खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहीला भाग थोडाच पाहीला पण आता प्रोमो मुळे उत्सुकता ताणली गेल्ये - ही प्रेग्नंट आहे - असं काहीतरी नायक म्हणतो ना.

नक्की भानगड काय आहे ? नायकाचं ठरलेल्या मुलीशी लग्न होतं की नाही ? ४-५ वाक्यात गोष्ट सांगेल का कोणी ?

आंबट गोड, तुमची प्रोमोबद्दलची तक्रार पाहिली वाटतं झी वाल्यांनी. काल कादिप मध्ये शिवने तो प्रोमोवाला डायलॉग मारला ' गवरी हो या गौरी है तो शिवकी ... Proud

Happy हो....
पण तो अजून 'नौरी'...म्हणत नाहीये....व्हायचीय ना अजून!

मालिकेचे संवाद लेखक / लेखिका कोण आहेत? काल ती मोनिका नवरा बाजुला असताना स्वत:च्या लग्नात आग्रह करताना म्हणते कि "मी काही सारखी सारखी लग्न करणार नाही आहे???" त्यावेळी मी समोर बसलेले असते तर माझ्याच घश्यात घास अडकला असता! त्या विक्रांतचा चेहरा पुर्ण वेळ एरंडेल प्यायल्यासारखा का होता?

वरती कोणीतरी प्रोमो आणि मालिकेचे लिहिले आहे. प्रोमोत एक आणि मालिकेत वेगळेच दाखवायची झी मराठीची जुनी परंपरा आहे. आठवा जुयेरेगा. प्रोमोमध्ये एका रंगाचा शर्ट आणि एपिसोडमध्ये दुसराच शर्ट दाखवला होता ना!

त्या विक्रांतचा चेहरा पुर्ण वेळ एरंडेल प्यायल्यासारखा का होता?>>>> जिच्याशी लग्न झालेय ती प्रेग्नण्ट आहे हे लग्नातच कळल्यावर चेहरा एरंडेल काय विष प्यायल्यासारखा होणारच ना.

आता बहुतेक विक्रांत आणि मोनिका मध्ये ,लग्न झाल, तरी नवरा बायको च नात नसणार .
तो मानसी च्या प्रेमात पडणार . पण घरच्यांमुळे त्यान्च चोरी चोरी चुपके चालु राहिलं .>>> पण असे दाखवणे चुकीचे आहे. विक्रान्त मोनीकाला दोष देतो, पण तो जर लग्नानन्तर तिच्या बहीणीच्या प्रेमात पडला तर त्याच्यात आणी मोनिकामध्ये फरक काय तो राहणार? मानसीला हे क़़ळायला नको का? एका प्रकारे हे extra marital affair च झाले. लोकान्ना ही कथा आवडणार नाही कदाचित. TRP कमी होऊ शकतो.

नेहमीप्रमाणे नविन मराठी सिरियल आली कि उत्साहाने पहायला सुरुवात करायची आणि एखाद्या आठवडयात तिचा रंग कळला कि पहाण सोडुन द्यायचं, या परंपरेसाठी 'खुकखु' पाह्यली. पण या वेळेस आठवडाभर पहायचीही शक्ती राहिली नाही. २ एपि. नंतर पहाणं सोडुन देण्यात आलं आहे.
झी मराठीच्या परंपरेनुसार पहिल्या एपिसोडपासुन खोटेपणा आणि लपवाछपवी चालु झाली आहे. आता प्रेक्षकांचा अंत पाहिपर्यंत किमान वर्षभर चालुच रहाणार. हिरो महान नाही, मुर्ख वाटला. प्रेग्नन्ट मुलीला लॉजिकल कारणासाठी अ‍ॅक्सेप्ट करणं वेगळ आणि मनाविरुद्ध कुढत, मजबुरी म्हणुन लग्न करण वेगळं. आणि ते ही गरज नसताना. त्याने जे कारण सांगितल ते अगदीच स्ट्युपिड होतं..... म्हणे कळालं तर आई मरेल. मग २ महिन्याने bump visible झाल्यावर काय आई आनंदाने नाचणार आहे का कि कशी माझी सुन क्विक आहे. लग्नानंतर २ महिन्यात ४ महिने प्रेग. आहे. क्रॅप !

एका प्रकारे हे extra marital affair च झाले. लोकान्ना ही कथा आवडणार नाही कदाचित. TRP कमी होऊ शकतो. >>>> Lol सुलु, सॉरी, पण तु अगदीच आदर्शवादी आहेस की. लोकांना अशा कथा आवडतात हे अनेक सिरियल्सनी प्रुव केलं आहे. प्रेमात पडणं आणि मॅरिटल स्टेट्सचा संबंध नाही. हा एका धाग्याचा आणि कदाचित माबो युद्धाचा विषय होवु शकतो. Wink

मग २ महिन्याने bump visible झाल्यावर काय आई आनंदाने नाचणार आहे का कि कशी माझी सुन क्विक आहे. लग्नानंतर २ महिन्यात ४ महिने प्रेग. आहे. क्रॅप !>>+१

मस्त समरी मनिमाउ...

म्हणजे हिरोचं लग्न ठरलेलं असत वेगळ्या मुलीशी - बहीणीशी - आणि करतो जी प्रेग्नंट आहे तिच्याशी का ? >>>>

नाही गं .

जिच्याशी लग्न ठरलं असतं ती प्रोग्नंट आहे , हे त्याला लग्न लागताना कळत. बाकी कोणाला माहित नसतं .
तिच्या आणि त्याच्या घरच्यांसाठी तो लग्न मोडत नाहे .
आणि नेहमी प्रमाणे तिची धाकटी बहिण सालस , सद्गुणी वगैरे आहे .
आता तो तिच्या प्रेमात पडेल असं आम्हा काही लोकांना वाटतं .

अरे राम!! प्राजक्ता_शिरीन, अगं त्याचं लग्न हिच्याशीच ठरलेलं असतं, पण लग्नात फेरे घेतांना नाडी परीक्षेवरुन त्याला कळतं की ती प्रेग्नंट आहे. (तो निष्णात नाडी तज्ञ असतो! ) पण तो तिथेच सांगत नाही कारण त्याच्या आईला धक्का बसेल. (त्याच्या भाषेत - मी एक आयुष्य उध्वस्त करण्या ऐवजी अनेक आयुष्यं वाचवतो आहे!! )
Happy
आता लहान बहीण अगदी समजूतदार आणी लोभस इ इ आल्याने तो साहजिकच तिच्या प्रेमात पडणार!

काल चा भाग पाहिला थोडा. काय तो नवरीचा उखाणा! आणि बहीण तरी किती भोचक आणि बिन्डोक ! कारेदु मध्ल्या नवर्‍यांचा स्वभाव इथेही कंटिन्यु झालाय!

नाही गं प्राजक्ता, लग्न बरोबर ठरलेल्या मुलीशीच झालं आणि लग्नात सप्तपदी घालताना हिरोला कळलं की ती प्रेग्नेंट आहे. (हिरो गायनॅक आहे आणि नाडीपरीक्षा शिकलेला आहे असं त्याची आजी म्हणते)

ओह ओके, धन्यवाद Happy

पहील्या भागात ते दिवा विझणं वगैरे बघून वाटलं की हिच्याशी न करता तिच्याशी करतो की काय Wink

प्रोमोवरून बांधलेला अंदाज चुकला म्हणायचा Wink

लग्नाआधी एकदाही विक्रांत आणि मोनिका एकमेकांना भेटले नसल्यासारखे वाटताहेत. मोनिकाबद्दलची धक्कादायक बातमी कळायच्या आधीही एकदाही विक्रांतच्या डोळ्यात ओळखीचं हसू नाही की लग्नाची हूरहूर नाही. सासरी आल्यावर मोनिका सासरचं घर पहिल्यांदाच घर बघत असल्यासारखी घरभर नजर फिरवते.

नाडीतज्ज्ञ गायनॅक विक्रांत एकदाही आपल्या गायनॅक आत्याला सांगत नाही की मोनिकाची प्रेग्नन्सी क्लिनिकली प्रूव्ह केल्याशिवाय आपण काहीही करणं योग्य नाही.

उषा नाडकर्णीला खोचक आजी/ सासू आणि आशा शेलारला वितंडवादी भूमिकेतून बाहेर काढा कोणीतरी. बाकी आशा शेलार या मालिकेत चांगली गबदूल दिसतेय.
शर्वरीची भूमिका आवडतेय. मस्त काकू दाखवली आहे. गालावर खळ्या पाडत तिचं 'मॉ'निका म्हणणंही आवडतंय.

शीर्षक गीत मस्त आहे. फक्त त्यातलं 'पारणे हे 'मनाचे' फिटेना' हे खटकतंय.

मोनिकाबद्दलची धक्कादायक बातमी कळायच्या आधीही एकदाही विक्रांतच्या डोळ्यात ओळखीचं हसू नाही की लग्नाची हूरहूर नाही >> हो ना . त्या मानसीलाही लग्नमंडपात बघितल्यावर , पहिल्यान्दाच बघितल्यासारखा भारावून जातो .

एकंदरीतच दोन घरात काहीच जिव्हाळा दिसत नाही .

>>फक्त त्यातलं 'पारणे हे 'मनाचे' फिटेना' हे खटकतंय<< अहो, अक्खी शिरेल च खटकते आहे हो...ते भेंभा [थँक्स दक्षिणा, ह्या शब्दासाठी] काय यडचाप आहे काय्...त्या [आगाउ, बिनधास्त, इ.इ.] मोनिका ला काही ही फैलावर न घेता तीच्या बरोबर लग्न काय करतयं, रिसेप्शन ला काय उभं राहतयं बेणं, अगदीच पुचाट Sad शून्य मार्क

रिपिट टेलिकास्ट कधी असतो या मालिकेचा? Uhoh (रात्रीचा)

आणि कथा पण थोडक्यात सांगा जरा मला पहिल्यापासून... उद्या पासून पहायला सुरू करून मी पण पिसं काढायला येतेच Proud

दळवींच्या घरात आज आली संक्रांत अन मला पाहून खुश झाले विक्रांत...असा काहीतरी !!!
Biggrin
हॉरिबल आहे ती! इतकी कशी काय निर्लज्ज पणे सहज वागू शकत्ये?

दळवींच्या घरात आज आली संक्रांत....ते अ‍ॅक्च्युअली दळवींच्या घरावर आज आली संक्रांत असे हवे होते बहुदा Lol

Pages