दादा कोंडके यांचे चित्रपट

Submitted by उडन खटोला on 26 June, 2016 - 00:51

मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच किंबहुना त्याहूनही सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत . अनेक रजत्/सुवर्णमहोत्सवी चित्रपट या गुणी कलवंताने दिले.

परन्तु त्यानी बनवलेले चित्रपट डीव्हीडी /डाउनलोड या माध्यमातून उपलब्ध नाहीत ,त्याचप्रमाणे मराठी टीव्ही चॅनेल वर देखील दाखवले जात नाहीत . यामागचे कारण नक्की काय आहे? कॉपीराइट संबन्धी किंवा त्यांच्या वारसाहक्कावरून काही वाद असल्याचे मागे ऐकिवात होते . परन्तु अशा कारणासाठी उत्तमोत्तम व सुपरहिट मराठी चित्रपटांचा खजिन्यापासून जनसामान्य प्रेक्षक वन्चित राहणे योग्य वाटत नाही .

यासंबंधी कोणास माहिती आहे का? व ते चित्रपट डीव्हीडी च्या माध्यमातून किंवा चॅनेलवर लावण्यासन्दर्भात काय करता येइल?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झी क्लासिक वर खूप आधी अमजद खान अन दादांचा "तेरे मेरे बीच मे" पाहिला होता, तो एक लाफिंग रायट होता !

"या खुदा तेरी खुदाई
साली टिन की गाडी आई
और हमारा यार ले गई"

चित्रपटाच्या मुळ प्रती शिल्लक असतील(?) याबाबत शंका आहे. आहेत त्या प्रती अतिशय निकृष्ट, दर्जाहीन आहेत.
दुर्दैवाने याचे सारे श्रेय खुद्द दादांनाच जाते.

परन्तु अशा कारणासाठी उत्तमोत्तम व सुपरहिट मराठी चित्रपटांचा खजिन्यापासून जनसामान्य प्रेक्षक वन्चित राहणे योग्य वाटत नाही . >>> +१
ऑरिजिनलची डीव्हिडी मिळाली तर मी पैला घेईन.

अतिशय वाईट दर्जाच्या डिवीडी आहेत. मी मिळवायचे खुप प्रयत्न केले होते. दादांचे नंतरचे हिन्दी किंवा फारसे न चाललेले चित्रपट मिळतात. त्यांची क्वालिटीदेखिल ठिकठाक आहे पण सोंगाड्या किंवा राम राम गंगाराम, एकटा जीव सदाशिव सारखे चित्रपट मिळत नाहीत. मिळाले तर प्रिंट इतकी खराब असते कि मजा येत नाही.

सुरूवातीचे काही चांगले चित्रपट सोडले तर नंतर ते द्वयर्थीच्या जास्त नादी लागले त्यामुळे मिळायला पाहिजे तेवढी प्रसिद्धी नंतरच्या काळात मिळाली नसणार. तसेच झपाट्याने बदलणारा प्रेक्षकवर्ग हे सुद्धा मोठे कारण आहे. आताच्या तरूण पिढीला कळणार नाही आणि आवडणारही नाही कदाचित.
तसेच दादांच्या नात्यात असलेल्या एका स्त्रीने केवळ चित्रपटच नाही तर पब्लिक शोमधे पण त्यांचे काही करू देणार नाही, केल्यास त्याची जबर किंमत तिला मिळावी असे केल्यामुळे पण बरेच वेळा टि.व्हि.वर देखील त्यांचे चित्रपट येऊ शकले नाहीत असे ऐकिवात आहे.