खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<<बहिणी-बहिणींचा साड्यांचा सीन अजिबात नाही पटला. वधू आपल्या बहिणीला सांगते की तुझी साडी माझ्यापेक्शा चांगली दिसते आहे, जा जाऊन बदलून ये अ ओ, आता काय करायचं
लग्नात कोण कुठली साडी कधी नेसणार याचे बहिणी-बहिणींचे प्लॅन्स किती आधीपासून चालू असतात! मग वधूला आधी नाही सांगता आलं की एकावेळी एकसारख्या रंगांच्या साड्या नको नेसायला ??!!
आणि नंतरही दोघींच्याही पिवळ्याच साड्या होत्या की अ ओ, आता काय करायचं

हिरॉईनची एंट्रीची हेअरस्टाईल, मेक-अप, गेट-अप भीषण वाटला मला... डाव्या खांद्यापाशी केसांत कसल्या जास्वंदीच्या लाल मोठ्या पाकळ्या लावून ठेवल्या होत्या अ ओ, आता काय करायचं

या सगळ्यात नवरदेव घरातून निघतानाच मुंडावळ्या बांधूनच निघतो या बाबीचा अनुल्लेख करावा लागला >>>>>+१००

बहिणी-बहिणींचा साड्यांचा सीन बघुन मला वाटल की सेम साड्यांमुळे चुकुन दुसरीच्या गळ्यात माळ घालणार असे काहीतरी असेल Wink

हीरॉईन किती टापटिपीची, व्यवस्थित काम करणारी आहे आहे हे दाखवण्यासाठी तो 'प्रत्येक बॅगेवर लेबल लावुन ठेवलेला' सीन उगाच घुसड्ला होता..

काय टिपिकल भाग होता पहिलाच. मालिकेचं पॅकेजच कळलं Proud

वधू गौरीहार पुजतानाचा सीन अगदीच बळंच. ती जागा आणि वेळ आहे का वराला ते सांगायची? लग्न ठरवतानाच नसेल का सांगितलं हे?- पण प्रेक्षकांना माहित नाही म्हणून हा सीन.
सेम साड्या- हे दाखवायला की मोनिका कशी स्वार्थी आहे वगैरे हा सीन.
नाडीपरिक्षातज्ञ आहे तो डॉक्टर. त्यासाठी त्याच्या आईला आधी चक्कर आणून पाडलं आणि मग वधूला. अमर अकबर अ‍ॅन्थनीमध्ये नाही का नीतू सिंग परवीन बाबीला तपासून 'ये मां बननेवाली है' म्हणत- तीच कॉपी. पण तिथे ती खोटं तरी बोलत असते. इथे ते खरंच आहे!!

शून्य कल्पनाशक्ती आणि मायनस गुणांची क्रियेटिव्हिटी!

चला, शांतपणे टीव्ही बंद ठेवून जेवता येईल हा एकच मोठा फायदा या सिरियलचा! Wink

मागच्या पानांवर कोणीतरी लिहिल आहे की, डोळ्यांच्या धाकात ठेवणारी आजी >> काल्च्या भागावरुन तरी उषाताईंची आजी नेहमी प्रमाणे तोंडाचा पट्टा सोडणारी आजी असेल असेच वाटते. गाडीला हार घालायला सजवायला दोरा कमी पडला अस तो कोणी सांगतो तर आजीबाई म्हणतात तुझ्या पॅटची नाडी वापर Uhoh

जानूच्या आईचं श्रीमंत व्हायचं स्वप्न झी वाल्यांनी या शिरेलीत पूर्ण केलंय. डोळा मारा>> मलाही अगदी हेच वाटलं त्यांना पाहून Happy

का रे दु मधले बरेच लोक दिसताहेत इथे! Happy
आणि त्याची वहिनी ...ती एक धागा सुखाचा मधली कस्तुरी ना?
साई प्रसाद समहाऊ ऑर्डीनरीच दिसतो!

आणि त्याची वहिनी ...ती एक धागा सुखाचा मधली कस्तुरी ना?>>> अजुन कशात होती का ती? मलाही ओळखीची वाटली.

काय टिपिकल भाग होता पहिलाच. मालिकेचं पॅकेजच कळलं फिदीफिदी

वधू गौरीहार पुजतानाचा सीन अगदीच बळंच. ती जागा आणि वेळ आहे का वराला ते सांगायची? लग्न ठरवतानाच नसेल का सांगितलं हे?- पण प्रेक्षकांना माहित नाही म्हणून हा सीन.
सेम साड्या- हे दाखवायला की मोनिका कशी स्वार्थी आहे वगैरे हा सीन.
नाडीपरिक्षातज्ञ आहे तो डॉक्टर. त्यासाठी त्याच्या आईला आधी चक्कर आणून पाडलं आणि मग वधूला. अमर अकबर अ‍ॅन्थनीमध्ये नाही का नीतू सिंग परवीन बाबीला तपासून 'ये मां बननेवाली है' म्हणत- तीच कॉपी. पण तिथे ती खोटं तरी बोलत असते. इथे ते खरंच आहे!!

शून्य कल्पनाशक्ती आणि मायनस गुणांची क्रियेटिव्हिटी! >>>> +११११११

अजिबात आवडला नाही कालचा भाग, बोअर. नायिका काल तरी आवडली नाही. पुढे कशी वाटते बघायला मालिका बघावीशी वाटत नाही.

ह्याला पूर्ण लग्न व्हायच्या आधी संशय येतोना मग लग्न कुठे थांबवतो, ते तर होतंच. तिला चक्कर येते तेव्हा नायिकाच जास्त सारवासारव करताना दिसली. हा पण ठामपणे म्हणत नाही की मी डॉक्टर आहे, मी बघतो. जाऊदे आपल्या हातात रिमोटची मोठी सोय आहे.

मला पण नाही आवडला कालचा भाग.

विक्रांतची अॅक्टींग आवडलीच पण. चेहर्‍यावरचे एक्सप्रेशन्स पण छान बदलतो तो.

नायिकेची मराठीची बोंब दिसतेय. वेगळ्याच अॅक्सेंटमध्ये बोलते. त्यामुळे ते कृत्रीम वाटलं मला तरी.

नायिकेची मराठीची बोंब दिसतेय. वेगळ्याच अॅक्सेंटमध्ये बोलते. त्यामुळे ते कृत्रीम वाटलं मला तरी. >>> अगदी अगदी .

ताई , ते आले ... एक्दम फिल्मी !!
आणि मागे वळून बघताना मोनिका एक्दम भयाण दिसत होती .

केतकर काकूंच प्रमोशन झालं -- आजी झाल्या .
नवरे दिसले .

साई प्रसाद समहाऊ ऑर्डीनरीच दिसतो!
>>>>>>>>>>
हारा हुवा खिलाडी .. केविलवाणा ..दिसतो.. >>> + १०००००

नाडी परिक्षा करणारे बर्याच लहान सहान गोष्टी सांगू शकतात , हा माझा वैयक्तिक अनुभव आहे .
केवळ या एका कारणामुळे , मला एरवी न आवडणार्या डॉ . बद्दल मला अती आदर आहे .

लग्नात नवरदेव सोडुन बाकी सगळे पुरुष सफाचट होते. किमान स्वतः:च्या लग्नाच्या दिवशी तरी दाढीचे खुंट कापायला हवे होते!

सविता प्रभुणे कायमच डोक्यात जाते, अतिशय लाऊड अभिनय आहे, काय ते डोळे फिरवण आणि काय ते बाई बाई बाई :|

आधी वाटलं होत परदेस ची स्टोरी आता शिरेलीत दिसणार पण हे काय दुसरच निघतंय की, आता कुणा कुणाच्या नाड्या तपासणार डॉक्टर ? Uhoh

आईना च कथानक असणार अस दिसतंय आधी नाकारणार मग बहिणीच सुख हे कस आपलच सुख आहे त्यावर कसा आपलाच अधिकार आहे हे सांगत हक्क मागणार वाटत बाई. आठवड्यातन एकदा बघायला हरकत नाही.

पण आईना मधे अमृता आधीच पळून जाते आणि जुहीशी लग्न होतं, इथे बहुतेक अभिज्ञाचा प्रियकर लग्नाला नकार देत असेल म्हणून ती ह्याच्याशी लग्नही करते. असो अभिज्ञा बरी वाटली मला. एकदा लग्न झाल्यावर फार कॉम्पलीकेटेड असणार.

बरं नायिकेला बहिण प्रेग्नंट आहे हे माहित नसणं असू शकतं पण बहिणीचं अफेअर आहे किंवा होतं हे तरी माहिती असेलना. असो कदाचित स्टोरी काही वेगळीच असायची.

शिर्षक गीत creative होत, छान होत. नेहमीसारखे हिरो-हिरोइनचे posters नाही दाखवले गाण्यात. Sand Art चा वापर छान केला होता.

नायकाच लग्न होत ना, मग तो नायिकेच्या प्रेमात कसा काय पडेल? जर नायक नायिकेशी extra martial affair करताना दाखवणार असतील तर मात्र् हे चुकीचे आहे. बायको कशीही असली म्हणून काय झाले? मुळातच मला कुठल्याही सिरीयल-चित्रपटात हे extra martial affair दाखवले की चीड येते. मी एकता कपूर च्या सिरियल्स याच कारणासाठी बघणे सोडून दिले.

ताई , ते आले ... एक्दम फिल्मी !!>>> मला बालगन्धर्वानच्या नाटकाची आठवण आली. Lol दादा ते आले ना!

सविता प्रभुणे कायमच डोक्यात जाते, अतिशय लाऊड अभिनय आहे, काय ते डोळे फिरवण आणि काय ते बाई बाई बाई :| >>>> मला ते तिच आजारी पडण बघून जावई विकत घेणे आहेची आठवण आली. म्हटल इथे सुद्दा नाटक करते की काय?

हारा हुवा खिलाडी .. केविलवाणा ..दिसतो.. >>> + १०००००>>>> लग्नासाठी पकडून आणलय की त्याला असे वाटत होते.

Pages