खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< लग्नाआधी आपल्या भाच्याची बायको प्रेगनंट आहे म्हणल्यावर अशी प्रतिक्रिया सहाजिकच आहे ना.>> प्रतिक्रिया तर सहाजिकच आहे पण ती व्यक्त करण्याच्या पद्धतिबद्दल म्हणतोय मीं; खरा आघात विक्रांतवर झाला असूनही तो सबूरीने सर्वांगिण विचार करून निर्णय घेतोय व ही ज्येष्ठ गायनॅक आत्या, " आत्तांच्या आत्तां बॅग भरून निघून जायचं इथून " असं दरडावतेय त्या नववधूला, व तेंही विक्रांत किंवा इतर कुटूंबियाना विश्वासात न घेतां ? !! मला तरी अगदींच खटकलं हें !

लग्नाआधी जे काही गोंधळ घालायचे ते घालावेत.... ? ऑ . ?
आपल्या देखिल व्हॅल्यूज इतक्या सैल होत चालल्या आहेत का? की आपण नववधू ने लग्ना आधी काही गोंधळ घातले असतील तरी काणाडोळा करु शकतो?

लग्नाआधी आपल्या भाच्याची बायको प्रेगनंट आहे म्हणल्यावर अशी प्रतिक्रिया सहाजिकच आहे ना.>> +१ नवर्‍यामुलाची आत्या आहे ती. असं बोलणारच. नशीब ती बोलतेय तरी. नाहीतर ती सुध्धा मोठेपणा करुन मॉनिकाला समजुन घेणारी असती तर अगदीच कहर चांगुलपणा झाला असता तो. आधीच नवरोबा करतोय तो हाइट आहे.

मोनिका त्याला म्हणते , मला हे बाळ नकोय . तु गायनॅक आहेस . तु नक्की मदत करू शकतोस .
कोणाला काही सांगायची गरज नाही. कोणाला काही कळणार नाही.
तो तिला " मी एक डॉक्टर आहे" असे म्हणवून उडवून लावतो .

>> ऑ? अ ओ, आता काय करायचं मग म्हणूनच ती तुला सांगतेय ना मठ्ठा..
डॉक्टर नाही तर काय जडीबुटीवाल्याकडे जाणार का या कामासाठी?>>

पियू Uhoh तू नीट पाहिला नाही का तो भाग?

विक्रांत हा एक सुसंस्कृत, सुविद्य,समजूतदार मुलगा व व्यावसायिक गायनॅक दाखवण्यात आला आहे. अचानक लग्नामुळे त्याच्या आयुष्यात . एक प्रचंड गुंता निर्माण झाला आहे. त्यामुळे तो हादरला असला तरीही तो गुंता आपल्या पद्धतिने सोडवण्यावर तो ठाम आहे व तसं त्याने त्या आत्यालाही सांगितलं आहे . अशा वेळीं, इतरानी त्याला सल्ला देणं, परिणामांची जाणीव करून देणं हें ठीक आहे. पण अंतिम निर्णय हा त्याचाच असणं यालाही पर्याय नाहीं. जोपर्यंत विक्रांत तो गुंता सोडवायला कांहीं बेकायदेशीर किंवा अनैतिक मार्ग अवलंबत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचा मार्ग आवडो वा नावडो, पटो न पटो, त्यांत स्वतः ढवळाढवळ करणं योग्य नाहीं, हें एका सुशिक्षित, ज्येष्ठ, व्यावसायिक गायनॅकला , मग भले ती त्याची आत्याही असो, कळणं अगत्याचं आहे. शशिकलाबाईंच्या 'पेटंट' अभिनयाला वाव द्यायचाच होता, तर ती एक अशिक्षित, रुढीप्रिय अशी कुटुंबातील बाई दाखवणं योग्य झालं असतं.

'तू सांग' असा एक सिग्नल आत्याला विक्रांतकडून मिळालेला आहे गेल्याच भागात. पण त्यावेळी उपस्थित नातेवाईकांची दखल घेऊन तिने वेळ मारून नेलेली आहे. आता संधी मिळाल्यावर स्वभावाला अनुसरून आणि विक्रांत-आत्याचे नातेसंबंध हितसंबंध बघता आत्याने मोनिकाला जाब विचारणं चुकीचं नाही.

जाब विचारला तेच बरं झालं. इतर मालिकांप्रमाणे गुळमुळीतपणे वेळ मारून नेणं वैतागवाणी झालं असतं. परव विक्रांतने आणि काल आत्याने मोनिकाला फटकारलं ते बघायला बरं वाटलं.

<< तू सांग' असा एक सिग्नल आत्याला विक्रांतकडून मिळालेला आहे गेल्याच भागात.>> 'प्रेग्नन्सी' आपल्याला कळलीय, एवढंच सांगण्याचा प्रश्न होता; जाब विचारणंही समजण्यासारखं आहे. पण लग्न तात्काळ मोडण्याच्या किंवा मोनिकाला तात्काळ घरांतून हांकलून देण्याच्या पिरोधात आपण असल्याचं विक्रांतने स्पष्ट केलं असतानाही आत्याबाईनी विक्रांत व इतर कुटूंबियाना विश्वासात न घेतां स्वतःच असं करणं, याबद्दल माझं दुमत आहे.[ मी मोनिकाचं वकीलपत्र घेतलेलं नाहीं ; फक्त विसंगति लक्षांत आली व खटकली, म्हणून सांगितली . :डोमा:]

बादवे थंडाक्का गौरी नंतर थंडोबा मिळाल्याच लक्षात नाही आल का कोणाच्या? सगळे डायलॉग्ज चेहर्‍यावर "उद्या आलीय जगबुडी अजुन केवढ काय काय करायच आहे मला" असे भाव घेउन म्हणत असतो.>>>>>>हा हा हा हा हा हा ...... पण तो कारेदू मध्ये होता ना तेव्हा तिकडे बराच ऍक्टिंग करायचा आता काय झाले त्याला ?????

एकुणात टीव्ही मालिकांचं लेखन आणि दिग्दर्शन करणे हे एक अतिशय सोप्पं आणि डोक्याला शॉट न देणारं काम असावं. इतक्या सहजपणे लॉजिक गुंडाळून ठेवतात हे लोक. लग्न झाल्यादिवसापासून नवरा मुलगा एरंडेल प्यायला सारखा चेहरा करून वावरतोय हे त्याच्या आई वडीलांच्या सुद्धा लक्षात येऊ नये ? आवरा...

अभिनेता दिग्दर्शकाच्या सांगण्या प्रमाणे काम करतोय बहुतेक. का रे दुरावा मधे चांगला एक्सप्रेसिव चेहर्यानी वावरायचा.

आत्तांच्या आत्तां बॅग भरून निघून जायचं इथून " असं दरडावतेय त्या नववधूला, व तेंही विक्रांत किंवा इतर कुटूंबियाना विश्वासात न घेतां ? !! मला तरी अगदींच खटकलं हें !>>> शशिकला बाई ज्या सिरियल मध्ये असतात त्या सिरियल मधल्या नववधू सुन्नाना हाकलण्याचे काम का करतात तेच कळत नाही.

कालच्या भागातली निर्मलाची वेषभुषा खटकली. काय ती साडी? काय तो ब्लाउज? तिच्या gynec प्रोफेशनला हा costume खटकतो.

निर्मला इतर शब्द जसे की very smart, चान्गली सून मोनिकाला वापरते ते मात्र इतर घरच्यान्ना बरे ऐकु येतात्,पण मूळ बोलणे मात्र ऐकू येत नाही, तेही निर्मला चक्क ओरडत होती तिच्यावर तरीही? कसे शक्य आहे?:अओ:

शैलजा.... Happy
त्या विक्रांतची कळी कधी खुलणार कोण जाणे! मानसी त्याच्या आयुष्यात आल्यावर बहुधा.......
पण तो अभिनय ठिक करतोय असे वाटते....त्याच्या सध्याच्या मानसिकतेला अनुसरुनच आहे ना. पण तो काही डॉक्टर वाटत नाही बुआ! बाकी काम ठीक करतोय. होपफुली, तिला तो लवकरच बाहेरचा रस्ता दाखवेल.

विक्रांत ठीक करतोय अ‍ॅक्टींग.
मला निर्मला पटली. वेष्भुषा, साडी, ब्लाउज, केस, अभिनय, संवाद. तिचं कॅरेक्टर जे काही वागतंय ते ही पटलं.

मोनिकाला विक्रांत घराबाहेर नाही काढू शकणार. त्याच्यातला गायनॅक त्याला हे नाही करू देणार. काल नाचताना त्याने मोनिकाला थांबवलं. तिच्यातल्या गर्भाची, नवीन जीवाची तो काळजी घेणार. मोनिका त्याच्या ह्या कमजोरीचा गैरफायदा उठवणार. विक्रांतमधल्या नवर्‍याला त्याच्यातला डॉक्टर स्वभावाविरुद्ध वागायला लावणार. मानसीला ही गोष्ट कधी ना कधी कळणार. मग तिची सहानुभुती विक्रांतला. सहानुभुतीतून सहवास, बहिणीच्या वर्तनाची आपोआप भरपाई. मोनिकाला मानसी विक्रांतची जवळीक डाचणार. विक्रांतची बाजू मांडायला आत्या आहेच.

"मानसीला ही गोष्ट कधी ना कधी कळणार. मग तिची सहानुभुती विक्रांतला. सहानुभुतीतून सहवास, बहिणीच्या वर्तनाची आपोआप भरपाई. मोनिकाला मानसी विक्रांतची जवळीक डाचणार. "
मंजुडी , दोनच ओळीत पुढच्या सहा महिन्याचे भाग एकदम सांगुनच टाकले की..... Lol Lol Lol
मालिका हळु हळु पुढे जातात.

किंवा कुठल्यातरी मालिकेतील अन्विता. मालिकेचं नाव विसरलो.

मंजुडी - नविन मालिका लिहिताय का? परफेक्ट लॉजिक.

कालच्या भागात ति doctor मोनिकाच्या अन्गावर कागदाचा लगदा फेकते ते खटकले. मान्य आहे कि, मोनीका चुकीची वागली पण ती doctor जरा जास्तच रुड वाटली.

मोनिकाला मानसी विक्रांतची जवळीक डाचणार. विक्रांतची बाजू मांडायला आत्या आहेच.>>>> नाही, उलट ती मानसीलाही दोष देऊ शकते. मोठी बहीण अशी, धाकटी तर तिच्या एक पाऊल पुढे, आपल्याच बहीणीच्या नवर्याला गटवल. अस आत्याला वाटेल.

मालिकेचे नाव खुलता कळा खुलेना असे हवे !!!>>>>:हहगलो:

किंवा कुठल्यातरी मालिकेतील अन्विता. मालिकेचं नाव विसरलो.>>>> स्वपनान्च्या पलिकडले, ती माधवी निमकर. सध्या ती पुढच पाऊल मध्ये आहे.

कागदाचा लगदा? Uhoh
डॉक्टरला तो कागद पाण्यात भिजवण्याएवढा वेळ कधी मिळाला?
मी तर बोळा फेकलेला पाहिला.

मी तर बोळा फेकलेला पाहिला.>>>> धन्स मन्जुडी, खरतर मला बोळाच म्हणायचा होता, शब्द सुचला नाही ऐनवेळी. Happy

तू नीट पाहिला नाही का तो भाग?
>> नाही गं. मी नाही पाहिला तो भाग.

काल ती गायनॅक जे वागतबोलत होती ते बरोबर होते का? प्रोफेशनली आणि एथिकली? मलाही ती प्रचंड रूड वाटली. अगदीच हडतूड केलं. तर मला ते खूप विचित्र वाटलं. इथले डॉक्टर मायबोलीकर प्रकाश टाकू शकतील का? नवरा (असल्यास) त्याच्या परवानगीशिवाय गर्भपात करणे बेकायदेशीर आहे का? Uhoh

जानु दिड वर्ष प्रेगनंट दाखवली होती. इथे, मोनिका नाही, मॉनिका आत्ताच तीन महिन्यांची प्रेगनंट आहे. जानुचा रेकॉर्ड या मालिकेत मॉनिका तोडणार का? Happy
मॉनिका आत्तापर्यंत मलातरी जराशी वेडसर वाटली. Sad
मानसीपध्दल अजुनतरी फारसे काही समजले नाही आहे. तेव्हा तिला नंतर बोलेनच!
हिंदू धर्मात शिख किंवा इतर ध्रर्मात डॉक्टर दाढी ठेवत असतीलही, पण अजुनतरी मी दाढीवाला मराठी डॉक बघितला नाही आहे. दाढी ठेवायची इतकी हौस असेल तर एकतर त्याचा व्यवसाय बदला नाहीतर, त्याची दाढी काढा.
इथे, आशा शेलार बहुदा, शशिकला पार्ट २ दाखवणार आहेत. Happy
जुयेरेगा मध्ये लोकेश गुप्ते मोठा भाऊ दाखवला होता. यावेळी प्रमोशन, चक्क काका! मग पुढल्या मालिकेत आजोबा का! Happy
मालिकेतले कलाकार बघता मालिका किमान २ वर्ष चालेल अशी आशा आहे.

माॅनिका ऑलरेडी साडेतीन महिन्यांची प्रेग्नंट आहे.... विक्रांत तिला अॅबाॅर्शन करू देत नाही.. कालच्या भागात घरच्या लोकांशी खोटं बोलावं लागलं म्हणून चिडचीड करत होता.. नंतर लग्नानंतर महिन्याने बायको साडेचार महिन्यांची प्रेग्नंट दिसेल तेव्हा हा काय सांगणार आहे.

Pages