कमी पडते ही, आणि ह्या पोस्ट ला चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांनीही लाईक केलं होतं Happy .

अन्जु
तिला म्हणावं थोडा अभिनय पण शिकून घे लगेहात

मी नाहीना बघत, मागे पोस्ट टाकून आले. तिने अभिनय शिकायची वाट बघण्यापेक्षा सिरीयल मी बघणं सोडणं जास्त सोपं वाटलं मला Wink .

तेव्हा त्या पोस्टवर हेही लिहीलं होतं, हिच्यामुळे मी सिरीयल बघणं सोडलं. बरेच जण लिहायचे आधी तिथे हिला अभिनय शिकवा पण झीने काय केलं उलट तिला १७६० अभिनयाची बक्षिसं दिली.

आता निशा प्रेग्नंट आहे...! कसं शक्य आहे?
काहीही दाखवतात.
आणि गवरी ला इतकं काय प्रेम त्या निशा बद्दल!

मला वाटतं की हिंदी संवाद लेखक व स्टोरी लिहीणारा आणि मराठी भागाचा संवाद लेखक व स्क्रीप्ट राईटर हे वेगवेगळे आहेत ....नक्कीच! म्हणूनच थोडी गॅप जाणवते. हिंदी चा एकदम फ्युएंट आहे. मराठीचा अगदी थातूर मातूर!
त्याच परिणाम पात्रांच्या अभिनयावरही होतोच!

निशा प्रेग्नंट कशी आहे हा प्रश्न गौरीच्या कुटुंबियांना पडणारच नाही.

आणि नक्की तिने खोटे पेपर्स आणले आहेत.

मला पण तोच प्रश्न पडला की निशा कशी काय प्रेग्नंट ? पण खोटी असेल कदाचित. कालच्या भागात तो जिजा का उखडला होता माताप्रसाद वर? Uhoh उर्मिला वरून काहीतरी झालं का? उर्मिला म्हणजे ह्म्मा आणि माप्र यांची मुलगी की राम ची बायको? हायला राम ची बायको सरला नै का... येळकोट च हाय सगळा Lol

निशाला घराबाहेर काढल्यावर गौरीला घर सोडावं लागलं, मग तिच्या नणंदेलाही. आता उलट्या क्रमाने सगळ्या आपापल्या घरी परत जातील.

सावंतांना माफी मागावी लागू नये म्हणून गौरीच्या नणंदेला दु:खात लोटलं की काय?

गौरीच्या नणंदेच्या नवर्‍याला लाच घेताना रंगे हाथ पकडल आणि सस्पेंड केलय आणि अशा परिस्थीतीत (पैशाची चणचण वगैरे) तिची सासु पोता 'च' द्या म्हणतेय

पोता कसला द्यायचा? लिपापोती करा त्या भुक्कड सासुची ( उर्मिला आणी गौरी दोघींच्या सासवा भुक्कड आहेत) शिव, उर्मिलाला घेऊन त्या मेणचटाशी (रुर्मिलाचा नवरा ) बोलायला जातो, तर त्तो बायकोवर ( उर्मिलावर ) हात उगारतो, शिवच्या वडिलांबाबत वाईट बोलतो, म्हणून शिव त्याला समज देतो. तर उलट मेणचटाची आई ( हिला आहट मध्ये भुताळणीचे काम द्यावे) शिवलाच गुंडा बोलते, आणी उर्मिला आल्यावर मेणचट तिच्या वर हात उगारतो.

गुढीपाडव्याला बनारसमध्ये एकीची गुढी उभारेन मी, असं काहीतरी गौरी म्हणत होती मागे, एक महिन्यापूर्वी प्रोमो बघितला होता त्यामुळे आता ती बनारसला येईल. तो प्रोमो बघून मला वाटलं सिरीयल संपवतील गुढीपाडवा किंवा त्यानंतर पण अजिबात चिन्हं दिसत नाहीत, इथे वाचून. किंवा नवीन सिरीयल प्रोमो पण नाही दिसत.

Pages